समानता
समानता
आम्ही(सह कुटुंब आणि सह परिवार) मागच्या वर्षी आमचे पासपोर्ट काढायला पासपोर्ट सेवा केंद्र मालाडला गेलो होतो. आम्हाला वेळ सकाळी ११ ची दिली होती. त्यासाठी आम्ही त्यांच्या फाटकाच्या बाहेर १०.५० ला रांगेत उभे राहिलो.आमच्या मागे रांगेत पासपोर्ट काढायला एक मुसलमान माणूस उभा होता. त्याच्या बरोबर त्याची बुरखाधारी बायको, दोन मुली वय वर्षे पाच आणि साडेतीन आणि एक मुलगा वय वर्षे दोन असे उभे होते. त्या माणसाने एक कॅड्बरी( मिल्क चॉकलेट) आणली आणि त्या मुलाला दिली. त्या दोन्ही मुलीनी थोडा वेळ ते मुल कॅडबरी खात होते तेथे पहिले आणि नंतर पाहणे सोडून दिले. त्या दोन निरागस आणि निष्पाप मुलींकडे पाहून माझ्या पोटात कुठेतरी तुटत होते. एक क्षण आपण दोन कॅडबरी आणून त्या मुलीना द्याव्या असेही वाटले परंतु त्या माणसाचा अहं दुखावला गेला असता म्हणून गप्प बसलो.
जो माणूस पासपोर्ट काढायला उभा होता त्याला दहा रुपयाच्या दोन कॅडबरी दोन मुलीना देण्यासाठी नव्हते हे तर शक्यच नाही. आश्चर्य म्हणजे त्याच्या बायकोनेही एक चकार शब्द काढला नाही. मी माझ्या बायको आणि दोन्ही मुलांना( मुलगा आणि मुलगी) ते दाखवले आणि सांगितले कि केवळ मुलगा म्हणून त्याला कसे वेगळे वागवले जाते ते पहा. असे करणे किती चुकीचे आहे तेही सांगितले. दुर्दैवाने मी तेथे काहीच करू शकत नव्हतो.
तीन दिवसांपूर्वी माझ्याकडे एक उत्तर भारतीय स्त्री तिच्या गरोदरपणाची सोनोग्राफी करायला आली होती. तिच्या बरोबर तिची बहिण, त्या बहिणीची ३-४ वर्षाची गोड मुलगी आणि दीड वर्षाचा मुलगा सुद्धा आले होते. त्या सर्वाना मी आतल्या खोलीत( जेथे सोनोग्राफी यंत्र आहे) तेथे घेतले. माझ्याकडे आलेल्या सर्व लहान मुलांना मी एक चॉकलेट देतो. ती माझ्या ड्रोवरमध्ये एका बरणीत भरलेली असतात. त्या दोन्ही मुलांना मी एक एक चॉकलेट दिले आणि सोनोग्राफी चालू केली. त्या मुलाने आपले चॉकलेट खाल्ले आणि अजून हवे म्हणून तो रडू लागला. त्यावर त्या रुग्णाच्या बहिणीने(मुलीच्या आईने)त्या मुलीला तिचे चॉकलेट त्या मुलाला द्यायला सांगितले. त्या इतक्या निरागस मुलीने ते त्याला दिले सुद्धा. मला जरा धक्काच बसला. तो "मुलगा" म्हणून लाडावलेलाच वाटत होता. दुसरे चॉकलेट खाल्ल्यावर थोड्या वेळाने त्या मुलाने परत चॉकलेट हवे म्हणून मागणी केली. मी "अजून" चॉकलेट देणार नाही म्हणून स्पष्ट सांगितले. त्या मुलाने रडायला सुरुवात केली. मी वैतागून त्याच्या आईला सांगितले कि त्याला बाहेर घेऊन जा. त्याच्या रडण्याने मला डिस्टर्ब होतोय आणि माझी काही चूक झाली तर तुमच्या बहिणीला ते महाग पडेल. त्यावर ती बहिण मुलाला घेऊन बाहेर गेली. मी सोनोग्राफी सुरु केली . मग माझ्या मनात एक विचार आला. मी त्या छोट्याशा मुलीला विचारले, "आपका चॉकलेट तो आपका भाई खा गया ना? आपको चॉकलेट चाहिये?" त्यावर ती घुटमळली. मी तिला एक चॉकलेट काढून दिले. ते ती खिशात टाकणार होती. मी तिला म्हणालो आप अभी ये खा लो. नाही तो आपका भाई फिरसे मांग लेगा. तिला ते पटले आणि तिने ते खाल्ले आणि माझ्याकडे बघून गोड असे स्मित केले. मला पण छान वाटले.
