Skip to main content

भिशी, काही प्रश्न

Published on गुरुवार, 14/07/2016
बचतगट, सहकार वगैरे विषयातील काही चर्चा विषय मनात होते पण विषयांचा तोच तो पणा नको म्हणून भिशीचा वेगळा विषय चर्चेसाठी घेऊन माहित नसलेल्या प्रश्नांबाबत माहिती करुन घेऊया असा विचार केला. भिशी म्हणजे दर महिन्याला ठराविक पैसे एकत्रकरून एकमेकांना वापरण्यास देणारा ग्रूप किंवा गट असे काहीसे स्वरुप असावे. महिन्याच्या भेटींना कुणाच्यातरी घरी किंवा अमुक ठिकाणी जमावयाचे छोटीपार्टी किंवा मनोरंजन मग त्या महिन्याचे पैसे ज्यास मिळतील तो मिळालेल्या पैसा आवडेल त्यासाठी वापरणार असे काही या भिशीचे स्वरुप असावे. मी स्वतः भिशी या प्रकारात कधी सहभाग न नोंदवल्यामुळे माझे वर्णन नक्किच तोकडे असणार. भिशीशी जवळून परिचय झालेली मिपाकर मंडळी या विषयी अधिक सांगू शकतील असे वाटते. हा भिशी प्रकार महिलांमधे आणि व्यापारी वर्गात अधिक प्रचलित असावा. भिशी प्रकाराची गृहीणींसाठी उजवी बाजू कमीतकमी औपचारीकेतून उभे रहाणारे पैसे जे कधी अडी अडचणिला कधी हौसे मौजेला -एक प्रकारच सेल्फ हेल्प ग्रूप द्वारे मायक्रो फायनासींग ! तर व्यापार्‍यांच्या बाबतीत खेळते भांडवल ज्यात कर न भरलेला पैसा सहज गुंतवता येतो कदाचित या माध्यमातून सावकारी करता येते तर क्वचित काही मार्केटींग स्कीमही दिसून येतात ! मुख्य मर्यादा तीन पहिली व्याजाचे आणि बचतीचे नुकसान - बँकेत अथवा पोस्टात दर महिना तेवढेच पैसे टाकले तर व्याज मिळते दुसरे दीर्घकालीन सुरक्षित बचत होते, भिशीची दुसरी समस्या पैशाच्या सुरक्षेचा अभाव -पहील्याच महिन्यात पैसे घेऊन जाणार्‍या व्यक्तिने पुढील महिन्यांचे हप्ते/ठरावीक रक्कम दिली न देता पोबारा केला तर काय? शेवटी सरकारच्या दृष्टीने महत्वाचा पण भारतीय भिशी हौशीं दुर्लक्षीलेला कि भिशी हा प्रकार कायद्याच्या परिघात बसत नाही अगदी अलिकडे २०१४ मध्ये महाराष्ट्रात भिशी विरोधी सरकारी मोहीम राबवत होते त्याची ही बातमी पहा. माझे प्रश्न १) आपला /आपल्या परिचितांचा भिशीशी जवळून परिचय झाल्या असल्यास भिशी म्हणजे काय ? भिशीचे स्वरुप कसे असते/ होते ? भिशी तुम्हाला आवडते का ? भिशीचे आकर्षण का वाटते ? तुमच्या मतानुसार भिशीचे फायदे तोटे कोणते ? २) भिशीला कायद्याच्या परिघात मान्यता का नसते ? भिशीला कायद्याच्या परिघात मान्यता असावी की नको आणि त्याबद्दल तुमची कारण मिमांसा काय ? ३) भिशीबाबत अजून काही चर्चा करण्या जोगे असल्यास जसे की तुमचे भिशी अनुभव, जसे की भिशीला इंग्रजीत काय म्हणतात, परदेशातही भिशी प्रकार असतो का ? तिथे त्याबद्दल काही कायदे आहेत का ? ४) कुणाला भिशि प्रकाराचा इतिहास माहित असल्यास अथवा शोधून देता आल्यास.

वाचन संख्या 21161
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

धागा टाकून पळण्यासाठी चुकवली, फाट्यावर न मारला जाणारा विषय घेतला की टका आले काका करत :), तेच ते विषय चघळले तर मिपा पब्लिकने फाट्यावर मारते या अनुभवातून गल्ली जानीवपूर्वक चुकवली. :) आता जरा लोकप्रिय विषय घेतलाय बघू मिपाकर काय म्हणतात बघू ! तरी सुद्धा फाट्यावर मारु शकतात कै ग्यारंटी नै. धागा टाकून पळा ..

