Skip to main content

भावना दुखावणे

लेखक यनावाला यांनी शुक्रवार, 20/11/2015 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
"मंत्रसामर्थ्य " या लेखामुळे काही वाचकांच्या भावना दुखावल्या असतील तर त्या सर्वांची मी क्षमा मागतो. या भावना दुखावण्यावर अधिक विचार केला. भावना का दुखावतात? माणूस हा मूलत: तर्कनिष्ठ प्राणी आहे. (मॅन इज अ रॅशनल अ‍ॅनिमल) प्रत्येकाला तर्कबुद्धी असते. (मतिमंद अपवाद). कुतूहल असते. त्यामुळे तो निसर्गाचे निरीक्षण करतो. घटनांवर विचार करतो. त्यातून अनुभव मिळतो. त्याने अनुभव-विवेक (कॉमनसेन्स) येतो. त्याचा उपयोग व्यावहारिक जीवनात होतो. पण देवा-धर्माचे संस्कार बालपणापासून मनावर बिंबवलेले असतात. त्यात आई-वडील, शिक्षक, समाज, प्रसारमाध्यमे इत्यादींचा सहभाग असतो. बालपणीचे संस्कार दृढ असतात. भांड्यावर ठोक-ठोकून कोरलेले नाव जसे सहजी पुसता येत नाही तसे बालमेंदूवर झालेले संस्कार पुढे सहजीं पुसले जात नाहीत. मुलगी मोठी होते. मग आपल्यावर बालपणी झाले तसे संस्कार ती आपल्या मुलांवर करते. असे पिढ्यानुपिढ्या चालते. या संस्कारांमुळे श्रद्धा निर्माण होतात. त्या मुख्यत्वेकरून देव, धर्म, आत्मा, पुनर्जन्म इ.संबंधी असतात. श्रद्धेमुळे तर्कबुद्धी ठप्प होते. जे धर्मग्रंथांत आहे, धर्मगुरू सांगतात ते सर्व खरे मानण्याची मानसिकता बनते. याचा गैरफायदा घेऊन समाजातील लबाड लोकांनी ज्योतिष, मुहूर्त, भाग्यरत्‍ने, ग्रहांचे खडे, वास्तुशास्त्र अशा अनेक गोष्टी निर्मून त्या देवा-धर्माशी जोडल्या. त्यामुळे श्रद्धाळू त्यांना बळी पडतात. हे विषय सोडले तर अन्य क्षेत्रांत श्रद्धाळूंची तर्कबुद्धी चांगली चालते. समजा त्यांच्या वाचनात पुढील मजकूर आला:--
"मूर्तीची समंत्रक प्राणप्रतिष्ठा केली की तिथे देवतत्त्वाचा संचार होतो,असा समज रूढ आहे. पण त्याचा अनुभव कधी आला आहे का? प्रचीती कधी दिसली आहे का? मूर्तीच्या समक्ष दानपेटी फोडली. देवीच्या अंगावरचे दागिने चोरले, मुकुट पळविला, दिवेआगर येथील मंदिरात चोरटे शिरले, प्रतिकार करणार्‍या रक्षकाला जीवे मारून सुवर्ण-गणेश चोरला, देवाने निष्ठावंत सेवकाला वाचवले नाही. या सत्य घटना आहेत. यावरून कोणता निष्कर्ष निघतो? देवमूर्तीत काही सामर्थ्य आहे असे दिसते का? प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपल्या मनाशी विचार करावा."
हे वाचल्यावर श्रद्धाळूंच्या भावना दुखावतात. ज्याची सत्यता कुणाही सुबुद्ध व्यक्तीला पटावी असे सत्य सुसंस्कृत भाषेत निदर्शनाला आणल्यावर श्रद्धाळूंच्या भावना का दुखावतात? मूर्तीमध्ये देवत्व असते ही श्रद्धा अतूट असेल तर हे विधान त्यांना हास्यास्पद वाटायला हवे. असे लिहिणार्‍याची त्यांनी कीव करायला हवी. ज्यात एकही अपशब्द, असभ्य, असंसदीय शब्दप्रयोग नाही, तसेच कुणाचे चारित्र्यहनन नाही, असे अभिव्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. तेव्हा श्रद्धावंतांच्या दृष्टीने निरर्थक असलेल्या लेखनाकडे त्यांनी दुर्लक्ष करावे. मग भावना का दुखावतात? मला वाटते श्रद्धाळूंनी असे लेखन वाचले की त्यांच्या उपजत तर्कबुद्धीमुळे लेखातील तर्कसंगत युक्तिवाद आणि निष्कर्ष त्यांना पटतात. ते योग्य आहेत असे बुद्धीला वाटते. पण बालपणापासून जोपासलेल्या श्रद्धेचा त्याग करायला भावना तयार होत नाही. मग बुद्धी आणि भावना यांच्या द्वंद्वांत ते सापडतात. हे खरे मानावे का ते याचा निर्णय होत नाही. ते अगतिक होतात. आपले काहीतरी चुकते आहे हे कळते. पण वळत नाही. मन प्रक्षोभित होते. उद्विग्न होते. मग "या लेखामुळे आमच्या भावना दुखावल्या." असे ते म्हणतात. ज्या लेखातील विचार सुसंस्कृत शब्दांत मांडलेले आहेत, ज्यातील विधाने वस्तुस्थितिदर्शक म्हणजे सत्य आहेत, ज्यात चारित्र्यहननाच्या हेतूने वृथा दोषारोप केलेले नाहीत, ते लेखन आपल्याला कितीही कटु आणि अप्रिय वाटले, तरी तो अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आविष्कार आहे हे समजणे योग्य ठरेल. त्या लेखनावर टीका करावी. मात्र टीकेत लेखनशुचिता अवश्य पाळावी.

