Skip to main content

पाण्याचे स्फटीक

लेखक भिंगरी
शुक्रवार, 04/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
पाण्याला जीवन असे म्हटले जाते.शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे. आपण तहान लागल्यावर पाण पितो,एखादा घाबरलेला असेल तर त्याला पाणी प्यायल्यावर बरे वाटते.रागावलेल्या व्यक्तीला पाणी प्यायल्यावर थोडे शांत वाटते. पाण्यावर एवढे बोलण्याचे कारण म्हणजे गुगलवर Water Crystals - masaru emoto हे वाचनात आले. या संशोधकाच्या म्हणण्यानुसार आपल्या भावनांचा पाण्यावर प्रभाव पडतो आणि त्याप्रमाणे त्या पाण्याच्या स्फटीकांमध्ये बदल होतो. ह्याबद्दल कोणाचा काही अनुभव आहे का? किंवा या विषयावर आधी चर्चा झाली आहे का?असल्यास दुवा कोणता?

वाचने 5866
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

In reply to by शुचि

तू सुचविलेले पुस्तक दुकानात चाळले. पाण्याच्या स्फटिकांचे खूप सुंदर फोटो आहेत खरच. जर हॅपी किंवा लक किंवा सोल, थँक यु आदि सकारात्मक शब्द सतत ऐकविले तर पाणी गोठल्यानंतर जे स्फटीक तयार होतात ते फार चमकदार व अत्यंत मनोहारी असतात. प्रत्येक शब्द वेगवेगळे स्फटीक निर्माण करतो. http://yieatn.com/wp-content/uploads/2010/09/Emoto-Water-Crystal-for-Global-Love-Day-2007-9999907342.jpg . http://ih.constantcontact.com/fs141/1102651109596/img/299.jpg?a=1113418821428 ___ याउलट बॅड लक, अनहॅपी आदि नकारात्मक शब्द तेच स्फटिक अतिशय मोडके व सुमार बनवितो असा काहीसा आशय आहे. . https://peaceloveprosper.files.wordpress.com/2013/10/water-crystal-example-2.png . बाकी हे खरेच आहे किंवा हे खोटेच आहे असा काहीही आग्रह नाही. एक नमूद केले बस्स.

In reply to by शुचि

पाण्याचे म्हणजे ते हिमवर्षावाचे स्फटिक असतात. आणि कुठल्याच स्फटिकाचा आकार नैसर्गिकरित्याच इतर कुठल्या स्फटिकाशी तंतोतंत जुळत नाही. 'मॅक्रो फोटोग्राफी' करणार्‍या छायाचित्रकारांना विचारा. यात कुठल्या भावनेचाबिवनेचा थेंबमात्रही संबंध नाही.

मी अगदी ताबडतोब पाण्याचे स्फटिक बनवून बघायला तयार आहे. कसे बनवायचे याची पाकृ कोणीतरी द्यावी. सर्व प्रकारचे आदरार्थी आणि गोग्गोड शब्द, शिव्या, विविध प्रकारची गाणी वगैरे सर्व काही वापरून स्फटिक बनवणार, आणि त्यांचे फोटो लगेच इथे देणार.

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ! लेख वाचुण मणोरंजन जाहले =)) चला आता पाणी पिवुन येतो

आम्ही काही सायंटिफिक, क्रियेटिव वगैरे करायचे म्हटले तर कुण्णी कुण्णी मदतीला येत नाहीये. सांगा ना-गडे कसे बनवायचे पाण्याचे स्फटिक ?

In reply to by चित्रगुप्त

सोप्पे आहे ग्लासभर पाणी घ्या , त्यात दोन चमचे पाणी विरघळवा , मग ते मिश्रण एका ताटात ओतुन कडक उन्हात वाळत ठेवा , उन्हाने पाण्याचे बाष्पीभवन खाले की ताटावर पाण्याचा क्रिस्टलचा एक बारीक थर तुम्हाला दिसुन येईल . =))

नकारात्मक शब्द काय आणि सकारात्मक शब्द काय पाण्याला काय ठाऊक!

हे पहा - इथे साद्यंत माहिती दिसेल. होम्योपॅथीच्या थिअरीला उपयुक्त आहे म्हणून थोडा अभ्यास केला होता मी याचा. पण नंतर कळले की असे काही अजून वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. असो. त्यामुळे याचे महत्व कमी होत नाही. ही चित्रे सुंदरच आहेत.