कडता(लिलाव) भिशी हा प्रकार व्यावसायिकांना बरा वाटतो. ह्यामध्ये समजा २० सद्स्य असतील तर महिना परहेड १००० रु गोळा केल्यावर २०,००० जमतात. त्यातून चिट्ठ्या न टाकता ज्याला गरज आहे तो मागतो. ते मागणे एकापेक्षा जास्त सदस्याकडून असल्यास २०,००० पेक्षा कमीवर बोली लावली जाते. जी फरकाची रक्कम ती सर्व सद्स्यांना परत वाटून दिली जाते. कधी मागणी आधीच असल्यास मायनस (म्हणजे १००० पेक्षा कमी हप्ता बसतो) हि भिशी म्हणजे पेशन्सचे काम आहे. जो पेशन्स ठेवतो त्याचे नुक्सान न होता घातल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम मिळते. गरजूला थोडे नुक्सान होते पण पटकन पैसे अ‍ॅव्हेलेबल होतात.

In reply to by गवि

अहो गवि, आमच्याइथे परहेड लाखाच्या १०० मेंबराच्या महिन्यातून दोनदा लिलाव अशा भिश्या सर्रास चालतात. चक्क ३५ लाखापर्यंत खाली उचलली जाते भिशी. अर्थात ह्यात पण गैरप्रकार थोडेसे आहेतच. उदा. भिशी चालवणार्‍यनेच जास्त अकाउंट करायचे, समोरच्याची गरज बघुन लिलाव उतरावयाचा वगिअरे वगैरे. भिश्या उचलून बाजारात १० टक्क्याने फिरवणारे (खाजगी सावकार) लोक्स पण आहेत.

In reply to by गवि

वरील लिलाव पद्धतीच्या भिशीत काही इरसाल मेंबरं असतात. कुणाला किती नड आहे याची त्यांना बरोब्बर माहिती असते. मग हे लोक उगाचच बोली लावतात. आणि भिशी उचलू पाहणाऱ्याला कमी रक्कम कशी मिळेल ह्याचे कारस्थान करतात. एका लिलाव भिशीत अशा एका काडीसारूची चांगलीच खोड मोडली होती. लिलाव भिशीत जो शेवटचा नंबर घेतो त्याला पूर्ण रक्कम मिळते, शिवाय आधीच्या लिलावांमधील वाटली गेलेली रक्कमही दर महिन्याला मिळालेली असते. तेव्हा लिलाव भिशीत नेहमी शेवटी थांबावे.

In reply to by एस

रिंग करने मी बांधकाम व्यवसायीक (अर्थात गाववाले) आणि गुंठामंत्र्याम्ध्ये अनुभवले आहेत. १९९५ ते १९९७ भिशीतला अनुभवी नाखु नंतर भिशीवाल्यांच्या आपसांतील भांडणाने कुठलीच (लिलाव)भिशी लावली नाही. कंपनीत दोन वर्षामागे चिठ्ठी भिशीत भाग घेतला होता आता ती ही नाही.

माझी आहे एक भिशी.उद्देश फक्त आणि फक्त टाईमपास. रेस्टाॅरंट मध्ये जायच गाॅसिप करायच,खायच. जिची भिशी आहे ती ३ गेम्स अरेंज करते आणि येणे जाणे या साठीही कॅब बोलावणे कॅबचे पैसे देणे हे तिचे काम.घरी यायच्या आधी ग्रुप फोटो काढणे. भिशीचे पि पि फ किंवा पाॅलिसी हप्तासाठी वापरते.