मला राहून राहून एक गोष्ट डाचत राहिली कि इतक्या लहान निष्पाप आणि निरागस मुलींवर त्यांचे आईबाप इतक्या सहजतेने अन्याय का करतात. केवळ त्या मुली आहेत म्हणून? आपल्याला समान हक्क मिळाला पाहिजे हि जाणीव त्या बिचार्या मुलींची कलीकावस्थेतच अशी का खुडून टाकली जाते? लहानपणी असेच वागवले गेले असल्याने त्यांच्या आया सुद्धा कदाचित मुलाला मुलीपेक्षा जास्त झुकते पारडे देत असाव्यात.
कदाचित यामुळेच मुलीसुद्धा मोठ्या झाल्या कि त्यांच्या मनात खोल रुजलेली पुरुष श्रेष्ठत्वाची भावना काढून टाकणे अशक्य होते.
स्त्री पुरुष समानता हि लहानपणापासूनच मुलांच्या मनात रुजवली पाहिजे तरच पुढच्या पिढीत समानते साठी लढ्याची गरज पडणार नाही.
वाचने
13194
वाचनखूण
प्रतिक्रिया
80
अजूनही बर्याच स्त्रिया ह्या
जेवण
In reply to जेवण by कपिलमुनी
हे अज्जूनही होते बर्याच घरांत
In reply to जेवण by कपिलमुनी
कसली डोंबलाची मॉडर्न घरं...
In reply to कसली डोंबलाची मॉडर्न घरं... by पिलीयन रायडर
अश्या वेळेला डायरेक्ट ३-४
In reply to अश्या वेळेला डायरेक्ट ३-४ by कॅप्टन जॅक स्पॅरो
फार्फार धन्यवाद!! मी आता एकदा
In reply to फार्फार धन्यवाद!! मी आता एकदा by पिलीयन रायडर
उन्हाळ्यात आंब्याच्या
In reply to उन्हाळ्यात आंब्याच्या by बॅटमॅन
थोडस गोमुत्र पण
In reply to थोडस गोमुत्र पण by बाबा पाटील
+१११११११११११११
In reply to +१११११११११११११ by बॅटमॅन
यात किमान
In reply to यात किमान by नाखु
यात एरंडेल पण अॅडवा =))
In reply to यात एरंडेल पण अॅडवा =)) by टवाळ कार्टा
आमेन
In reply to उन्हाळ्यात आंब्याच्या by बॅटमॅन
तुला सांगते..
In reply to तुला सांगते.. by पिलीयन रायडर
दोन्ही प्रकारातल्यांना रट्टे
In reply to तुला सांगते.. by पिलीयन रायडर
थापा ठोका....
In reply to थापा ठोका.... by प्रभाकर पेठकर
छान उपाय.
In reply to छान उपाय. by जातवेद
लग्न झालेल्यांना पण त्रास
In reply to लग्न झालेल्यांना पण त्रास by टवाळ कार्टा
मानसिक त्रासाची गणना करू नये!
In reply to मानसिक त्रासाची गणना करू नये! by जातवेद
खिक्क....सवय झालि कै
In reply to उन्हाळ्यात आंब्याच्या by बॅटमॅन
अशा लोकांना केळाच्या शिकरणात
In reply to अशा लोकांना केळाच्या शिकरणात by आनंदराव
तुम्ही माझी लुंगी खरेदी हा
In reply to कसली डोंबलाची मॉडर्न घरं... by पिलीयन रायडर
कहर!!!
डोळ्यात अंजन घालणारे अनुभव
जौ द्या ना डॉक..
