Skip to main content

त्‍न की त्न कोणते लेखन अधिक बरोबर (प्रमाण) समजावे?

लेखक माहितगार यांनी रविवार, 20/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भाषेतील जोडाक्षर लेखनाच्या पाच पद्धती आहेत.* आडवी बांधणी आणि उभी बांधणी हे प्रमुख प्रकार. (त्+न=त्‍ + न =) त्‍न हे जोडाक्षर असलेले मराठी भाषेत केवळ पत्‍नी, यत्‍न आणि रत्‍न तीनच शब्द वापरात आहे. चौथा शब्द अरत्‍नी असा आहे, अर्थ - कोपरापासून ते करंगळीच्या टोकापर्यंतचे अंतर. पण हा शब्द फारसा वापरात नाही. . . . . . marathi jodakhare tna . . . . . मराठीमधील पत्‍नी, यत्‍न आणि रत्‍न या नित्याच्या तिनच शब्दांचा प्रश्न असला तरीही त्यांच्या लेखन कसे करावे या बारकाव्या वरुन मराठी विकिपीडियावर अशात चर्चा रंगली त्‍नी, यत्‍न आणि रत्‍न हे आडव्या बांधणीचे लेखन बरोबर की त्नी, यत्न आणि रत्न हे उभ्या बांधणीचे लेखन बरोबर ? * आडव्या बांधणीची बाजू ** आडव्या बांधणीतील त् आणि न वेगवेगळा जोडलेला दिसणे अधिक वाचक सुलभ वाटते. ** उभ्या बांधणीतील लहान फाँटातील त्न नसरावलेल्या वाचकास त्र सारखा वाटून तो वाचताना गोंधळू शकतो तसे आडव्या बांधणीतील त्‍न चे होत नाही ** मुद्रित प्रकाशनांमध्ये मुख्यत्वे आडव्या बांधणीचा त्‍न प्रचलीत आहे. (आंतरजाला वर आडव्या बांधणीचा त्‍न प्रमाण म्हणून वापरावयाचा झाल्यास बहुतेक मराठी टंकन सुविधांमध्ये बदल करावे लागतील.) * उभ्या बांधणीच्या त्न ची बाजू ** उभ्या बांधणीतील त् आणि न एकाखाली एक दिसणे दिसणे अधिक वाचक सुलभ वाटते. ** आडव्या बांधणीतील लहान फाँटातील त्‍न नसरावलेल्या वाचकास ल सारखा वाटून तो वाचताना गोंधळू शकतो तसे उभ्या बांधणीतील त्न चे होत नाही ** आंतरजालावरील टंकलेख्नन सुविधांमध्ये मुख्यत्वे उभ्या बांधणीचा त्न आहे. उभ्या बांधणीचा त्न चालू ठेवल्यास टंकन सॉफ्टवेअर मध्ये बदल करत बसण्याची गरज पडणार नाही. प्रश्न १) शासकीय किंवा इतर कोणत्या संस्थेकडून कोणते टंकन प्राधान्याचे (अथवा प्रमाण) आहे या बद्दल काही संकेत उपलब्ध आहेत का ? प्रश्न २) कोणत्या त्न चे लेखन प्रमाण असावे असे तुम्हाला वाटते त्‍न चे की त्न चे आणि का ? मराठी जोडाक्षर लेखन प्रकार * मोडी * विशेषाक्षरे जसे क्ष, श्र * अक्षरांचे पाय मोडून * आडवी बांधणी त्‍न * उभी बांधणी त्न चर्चा सहभागासाठी आणि अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्याआभार. आपले या धाग्यावरील प्रतिसाद प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जातील.

वाचने 3861
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

आडव्या बांधणीची अक्षरे वाचायला अन समजायला सुलभ जातात. अशा अक्षरांची वारंवारिता जास्त नसल्याने जास्त जागा अडवली जात नाही तस्मात आडवी बांधणी योग्य. त्त ह्या अक्षराला हाच नियम लावावा. मात्र ठ ला ठ लावलेले एकाखाली एक असावे. मु द्दा सारखे. अवांतर करतोचः ऑनलाइन लिखाणात सध्या त्र एवजी वेगळेच कॅरेक्टर वापरणात येते, त्याविषयी प्रबोधन झाल्यास अधिक उत्तम. फार खटकते ते नजरेला.

छापील अक्षरांत जेव्हा अक्षरांचे /जोडाक्षरांचे खिळे वापरताना जे स्वातंत्र्य होते ते आता कळफलक टंकनात मिळत नाही.चूक बरोबर माहिती असूनही मला हवे तसे जोडाक्षर उमटवताच येत नाही.जाहिरातीचे फलक लिहितांना/रंगवतांना मात्र शक्य आहे. मला "वांग्मय" शब्द टंकताच येत नाही.कॅापी पेस्ट करावा लागतो. शुद्-ध जोडाक्षरांचा आयताच तक्ता इथे मिपावर लेखन सहाय्य म्हणून देता येईल का?