भिशी बद्दल माझी माहिती ऐकीव आहे (माझा ड्रायवर फोनवर बोलताना, किँवा ट्राफिकजाममधे ड्रायवर राजकारण/समाजकारण/जिवणविषयक तत्वज्ञान उत्स्फुर्तपणे मतप्रदर्शनाच्या दरम्यान, मिळालेल्या साठ्यावर ) भिशी ही कॅज्युअल-लोन प्रकार आहे, नो फॉर्मॅलिटी जस्ट व्हर्बल काँट्रॅक्ट (म्हणून हा परिचितांमध्येच शक्यतो आयोजित केला जातो) सर्व सभासद आधी टेबल-रक्कम ठरवतात (उदा १२ सभासद प्रत्येकी १० हजार/प्रती महिना, १२ महिन्यांसाठी सर्वानीच भरायचे ... म्हणजे ऐकून टेबल रक्कम १ ला २० ह/प्रती महिना). ही रक्कम पहिल्या महिन्यात कोणाला वापरायला हवी, यावर सभासद बोली लावतात. उदा सभासद अ म्हणतो मी ५ हजार कमिशन देईन, जर मला ही टेबल रक्कम या महिन्यात मिळाली तर... दुसऱ्या कोण सभासदाला (ब याला) जर जास्त निकड असेल तर तो (सभासद ब) ५५०० रु अशी बोली लावतो.... याप्रमाणे जो जास्त बोली लावतो त्याला ती त्या महिन्यात वापरायला मिळते. वरील केस मधे ब ला १२० हजार त्या महिन्याकरिता वापरायला मिळणार, त्याबदल्यात तो ५५०० रु देणार, ते ५५०० उरलेल्या ११ सभासदांमधे समान वाटप होऊन वितरित होणार. एकदा रक्कम वापरायला मिळाली की पुढे उरलेल्या कालावधीत सभासद ब परत बोली लावू शकणार नाही. असे ते १२० ह दर महिन्याला नवीन सभासदाला वापरायला मिळणार (*सर्वानी वर्षभर दरमहा १० हजार जमा करायचेच असतात, चुकवून चालत नाही)

अजून एक घरगुती भिशीचा प्रकार असतो तो म्हणजे दर महिन्याला ठराविक रक्कम जमा केली जाते. उदा. ₹१००० हे १० सदस्य दर महिन्याला ठराविक तारखेला उदा. १० तारीख गोळा करतात. एकूण रक्कम ₹१०,०००. सर्वांच्या उपस्थितीत चिठ्ठ्या टाकून लहान मुलाच्या हस्ते एक चिठ्ठी उचलली जाते. त्यात ज्या सदस्याचे नाव निघेल त्याचा त्या महिन्यात नंबर. या प्रकारच्या भिशीत माझ्या निरीक्षणानुसार सुरूवातीच्या काही महिन्यांत भिशी लागली तर फायदा असतो, कारण नाहीतर हा बिनव्याजी रिकरिंग डिपॉझिटचा प्रकार बनतो.

अवांतरः माहीतीगारांकडुन माहीती मिळणे अपेक्षित आहे , माहीती घेणे नाही =)))) अतिअवांतरः ह्यावेळी उत्तरदायकत्वास नकार स्पेसीफाय करायचे राहिले असल्याने उत्तरदायकत्वस होकार आहे की काय असा समज होवु शकतो. महाअवांतरः वैजु वयनींची भिशी अशी एक कथा लिहिण्याची आयडीया मनात आली आहे ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

:) टका म्हणतात तसे गल्लीचुकली की माहिती कुठून राहील ? कधी कधी मुद्दाम गल्ली चुकवून माहितगारांना माहिती नसते/ नसू शकते याचा मनमोकळा प्रूफ देत असतो. बाकी तुमचा प्रतिसाद वाचून थोडसं बर वाटतय आपण गोष्टी विसरलो तरी इतर लोक आठवण करुन देतात :) उत्तरदायकत्वास नकार आम्ही मिपा प्रोफायलवर कायम स्वरुपी टाकलाच आहे. पण घाई घाईत प्रोफायल पहायचे वाचकाकडून राहून जाऊ शकते म्हणून कायदे विषयक बाबींची चर्चा करत असेन तर टाकत असतो. इथेही कायद्याची अल्प चर्चा शक्य असली तरी प्रत्यक्षात होण्याची शक्यता कमी असल्यामुळे उत्तरदायकत्वास नकाराची आठवण देत बसलो नाही तुम्ही आठवण करुन दिल्या बद्दल आभार :) :) बाकी वैनींची भिशी अन दादांची मिशी असे महाकथाकाव्य लिहिण्याचा योग अवश्य यावा या साठी शुभेच्छा. प्रतिसाद आणि चर्चा सहभागासाठी सर्वांनाच शुभेच्छा

आमच्याकडे दिवाळी भिसी हा प्रकार आहे. प्रति सदस्य दरमहा ठरलेलीच रक्कम जमा करायची. जमा होणारे पैसे गरजवंताला व्याजाने द्यायचे. मग दिवाळीला हे जमा होणारे व्याज प्रति सदस्य विभागुन अधिक मुद्दल वाटायचे. हे सर्व एक सदस्य करतो त्याला बाॅस म्हटलं जाते. कुणाचे पैसे आले नाही आले ही बाॅसची जबाबदारी असते. लिलाव भिसी मात्र ब्लॅकमेलचा प्रकार वाटतो. पण यात शक्य तेवढी उशिरा भिसी घेणाराला जास्त फायदा होतो.

