Skip to main content

पुरोगाम्यांचे सण-रुढी परंपरा

लेखक वडापाव यांनी गुरुवार, 14/04/2016 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
पुरोगामी होऊन जुन्या रुढी परंपरांना छेद द्यावा अशी अगदी योग्य भूमिका मांडणारी बहुतेक मंडळी कधीकधी मात्र कोड्यात टाकतात. होळी दहन करून होणा-या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त करतात आणि मनुस्मृती दहनासाठी मात्र सगळ्यांनी पुढे येण्याचं उत्साहानं आवाहन करत बसतात. असं करून आपण ज्या विचारसरणीला विरोध करतो तिचा पुरस्कार करणा-या मनुस्मृतीचा खप आपणच वाढवतोय हे का बरं दिसत नाही यांना? हे म्हणजे दिवाळीला आंघोळ करताना नरकासूर (नरकासूरच ना?) फोडण्यासारखंच आहे. विविध धार्मिक सणांच्या सार्वजनिक साजरीकरणामुळे होणा-या वाहतुकीच्या कोंडीबद्दल आणि एकूणच गोंगाटाबद्दल बोंब मारताना आपणही आंबेडकर जयंती/मयंतीला तेच करतो/तेच करण्याचं आवाहन करतो/तेच करण्याचा पुरस्कार करतो हे सोयीस्करपणे विसरताना लाज नाही वाटत?? नेमकं तेव्हाच कसं भावना महत्त्वाच्या होतात?

वाचने 12603
प्रतिक्रिया 98

प्रतिक्रिया

In reply to by mugdhagode

ज्यांच्यावर चिखल्फेक करायला हा धागा काढलाय त्यांचे दैवत डॉ. बाबासाहेबानी कायदे केल्याने आताशी ५० वर्षात हे अधिकार मिळालेत. आणि चालले इस्लाम ,बौद्ध व पुरोगाम्यांवर टीका करायला ! असल्या कुंभकर्णी समाजाला जागं करायला एक दिवस लावला डीजे जोरात तर बिघडलं कुठं ?
यातलं खरे काकांना उद्देशून नेमकं काय होतं? धागा काढण्याच्या उद्देशाबद्दल तुम्हाला व काहीजणांना शंका वाटतेय म्हणून मी माझं स्पष्टीकरण दिलं. मी काही आंबेडकर विरोधी नव्हे. उलट त्यांचे जितके विचार वाचलेत त्यांमुळे भारावलो आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांची पुस्तकं वाचून काढण्याचा संकल्प केलाय. असो. धाग्याचं नाव पुरोगाम्यांचे सण न ठेवता फुरोगाम्यांचे सण ठेवायला हवं होतं असं मी आधीच म्हटलं. खरेखुरे पुरोगामी जे जनजागृतीचं कार्य करत आहेत त्यांच्याबद्दल कायम मनात प्रचंड आदर राहील. अगदी वेगळ्या, न पटणा-या विचारप्रवाहातले असूनही प्रत्यक्षात चांगलं, समाजाच्या हिताचं काम करणा-या माणसांबद्दलही भरपूर आदर आहे (मी तर नुसताच विचार करतो काम तर काही करत नाही. उदया मी चुकून त्यांच्याहून जास्त काम करू शकलो तरी आदर कायम राहील). पण आत्मावलोकनाची/आत्मपरीक्षणाची गरज सगळ्यांनाच असते. एकीकडे आपण समाजाला भावनेच्या आहारी न जाता विवेकाधारित जीवनशैली अनुसरण्याचे सल्ले द्यायचे आणि दुसरीकडे आपणच भावनांच्या नावाखाली भलभलत्या उचापत्यांचा उदो उदो करायचा? किंवा अनुल्लेखाने विरोध करणं टाळायचं? कशासाठी? इथे जे हिंदु-मुस्लीम पेटलंय त्यावरही माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे, पण जे म्हणेन ते तुमच्यासाठी नवीन नसेल आणि हा धागाही त्याबद्दल नाही त्यामुळे मी यात माझी मतं मांडत नाहीये. तरी तुमच्या चर्चेतून बरंच नव्याने कळतंय त्यामुळे ही चर्चा सुद्धा या धाग्यामार्फत एकीकडे सकारात्मक निष्कर्षाप्रत चालू राहावी असंच वाटतं.

