Skip to main content

पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार आहेत का ??????

लेखक काकासाहेब केंजळे यांनी गुरुवार, 11/02/2016 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार असतात का? हा प्रश्न अनेकांना पडतो,तसा मलाही तो समजायला लागल्यापासून पडत आलेला आहे.पुरुषाला जन्म देणारी स्त्री असूनही ति पुरुषप्रधान व्यवस्थेत कशी अडकली? जगभरात पुरुषप्रधान संस्कृतीच का आहे?.जग बदलणार्या विलक्षण घटना(breakthroughs) फक्त आणि फक्त पुरुषांकडून का घडल्या आहेत?.धर्म राजकारण ,विज्ञान तंत्रज्ञान, कला ,साहीत्य, साम्राज्ये यावर एक नजर टाकली तर हा विलक्षण योगायोग लक्षात येतो.जरा नजर टाकूयात विज्ञान तंत्रज्ञान---- आर्कीमिडीज ,पायथागोरस,सुश्रुत,गॅलिलिओ,न्युटन , डार्विन , जेम्स वॅट, एडीसन,बेंजामिन फ्रेंकलीन,मार्कोनी,मेंडेल,पास्कल, एडवर्ड जेन्नर, अलबर्ट आइनस्टाइन , राईट बंधू,वॅटसन् क्रीक(DNA) ,स्टीफन हॉकींग्ज, बिलगेट्स , हेन्री फोर्ड , स्टीव जोब्ज. ......... ईत्यादी अनेक तत्वज्ञान-----ॲरीस्टोटल, सॉक्रॅटीस , प्लेटो,रेने देकार्त,डार्विन ,चाणक्य ईत्यादी अनेक धर्म------ येशु ख्रिस्त,मोहंमद पैगंबर, आद्य शंकराचार्य,भगवान गौतम बुद्ध,भगवान महाविर, गुरु गोविंदसिंग ईत्यादी अनेक कला--- लिओनार्दो दा व्हीन्ची , पाब्लो पिकासो, शेक्सपिअर,रविंद्रनाथ टागोर, राजा रविवर्मा ,बिटल्स,एम एफ हुसेन...ईत्यादी अनेक साम्राज्ये------ अलेक्झांडर द ग्रेट,नेपोलियन बोनापार्ट,चंगेजखान,सम्राट अशोक,मुघल साम्रट बाबर, शिवाजी महाराज, पेशवे इत्यादी अनेक प्रश्न असा आहे की हे सगळे पुरुष जगाचा तोंडवळा बदलत असताना स्त्रीया काय करत होत्या? त्यांनी का शोध लावले नाहित? याचा सरळ अर्थ असा निघतो का की पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार असतात? मागच्या पन्नास वर्षात युरोप अमेरीकेत व भारतात स्त्रीयांना समान संधी आहे तरीही विज्ञान ,तंत्रज्ञान, कला , साहित्य ,क्रिडा यात स्त्रीया पुरुषांपेक्षा बर्याच पिछाडीवर आहेत.या सामाजिक चमत्काराचे कारण काय असू शके? आजच्या स्त्री पुरुष समानतेच्या युगात मिपासारख्या खुल्या व अभिव्यक्तीची मोकळीक असणार्या संकेतस्थळावर यावर काथ्याकूट व्हायला काहीच अडचण नाही

वाचने 34160
प्रतिक्रिया 175

प्रतिक्रिया

In reply to by कविता१९७८

काय पिवशे मिपागांधी, मिपाकट्टप्पा सारखा मिपा बायको पण पुरस्कार सुरु झालाय काय? ;)

मुळात हा चुकीचा आहे. आजच्या समानतेच्या जगात हा प्रश्न अजूनही पडावा याचं नवल आणि खेद दोनीही वाटतो.
पुरुष जगाचा तोंडवळा बदलत असताना स्त्रीया काय करत होत्या?
या प्रश्नाच उत्तर द्यायला बसलो तर लिस्ट फार होईल काकेसाहेब तरीही वानगी दाखल उदा सांगतो. मेरी क्युरी डॉ आनंदीबाई जोशी सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ मांसाहेब झाशीची राणी लक्ष्मीबाई सरोजिनी नायडू चंदा कोचर इंद्र नुई

इंदिरा गांधिंच नाव सुद्धा वरिल लिस्ट मध्ये असावयास हवे, काहि काहि निर्णय खुप धाडसि (चुक्-बरोबर अलाहिदा) होते त्यांचे, एकहि पुरुष पंतप्रधान तसे निर्णय घेउ शकला नाहिये, अपवाद फक्त पोखरण अणुचाचणि चा.

In reply to by पैसा

मी आले हळदी कुंकवाला आणि वाण वाटायला पुस्तक आणलीत
चला बायांनो पुस्तक वाचूयात आणि हुषार होऊयात
2 1

In reply to by टवाळ कार्टा

तुला गामाजीनी दिला ना हा सल्ला? सगळीकडे लगेच झेंडा घेऊन फिरु नकोस. नाही तिथं लीड घ्यायला जाशील अन तोंडावर पडशील. जरा जपून. मिपाच्या पुरुषवर्गाच्या सार्‍या आशा तुझ्यावरच आहेत आता. ;)

In reply to by टवाळ कार्टा

तो वरचा प्रतिसाद असा हवा होता...कोणी सा.सं. मदत करेल का? नुकत्याच मिळालेल्या सल्ल्यानुसार...Women want to be led by men. Not only that, they take pride in it.

In reply to by अभ्या..

अभ्या.. शेठ, आमचं शिक्षण थोडं कमी आहे मान्य आहे पण एवढं सुद्धा कमी नाही बरं... प्रतिसादाबद्दल आभार. होतो कधी कधी गैरसमज.

In reply to by रमेश भिडे

मज्जा समजून घ्या रमेशमालक. सगळे एलईडी कॅप्स मध्ये लिहिलेले म्हणून दिवे आठवले. बाकी कै नै.

In reply to by हेमंत लाटकर

उत्तम काडी. ते काही अपवाद तुमच्या 'आतल्या आवाजा'चे ऐकून लिहिलेय का?

In reply to by हेमंत लाटकर

+१ टू लाटँकर चाचा ,अगदी अगदी बायंका काडीलावू न बड्बडया असतात काही अपवादा मध्ये मी आहे बरं का ;)

In reply to by अभ्या..

अरे अभ्या न राकू मिला ना घोडा , तुम्हारा क्या अपडेट ? ह्या वर्षी तरी नाचू दे तुझया लग्नात ;);)

In reply to by पियुशा

राकू मत बोल पिवशे. राकू बोले तो फुसके बार. तेरेकू मालूम नै क्या? मेरा ओएस वैसेका वैसाच. अपडेट कुछ नै लेकीन सिध्देश्वरमालिक की कॄपासे नाचनेका मौका मिलेंगा इस साल तुम्हारेको. ;)

जल्ला मेला उगाचच पोरींची नाव अबोली ठेवतात. हुशार पुरूष विरोध कसा करत नाही म्हणते मी

नानासाहेबांच्या अजून एक अवताराची समाप्ती झालेली दिसतेय. आता ते बहुतेक मामासाहेब मोकळे, बाबासाहेब बेंडाळे, पापासाहेब पेगळे असे आयडी घेऊन नवीन अवतार धारण करतील.