Skip to main content

आयटीवाले

३७० रुपये वारले (नाहीत)..

लेखक गवि यांनी सोमवार, 15/06/2026 17:20 या दिवशी प्रकाशित केले.

ते ७० रुपये वारले आणि हे ३७० रुपये वारेनात..

"अशी ही बनवाबनवी" कोण विसरेल? म्हणजे तुम्ही हा सिनेमा पाहण्याइतक्या भाबड्या काळात जन्माला आला असाल तर. त्यातला अशोक सराफ आणि सुधीर जोशी यांचा तो कल्ट ठरलेला संवाद आपण शेकडो वेळा पाहिला ऐकला असेल. पांढऱ्या बंडीतले घरमालक विश्वास सरपोतदार जेव्हा आपल्या ७० रुपयांचा हिशोब मागतात, तेव्हा बेरकी धनंजय माने (इथेच राहतात का फेम) अत्यंत गंभीर चेहऱ्याने आणि तितक्याच भाबडेपणाने म्हणतात,"७० रुपये वारले!" 

८० च्या दशकातला हा डायलॉग आता निष्पाप कोवळ्या विनोदाचा पेंढा भरलेला नमुना म्हणून उरला आहे. 

🏟 पुण्याच्या भेटीचे वर्णन ✈

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 02/06/2026 15:19 या दिवशी प्रकाशित केले.

🏟 पुण्याच्या भेटीचे वर्णन ✈

नुकतीच मी👩 भारतात आले होते. मला सुटी उशीरा मिळाल्याने एकटीने प्रवास केला. आमचे हे👨 आधीच पोहोचले होते. सध्याला हिंजवडीतल्या त्यांच्या कंपनीत🏛 ते वर्क💻 फॉम होम करत होते. हे काम संपवून आम्ही सगळे परत अमेरीकेत🏡 परतणार आहोत. 

एक बोजड दिवस

लेखक निओ यांनी शनिवार, 09/05/2026 21:29 या दिवशी प्रकाशित केले.

एखादा दिवस कसा ढकलत ढकलत काढावा लागतो, गाडी पंक्चर

आयटीवाले !

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 08/10/2015 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एक लेख वाचण्यात आला. त्यात आयटीतील लोकांच्या रोजच्या जीवनमानाबद्दल लिहीले होते. त्यां लेखाचा मतितार्थ असा होता की आयटीतील लोक खूप स्वच्छंद जगतात. त्याना हवे तेवढे पैसे उपलब्ध असतात मात्र नशिबात आईच्या हातची गरम भाकरी खाण्याचे सूख मात्र नसते. एकूणातच समाजातील आयटीवाले हा एक छोटा वर्ग लोकांच्या चर्चेचा नेहमीच विषय असतो. यातील काही कॉमन अभिप्राय/प्रश्न असे आहेत. तुम्हालाही असे अनुभव आले असतील्.तुम्हाला काय वाटतंय या अभिप्रायांबद्दल? लोकांच्या मते १)आयटीवाले भरपूर पगार मिळवतात. २) एसी मधे बसून नुस्ते इंटरनेट बघायचे हेच तर नुस्ते काम असते.