In reply to जौ द्या ना डॉक.. by पिलीयन रायडर
पिरा ताई
In reply to पिरा ताई by सुबोध खरे
+११११११११
In reply to +११११११११ by टवाळ कार्टा
टका
In reply to टका by मी-सौरभ
चायला...फक्त नव्र्यानेच असे
In reply to पिरा ताई by सुबोध खरे
हे अगदी खरं. समारंभात पुरुष
In reply to हे अगदी खरं. समारंभात पुरुष by स्रुजा
+१
मी हे अभिमानाने सांगू इच्छितो
ह्या असल्या मानापमानामुळे
In reply to ह्या असल्या मानापमानामुळे by परिकथेतील राजकुमार
=))
In reply to ह्या असल्या मानापमानामुळे by परिकथेतील राजकुमार
+ १
In reply to + १ by मुक्त विहारि
कुठेही जम्वा पण मला बोल्वा ;)
In reply to कुठेही जम्वा पण मला बोल्वा ;) by टवाळ कार्टा
१००%....
In reply to ह्या असल्या मानापमानामुळे by परिकथेतील राजकुमार
प्रतिसाद जीपीएस
In reply to प्रतिसाद जीपीएस by चित्रगुप्त
पण... पराशेठ तयार व्हायला
(अनुभव) वाचुन वाइट वाटले.
In reply to (अनुभव) वाचुन वाइट वाटले. by भाऊंचे भाऊ
आमच्याकडे देखिल असेच घडले.
In reply to आमच्याकडे देखिल असेच घडले. by चैदजा
आपण एकमेकांचे भाऊ-बहिण तर
आम्ही दोघे...
In reply to आम्ही दोघे... by बाबा पाटील
उत्तम आहे. पण तुमची केस वेगळी
In reply to आम्ही दोघे... by बाबा पाटील
छानच
ती मुले सुदैवी आहेत....
In reply to ती मुले सुदैवी आहेत.... by मुक्त विहारि
पुर्वी होत नसतील
In reply to पुर्वी होत नसतील by बाबा पाटील
+१
In reply to +१ by टवाळ कार्टा
+११
छान लेख. विचार पटले. अमलात
हे होते हे दुर्दैवी आहे पण
अनेकदा हां संस्कार घरात च
In reply to अनेकदा हां संस्कार घरात च by प्यारे१
ते मांडीघालून बस्णे सोडले तर
हे जेवण्याचे झाले.
सत्तर वर्षापूर्वी माझ्या
चांगलं लिहिलंत!
मुलीला मराठी शाळेत घालणे व
In reply to मुलीला मराठी शाळेत घालणे व by श्रीगुरुजी
खरंय. हे मी पण माझ्या एका
In reply to खरंय. हे मी पण माझ्या एका by पद्मावति
सॉरी दहेज देणार आहेतच्या ऐवजी
आमच्या घरी छोटासा कार्यक्रम
In reply to आमच्या घरी छोटासा कार्यक्रम by उगा काहितरीच
राजाभाऊ खाडिलकर म्हणून संघाचे
In reply to राजाभाऊ खाडिलकर म्हणून संघाचे by प्यारे१
राजाभाऊ नाही. शरदभाऊ खाडिलकर.
याच विषयावर 'पण लक्षात कोण
माझ्या दोन्ही मुलांना सर्व
In reply to माझ्या दोन्ही मुलांना सर्व by चित्रगुप्त
. स्वतः स्वयंपाक करून
In reply to . स्वतः स्वयंपाक करून by भाऊंचे भाऊ
मुद्दा अगदी बरोबर आहे. पण
मुलाचा सोस.
In reply to मुलाचा सोस. by सर्वसाक्षी
सहमत
In reply to सहमत by सुबोध खरे
मुलीसाठी शैक्षणिक कर्ज
हे सर्व अनुभव वाचून वाईट
धाग्याने ५० गाठले....
डॉक्टरसाहेब,
आशयाशी सहमत
एक निरीक्षण असे आहे की सुनेवर
In reply to एक निरीक्षण असे आहे की सुनेवर by एस
हो हो, बर्याचदा बायकाच याला
In reply to एक निरीक्षण असे आहे की सुनेवर by एस
सहमत आहे. बायकांनीच रडारड
काय अचरटपणा आहे! हे करवतं तरी
..........
असेही पालक
नक्की कुठल्या वर्षातल्या गोष्टी आहेत या?
In reply to नक्की कुठल्या वर्षातल्या गोष्टी आहेत या? by बिहाग
पहिला प्रसंग बहुधा पुणे नामक