In reply to by mugdhagode

इथे कोणीही (तुमच्याशिवाय) त्रास करून घेत नाहीये. जरा घराकडे लक्ष दिलंत तर तुम्हालाही बरे दिवस येतील. सासरा काय म्हणतो म्हणे तुमचा?

In reply to by mugdhagode

मोगा खान हिंदू धर्मातील एकही ग्रंथात कर्मकांडाचे तुम्ही प्राणपणाने पालन केलेच पाहिजे किंवा हाच अंतिम ग्रंथ आणी इथे लिहिलेले आहे तेच अंतिम सत्य असे लिहिलेले नाही. ५००० वर्षापूर्वीचा धर्म प्रवाही तरी आहे १४०० वर्षापूर्वीचा धर्म जसा त्याच काळात अडकून पडला आहे कि अजून १४०० वर्षे तरी महिलांना कोणतेही अधिकार मिळण्याची शक्यता नाही. वर तुम्ही त्याचे समर्थन करता आहात हा केवळ पुरुषी अहंकार आहे. मी बौद्ध धर्मावर किंवा "प्रामाणिक" पुरोगाम्यांवर कुठे टीका केली हे दाखवून द्या. मी फक्त राही ताई शाहबानो केस मध्ये राजीव गांधींचे लंगडे समर्थन करतात त्यावा टीका केली आहे. आणी तुम्हाला कायद्याच्या भाषेचा नीट अर्थ लावता येत नसेल तर कुणा कायदेपंडिताकडून लावून घ्या. भारतीय दंडविधान संहिता आणी मुस्लीम वैयक्तिक कायदा यात फारकत करून दंड विधान संहिता मुसलमानांना लागू होते आणी म्हणून मुस्लीम वैयक्तिक कायदा दंडविधान संहितेच्या आड येऊ शकत नाही असा स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. Before Memory Fades हे श्री फली नरिमन या अतिशय उच्च घटना पंडितांचे आत्मचरित्र जरूर वाचा आणि मग असे फालतू श्लेष काढा. http://www.amazon.in/Before-Memory-Fades-An-Autobiography-ebook/dp/B005… येथे उपलब्ध आहे. किंवा "आधुनिक भारतावर सखोल परिणाम करणारे १० महत्त्वाचे खटले" हेही पुस्तक वाचून पहा http://www.freepressjournal.in/ten-cases-that-impacted-modern-india/248… किंवा वेळ असेल तर माझ्याकडे आहेत ती येउन घेऊन जा. किंवा डी जे वर अथवा मागासवर्गीयांवर कुठे टीका केली ते दाखवून द्या उगाच वडाची साल पिंपळाला लावू नका . वादात हार मानण्याची तुमची दिलदार वृत्ती नाहीच म्हणून फाटे फोडणे बेफाट आरोप करणे विसंगत विधाने करणे असे केले जाते आणी मग अशी "चिडचिड" होते.

आंबेडकर जयंतीला काही कार्यकर्त्यांनी डिजे, मंडप, मिरवणूका ई. गोष्टींना फाटा देवून विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटली आहेत. दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत केली आहे. झापडं जर्र्र्रार्र्रा बाजूला केली तर असे प्रश्न 'उठणार' नाहीत ;)

In reply to by भीमाईचा पिपळ्या.

तुमच्या ओळखीचे कोणी असतील तर त्यांना अभिनंदन सांगा जरा! सगळ्या गणेसोत्सव दहीहंडी वगैरे मंडळानी असे उपक्रम केले तर कितीतरी बरे!

In reply to by भीमाईचा पिपळ्या.

आक्षेप त्या 'काही' कार्यकर्त्यांना करताना दिसतोय का मी?? मुठभर लोकांनी डीजे, मंडप, मिरवणुका इ. गोष्टींना फाटा दिला म्हणजे समस्त सण साजरीकरणाच्या पद्धती चांगल्या झाल्या का?