वाचने 39899
प्रतिक्रिया 105

प्रतिक्रिया

In reply to by यनावाला

शान्तिप्रिय (?) अल्प(?)सन्ख्यान्क समाजातील शरियत / कुराण / हदीस वगैरे जुनाट रानटी प्रथा ... सौदी तील मुल्ला अन मुतव्वान्चे चाळे , आयसिस च्या कडव्या धर्मान्धाचे विक्रुत चाळे अन अविज्ञानवादी बायबल अन मागास अन्धश्रद्द्धाळू पोप यान्च्या बद्दल अवाक्शर देखिल न उच्चारता फक्त हिन्दु धर्मच तेवढा मागास /बुरसतलेला अन अन्धश्रद्धाळू आहे का? की इतरान्च्या "भावना" दुखवण्याची भारीच कळकळ यन्नावाल्याना लागुन राहिलेय ? त्यान्च्याबाबतीत काय वाचा बसते का तुमची

In reply to by रमेश भिडे

समाजसुधारणा आधी आपल्या धर्मातच करायला हवी ना? बाकी ह्या प्रश्नाचं समर्पक उत्तर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पूर्वी दिलं होतं. दुवा मिळाल्यास शोधून डकवतो.

In reply to by रमेश भिडे

@ तुम्ही लिहिल्याप्रमाणे मुस्लिम, ख्रिचन् आपण मागास समजू. तुम्ही या धर्मात मोड़ता का? उत्तर हो असेल तर चर्चा संपली पण नाही असेल तर आपल्या धर्मातील अनिष्ठ प्रथा आपणच दूर नको का करायला पाहिजे? प्रत्येक वेळी दुसऱ्या धर्माकडे बोट दाखवून तुम्ही आपल्या चूका का झाकता आहात? बाय द वे तुमचा कुराण, हदीस ,बाइबल यावरचा अभ्यास बराच दांडगा वाटतो. एक नविन धागा टाकून चर्चेला तोंड फोड़ा ना .

In reply to by भंकस बाबा

श्री.प्रचेतस आणि श्री. भंकसबाबा यांचे प्रतिसाद अगदी बिंदुगामी, म्हणजे टु द पॉइंट आहेत.
बाय द वे तुमचा कुराण, हदीस ,बाइबल यावरचा अभ्यास बराच दांडगा वाटतो. एक नविन धागा टाकून चर्चेला तोंड फोड़ा ना .
वा! बिनतोड . धन्यवाद !

