माहिती हवी आहे: डीसी रूल्स/ विकास आराखड्याची बांधकाम नियंत्रण नियमावली

जातवेद काथ्याकूट
परवाच लोकमत मधे ही बातमी वाचनात आली, बांधकाम नियमावली सोमवारी सादर होणार
पुणे शहर जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याची बांधकाम नियंत्रण नियमावली सादर करण्यासाठीची मुदत येत्या ९ नोव्हेंबरला पूर्ण होत असल्यामुळे हा आराखडा तयार करणाऱ्या त्रिसदस्यीय समितीकडून सध्या युद्धपातळीवर याबाबतचे काम सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षपुर्ती निमत्त झालेल्या कुठल्याश्या मुलाखतीत पण त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता कि, "तुम्ही विकसकांच्या दबावामुळे नियमावली जाहिर करण्यास विलंब करत आहात काय?". तेव्हा ते म्हणाले होते, "मुंबई आणि पुणे, दोन्ही शहरांबाबतचा आरखडा लवकरच आणू". मला एका नातेवाईकाचा सुद्धा असाच सल्ला मिळाला होता कि, "नव्या नियमांमुळे दर उतरणार आहेत तेव्हा थोडा थांबा, तसेही आत्ता दर फारशे वाढत नाही आहेत". या नव्या नियमावलीत असे नेमके काय असणार आहे आणि त्याचा पुण्यातल्या घरांचे दर कसे खाली येणारेत कोणी सांगू शकेल काय?
वर्गीकरण

7 टिप्पण्या 1,845 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

भाऊंचे भाऊ नवीन

या नव्या नियमावलीत असे नेमके काय असणार आहे आणि त्याचा पुण्यातल्या घरांचे दर कसे खाली येणारेत कोणी सांगू शकेल काय?
हे घडणार नाही. बाकी आपले शंका समाधान बहुदा ते चोक्कलिंगम साहेबच व्यवस्थीत करतील.

जातवेद नवीन

In reply to by कंजूस

हे कधी झाले? काल परवा पर्यंत तरी पुण्यात न विकलेल्या सदनिकांची संख्या कशी वाढत चालली आहे अशाच बातम्या येत होत्या.

बिहाग नवीन

सदनिका एका दिवसात बांधून होत नाही. त्यासाठी ३-४ वर्ष आधी जागा ताब्यात घेवुन मग काम सुरु करावे लागते. जर काही झालेच तर FSI वाढेल पण त्याने आत्ताची बांधकाम सुरु लालेली घरे कशी स्वस्त होतील ? ( जमीन आधीच घेतलेली होती ना ). सिमेंट लोखंड मजुरी आणि चिरीमिरी कधीच स्वस्त झाली नाही. ती वाढतेच आहे. म्हणजेच ज्या बांधकाम व्यवसाईकाला दिवाळे काढायचे आहे तोच महागात बांधलेली घरे स्वस्त करेल. पुण्यात २००० - २००६ मध्ये घर घेतलेल्या घरांच्या किमती आता दुप्पातीच्या वर आहेत. पण २००८ - २०१३ मध्ये घेतल्याचा किमती साधारण १३०% चा आसपास आहेत. पण त्यानंतर किमतीत्त त्याप्रमाणात वाढ झाली नाही. थोडक्यात स्वतः रहाण्यासाठी बघायचे असेल तर असल्या आशेवर राहु नका. जर second home असेल जरूर थांबा आणि पैसे तसेच न ठेवता चांगल्या liquid / debt fund मध्ये टाकून ठेवा. आणि वाट बघत बसा. ;-)