Skip to main content

पुण्यात केसांवरील चांगले उपचार कोठे उपलब्ध आहेत..

शुक्रवार, 11/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मुलीसाठी (वय १३) सध्या मी चांगला डॉक्टर शोधत आहे, केसगळती आणि कोंडा (स्काल्फ) यावर उपचारासाठी! कोणत्याही उपचारपद्धतीतला असेल तरीही चालेल पण शक्यतोवर आयुर्वेदिक आणि होमिओपथी उपचार करणारा डॉक्टर प्रीफरेबल. कुणीतरी सांगितलं म्हणून डॉक्टर बालाजी तांबे यांच्या कार्ल्यात तपास केला; पण तिथे फक्त पंधरा दिवस, २२ दिवस आणि ३० दिवस असे प्रोफेशनल पंचकर्म पैकेज आहेत, तेही निवासी... त्यात फी अवाच्या सव्वा ... मिनिमम पैकेज ४० हजार तरी !! फक्त केसांवर असे उपचार नाहीत ...औषधे असतील तर नीट माहितीही देत नाहीत ... पुण्यात शिवाजीनगरात त्यांचे एक केंद्र आहे पण तिथे डॉक्टर तांबे येत नाहीत .. काय करता येईल?? पुण्यात केसांवरील चांगले उपचार कोठे उपलब्ध आहेत, कुणी कृपया मार्गदर्शन करेल का? ... लेक बिचारी वैतागलीय ... खूप उपचार झाले ट्राय करून; घरगुती, आजीबाईचा बटवा ... आणि अजून अनेकांचे बटवे !!! 'मिपा'वर काहीतरी ठोस आणि उपयुक्त मदत मिळेल, ही आशा...

वाचने 20733
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

केसांवरील उपचार (कोणत्याही पद्धतीचे) परिणामकारक नसतात असे वाचले होते. तरीही तुमच्या माहितीकरता डॉ. बत्रा यांचे पुण्यात २-३ ठिकाणी क्लिनिक आहे. केसांच्या समस्यांवर होमिओपथी उपचारपण केले जातात इथे अधिक माहिती मिळेल *मी या ठिकाणी उपचार केले नाहीत. येथील उपचार खर्चिक आहेत असे ऐकुन आहे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

डॉ. बत्रा विषयी जरा गुगला मग कळेल काय आहे तो प्रकार . मला वाटतंय तुम्ही वैद्य खडीवाले ना दाखवा मुलीचे वय कमी आहे म्हणून होईल उपचार. बाकी मोठ्या माणसांना कुठलीच उपचार पद्धती लागू नाही . मी ५० - ६० हजार घालवलेत विविध उपचार पद्धतीत आता डोके शांत झालेय खिशाबरोबर . आता कंगवा नाही , तेल नाही , शाम्पू नाही , बायकोला चतुर्थी चा चंद्र बघायची गरज नाही

पाहून घ्या ...जमल तर खोबरेल तेल २००मी लि , ४ ते ५ जास्वंद पाने , मधाचे पोळे (माशा उठून गेल्या असतील अशे) एकत्र करून तापवा या तेलाने दररोज डोक्याला मालिश करत जा फरक पडतो हे नको असेल तर पतंजली चे तेल वापरून पहा.

खूप उपचार झाले ट्राय करून
exactly इथच खरी गोम आहे . सारखे उपचार बदलत राहिल्यानेच असं होतं .ट्रिचप तेल आणि वटजटादी तेल दोन्ही mix करून गरम करूनच आणि केसांच्या मुळानाच लावायचं .हलक्या हाताने मसाज करायचा . खसखसा चोलायचं नाही . नाहीतर केसांची मुलं कमकुवत होतात . पूर्ण १ दिवस आणि १ रात्र हे तेल डोक्यावर राहू द्यायचं . मग शिकेकाई आणि रिठा च्या मिश्रणाने किवा 'निशा हर्बल स्मार्ट ग्लो' शाम्पूने केस धुवायचे . (आठवड्यातून जास्तीत जास्त २ दाच केस धुवावेत ) महत्वाची नोंद : तेलात बदल झाल्यावर पहिला महिनाभर केस जास्त प्रमाणात गळू शकतात . काळजी करू नये . तेल बदलू नये . महिनाभरानंतर बघा कसा फरक दिसतोय ते .