In reply to by सत्याचे प्रयोग

प्रथमदर्शनी रोचक वाटते, पण बॉस प्रकरणच नव्हे त्याची जबाबदारीपण प्रथमदर्शनी दादा सारखी वाटते आहे. दुर्दैवाने या सगळ्या प्रकारांना कायद्याची व्यवस्थीत चौकट उपलब्ध केली जावयास हवी. कायद्याच्या चौकटीत निर्बंध हवेत आणि योग्य हवेत.

In reply to by माहितगार

The chit funds act 1982 बघा बाकी रात्री गोल्डमन दत्ता फुगे यांची चिट फंड घोटाळ्यात दिघीत खून झाल्याचे वाचले असेलच त्यावरून एकंदर या हिमनगाचीं कल्पना यावी.

In reply to by आदूबाळ

चिट फंड्स प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत. मुथूट फिनकाॅर्प, मुरुगप्पा ग्रुप, मार्गदर्शी चिट फंड्स ही काही मोठी नावं. तिथे तर जातनिहाय चिट फंड्स किंवा भिशी असते. आंध्र प्रदेशातले रेड्डी या व्यवसायात एकदम पुढे आहेत. तेच पैसे खाणी, हाॅटेल्स, सोनं, जमीन इत्यादींमध्ये गुंतवून त्यांनी आपली राजकीय ताकदही वाढवलेली आहे. कर्नाटकातील बेल्लारीच्या खाणींमुळे उजेडात आलेले रेड्डी बंधू मुळात यातूनच पुढे आले. त्यातला एक तर कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होता.

In reply to by आदूबाळ

विषय निघालाच आहे तर महिलांच्या लोप्रोफाइल घरगुती भिशांना चिटफंड कायद्याच्या कक्षेत बसवता येऊ शकते का ? त्यासाठी काय कार्यपद्धती कायद्याची चौकट स्विकारणे श्रेयस्कर या बद्दल जाणकारांनी माहिती दिल्यास बरे पडेल.

In reply to by माहितगार

सगळंच कायद्याच्या चौकटीत कशाला आणायचं? तसं पाहिलं तर २०० रु. च्या वर कुणाला रोख आहेर जरी केला तरी सरकारला तसे सूचित करावे असा (किमान सरकारी नोकरीवाल्यांसाठी ) कायदा आहे. कुणी करतं का तसं?

In reply to by साती

:)
सगळंच कायद्याच्या चौकटीत कशाला आणायचं?...कुणी करतं का तसं?
म्हणजे काय ?, लोक संकेत अथवा कायद्यांसाठी नाहीत आणि कायदे/ संकेत लोकांसाठी आहेत, कायदे/संकेत तयार करण्याच्या प्रक्रीयेत लोकांचा स'तर्क' सहभाग असेल तर लालफिताशाही शिवाय संकेत आणि कायदे समाजात रुळू शकतात. भिशीच्या बाबातीत संकेत/ आणि कायदे असण्याच्या नेमक्या गरजा माहित नाहीत, काही ठिकाणी भिशी प्रकार निर्मळ्पणे चालत असेल सर्वत्र आलबेल नसावे म्हणूनच कुठेतरी संकेत आणि कायद्यांची जरूरी असावी. एखादी गोष्ट बेकायदेशीरपणे करत राहण्याने समाजात कायद्याबद्दल अ‍ॅपथीची भावना निर्माण होते ती समाज धारणेस सयुक्तीक असते किंवा कसे या बद्दल विचार व्हावयास हवा.