In reply to by यनावाला

यनावाला, >> अशा मूर्तीच्या अंगावरील दागिने चोरीला जातात, मूर्तीचे सोन्याचे डोळे चोर काढून नेतात, कधी मूर्तीच >> बखोटीला मारून घेऊन जातात. कांहीच प्रतिकार होत नाही.तरी त्या मूर्तीत देवतत्त्व आहेच असे म्हणायचे का ? >> विचार करायचाच नाही का? श्रद्धाळूची तर्कबुद्धी त्याच्या श्रद्धा विषयात ठप्प होते. लुळी पडते असे म्हणतात. >> ते खरेच आहे. देवतत्त्वाकडून चोरी थांबवायची अपेक्षा का केली जात आहे? चोरी रोखण्याची व्यवस्था वेगळी असते. तिचा देवाशी संबंध नाही. आज अस्तित्व म्हणजे काय हे आधुनिक विज्ञानही ठामपणे सांगू शकलं नाहीये. इथे बघा एक मी एक वैज्ञानिक चमत्कार दाखवलाय. तुमच्या हातातलं रिमोट आणि दूर ठेवलेला टीव्ही यांच्या दरम्यान काही अस्तित्व आहे का? हो आणि नाही अशी दोन्ही उत्तरं आहेत. ही दोन्ही उत्तरं बरोबर आहेत. मग तुमच्यासाठी दगड असलेल्या मूर्तीत आस्तिक लोकं देवतत्त्व उतरलेलं मानतात, यात आक्षेप घेण्याजोगं काय आहे? देवतत्त्वाचा प्रत्यय हवा असेल तर तशी श्रद्धा हवी ना मनात. आ.न., -गा.पै.

काय विचार करावा कळेनासं झालं आहे. इतका हिरीरीने कशाला वाद घालायचा या असल्या विषयावर? उगाच कटुता वाढत चाललीये...

In reply to by असंका

श्रद्धावंत माणसाला सरसकट, खिल्ली उडवल्यासारखे, बुद्धीहिन, अक्कलशून्य म्हणून हिणवू नये म्हणून. 'ते बघा कशे येडे हैत' ह्या टैप संवाद चालला आहे त्याबद्दल विरोध आहे. सभ्यता, सुसंस्कृतता ही भाषेत नसून भावनेत असते हे सांगण्यासाठी असा सगळा खटाटोप.

प्रत्येकाचा एक पिंड असतो, जो तो जन्मत:च घेऊन येतो. तुम्ही श्र्ध्दा की अंधश्रध्दा या प्रश्नाचे उत्तर देताना चक्क पुनर्जन्माच्या सिध्दांताचा आधार घेत आहात. सर्वसाधारण जे नास्तीक असतात ते पुनर्जन्म सुध्दा मानत नाहीत. तुमच मत मांडणारी एखादी थेअरी सांगायची ज्यावर शोध निबंध प्रसिध्द झाले आहेत. खास करुन ते शोध निबंध परदेशात प्रसिध्द झालेले असले म्हणजे त्यावर तिरकस शेरे येणार नाहीत. आता जे मी लिहणार आहे ते तुमच्या साठी आहे. नास्तीक, पुनर्जन्म इ. न मानणारे इ. लोकांसाठी बिलकुल नाही. तुम्हाला जे म्हणायचे आहे ते लास्ट बर्थ रिग्रेशन या थेअरी च्या संदर्भात आहे का ?