In reply to by तुडतुडी

हे नक्की कामात येतात. याचा चांगला परिणाम झालेले उदाहरण डोळ्यासमोर आहेत. मला स्वत:ला केस गळती सुरु झाली होती तेव्हा सिसा तेल वापरले होते. नवरत्न तेलाच्या नियमित मालिशने पार तुळतुळीत टकलावर (तुरळक) केस आलेले पहिले आहेत. (खरे तर फक्त सुखाची झोप यावी म्हणून ते तेल वापरत होते) नवरत्न तेलाचा वास खूप येतो आणि सर्दी पण होते लवकर म्हणून हे तेल मी टाळतो.

आज आयुर्हित यांची प्रकर्षाने आठवण झाली ! काश ! आज वो ............

केशारोपण याने किती फरक पडतो? टीव्ही वर "हेअर बिल्डिंग फायबर" नामक जहिरात बघुन त्यांच्यशि संपर्क साधला तर ते लोक औषधाबद्दल किमती व्यतिरीक्त इतर कोणतीच माहिती द्यायला तयार नसतात. उदा: अ‍ॅलर्जी, साईड इफेक्ट वगैरे. जहिरातीत दाखवतात तसे त्याने खरच का टकलावरसुद्धा केस उगवतात ? दुसरा एक उपाय आहे " मिनॉक्सिडॉल " पण त्याचे रीझल्ट सगळ्याना मिळतातच असे नाही.

In reply to by विजुभाऊ

इतर कुठलीही औषधं घेताना संभाळून.!! "हेअर बिल्डिंग फायबर" हे ज्या वेगानं केस "वाढलेले" किंवा "जमा झालेले" दाखवतात ते पाहता अशक्य वाटतंय. उगाच प्रयोग करायला जाऊन आहेत त्या केसांची वाट लागून भलतंच काहीतरी होण्याची शक्यता फार.

In reply to by मास्टरमाईन्ड

हे पूर्ण टकलावर उपयुक्त नाही. आधीच्या कमी असलेल्या केसांच्या आजूबाजूला फायबर चे जाले विणले जाते.साईड इफेक्ट बद्दल काही माहिती नाही.तसेच किती दिवस टिकते याचीही कल्पना नाही.

तांबे यांच्या क्लिनिकात केसांसाठी ट्रीटमेंट घेतली होती त्याला बरीच वर्षे झालीत. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार गोळ्या व तेलाची ट्रीटमेंट होती. महाग होती (त्यावेळी बारा पंधरा हजार रुपये). पुन्हा गेले नाही. उपयोग झाला. तेथील काम करणार्‍या डॉ. नी त्यांचे क्लिनिक सुरु केले आहे. हवा असल्यास फोन क्र. देईन. त्यांचे उपचारही स्वस्त नाहीत. सध्या मी घरीच खोबरेल तेल लावते. ते मानवते. एवढाले पैसे द्यायचे या विचारांनीच केस पांढरे होतात. ;)

मी प्युरिफाईड पाणी वापरणे सुरु केले आहे. केसगळती आणि कोंडा यावर थोडा फरक पडला आहे. कॉर्पोरेशनचे पाणी काही कामचे नाही :(

पुण्यात बुधवारपेठेत दगडुशेट गणपतीजवळ त्रिमुर्ती हेअर क्लिनीक आहे. माहितीतल्या एका स्त्रिचे केस अकाली (वय वर्षे ३२) गळुन तिला जवळपास टक्कल पडले होते त्यांचा उपचराने ते पुर्ववत झाले होते. परांजपे नावाच्या महिला ते क्लिनीक चालवत असत सदरील घटना १५ वर्षेपुर्वीची असुन त्यावेळी डॉक्टर-मॅड्यमचे वय बहुदा ६७ असावे. आज ते चालु आहे का व कोण चालवते याची चौकशी करुन नक्किच उपचार घ्या.

तांबे डॉक्टर नाही आणि होमिओपॅथी हि विज्ञानाच्या कसोटीवर उतरणारी उपचारपद्धती नाही. आयुर्वेद अजून सिद्ध झालेली नाही. त्यामुळे या सगळ्यात फक्त पैसे वाया जाणार हे नक्की.

