Skip to main content

होस्टेल मधिल विद्यार्थ्यांना मारहाणीबाबत

लेखक mahayog
सोमवार, 02/11/2015 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपुर्वी व्हाट्सअॅपवर एका होस्टेल मधील विद्यार्थ्यांना निर्दयीपणे मारत असल्याबाबत व्हिडिओ क्लिप फिरत होती. कुठले होस्टेल आहे हे कळले का?

वाचने 4987
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

अशा विषयाचा सुद्धा काथ्याकूट होऊ शकतो?

In reply to by याॅर्कर

विषय महत्त्वाचा आहे. काल हॉस्टेलच्या मुलांना मारहाण झाली, उद्या मिपावरच्या सभासदांना होऊ शकते. सावध असलेले बरे!

In reply to by परिकथेतील राजकुमार

काल हॉस्टेलच्या मुलांना मारहाण झाली, उद्या मिपावरच्या सभासदांना होऊ शकते.
हा हा हा. हे असे टिपीकल परास्टाईल प्रतिसाद आणि परा-ब्रिटिश टिंग्यासारखे जुने मिपाकर परत आलेले बघून मिपावरच्या जुन्या (२००८-०९) च्या दिवसांची आठवण आली. तसे दिवस परत आले तर काय बहार येईल. (नोस्टाल्जिक) गॅरी ट्रुमन

अरे व्वा. टिंग्या आणि परा दोघेही चक्क्क्क्क्क्क्क्क्क हजर आहेत. पराचे बरोबर आहे. मिपा सदस्यानी सावध रहायला हवे. सज्जनगडावर "विजापूरचासरदारचालोनयेत आहे" अशी कविता ल्हिली होती. ती तीनशे वर्षानी सुद्धा खरी ठरतेय. कलीयूग संपणार जगाचा अंत जवळ आल्याची लक्षणे आहेत ही सगळी.

मी डोळे चोळुन चोळुन प्रतिसादांवरची तारिख पाहिली. जुना धागा वर आल्या सारखं वाटतय!

पण.... परा आणि ब्रि.टिंग्या, ह्यांना बर्‍याच दिवसांनी, प्रतिसादक म्ह्णून, मिपावर बघीतल्याने, दिवाळी जवळ येत चालल्याचे जाणवले.

In reply to by विजुभाऊ

प्रतिसादक =====> प्रतिसाद देणारा. अतिसारक =====> फूल्ल-बॉटल लेमनवॉटर पिवून आणि मुद्दाम फालतू गहन विचार करत आहे असे दाखवत, हितोपदेश रेकणारे, काऊ आणि चिऊ.

अनेक जुनेजाणत्या आयड्या प्रकट होऊन सक्रिय झाल्याचा आनंद झाला आहे ! अश्या ताकदीचे अजून दोनचार धागे टाका ब्वॉ mahayog सायेब/म्याडम. :)

मस्त धागा. अजुन येऊद्यात. जुन्या-जाणत्यांची हजेरी पाहून धन्य झालो. असेच अजुन धागे टाकावेत ही विनंती.

व्हिडीयो टाका, बहुतेक भाईकट्टी v/s शिवसेना प्रकरण असेल..