In reply to by नितीनचंद्र

ते विधान पुनर्जन्माच्या बाबतीत केलेलं नाही हे स्पष्ट करू इच्छितो. जन्मतःच म्हणजे समजायला लागल्यापासून शिक्षण, संस्कृती, स्वभाव, चालिरिती, समाजातले स्थान यापेक्षा वेगळं काही म्हणजे पिंड. 'मनाचा धर्म'. एखादी व्यक्ती लहानपणापासून उचापती असते, तर कोणी शांत असते. एखादं लहान मुल फार मारकुटं असतं तर दुसरं मारखाऊ असतं. आयुष्यात शिक्षण, संस्कार, स्थानाचे, ज्ञानाचे अनेक लेप लागले तरी मूळ पिंड अबाधित राहतो. हे त्याचे विवेचन. राहता राहिला पुनर्जन्माचा सिद्धांतः यात एखाद्याचे मान्यतेनुसार काही बदल घडत नाही. समजा असेल पुनर्जन्म ही संकल्पना खरी तर त्याचा मला नक्की काय उपयोग. नसेल तरी काय उपयोग? आज हजारो थोरामोठ्यांच्या आयुष्याचे एकुणेक तपशिल उपलब्ध आहेत. त्याचा अभ्यास करून कोणी म्हटले की मी नेहरुंचा पुनर्जन्म आहे तर सिद्ध कसं करणार की नाही, खोटे आहे? साधनेत पुढे जातांना योग्याला आपले सगळे जन्म आठवतात असे म्हटले जाते. आता तिथे गेल्यावर जर मला यदाकदाचित ते आठवले तरी मी दुसर्‍याला सांगू शकणार नाही. दुसर्‍यांना कसे दिसणार मी जे बघतो ते? सिद्ध कसे करणार? पुरावा काय? त्यात जर मी थेट अकराव्या शतकातला कोणी हिंदू राजा होतो म्हटले तरी कोणाकडे त्याचे तपशील नाहीत क्रॉसचेक करायला. एक विनोद आठवतो, डोळ्यांच्या डॉक्टरकडे एकजण गेला. डॉक्टर डोळे तपासण्यासाठी एकेक भिंग लावून भिंतीवरच्या अक्षराचे बोर्ड वाचायला सांगू लागले. "बघा, आता सांगा?" बिचारा रुग्ण ठार निरक्षर. त्याला काला अ़़क्षर भैंस बराबर. असो. काही मुले समजायला लागल्यापासून इतक्या तेजस्वी बुद्धीचे, कलेचे, जाणीवेचे प्रदर्शन करायला लागतात जे साठी उलटलेल्या लोकांना थोडं थोडं जमायला लागलेले असते. उपजत कलागुण, बुद्धीमत्ता हा खरंच अपघात की मागच्या जन्मीचे संस्कार पुढच्या जन्मात कॅरीफारवर्ड झाले असे समजायचे? तिथेही गोची आहेच. लोक म्हणतात सगळे इथेच सोडून जायचे आहे. मग कॅरीफारवर्ड होते तरी काय?

प्रत्येकाचा एक पिंड असतो, जो तो जन्मत:च घेऊन येतो.
जर माझं संदीपच्या त्या प्रतिसादाचे आकलन योग्य असेल तर संदीपचा रोख पुनर्जन्माच्या सिध्दांताकडे नसून Genetic Predisposition कडे आहे. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा जनुकांच्या स्वरुपात काही स्वभाव विशेष घेऊन जन्माला घेऊन येतो. उदा. कुणी जन्मतःच तापट स्वभावाचा असतो तर कुणी अंतर्मुख. हे स्वभाव विशेष एका पीढीकडून दुसर्‍या पीढीकडे जनुकांच्या स्वरुपात पुढे सरकत राहतात. अर्थात त्यातही काही वेळा एखाद्या पीढीतील एखाद्या अपत्यामध्ये हे स्वभाव विशेष कधी दबले जातात तर कधी प्रकर्षाने मूर्त रुप धारण करतात.

अर्थात त्यातही काही वेळा एखाद्या पीढीतील एखाद्या अपत्यामध्ये हे स्वभाव विशेष कधी दबले जातात तर कधी प्रकर्षाने मूर्त रुप धारण करतात.
सहमत. Mendel's laws of inheritance हेच सांगतो.

ओ धागावाले, तुम्ही पण टू द पॉइंट येऊन माझ्या प्रतिसादावर उत्तर द्याना...? का पळून र्‍हायलेत सारखे इकडून तिकडे...?