बुरशी अथवा जंतूंमुळे कोंडा होतो.ते वरची कातडी पोखरतात हाच कोंडा. कोणतेही खाद्यतेल हे बुरशी अथवा जंतूंना आयतेच खाद्य म्हणून मिळते ते टाळा.यांना मारक दोन थेंब डेटॅाल तीन तीन दिवसांनी लावून पंधरा मिनिटांनी केस ( डोळ्यात पाणी न जाता ) धुणे. दुसरा एक विक्षिप्त उपाय -एक थेंबभर रॅाकेल मुळाशी चोळणे.त्यानंतर केस साबणाने धुणे. हु उपाय पुण्याबाहेरही करता येतात.

In reply to by कंजूस

रॉकेल माहीत होतं पण डेटॉल माहीत नव्हतं. हा उपाय करून पाहतो. हे लावायचे कसे? सरळ हातावर घेऊन चोळायचे की पाण्यात टाकून विरल (डायल्यूट) करून घ्यायचे?

In reply to by एस

केस ओले केल्यावर लावायचं आपोआपच विरल होतं.पंधरा मिनिटांनी खुर्चीत बसून डोके मागे टाकले आणि पाणी ओतले की मागच्या मागे डोळ्यांकडे न जाता पाणी वाहेल. रॅाकेलचा वास जाण्यासाठी एक दोन थेंब खोबरेल लावावे.नंतर साबणाने धुवावे.

In reply to by एस

डॅटॉलच्या (लिक्वीड) बाटलीवरच लिहले आहे की कोंड्यासाठी उपयोगी म्हणून. तसेच कोणी लोक कापुरसुध्दा वापरतात कोंडा काढायला. मी जॉन्सस अँड जोंन्सनचा निजोराल २% हा शँपु वापरतो कारण मला याचा फायदा झाला. शेड्युल-एच ड्रग असे लिहलय त्यावर पण विदाऊट प्रिस्क्रीप्शनही सहजी मिळुन जातो. (याचा फेस होत नाही)

डॉ. बत्रा होमिओपथीची औषधे देतात. ती काहीच कामाची नसतात. हा स्वानुभव आहे. (होमिओपथी विरुद्ध अ‍ॅलोपथी हा वाद नको.) बाकी रिचफिल वगैरे ट्रायकोलोजीची क्लिनीक आहेत. तिथे खुप खर्चिक उपाय आणि औषधे मिळतील. (हे उपाय तिथेच खर्चिक असतात. इतरत्र निम्म्या किमतीत इलाज होतील. :) सामान्यतः केसांचे विकार त्वचारोग स्पेशलिस्ट पाहतात. तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांशी बोलून पाहा. जमल्यास तेच एखाद्या तज्ञ डॉ चे नाव सुचवतील.

हा घ्या खालील पत्ता स्वतः skin treatment घेतली आहे, २ महिन्यातच एकदम perfect result (माझा खर्च ३५०० झाला होता). इथे माधुरी दिक्षित, करिश्मा कपूर ह्यानी पण ट्रीटमेंट घेतली आहे. एकदा जाउन या महाग पण नाहीये. first visit 450 aahe aani nantar 350 only. जाताना फोन करून जावे, शक्यतो ठराविक दिवशी सायं. ५ ते ८ पर्यंतच असतात Dr. Sharad Mutalik Address: Samruddhi Apartment, B, Wing, Near Pmc Bus Terminus, Near shramik bhavan, Shivajinagar, Pune, Maharashtra 411005 Phone:020 2552 0020

In reply to by नितिन५८८

नक्की ३५०० ना. माधुरी दिक्षित, करिश्मा कपूर ही नावे येतात म्हणून . चला अजून १ प्रयोग करणे आले .

आमचा एक मैतर बिस्लेरीने डोके धुतो. एकच शांपू ब्रँड सदैव वापर्तो. डोके पुसायला खास टॉवेल ठेवतो. बाहेर फिरताना कायम टोपी वापरतो. डँड्रफ काय थांबत नाही. म्या इज्जतीने थोड्या थोड्या दिवसाने क्रु कट मारतो. मला कधी झाला नै. ;)

तुमची मुलगी अजुन लहान आहे प्रॉब्लेम वाढण्या अगोदर सरळ चांगला वैद्यकीय सल्ला घ्या आयुर्वेदिक औषधे सुद्धा विनासल्ला वापरणे चांगले नाही कारण आपण स्वनाडी परिक्षण करू शकत नाही आपल्याला बेसिक माहिती सुद्धा नसते त्याची. आता तुमच्या प्रश्नाबद्दल :- सदाशिवपेठेत वैद्य समीर जमदग्नी ह्यांचा सल्ला घेऊन पहा ते उत्तम वैद्य आहेत असे कळले होते (अनुभव नाही) बहुतेक पेरूगेट च्या आसपास कुठेतरी त्यांचे क्लिनिक आहे.

