Skip to main content

कपालभातीं, प्राणायाम

लेखक अर्जुन
Published on गुरुवार, 21/04/2016
मला खुप वर्षांपासून सायनसचा त्रास आहे. मला त्यावर आमच्या ओळखींच्यानी कपालभातीं, प्राणायाम करण्यास सांगितले. माझा सायनसचा त्रास खुपच कमी झाला, पण त्यामूळे मला कमी रक्तदाबचा त्रास सुरु झाला आहे. कपालभातीं, प्राणायाम न थांबवता रक्तदाब नियमित कसा राहील ?

वाचन संख्या 1594
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

http://www.misalpav.com/node/35726 येथे अगोदरचे दिसत आहेत. काय प्रकार आहे कळत नाहीय्ये. मला वाटते की, http://www.misalpav.com/node/35726?page=1 या ऐवजी http://www.misalpav.com/comment/reply/35772 असे झालेय.

एक सोपा उपाय करून बघा....रात्री जेवण झाल्यावर गुळ-तूप खायचे ....चांगले चघळून खा...सुमारे ५-६ दिवस खा...सायनस नक्की कमी येईल...झालेच तर कायमचा थांबेल ...या काळात कपाळ भाति बंद करणे शक्य असेल तर करा म्हणजे नक्की याचा परिणाम झालाय याला बळकटी मिळेल....काय अनुभव येतोय कळवा.

पुतळाचैतन्याचा, अत्यंत आभारी आहे. मी उपाय करुन बघतो आणि अनुभवही कळवीन.कमी रक्तदाबावर माहीती असल्यास तोही जरुर कळवणे.

In reply to by अर्जुन

रक्त दाब हा विषय फार गुंतागुंतीचा आणि धोकादायक मानला जातो...आपले वय आणि पार्श्वभूमी पाहून आपण डॉक्टरचा सल्ला घ्यावा...जर आपण तरुण असाल आणि भरपूर फिरणारे असाल तर फारशी काळजी करायचे कारण नाही...मीठ जास्त खाल्ले तर रक्त दाब वाढतो...पण आपण डोक्तारी सल्ल्याने ह्या गोष्टी कराव्यात