In reply to by संदीप डांगे

संदीप जी तुम्ही तेच ना जे दुसऱ्या धाग्यावर मुस्लिमाचा कैवार घेत होते. एक तर तुम्ही गोंधळात आहत अथवा माझे डोके चालेनासे झाले आहे. श्रद्धा ह्या फ़क्त हिंदुच्या असतात काय? तुमच्या मागे दिलेल्या प्रतिसादानुसार मुस्लिम दंगे घडवत नाहीत तर काही बाहरी शक्ति ते त्यांच्याकडून ते करुन घेतात. मग आपण मुस्लिमाच्या श्रद्धेनुसार विचार केला तर थोड्याच अवधीत सर्व जग मुस्लिम बनणार आहे. इस्लाम हे सर्व समस्येचे समाधान आहे. हदीस मधे सर्व आधीच लिहिलेले आहे , हे सर्व तुम्हाला मान्य असले पाहिजे. एखाद्याला चुकून पाय लागला तर पाया पडणे ही हिन्दू संस्कृति आहे. मी स्वतःला नास्तिक म्हणवत असलो तरी पाय लागला तर नमस्कार करतो . याचा अर्थ असा होत नाही की मी त्या व्यक्तीला देव मानतो. ती माझी प्रतिक्षिप्त क्रीया असते. मला माझ्या हिंदू मित्राने गणपतीला घरी बोलवले तर एकतर मी त्याच्याकडे गणपतित जाणार नाही अथवा गेलो तर गणपतीला मनोभावाने पाया पडींन . माझ्या थियरी साठी मी माझ्या मैत्रीचा बळी देणार नाही.

In reply to by भंकस बाबा

संदीप जी तुम्ही तेच ना जे दुसऱ्या धाग्यावर मुस्लिमाचा कैवार घेत होते.
मी कधीच मुस्लिमांचा कैवार घेत नाही. मुस्लिमांना जानीदुष्मन समजणारे मी तसं करतो असं समजतात. उदा: "भाजपविरोधी बोलणे म्हणजे देशद्रोही/पाकिस्तानप्रेमी असणे"
एक तर तुम्ही गोंधळात आहत अथवा माझे डोके चालेनासे झाले आहे.
पहिला क्लॉज चुकीचा आहे, दुसर्‍या क्लॉजबद्दल मी काही सांगू शकत नाही.
श्रद्धा ह्या फ़क्त हिंदुच्या असतात काय?
हा प्रश्न मला विचारण्याचा हेतू काय? नाही खरंच मला प्रश्नच समजला नाही. म्हणजे तुम्ही नेमकं कोण्या बाजूने बोलत आहात. श्रद्धावंतांच्या की बुद्धीवाद्यांच्या? कारण सद्यस्थितीत ह्या धाग्यावर हिंदू-मुस्लिम असं काही नाही आणि मी तरी श्रद्धावंतांच्या बाजूने मत मांडत आहे आतापर्यंत.
तुमच्या मागे दिलेल्या प्रतिसादानुसार मुस्लिम दंगे घडवत नाहीत तर काही बाहरी शक्ति ते त्यांच्याकडून ते करुन घेतात.
वाक्यांचा विपर्यास करुन स्वतःला हवे ते समजुन घेऊन एखाद्याबद्दल प्रतिमा तयार केली तर काय होते याचे हे विधान मूर्तिमंत उदाहरण आहे. मी कुठेही असं म्हटलेलं नाही की 'मुस्लिम दंगे घडवत नाहीत'. हां, हे म्हटलं असेल की राजकारणी मतांचे धृवीकरण करण्यासाठी दंग्यांचे आयोजन करतात. पुढचं विधान 'बाहरी शक्ति' हे फक्त आयसिस, अलकायदाला असलेल्या अमेरिकन पाठिंब्याबद्दल आहे. उणेपुरे तीस हजार आयसिसवाले आतंकवादी मारायला ७+ देशांना १३+ महिने झाले तरी जमत नाहीये. असं का होते याचं उत्तर शोधा. हा ह्या चर्चेचा धागा नाही. त्यामुळे इथे यापेक्षा जास्त लिहिणार नाही. कृपया माझी 'मुस्लिमप्रेमी' अशी काही प्रतिमा बनवून घेऊ नये. डोके चकरावणार्‍या बर्‍याच भूमिका मी घेऊ शकतो. इथे मिसळपाववर कोणी मुस्लिम इस्लामची भलामण करणारा धागा टाकत नाही म्हणून... अन्यथा तेही दिसले असते.