अगदी केसांच्या आणि प्रश्नाच्या मुळात जायचे तर जंतू आणि बुरशी हेच आहे परंतू जालीम औषधे वापरता येत नाहीत कारण डोळे जवळच असतात आणि कोंडा परवडला पण डोळ्यांना अपाय नको हा मुख्य विचार ठेवावा लागतो. अगदी अल्प प्रमाण ठेवलेले झिंक फॅासफाइड असलेले शांपू आहेत. उष्ण आणि दमटपणा जंतू आणि बुरशी वाढवतात.

डोक्यात कोंडा होण्याची कारणे-- नैसर्गिक रित्या काही लोकांच्या त्वचेच्या पेशींची लवकर वाढ आणि र्हास होतो.(TURNOVER) त्यामुळे अशा मृत पेशींचा गोळा म्हणजे कोंडा आहे. या पेशींची वाढ जर केसांच्या मुळाशी झाली तर त्यामुळे केसांची मुळे अशक्त होऊन केस गळती होते. अतिरिक्त तेल लावल्यामुळे केसांच्या मुळाशी असणार्या पेशींचे श्वसन कमी होते आणि कोंडा होतो. काही जणांची त्वचा अधिक कोरडी असते त्यांना पण कोंडा जास्त होतो. याच कारणाने थंडीत कोंडा जास्त होतो. केसांना तेल लावले तर कोंडा सुटा होत नाही आणी केस चमकदार दिसतात त्यामुळे कोंडा "असतो" पण "दिसत" नाही. वरील सर्व कारणांत एक कारण कोंड्यात मोठ्या प्रमाणात वाढ करते ते म्हणजे बुरशीची वाढ. ज्या लोकांची त्वचा तेलकट असते किंवा ज्यांना अतिरिक्त घाम येतो किंवा जे लोक डोक्याची त्वचा स्वच्छ ठेवत नाही त्यांच्या डोक्याच्या त्वचेत बुरशीची वाढ होऊन कोंडा अधिक होतो. यासाठी उपाय म्हणजे १) केस आणी डोक्याची त्वचा रोज स्वच्छ ठेवणे. यासाठी आपण आपल्या आवडीचा साबण किंवा शाम्पू वापरू शकता. २) ज्यांच्या डोक्याला (किंवा शरीराला) अतिरिक्त घाम येतो त्यांनी दिवसात दोन वेळेस अंघोळ करावी ( शक्यतो थंड पाण्याने) ३) ज्यांना कोंडा झालेला आहे त्यांनी औषधी शाम्पू वापरावे यात सिप्लाचा ८X किंवा जोन्सन आणी जोन्सनचा निझोराल २ किंवा Scalpe हे शाम्पू वापरावेत. वरील किंवा किटो कोनाझोल किंवा सायक्लो पायरोक्स हे बुरशीनाशक द्रव्य आणि झिंक पायरी थायोन (ZPTO) हे द्रव्य असलेला कोणताही शाम्पू आणावा बर्याचदा चांगला शाम्पू चुकीच्या पद्धतीने वापरला तर त्याचा पाहिजे तेवढा गुण येत नाही यासाठी औषधी शाम्पू वापरण्याची पद्धत खाली देत आहे. -- प्रथम केस आणि डोक्याची त्वचा पाण्याने पूर्णपणे ओळी करून घ्या -- त्यानंतर ५ मिली शाम्पू ( लहान मुलाच्या औषध घेण्याच्या झाकणाने मोजून) किंवा साचेट मध्ये ३ मिली शाम्पू असतो तो पाहून त्या मापाप्रमाणे ५ मिली शाम्पू डोक्यात केसांच्या मुळाशी बोटांनी मालिश करून लावा. ज्यांचे केस खांद्यापेक्षा लांब असतील अशानी १० मिली शाम्पू वापरावा. -- शाम्पू डोक्याला लावून एक कप चहा किंवा कॉफी करून प्यावी। ( पाच मिनिटे शाम्पू डोक्याला लावलेला असला पाहिजे). -- पाण्याने डोके आणि केस स्वच्छ धुवावेत. -- हि प्रक्रिया आठवड्यात दोनदा अशी चार आठवडे करावी. -- यानंतर हीच प्रक्रिया महिन्यात एकदा औद्श्धी शाम्पू लावून वर्षभर करावी. आणि इतर वेळेस आपला आवडता कोणताही शाम्पू लावून केस आणि डोके स्वच्छ ठेवावे. बहुसंख्य लोकांना याचा चांगला उपयोग होतो.