माझ्या गुजराती मित्राने मला एकदा जबरदस्ती दोन महिन्याच्या एका भीशीत पैसे लावायला लावले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून दर आठवड्याला अमुक एक रक्कम देत होतो. त्याने त्याच्या पद्धतीने गेम खेळुन मला ऐंशी हजारावर वीस हजार कमवून दिले होते. तो त्यात मुरलेला असल्याने ते जमलं. मला हा प्रकार समजत नव्हता त्यामुळे रिस्की वाटला. आता आठवत नाही पण बहुतेक आठवड्याला दहा हजार का काहीतरी अशी भीशी होती. नक्की किती जण सामिल होते ते माहित नाही. पण सुरुवातीला अगदी साडेसात हजार भरायला लागले. मग पाचशे तिनशे अशी चढउतार होत होते. एकदाच दहा हजार पूर्ण भरले तेही शेवटच्या हफ्त्याला. एकूण फायदा वीस पंचवीस टक्के झालेला. "दोन महिन्यात वीस टक्के व्याज." जो कमी रक्क्म घेण्यास कबूल होतो त्याला आधी रक्कम मिळते. हा नियम असला तरी कुणाच्या तरी हिश्शातून आपण रक्कम कापून घेतो हे मनाला पटले नाही. मी तेवढा निर्ढावलेला नाही त्यामुळे असा फायदा योग्य वाटला नाही. एकदा पैसे कमवून गप्प बसलो परत कधी अशा भीशीच्या नादी लागलो नाही. मुस्लिम लोक धर्मानुसार व्याज घेत नाहीत. पण ह्या भीशीत ९० टक्के मुस्लिम होते. हे वर्तन विचित्र वाटले.

In reply to by संदीप डांगे

मुस्लिम लोक धर्मानुसार व्याज घेत नाहीत. पण ह्या भीशीत ९० टक्के मुस्लिम होते. हे वर्तन विचित्र वाटले. त्यात काय विचित्र आहे? मुस्लिम धर्मात सुरापान सुद्धा निषिद्ध आहे आणि आमचे झाडून सगळे मुस्लिम दोस्त पस्तीस होईपर्यंत ढोसतात.

In reply to by संदीप डांगे

मुस्लिम लोक धर्मानुसार व्याज घेत नाहीत. पण ह्या भीशीत ९० टक्के मुस्लिम होते. हे वर्तन विचित्र वाटले.
ते तेवढे कट्टर नसावेत. शेवटी धार्मिक कट्टरपणावर आर्थिक गरज किंवा आर्थिक फायदा हे नेहमीच मात करतात.

भिशी बेकायदेशीर आहे. त्यामुळे माहिती कशाला करून घ्यायची! ;) इन्कम टॅक्स वाचवून खेळते भांडवल उपलब्ध करून देण्याचा हा एक पैसेवाल्या लोकांचा मार्ग आहे. आता बेकायदेशीर आहे म्हटल्यावर माझा भिशीशी असा असा संबंध आलाय असे सांगणेही बेकायदेशीर आहे. नाही का? ;) पण जौदे, भारतात अशी (म्हणजे केवळ भिशीच नव्हे तर इतरही) पॅरलल ब्लॅक मार्केट इकॉनॉमी आहे म्हणून कितीही जागतिक इकॉनॉमिकल क्रायसिस आले तरी भारत तरून जातो अशी बर्‍याच जणांची लाडकी (आणि मला पटणारी) थिअरी आहे. गंमत म्हणून चालणार्‍या घरगुती लेवलच्या भिश्या असतात त्यात दर महिन्याला ठराविक पैसे जमवू ते पूर्णच्या पूर्ण एकाला द्यायचे आणि त्याने काहीतरी पार्टी द्यायची असा प्रकार असतो. खर्‍या बिझनेसमन्/वुमन्सच्या भिश्या असतात तो एकदम सॉलिड ऑर्गनाईज्ड प्रकार असतो. कुणाही सोम्या गोम्या कापसेला भिशीचा धंदा करणं जमत नाही. त्याकरिता मार्केटमध्ये तेवढी पत असावी लागते. आणि कुणी हप्ते भरले नाहीत तर वसूल करण्याइतकं गुंडांचं पाठबळ. समजा एक एक हजारांची १२ मेंबरांची एका वर्षाची भिशी आहे तर हा भिशीवाला एक पूर्ण हप्ता म्हणजे दर महिन्याला एक हजार रूपये भिशी चालवणावळ म्हणून स्वतःकडे ठेवतो. उरलेल्या अकरा हजारावरच काय तो क्लेम असतो. त्यात वर म्हटल्याप्रमाणे जो कमीतकमी पैसे मागेल त्याला पैसे दिले जातात. उरलेला पैसा फायदा म्हणून वाटण्यात येतो किंवा पुढच्या महिन्यात त्या प्रमाणात प्रत्येकी हप्ता कमी बसतो. काही वेळा ऑटो फायनान्स्/प्लॉट फायनान्स अश्या गोंडस नावाखाली या भिश्या चालवल्या जातात. त्यांचे रूल्स आणि रेग्युलेशन्स वेगळे असतात. आणि अगदी काही टर्म्स आणि कंडीशन्समध्ये बसवून त्यांना कायदेशीरही केलेले असू शकते. मी माझी पहिली वहिली स्कूटी अश्या ऑटोफायनान्स स्कीममधून घेतलेली आहे. पण अगदी कायदेशीर कागदपत्रे असतात. आणि लिमिटेड टू 'डिस्ट्रीक्ट ज्युरिस्डिक्शन ' असं स्पष्ट लिहिलेलं असतं. बाकी भिशीवाला जसा सोम्या गोम्या नसतो तसा भिशी मेंबरही कुणी ऐरा गैरा नसतो. मोठ्या भिश्यांमध्ये मार्केटमध्ये ज्याला पत आहे असेच लोक असतात. हा एक मोठा बिझनेस आहे. यात खूप रिस्क आहे. त्यापेक्षा आम्ही आमची आई म्हणते तो मार्ग वापरतो. 'कष्ट करून पोष्ट भरा' म्हणजे सरकारी स्कीमांमधून /लिगल व्यवहारांतच पैसे गुंतवणे कमी परतावा असले तरी श्रेयस्कर. ;)

