Skip to main content

Inception , स्वर्ग आणि अध्यात्म

गुरुवार, 05/11/2015 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे दोन वर्षापूर्वी ख्रिस्तोफर नोलान कृत "Inception" पाहिला होता. पाहून झाल्यावर अनेक दिवस मनात घोळत राहिला . त्यातच पूर्वी भारतीय अध्यात्मावर काही पुस्तके वाचले होती . आणि अलीकडेच युट्यूब वर Spirit Science ची व्हिडिओ सिरीज पाहिली . आणि मग विचारमंथनातून काही ठोस मुद्दे हाती लागले ते असे - १ . "परलोक" अथवा spirit world हे प्रत्यक्षात अस्तीत्वात असावे . २. मनुष्याच्या सुप्त मन /अंतर्मना च्या सात पातळ्या असून त्यांनाच भारतीय अध्यात्मात सप्तलोक अथवा सप्तस्वर्ग म्हणत असावेत . ३. मनुष्याच्या सुप्त मन /अंतर्मना च्या पातळीवर ज्या घडामोडी होतात ,त्यावर प्रत्यक्षात भौतिक जगात मनुष्याचे जीवन प्रभावित होत असते. ४. सिनेमामध्ये ज्याप्रमाणे एकावर एक Dream-Levels दाखवल्या आहेत ,त्याचप्रमाणे या अंतर्मनाच्या / सप्तलोकांच्या जाणिवेच्या लेवल्स असाव्यात . ५. सिनेमात अनेक ठिकाणी मनुष्याच्या Self-Defense चा उल्लेख येतो. हा Psychic-Self -Defense मनुष्याची तीव्र इच्छाशक्ती व त्याने केलेली "पुण्य"कर्मे यावर आधारित /संबंधित असावा . म्हणजे असे की पुण्य/सत्कर्मांमुळे व्यक्तीची इच्छाशक्ती स्ट्रॉंग होते व अशा व्यक्ती भौतिक अथवा आध्यात्मिक दृष्ट्या सहजासहजी संकटांना बळी पडत नाहीत . ६. सिनेमात जरी अंतर्मनाच्या सुप्त पातळीपर्यन्त पोहोचण्यासाठी Drugs चा वापर केलेला असला तरी ध्यान /समाधी इत्यादी मार्गानी अंतर्मनाच्या सुप्त पातळीला पोहोचता येवू शकते व बिघडलेल्या गोष्टी ठीक करू शकतो . किंबहुना भौतिक जगातील अनेक समस्यांचे अथवा स्वभावदोषांचे मूळ अंतर्मनातच असल्याने त्यावर उपाय करणे शक्य होते . ७. In other words, We are co-creators of our Reality and Destiny. भारतीय अध्यात्म -तत्त्वज्ञानातील अनेक मूल्ये आणि कर्मसिद्धांत यांना सिद्ध करणारा हा चित्रपट आहे असे माझे मत बनले . आपणास काय वाटते ?

वाचने 3639
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

In reply to by उडन खटोला

आम्ही त्यांचेही बाप आहोत. असल्या खुळचट कल्पनांना 'भंड धूर्त निशाचरः' म्हणून निकालात काढणारे लोकायतिक चार्वाक. काय समजलेंत?

In reply to by आदूबाळ

येथे निशाचर शब्दाचा अर्थ चोरलफंगे, दरवडेखोर, लुटारू इत्यादी प्रामुख्याने रात्रीच्या अंधारात आपला वाईट कार्यभाग उरकणारे, समाजाला फसवणारे, लुबाडणारे, अशा धिक्कार करण्याजोग्या प्रवृत्ती असा लाक्षणिक अर्थ चार्वाकांना अपेक्षित आहे. त्या काळात अशा समाजकंटकांचे एका शब्दात वर्णन निशाचर असे केले जात असावे. आजकाल कृष्णकृत्ये दिवसाढवळ्या राजरोसपणे करण्याइतपत अशा लोकांची मजल जाते ही बाब अलाहिदा! :-)

=))

" आणि मग विचारमंथनातून काही ठोस मुद्दे हाती लागले ते असे- " :):)

भारतीय अध्यात्म -तत्त्वज्ञानातील अनेक मूल्ये आणि कर्मसिद्धांत यांना सिद्ध करणारा हा चित्रपट आहे असे माझे मत बनले आपल्या ईथे चित्रपटांवरुन भारतीय अध्यात्म कसे सिद्ध होईल? चित्रपट म्हणजे सत्य नव्हे!