आज मूठभर आहेत उद्या अजुन वाढतील. हाही एक सकारात्मक बदल म्हणून किमान आपण दखल घेवू शकतो ना. वरती राही ताईचा प्रतिसाद म्हणजे 'मंथूनी नवनिता'... आहे. खरंतर त्या प्रतिसादानंतर इथे चर्चा करण्याचे प्रयोजणच उरत नाही. :) @ पैसा ताई, काल 'ती' बातमी टिव्हीला पाहीली. सोलापूरची बातमी होती. इथे सोलापूरचे कोणी सदस्य असतील सविस्तर सांगतील ते. बाकी ते दहिहंडी, गणेशोत्सव बद्दल नाही पटले. त्या आमच्या पिढ्यांनपिढ्यांच्या परंपरा आहेत. तुम्ही हिंदूधर्माच्या रूढीपरंपरांबद्दल लिहायला नको होते ;)

विविध धार्मिक सणांच्या सार्वजनिक साजरीकरणामुळे होणा-या वाहतुकीच्या कोंडीबद्दल आणि एकूणच गोंगाटाबद्दल बोंब मारताना आपणही आंबेडकर जयंती/मयंतीला तेच करतो/तेच करण्याचं आवाहन करतो/तेच करण्याचा पुरस्कार करतो हे सोयीस्करपणे विसरताना लाज नाही वाटत??
मुठभर लोकांनी डीजे, मंडप, मिरवणुका इ. गोष्टींना फाटा दिला म्हणजे समस्त सण साजरीकरणाच्या पद्धती चांगल्या झाल्या का?
वरती नानाने म्हटल्याप्रमाणे 'दुखणे वेगळेच' दिसते आहे.

अग्गोबाई मुगोबाई, वाचायला शिकल्यात का हो ताई? तुम्ही भले शिकल्या असाल वाचायला, पण आम्हाला निरक्षर समजता काय? तुमचं हे विधान धादांत असत्य आहे : >> दहा हजार वर्षाचे वय असलेल्या धर्मात विवाहीत मुलीला संपत्तीत अधिकारच नव्हता. पिता रक्षति कौमार्ये ..... वगैरे मनुस्मृतीत मुलीला पित्याच्या संपत्तीत वाटा दिला आहे. शिवाय बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल मनुस्मृतीवर आधारलेलं आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बाबासाहेबांच्या हिंदु कोड बिलाचे क्रेडिट मनुस्मृतीला ! किती कोड ( गे) आहात हो पैलवान तुम्ही !

In reply to by mugdhagode

मुगोबाई, श्रेय दिल्याचं ते बाबासाहेबांनीच म्हंटलंय. आ.न., -गा.पै.

In reply to by mugdhagode

मुगोबाई, तुम्ही दुवा दिलेल्या लेखाची सुरुवात तुफान विनोदी आहे. म्हणे मनुस्मृती हे ब्राह्मणधर्माचं पुस्तक आहे. मनु क्षत्रिय होता हेही माहीत नाही. फार छान! मेकॉलेछाप शिक्षण घेतलं की असे मस्तपैकी तारे तोडता येतात. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मनु कोण होता , हे इथे महत्वाचे नाही .. मनुस्मृतीतील लिखाणाबद्दल बोला.

In reply to by mugdhagode

जरा उठून एक सर्वे करा, किती हिंदुना मनुस्मृति माहीत आहे ते. त्याचबरोबर कितिना कुराण माहीत आहे ते. ज्याना कुराण माहीत आहे ते कितिशे त्याचे पालन करतात कारण जर पालन करायला गेले तर जगणं मुश्किल होईल. बाकी तुम्ही असे टीनपाट प्रतिसाद टाकताना माफ़ी म्हणुन कलमा पढता काय?

In reply to by mugdhagode

हो का मुगोबाई ! मनु कोण होता ते महत्त्वाचं नाही म्हणता? मग मनुवादी म्हणून शिव्या कोणाला हासडतात बरं? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

घोड़े साहेबाना आधी ते कोण आहेत ते ठरवू दे मग पुढ़च बघू. दुधात चिंचेचि चटणी घालून पिणारे हे, यांना काय धर्म कळणार!