In reply to by साती

भिशी बेकायदेशीर आहे. त्यामुळे माहिती कशाला करून घ्यायची!
भिशी कायदेशीर करुन घेण्याची गरज काय याचे अर्धे उत्तर मी वर दिलेच आहे, बँकींग आणि पोस्टातील रिकरींग बचतीची जागा भिशी व्यवस्थीतपणे घेऊ शकत नाही, पण माणसाची ग्रूप इंटर अ‍ॅक्शनची मानसिक गरज आणि कमीतकमी अटींवर मायक्रो फायनान्सींगची आर्थीक गरज भिशी भागवतात. कोणत्याही स्वरुपातील बचत हि बचत असते, भिशी मध्ये आर्थीकदृष्ट्या कमकूवत वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे ज्याचा बँकींग मध्ये अधिकृत सहभाग नाही, नियमीत बचत करणार्‍याची पतवृद्धी अधिकृत माध्यमातून नमूद झाल्यास अधिकृत फायनांन्सींगचे पाठबळ वाढत्या प्रमाणात देणे शक्य होऊ शकावे जे सध्या भिशी स्वरुपातील बचतीतून नोंद होत नसल्यामुळे होत नाही.

In reply to by साती

पण जौदे, भारतात अशी (म्हणजे केवळ भिशीच नव्हे तर इतरही) पॅरलल ब्लॅक मार्केट इकॉनॉमी आहे म्हणून कितीही जागतिक इकॉनॉमिकल क्रायसिस आले तरी भारत तरून जातो अशी बर्‍याच जणांची लाडकी (आणि मला पटणारी) थिअरी आहे.
विनोद म्हणून चांगला आहे अ‍ॅप्रिसीएटेड, इकॉनॉमीचे काही घटक जागतिक बाजारपेठेशी निगडीत नसतील तर जागतीक चढ उताराचा परिणाम होणार नाही यात इकॉनॉमी व्हाईट आहे का ब्लॅक आहे याचा प्रत्यक्ष संबंध अल्प असावा, हां हे खरे की व्हाईट इकॉनॉमी जागतीक बाजारपेठेशी लवकर संलग्न होऊ शकावी, पण जागतिक चढ-उतारातून तरून जाण्यासाठी तुमचे स्थानिक उत्पादन आणि स्थानिक बाजारपेठ मजबूत असणे हे महत्वाचे पॅरलल ब्लॅक मार्केट इकॉनॉमी स्थानिक उत्पादन आणि स्थानिक बाजारपेठ मजबूत करण्यास खुपशी सक्षम असू शकत नाही, भारतातल्या पॅरलल ब्लॅक मार्केट इकॉनॉमीतला बहुतांश पैसा ट्रेडींग आणि सर्वीसेस मध्ये लागतो - आणि वस्तु उत्पादनासाठी अधिकृत माध्यमातला पैसा कमी पडल्याने अधिकृत माध्यमात वस्तू उत्पादनासाठी लागणार्‍या भांडवलास चणचण जाणवेल , वस्तु उत्पादनासाठी लागणारा पैशाला अव्वाच्या सव्वा दराने पैसा उभा करावा लागल्याने अथवा न मिळाल्याने इकॉनॉमी कमकूवत होत असावी मजबूत होत नसावी किंवा कसे. असो.