ध्यान /समाधी इत्यादी मार्गानी अंतर्मनाच्या सुप्त पातळीला पोहोचता येवू शकते
. . सहमत. याबाबत माहिती मिळवत आहे. . . . . . . . (समाधी घेण्यास उत्सुक असणारा-याॅर्कर)

४. सिनेमामध्ये ज्याप्रमाणे एकावर एक Dream-Levels दाखवल्या आहेत ,त्याचप्रमाणे या अंतर्मनाच्या / सप्तलोकांच्या जाणिवेच्या लेवल्स असाव्यात .
इट्स जस अ मेटाफोर. टेक्नीकली अ ड्रीम विदीन ड्रीम ड्स नॉट गारंटी गोइंग डीप इन्साइड माइंड... इट मे हॅपन ऑर मे नॉट.

In reply to by भाऊंचे भाऊ

इट्स जस अ मेटाफोर. टेक्नीकली अ ड्रीम विदीन ड्रीम ड्स नॉट गारंटी गोइंग डीप इन्साइड माइंड... इट मे हॅपन ऑर मे नॉट.
म्हणजे मराठीत काय ? उलगडा करावा.

In reply to by चित्रगुप्त

इट्स जस अ मेटाफोर.
स्वप्नामधे (मधील) स्वप्न आपल्याला मनाच्या गाभार्‍यात खोलवर पोचवते ही चित्रपटामधे वापरलेली संकल्पना अंतर्मनाच्या सुप्त पातळीपर्यन्त पोचायचा निश्चीत मार्ग अजिबात नाही.
अ ड्रीम विदीन ड्रीम ड्स नॉट गारंटी गोइंग डीप इन्साइड माइंड... इट मे हॅपन ऑर मे नॉट.
म्हणून चित्रपटात दाखवलेल्या अंतर्मनात जायच्या (जी काही असेल त्या )प्रक्रीयेचे प्रतिकात्मक उदाहरण इतकेच महत्व द्यावे. कारण स्वप्नात स्वप्न पाहणे ही क्रीया मनाला अपेक्षीत सुक्ष्म पातळीवर न्हेत नाही.

खुप छान संगती लावली आहे. मात्र आजच्या काळात आपल्या स्वतःच्याच संस्कृतीला हिनवण्याला महत्व आले आहे. त्यामुळे तुमच्या लेखाची टींगळ-टवाळी होईल यात शंकाच नाही.

सिनेमात जरी अंतर्मनाच्या सुप्त पातळीपर्यन्त पोहोचण्यासाठी Drugs चा वापर केलेला असला तरी ध्यान /समाधी इत्यादी मार्गानी अंतर्मनाच्या सुप्त पातळीला पोहोचता येवू शकते व बिघडलेल्या गोष्टी ठीक करू शकतो .
आपल्याकडे जुन्याकाळापासून ऋषी मुनी भांग, गांजा, मदिरा ह्यांचा वापर करतातच.

सिनेमात जरी अंतर्मनाच्या सुप्त पातळीपर्यन्त पोहोचण्यासाठी Drugs चा वापर केलेला असला...
काहीही हं उ...! सिनेमात फक्त पुरेसे झोपी जायला ड्रगचा वापर केलेला दाखवला आहे. अंतर्मनात शिरायला मशीनच्या सहाय्याने हवेते स्वप्न झोपी जाणार्‍या व्यक्तीत प्रक्षेपीत केल्या जात असे.

स्वप्नामधे (मधील) स्वप्न आपल्याला मनाच्या गाभार्‍यात खोलवर पोचवते ही चित्रपटामधे वापरलेली संकल्पना अंतर्मनाच्या सुप्त पातळीपर्यन्त पोचायचा निश्चीत मार्ग अजिबात नाही. मनाच्या सुप्त पातळी पर्यंत जाण्याचा अजुन एक मार्ग ध्यान आहे. स्वप्नात काय किंवा ध्यानात काय आपले शरीर रिलॅक्स असते. रक्तदाब न्युनतम पातळीत ( असु शकतो ) असतो. आपला मेंदु येणारे आवाज किंवा विचार स्विकारत असतो परंतु त्याच फारस विश्लेषण करत नाही. मनालाही अश्यावेळी सुप्त पातळीत जाता येते. योगसुत्र ग्रंथात याचा उल्लेख आहे की अश्या अवस्थेत ( प्रखर अभ्यासाने लाभलेल्या ) मागील जन्माचे ज्ञान होते.