In reply to by सूड

खालील दिलेल्या लक्षणांपैकी एक किंवा अधिक लक्षणे असणारे भारतात "पुरोगामी" या सन्माननीय पदवीने गौरविले जातात. - हिंदू वगळता इतर धर्मियांची श्रद्धास्थाने, त्यांची संस्कृती, त्यांच्या चालीरिती, त्यांचे धर्मग्रंथ इ. बद्दल अतिरेकी श्रद्धा ठेवणे. या धर्मातील वाईट चालीरितींबद्द्ल बोलणार्‍यांचा तिरस्कार. - हिंदू धर्मातील चिन्हे, धार्मिक ग्रंथ, सण, उत्सव इ. बद्दल तिरस्कार. हिंदू या शब्दाबद्दल घृणा. - हिंदू हा धर्मच नाही, हिंदू हेच खरे अत्याचारी होते, हिंदू हेच खरे आक्रमक होते, त्यांनीच हा धर्म स्थानिकांवर लादला, तेच दंगली करतात व अल्पसंख्याकांचे शिरकाण करतात. इ. इ. चा गोबेल्स तंत्राने सर्वत्र प्रचार करणे. - इतर धर्मियांना त्यांच्या अंधश्रद्धातून दूर करण्याऐवजी सतत हिंदूंची भीति दाखवून भयभीत ठेवणे. हिंदूंच्या पक्षपातामुळेच तुम्ही अजून गरीब व मागासलेले आहात हे असा सतत प्रचार करणे, हिंदू, भारतीय संस्कृती, वेदपुराणे, गीता, योगसाधना, भक्ती, उपासना असा कोणताही शब्द उच्चारणार्‍यांना जातीयवादी/मनुवादी/संकुचित अशी विशेषणं लावून त्यांचा उपहास करणे. - २६/५/२०१४ पूर्वी देश अत्यंत सहिष्णु होता. परंतु या दिवसानंतर देशात कमालीची असहिष्णुता आली आहे, विचारवंतांचा गळा घोटला जात आहे, फॅसिस्ट राजवट आली आहे, विचारस्वातंत्र्य नष्ट झाले आहे इ. प्रचार करणे. - हिंदूंवर टीका करणारी पुस्तके, हिंदू देवदेवतांची विटंबना करणारी चित्रे इ. प्रकारांना, प्रतिभाशाली कलाकाराच्या उस्फूर्त प्रतिभेचा अमूर्त आविष्कार, कलाकारांचे अभिव्यतीस्वातंत्र्य इ. भरजरी शब्द वापरून पाठिंबा देणे व जेव्हा इतर धर्माच्या बाबतीत असे प्रकार घडतील तेव्हा तातडीने अशा कलाकृतींवर बंदी घालण्यासाठी आंदोलन करणे. - हिंदूंविरूद्ध बोलणारे व इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींकडे दुर्लक्ष करून त्यांना पाठबळ देणारे तेच फक्त मानवतावादी, लोकशाहीवादी, पुरोगामी, निधर्मी आणि विचारवंत आणि हिंदूंच्या बाजूने बोलणारे, इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींवर टीका करणारे ते जातीयवादी, बुरसटलेले, कर्मठ, सरंजामशाही, धर्मांध व प्रतिगामी विचारांचे अशी सरळसरळ समाजाची दोन भागात विभागणी करणे. - हिंदूंवर इतर धर्मियांकडून अत्याचार होतात तेव्हा तोंडात मिठाची गुळणी घेऊन, डोळे मिटून व दोन्ही कान झाकून गप्प राहणे व इतर धर्मियांवर हिंदूंकडून साधा ओरखडा उमटला तरी बेंबीच्या देठापासून किंचाळून आक्रोश करणे. - बॉम्बस्फोट करून निरपराध नागरिकांचे प्राण घेणार्‍या अतिरेक्यांच्या फाशीचा "न्यायालयीन हत्या" असा प्रचार करून छाती पिटत विरोध करणे. वरीलपैकी एक किंवा अधिक लक्षणे दिसतात त्यांनाच "पुरोगामी" म्हणतात.

In reply to by श्रीगुरुजी

गुर्जी , तुम्ही फारच विचार करता ब्वां . पुरोगाम्यांचा भलताच अभ्यास दिसतोय तुमचा .

In reply to by नुस्त्या उचापती

त्यांची अवस्था रावणासारखी झाली आहे.. श्री मत कहो , राम का नाम मत लो ... असे रावण दिवसातुन इतक्या वेळा ओरडायचा की त्यातूनच त्याचे तोंडुन रामनाम बाहेर पडुन तो मोक्षास व सद्गतीस गेला.

In reply to by mugdhagode

त्यांची म्हणजे गुरुजींची... गांधी , नेहरु , खुदा , येशु , बाबासाहेब यांचे स्मरण गुरुजी व तत्सम लोक रोज इतक्या वेळा करतात की त्यातूनच त्यांचा पुण्यसंचय वाढत राहील.

In reply to by mugdhagode

मुगोबाई, तुम्ही हरामखोर हे विशेषण पुन्हापुन्हा उच्चारून पुण्यसंचय करता ना? बरोब्बर ओळखलं की नाही? आ.न., -गा.पै.