सुमारे दोन वर्षापूर्वी ख्रिस्तोफर नोलान कृत "Inception" पाहिला होता. पाहून झाल्यावर अनेक दिवस मनात घोळत राहिला . त्यातच पूर्वी भारतीय अध्यात्मावर काही पुस्तके वाचले होती . आणि अलीकडेच युट्यूब वर Spirit Science ची व्हिडिओ सिरीज पाहिली . आणि मग विचारमंथनातून काही ठोस मुद्दे हाती लागले ते असे -
१ . "परलोक" अथवा spirit world हे प्रत्यक्षात अस्तीत्वात असावे .
२. मनुष्याच्या सुप्त मन /अंतर्मना च्या सात पातळ्या असून त्यांनाच भारतीय अध्यात्मात सप्तलोक अथवा सप्तस्वर्ग म्हणत असावेत .
३. मनुष्याच्या सुप्त मन /अंतर्मना च्या पातळीवर ज्या घडामोडी होतात ,त्यावर प्रत्यक्षात भौतिक जगात मनुष्याचे जीवन प्रभावित होत असते.
४. सिनेमामध्ये ज्याप्रमाणे एकावर एक Dream-Levels दाखवल्या आहेत ,त्याचप्रमाणे या अंतर्मनाच्या / सप्तलोकांच्या जाणिवेच्या लेवल्स असाव्यात .
५. सिनेमात अनेक ठिकाणी मनुष्याच्या Self-Defense चा उल्लेख येतो. हा Psychic-Self -Defense मनुष्याची तीव्र इच्छाशक्ती व त्याने केलेली "पुण्य"कर्मे यावर आधारित /संबंधित असावा . म्हणजे असे की पुण्य/सत्कर्मांमुळे व्यक्तीची इच्छाशक्ती स्ट्रॉंग होते व अशा व्यक्ती भौतिक अथवा आध्यात्मिक दृष्ट्या सहजासहजी संकटांना बळी पडत नाहीत .
६. सिनेमात जरी अंतर्मनाच्या सुप्त पातळीपर्यन्त पोहोचण्यासाठी Drugs चा वापर केलेला असला तरी ध्यान /समाधी इत्यादी मार्गानी अंतर्मनाच्या सुप्त पातळीला पोहोचता येवू शकते व बिघडलेल्या गोष्टी ठीक करू शकतो . किंबहुना भौतिक जगातील अनेक समस्यांचे अथवा स्वभावदोषांचे मूळ अंतर्मनातच असल्याने त्यावर उपाय करणे शक्य होते .
७. In other words, We are co-creators of our Reality and Destiny. भारतीय अध्यात्म -तत्त्वज्ञानातील अनेक मूल्ये आणि कर्मसिद्धांत यांना सिद्ध करणारा हा चित्रपट आहे असे माझे मत बनले .
आपणास काय वाटते ?
वाचने
3639
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
निरर्थक आणि हास्यास्पद वाटते.
?????????????????????????????????????????????????????????
In reply to निरर्थक आणि हास्यास्पद वाटते. by एस
आम्ही त्यांचेही बाप आहोत.
In reply to ????????????????????????????????????????????????????????? by उडन खटोला
.
In reply to आम्ही त्यांचेही बाप आहोत. by एस
धूर्त आणि भंड समजू शकतो, पण
In reply to . by मोगा
म्हमद्या नव्हता ना निशाचर
In reply to धूर्त आणि भंड समजू शकतो, पण by आदूबाळ
येथे निशाचर शब्दाचा अर्थ
In reply to धूर्त आणि भंड समजू शकतो, पण by आदूबाळ
=))
विचारमंथनातून...
भारतीय अध्यात्म
बरं
४. सिनेमामध्ये ज्याप्रमाणे
मराठीत
In reply to ४. सिनेमामध्ये ज्याप्रमाणे by भाऊंचे भाऊ
इट्स जस अ मेटाफोर.
In reply to मराठीत by चित्रगुप्त
चित्रपट फारच मनाला लावून
खुप छान संगती लावली आहे.
सिनेमात जरी अंतर्मनाच्या
सिनेमात जरी अंतर्मनाच्या
स्वप्न आपल्याला मनाच्या