प्रश्न विचारण्याचा हेतु इतकाच की वेटकिंन ला पोपला भेटायला जाणारा किरिस्ताव वा हजला जाणारा मुस्लिम ह्यांच्या श्रद्धा तुमच्या श्रद्धेपेक्षा वेगळ्या कशा? म्हणजे एका धर्माची ती श्रद्धा व् दुसर्याची ते थोतांड असे म्हणायचे आहे का तुम्हाला? तसे नसेल तर मुस्लिमाना पण आपल्या प्रवाहात सामिल करा ना.त्यांच्या श्रद्धेला मान दया.

In reply to by भंकस बाबा

हा प्रश्न कुणाला आहे? कोण म्हणतंय की 'वेटकिंन ला पोपला भेटायला जाणारा किरिस्ताव वा हजला जाणारा मुस्लिम ह्यांच्या श्रद्धा तुमच्या श्रद्धेपेक्षा वेगळ्या आहेत' म्हणून?

अशा चर्चांना कधी अंत नसतो. प्रत्येकाने त्याला जे पटेल तसे वागावे. उगाच इतरांना उपदेश करायला जाऊ नये, अशा मताचा मी झालो आहे. --स्तिक = शहाणा, या समीकरणांत प्रत्येकानी त्याला आवडेल त्याप्रमाणे, 'आ' वा 'ना' टाकून वाचावे.

बाबारे, तू ज्या गोष्टीवर प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो आहेस त्याविषयाच्या तुझ्या मूळ संकल्पनाच चुकीच्या आहेत. तुमचं मुसळ केरात जात नाहि आहे, तुम्ही केर-कचराच मुसळात घेतलाय कुटायला.
असं आम्हि आमच्या सरांना समजावुन सांगण्याचा खुप प्रयत्न केला... पण त्यांच्या पचनी पडलं नाहि. तसच अपचन झालय इथे पण. असो.

. श्रद्धा ही अंधच असते याबद्दल मला आता पूर्ण खात्री आहे. मिपाकरांमध्येही मोठ्या प्रमाणात अशा लोकांचा भरणा असावा अशी शंका येते मला कधी कधी. आता उदाहरणच घ्या, http://www.misalpav.com/comment/763784#comment-763784 मनाविषयीं माझी समजूत अशी आहे: व्यक्तीला दु:ख झाले की ती उदास होते. प्रसंगी रडते. आनंद झाला की ती उत्साहित होते. कधी हसते. गर्व झाला की उन्मत्तपणे बोलते, वागते. या प्रमाणे आविष्कारातून भावना समजतात. ......... सर्व भावनांच्या समुच्चयाला मन असे नाव आहे. मन अमूर्त आहे. सर्व भावनांचे उगमस्थान मेंदू आहे. तसेच बुद्धीसुद्धा मेंदूतच उद्भवते. या प्रतिपादनातली तर्कातली आणि गृहितकातली चूक कुणालाही कळली नाही. सगळे अंधश्रद्ध वा वा करत राहिलेत. भावना व्यक्त केली नाही तर तिचे अस्तित्वच नाही का? व्यक्त न करताही आपली भावना आपल्याला माहितच असते. इथे उलटा क्रम आहे! म्हणजे मन अमूर्त आहे. सर्व भावना मनात असतात. मन मेंदूत असते!? ( पण ते अमूर्त असेल तर त्याची जागा कशी ठरवली? ;) ) मेंदू नसलेल्या जीवांच्या भावनांचे काय? शिवाय अमूर्त एनटीटी कडून मूर्त परिणाम कसे साधले जातात? कुणी वैदन्यानिक उत्तर देईल का प्लीज... शिवाय हे असे व्हेग (आणि चुकीचेही) उत्तर की मन अमूर्त वगैरे आहे, हे आमच्यासारख्या श्रद्धापीडितांनी वैदन्यानिक सत्य समजून गपचुप ऐकून घ्यायचे आणि आणि आम्ही सांगितले की अव्यक्त परब्रह्म अमूर्त आहे, तर आम्ही येडे!!?? स्वगत: एक लेख पाडावा का ???

In reply to by कवितानागेश

आम्ही सांगितले की अव्यक्त परब्रह्म अमूर्त आहे, तर आम्ही येडे!!?? हो. स्वगत: एक लेख पाडावा का ??? वेलकम. २५ प्रतिसादाची जवाबदारी मी घेतो. -दिलीप बिरुटे

मला वाटते तुमची भावना बरीच दुखावल्या गेली आहे. बाकी 'मंत्र सामर्थ्य' म्हणजे या शब्दाचा अर्थ शोधणे हि आवश्यक आहे. बाकी श्रद्धावंत लोक जास्ती तार्किक रूपाने विचार करतात, नास्तीकांपेक्षा.