पुण्यात बुधवारपेठेत दगडुशेट गणपतीजवळ त्रिमुर्ती हेअर क्लिनीक आहे.
अजिबात नको. पैशाचा अपव्यव आहे
आयुर्वेद अजून सिद्ध झालेली नाही.
कुठल्या जगात वावरताय ? अभ्यास वाढवा जरा . मला तरी वाटतंय विक्रांतला एवढे चांगले चांगले उपाय सोडून पैसे घालावण्यातच इंटरेस्ट आहे

आपणा सर्वांचे मन: पूर्वक धन्यवाद .... खूप तपास केला, खूप माहिती घेतली ... गुण आलेल्या रुग्णांना भेटलो... डॉक्टर भोर, ऋषी आयुर्वेदालाय, फक्त सायंकाळी ७ ते रात्री ९, भेळ चौक, स्वीटमार्टच्या बाजूला ... (रविवार बंद) प्रथम तपासणी फी ३०० रुपये ... डॉक्टर खूप चांगले आहेत ... १००० रुपयांची औषधे दिलीत ... त्यात तेल आहे त्यांचे स्वत:चे कडूनिंब (निंबोळी अर्क), आवळा, शिकेकाई, रिठा, आणि कापूर असलेले .... एक ट्यूब आहे ... आठवड्यातून दोनदा फक्त तेल आन्घोलीपूर्वी तासभर अगोदर किंवा आदल्या रात्री लावून ठेवायचे ... ट्यूब ही दोनदाच फक्त किंचितसा खोबरेल तेलासह स्काल्फ ला लावावा ... शिवाय खाण्यापिण्याची पथ्ये ... ती तर लेक पाळत होतीच ... पापड, लोणचे खावू नये दूध, ताक, दही, लोणी भरपूर खावे.... (यातले दूध ती पीत नव्हती, आता पिवू लागलीय...) आठवडाभरात थोडा फरक जाणवलाय म्हणून लिहितोय.... महिन्याची औषधे दिली आहेत... आपणा सर्वांचे धन्यवाद ...

आपणा सर्वांचे मन: पूर्वक धन्यवाद .... खूप तपास केला, खूप माहिती घेतली ... गुण आलेल्या रुग्णांना भेटलो... डॉक्टर भोर, ऋषी आयुर्वेदालाय, फक्त सायंकाळी ७ ते रात्री ९, भेळ चौक, स्वीटमार्टच्या बाजूला ... (रविवार बंद) प्रथम तपासणी फी ३०० रुपये ... डॉक्टर खूप चांगले आहेत ... १००० रुपयांची औषधे दिलीत ... त्यात तेल आहे त्यांचे स्वत:चे कडूनिंब (निंबोळी अर्क), आवळा, शिकेकाई, रिठा, आणि कापूर असलेले .... एक ट्यूब आहे ... आठवड्यातून दोनदा फक्त तेल आन्घोलीपूर्वी तासभर अगोदर किंवा आदल्या रात्री लावून ठेवायचे ... ट्यूब ही दोनदाच फक्त किंचितसा खोबरेल तेलासह स्काल्फ ला लावावा ... शिवाय खाण्यापिण्याची पथ्ये ... ती तर लेक पाळत होतीच ... पापड, लोणचे खावू नये दूध, ताक, दही, लोणी भरपूर खावे.... (यातले दूध ती पीत नव्हती, आता पिवू लागलीय...) आठवडाभरात थोडा फरक जाणवलाय म्हणून लिहितोय.... महिन्याची औषधे दिली आहेत... आपणा सर्वांचे धन्यवाद ...