In reply to by माहितगार

"असो"च्या आगोदर आख्ख्या वाक्यात एकच पूर्णविराम असल्यामुळे तुम्हाला काय म्हणायचं आहे ते नीटसं समजलं नाही ;) पण सातीताईंचा मुद्दा पटण्यासारखा आहे. पैसा ही जरा विचित्र गोष्ट आहे. पैशाचं आभिसरण (सर्क्युलेशन) आणि पैशाचं उत्पादन (क्रिएशन) ही एकच गोष्ट आहे. त्यामुळे ही समांतर काळी अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेपासून तुटली तरी आपापसांत आभिसरण होण्याने अर्थव्यवहार चालू रहातो. अवांतरः समांतर काळी अर्थव्यवस्था सशक्त असेल तर एकवेळ इन्फ्लेशन होईल पण डीफ्लेशन होणार नाही असा माझा दावा आहे. अर्थात मला कोण विचारतोय म्हणा ;)

In reply to by आदूबाळ

अवांतरः समांतर काळी अर्थव्यवस्था सशक्त असेल तर एकवेळ इन्फ्लेशन होईल पण डीफ्लेशन होणार नाही असा माझा दावा आहे. अर्थात मला कोण विचारतोय म्हणा ;)
अंशतः मान्य पण किमान काही प्रमाणात वस्तू उत्पादन होत असेल तर, मागणी आणि उत्पादनाचे प्रमाण आत्यंतीक टोकाचे होऊन अर्थव्यवस्था कोसळल्यास समांतर काळी अर्थव्यवस्था मदतीस येणार नाही उलट वस्तू उत्पादनासाठी भांडवल उपलब्ध न होण्यास अप्रत्यक्षपणे कारणीभूत असेल. समांतर काळी अर्थव्यवस्थेतला पैसा वर म्हटल्या प्रमाणे मुख्यत्वे ट्रेडींग आणि सर्विसेस मध्ये गुंतवला जातो, भ्रष्टाचारी लोकांच्या वस्तु खरेदीतून जेवढा पैसा वस्तु उत्पादनास जाईल तेवढाच. समांतर काळी अर्थव्यवस्था वस्तू उत्पादकांना वस्तू विक्रीतून उभा रहाणारा पैसा पुरवू शकते, पण बाजारातील एकुण मोठी मागणी पूर्ण करण्यासाठी वस्तू विक्री शिवाय मोठ्या भांडवल उभारणीची गरज भासते तेव्हा समांतर काळी अर्थव्यवस्था कितपत साहाय्यकारी होऊ शकेल ? (अती अवांतर सहसा काळ्या रंगाचा उल्लेख मी टाळत असतो पण चर्चेच्या ओघात वापरला गेला बद्दल क्षमस्व)

In reply to by माहितगार

हो, पण नॉक ऑन इफेक्ट असतातच ना. काळा पैसा --> ट्रेडिंग --> ज्या वस्तूचं ट्रेडिंग केलं गेलंय त्या वस्तूचं उत्पादन --> नफा --> कर काळा पैसा --> सर्व्हिसेस --> सर्व्हिस पुरवणार्‍यांना उत्पन्न --> त्यांनी केलेला खर्च --> ज्यावर ते खर्च करतात त्याचं उत्पादन --> नफा --> कर त्यामुळे जागतिक मंदीच्या काळातही भारतातल्या टॅक्स कलेक्शनच्या (अ‍ॅबसोल्यूट) आकड्यांवर फारसा परिणाम नव्हता असं आठवतं आहे.

In reply to by आदूबाळ

आणि पैशाचं उत्पादन ही एकच गोष्ट आहे - हे फारसं पटलं नाही. माझ्यामते पैसा हा मुळात फक्त आणि फक्त व्यक्तीच्या श्रमातून निर्माण होतो, अभिसरण म्हणजे असलेला पैसा फिरता राहणं. हा फिरणारा पैसा नवीन पैसा निर्माण करतो असं सकृतदर्शनी वाटत असलं तरी त्यात मूलतः माणसाचे श्रमच कारणीभूत असतात आणि हा फिरणारा पैसा नवीन श्रमाला फक्त उद्युक्त करतो असे वाटते.