In reply to by विवेकपटाईत

निष्कर्षावर पोहोचलात ? काही विदा आहे का ? श्रद्धाळु लोकांच्या कुठे नादी लागता म्हणुन हे नास्तिक लोक काही बोलत नाहीत असं मला वाटतं ! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉ. साहेब, झालंय असं की विज्ञानाचे चार गॅजेट्स दाखवून वैज्ञानिक पद्धतीच्या नावाखाली अहंकाराचा, विवेकवादाचा अनाठायी प्रोपागंडा केला गेलाय. तो इतका झालाय की विरूद्ध बाजूही तार्किक आणि अभ्यासपूर्ण विचार-संशोधन करू शकते याकडे कुणाचे लक्षच जात नाही, कुणी(हे विज्ञानवादीच) महत्त्वही देत नाही. हा झगडा मूर्त विरुद्ध अमूर्त मधला आहे. तो अगदी मुदलातच चुकीचा आहे. वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करण्याजोगे दावेच मान्य केले जातील असे म्हणायचे, पण मग वैज्ञानिक पद्धतच वापरा म्हटले की पळ काढायचे ह्याशिवाय इथल्या विज्ञानवाद्यांनी काय केले? मी आधीच म्हटले तसे झाडांच्या वाढीचे औषध माणसावर उपयोगी असेल तरच ते खरे असे म्हणणार्‍यांचे काय करावे?

मूर्तीच्या समक्ष दानपेटी फोडली. देवीच्या अंगावरचे दागिने चोरले, मुकुट पळविला, दिवेआगर येथील मंदिरात चोरटे शिरले, प्रतिकार करणार्‍या रक्षकाला जीवे मारून सुवर्ण-गणेश चोरला, देवाने निष्ठावंत सेवकाला वाचवले नाही. या सत्य घटना आहेत. यावरून कोणता निष्कर्ष निघतो? देवमूर्तीत काही सामर्थ्य आहे असे दिसते का? प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपल्या मनाशी विचार करावा.
हे वाचल्यावर श्रद्धाळूंच्या भावना दुखावतात. ज्याची सत्यता कुणाही सुबुद्ध व्यक्तीला पटावी असे सत्य सुसंस्कृत भाषेत निदर्शनाला आणल्यावर श्रद्धाळूंच्या भावना का दुखावतात? मूर्तीमध्ये देवत्व असते ही श्रद्धा अतूट असेल तर हे विधान त्यांना हास्यास्पद वाटायला हवे.
प्राणप्रतिष्ठा, मुर्तीपूजा वगैरे एक विशिष्ट प्रकारची साधना आहे (ति कशी हा वेगळा विषय आहे). प्राणप्रतिष्ठा करुन एखादा रोबोट निर्माण करावा व त्याने आपल्या मालमत्तेचं रक्षण करावं अशी कुठलिही प्रोव्हिजन त्यात नाहि. रेडीओसंचात बॅटरी घालुन आकाषवाणी केंद्राशी ट्युन करतात. आता त्या रेडीओची प्लॅस्टीकची केस बदलुन चामड्याची घातली, किंवा तो रेडीओसंच चोरीला गेला, तुटला तर आकाषवाणी केंद्राने आपलं "सामर्थ्य" दाखवावं असा 'वैज्ञानीक' दावा कोणि करत नाहि. आपण जे आर्ग्युमेण्ट करत आहोत त्यातल्या प्रमेयांची किमान वैधता तपासुन बघणे इतकंहि करु नये 'विज्ञानवाद्यां'नी ? आपले समज चुकीचे नाहितच या वैज्ञानीक अंधश्रद्धेच्या निर्मुलनाकरता कुणी आनेवाले है क्या दुनीयामे ??

In reply to by अर्धवटराव

हमें आपके रेडियो के गाने बहुत पसंद है. हमें वो परेडसी परेडसी जाना नहीं सुनना है. कब सुनायेंगे?