वाङमय वा + शिफ्ट जी + एम + ए + वाय

ञ हे कॅरेक्टर त्र एवजी वापरले जाते अशी तक्रार माझी होती. अक्षरांच्या उत्पत्तीचे जरासे लॉजिक वापरले तर गमभन सारखा सोपा लेआउट नाही. आम्हाला इन्स्क्रीप्ट ची सवय असल्याने अवघड जाते जरासे ते सोडा. ज्ञ = ज+य ज्ञ = द + न + य ह्र = ह + र ॠ = शिफ्ट र + य आणि बरेच इतर

In reply to by अभ्या..

हे एक सानुनासिक आहे. उच्चार करताना सामान्यत: हवा तोंडातून, मुखविवरातून बाहेर पडते, पण हवा बाहेर पडताना काही हवा नाकाच्या मार्गानं बाहेर पडत असेल तर तो जो विशिष्ट, वेगळा आवाज असतो त्याला सानुनासिक उच्चार म्हणतात, नासिकेच्या मार्गानं हवा बाहेर पडल्यामुळे होणारा विशिष्ट आवाज. अशा प्रकारच्या स्वतंत्र आवाजासाठी देवनागरी लिपीत ड्:, ञ, ण, न, म ही पाच अक्षरं आहेत. याखेरीज इतर ध्वनींची उच्चार करतानाही काही हवा नाकाच्या मार्गानं बाहेर पडली तर जो उच्चार होतो तोही सानुसासिकच असतो, त्यासाठी याच ड्:, ञ, ण, न, म अक्षरांचा उपयोग केला जातो. जुन्या काळी यत्रांची सोय म्हणून ड्:, ञ, ण, न, म या अक्षरांचं अर्ध रूप वापरून केलं जाणारं शास्त्रीय लेखन अवघड जात असे, म्हणून त्या त्या अक्षरावर अनुस्वार देऊन लेखन सुरू झालं (अङ्क – अंक, सचय – संचय, खण्ड – खंड, सन्थ – संथ, अम्बा – अंबा,) सानुनासिक उच्चार दाखवण्यासाठी अनुस्वाराचा / टिंबाचा उपयोग फक्त य, र, ल, व, श, ष, स, ह या अक्षरांच्या संदर्भातच होतो. (उदा. वंश, संसार, संस्कार, सिंह, हिंसा इत्यादी. या ठिकाणी अनुस्वार टाळून एखादा अनुनासिक वर्ण वापरणं शक्यच नसतं.) सर्वसामान्यांच्या सोयीसाठी शास्त्रीय नसलेलं हे अक्षरावर टिंब देण्याचं लेखन आजही सुरू आहे. मूळचं शास्त्रीय लेखन आता संगणकाच्या युगात मुळीच अवघड राहिलेलं नाही, कारण संगणकामुळे अनेक अक्षरं आणि खुणा वापरण्याची सोय आता त्याच कळफलकावर उपलब्ध झालेली आहे. - प्रहार.इन या साईटवरून साभार! Sandy

In reply to by चांदणे संदीप

- प्रहार.इन या साईटवरून साभार!
अच्छा, असं आहे का ! क्षणभर आम्हांस वाटले आपण व्याकरण कोळून प्यालेले मराठीचे नामांकीत प्राध्यापक वगैरे आहात की काय ;)

In reply to by जव्हेरगंज

कोळून प्यायची वगैरे गरज नाही हो! आमच्या सुदैवाने मराठीची गोडी लावणारे शिक्षक आम्हांला लाभले व त्या गोडीनेच पुढे कधीतरी हे माहित करून दिलेले, त्यामुळे माहित तर होते पण योग्य शब्दांत कदाचित सांगता आले नसते म्हणून प्रहारची मदत घेतली व माझे टंकायचे श्रमही वाचले! :)

In reply to by चांदणे संदीप

कारण संगणकामुळे अनेक अक्षरं आणि खुणा वापरण्याची सोय आता त्याच कळफलकावर उपलब्ध झालेली आहे.
आपण सर्व बारकाव्यांकडे लक्ष देत नाही. हे अंशतःच बरोबर असावे या विषयातील जाणकार - जसे आमचे मराठी विकिपीडियाचे शुद्ध लेखन प्रेमी सदस्य:ज तुम्हाला 'बात अभी बाकी है' असे सांगणारा मेगाबायटी प्रतिसाद आवर्जून देतील. त्यांच्या चर्चेतला मी त्न फक्त इथे चर्चेस घेतला आहे त्याची आडवी बांधणी बहुतांश उपलब्ध टंकन पद्धतीतून टंकता येत नाही.