In reply to by चतुरंग

न पटण्याचं कारण म्हणजे आपण वेगवेगळ्या गोष्टींविषयी बोलत आहोत. तुम्ही म्हणताय ती "व्हॅल्यू". ती माणसाच्या श्रमाने निर्माण होते हे मान्यच आहे. (लेबर थियरी ऑफ व्हॅल्यू) मी म्हणतोय तो "पैसा" - तुम्ही म्हणताय ती व्हॅल्यू साठवून ठेवायचं भांडं (स्टोअर ऑफ व्हॅल्यू). मनुष्यश्रमाने निर्माण झालेली व्हॅल्यू अ व्यक्तीकडून ब व्यक्तीकडे पोचवण्याचं साधन. आता व्हॅल्यू आणि ते साठवण्याचं भांडं यामध्ये बर्‍याचदा ताळमेळ नसतो. जर तो ताळमेळ १००% असता, तर इन्फ्लेशन वगैरे भानगडी उद्भवल्याच नसत्या.

In reply to by आदूबाळ

पैशावर टॅक्स भरला गेल्यास बर्‍याचदा काळापैसा म्हटले जाते आणि असा पैसा अर्थव्यवस्थेत राहीला तर काय हरकत आहे अशी भूमिका असते. पैशावर टॅक्स न भरल्याने अर्थशास्त्रीय समस्या गंभीर होतेच असे नाही प्रथम दर्शनी बरोबर वाटते, प्रॉब्लेम अर्थव्यवस्थेत असा पैसा किती आहे हे सांगणे आणि त्या दृष्टीने चलन नियमन करणे केंदीय बँक जसे की आर बी आय आहे त्यास कठीण जाते. काळा पैशाची इकॉनॉमी कंझम्शन अवलंबी असते, आणि महागाई हाताबाहेर वाढल्यास वस्तू उत्पादनाचे खर्च वाढून वस्तू उत्पादन करण्यापेक्षा आयात वस्तू स्वस्त होते आणि परकीय चलन साठ्यात अधिकच घसरण होऊन महागाईचे चक्र स्पायरल होऊ शकते, सेंट्रल बँकेचे चलन नियमन चुकले तर महागाई हाता बाहेर जाऊ शकते. वर जसे म्हटले तसा पैसा सुयोग्य प्रमाणात वस्तु उत्पादनाकडे वळत नसल्याने समस्या निर्माण होते. दुसरीकडे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हेलेपमेंटसाठी सरकारने पैसा करातून गोळा करण्या एवजी इतर मार्गाने उभा केल्यास तोही चलनवाढीस (महागाईस) कारणीभूत होतो. त्या शिवाय शस्त्र, ड्रग्स अशा क्षेत्रात काळा पैसा लावला जाऊन सरकारे आणि मुख्य म्हणजे अशांतता पसरू शकते. अशांततेचा एक परिणाम आर्थीक प्रगती झाली तरी प्रगतीचा लाभ सामान्य जनते पर्यंत पोहोचवणे कठीण होऊन बसू शकते. असो

In reply to by आदूबाळ

किंमती वाढल्यामुळे वस्तू विकत घेणं परवडणार नाही आणि economic disparity वाढत जाईल. जास्तीत जास्त नफा कमावण्यासाठी उत्पादक माल निर्माण करतील पण क्रयशक्ती कमी झाल्यामुळे तो विकला जाणार नाही आणि त्यातून हा बुडबुडा फुटून deflationary pressure निर्माण होऊ शकतं. अमेरिकेच्या real estate market चा बुडबुडा जसा फुटला तसं. समांतर काळी अर्थव्यवस्था आणि मलेरिया यांच्यात फार आश्चर्यकारक साम्य आहे. तिथे ताप चढणं आणि उतरणं या सायकलमुळे रुग्णाला अशक्तपणा येतो. इथे अर्थव्यवस्थेचं तेच होतं. अर्थात इथे सरकार समांतर काळ्या अर्थव्यवस्थेला झिंबाब्वेप्रमाणे नोटा छापून उत्तेजन देत नाहीये हे assume करावं लागेल.