१) लेख शीर्षकात दोन्ही त्न वेगवेगळे दिसावयास हवेत कारण प्रत्यक्षात ते वेगवेगळे आहेत. २) लेख शीर्षक सोडून; उर्वरीत मिपा संपादन खिडकीत टंकताना मला त्न आडव्या बांधणीचा दिसतो प्रकाशित केल्यावर मात्र उभ्या बांधणीचा दिसतो आहे. असे इतरांनाही होते आहे का ? मी विंडोज १० + फायरफॉक्स ज्या काही लेटेस्ट आवृत्ती आपोआप अद्ययावत होतात त्या वापरतो आहे.

In reply to by माहितगार

त्न की त्न
यातले दोन्ही (त्न की त्न ) मला सारखेच दिसत आहेत. ऊभ्या बांधनीचे. आडव्या बांधनीचा एकही दिसत नाही या धाग्यावर. पण कसा लिहीतात ते माहीत आहे. म्हणून काही विचारलच नाही . opera mini browser.

In reply to by माहितगार

त्न स्क्रीनवर कसा उमटेल... हे बहुदा तुम्ही कोणता/ती फाँट (अक्षरसंच) वापरता यावर अवलंबून आहे. जोडाक्षरे नेहमी जोडाक्षरे (उदा: त्न) म्हणूनच बघायला आणि वाचायला सुलभ वाटतात.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@डॉ सुहास म्हात्रे उभी मांडणी वाचनास सुलभ असेच आपणास म्हणावयाचे आहे ना. त्न स्क्रीनवर कसा उमटेल... हे तुम्ही कोणता/ती फाँट (अक्षरसंच) वापरता, ओएस+ब्राउजर, आणि संबंधीत वेबसाईट सॉफ्टवेअर मधील रेंडरींग यावर अवलंबून असेल म्हणजे अधिक क्रायटेरीआ असावेत. जव्हेरगंजांची समस्या बहुधा वेगळी -ब्राउजरची- असावी. त्याची इतरकुणाकडून खात्री करुन लागेल.

In reply to by माहितगार

हाताने लिहायला, वाचायला आणि वाचून उच्चार करायला आडवी बांधणी जास्त सहज आहे, असे माझे मत आहे... लेखाच्या शीर्षकातला दुसरा त्न. जे सर्वसामान्यपणे चांगले / मान्य आहे तेच संगणकाने अधिक सहजसाध्य करावे... अशीच संगणकप्रणाली युजर फ्रेंडली असते. फारसा फायदा न देता; केवळ संगणक वापरण्यासाठी नवीन काही शिकणे/करणे आवश्यक करणारी संगणक प्रणाली अविकसित, युजर अनफ्रेंडली व "वन विथ स्टीप लर्निंग कर्व" समजली जाते. कोणत्याही संगणक प्रणालीला विकसित म्हणण्यासाठी, तिने पूर्वीच्या अ/संगणकीय प्रणालींपेक्षा कमी श्रम-वेळ-कौशल्य-धन वापरून, अधिक प्रतीचे उत्पादन देणे व माणसाचे जीवन अधिक सुकर करणे आवश्यक आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कोणत्याही संगणक प्रणालीला विकसित म्हणण्यासाठी, तिने पूर्वीच्या अ/संगणकीय प्रणालींपेक्षा कमी श्रम-वेळ-कौशल्य-धन वापरून, अधिक प्रतीचे उत्पादन देणे व माणसाचे जीवन अधिक सुकर करणे आवश्यक आहे.
दॅट्सीट. पूर्वी टाइप फेस असताना अर्ध्या कॅरेक्टर्स चे सेपरेट टाइपफेस लागत शिवाय जोडाक्षर झाल्यावर बनणारे सेपरेट कॅरेक्टर साठी वेगळा टाइप. ह्यामुळे व्हायचे काय की इंग्लिश टाइपसेटिंग करताना कमी खीळ्यांचा सेट लागायचा. मराठीत दमछाक व्हायची. आता अर्धा त प ला पण जोडता येतो, न ला पण जोडता येतो. मात्र त्न साठी सेपरेट खिळा लागतो. कम्प्युटरवर हे करताना तसेच शिकावे लागते. अर्धा त किंवा एक कॅरेक्टर टायपून ते अर्धे करायचे मग त्याला दुसरे जोडायचे. स्वा. सावरकरांनी ह्या मुद्द्यावर लक्ष देऊन अ आणि मात्रे वेलांट्या वापरुन ई ऊ सारखी स्वरचिन्हे कमी केली होती. त्यामागे तत्कालीन मुद्रणाचा अवश्य विचार होता.

मला तेच म्हणायचं आहे तुम्ही टाइप केलेले वेगळे त्न एकच दिसताहेत.मी गुगल वापरत नाही ,थेट देवनागरीच कळफलक वापरतो आणि त्यात ते अक्षर नाही.

In reply to by कंजूस

१) आता वर चित्र जोडले आहे, तुम्हाला आता त्यातले कोणतेवाले दिसते आहे ते सांगता येईल २) आपला ब्राऊजर कोणता ? विंडोज एक्सप्लोरर, फायर फॉक्स, गूगल क्रोम कि अजून कोणता वेगळा ?