Skip to main content

महाभारताचे किमान स्वरूपाचे कथानक काय असू शकेल ?

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 25/08/2015 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
महाभारत हा ग्रंथ लिहितानाच ग्रंथ लेखकाने तो ९००० श्लोकांचा आहे हे ग्रंथातच नमुद करून ठेवले. काळाच्या ओघात त्यातील विवीध कथासूत्रांचा विस्तार होत गेला आणि श्लोक संख्या लाखाच्या घरात गेली. म्हणजे प्रचंड मोठा भाग हा वस्तुतः प्रक्षीप्त असला पाहीजे. मला एक नेहमी पडणारा प्रश्न आहे की १) महाभारताच्या प्रथम कर्त्याने ९००० श्लोकात समजा एक कथा त्याच्या स्वतःच्या दृष्टीने पुर्ण केली आहे, समजा अधिकतम शक्य असलेला प्रक्षिप्त भाग गृहीत धरावयाचा नाही असे ठरवले तर महाभारताचे किमान स्वरूपाचे कथानक काय असू शकेल कि ज्या शिवाय महाभारताची कथा आजीबात आकार घेणार नाही ? किंवा असंही म्हणता येईल की तुम्हाला केवळ ९००० श्लोकांमध्ये महाभारताची मुख्य पटकथा सांगावयाची आहे तर तुमच्या पटकथेचे स्वरूप कसे असेल ? २) महाभारतातील किमान पात्रे कोणती की ज्यांच्या शिवाय महाभारताचे किमान स्वरूपाचे कथानक आकारास येऊ शकत नाही ? ३) महाभारतातील किमान भागास आवश्यक नसणारी पण लाखभर श्लोकी महाभारतातील कोणती कथासूत्रे सहजपणे बाजूला ठेवता येतील अथवा टाळता येतील ? (अशीच चर्चा रामायणा बाबतही करावयाची आहे पण नंतर कधीतरी वेगळ्या धाग्यातून) * प्रक्षिप्त = एखाद्या ग्रंथात ग्रंथकाराव्यतिरिक्त दुसर्‍या कुणीतरी मागाहून घातलेला भाग/लेखन (संदर्भ)

वाचने 35062
प्रतिक्रिया 96

प्रतिक्रिया

In reply to by तुडतुडी

जो उल्लेख केलाय त्याबद्दल बोल की तुडतुडे, जो उल्लेख नाही त्याबद्दलच फापटपसारा वाढवून काय होणारे? हे लोक मूर्ख आहेत किंवा कसे इतके सांग. मग त्यांना सांगू आपण.

In reply to by बॅटमॅन

विज्ञानाच्या पल्याडच्या योगादी सामर्थ्याच्या तथाकथीत कल्पनांमबद्दल वि.का. राजवाड्यांचा एक मस्त लेख बर्‍याच वर्षांपुर्वी वाचला होता असे आठवते. कुणाकडे वि.का. राजवाड्यांचे साहित्य उपलब्ध असल्यास तो लेख शोधून वेगळ्या धाग्याच्या रुपाने मिपा आणि इतरही मराठी संस्थळावर आवर्जून टाकला जावयास हवा असे वाटते.

In reply to by तुडतुडी

त्या 'स्ताना'तील लोक धर्मांध असल्याने त्यांची तशी गत झाली आहे. मला माफ करा पण मला वाटते आपले विचार त्या लोकांशी मिळते आहेत. सुदैवाने हिंदुस्थानात बुद्धिवादी लोक आहेत.

मंडळी चर्चा पुन्हा एकदा मूळ धागा लेखाकडे यावी म्हणून काही प्रश्न १) व्यास लिखीत महाभारत भागाची सुरवात काय असावी ? २) व्यास आणि भीष्म समावयीन असावेत का ? ३) महाभारताचे कुरुक्षेत्र युद्ध संपून व्यासांनी महाभारत (जय) लिहिण्यास घेतले तेव्हा व्यासांचे वय काय असावे ?

धृतराष्ट्र आणि पंडू ही खरे तर व्यासाची संतती. म्हणजे व्यासाने आपल्या वंशाचा इतिहास जिवंत रहावा म्हणून जय हा ग्रंथ लिहिला असे म्हटले तर काय चुकले ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

धृतराष्ट्र आणि पंडू ही खरे तर व्यासाची संतती. म्हणजे व्यासाने आपल्या वंशाचा इतिहास जिवंत रहावा म्हणून जय हा ग्रंथ लिहिला असे म्हटले तर काय चुकले ?
मी इथे गृहीतके सरसकट नाकारत नाहीए पण उपरोक्त विधानाच्या अनुषंगाने आधार गृहीतकांकडे निर्देश करतो आहे. कारण इतिहास जिवंत ठेवण्याची संवेदना आहे अशी व्यक्तीस वंशविच्छेद करणारे संघर्ष थांबवण्याचाही प्रयत्न करेल तटस्थ राहणार नाही. १) यातील पहिल गृहीतक हे कि अ) जय या कथेत अंशतःतरी इतिहास असला पाहिजे. (असूही शकतो, नसूही शकतो यावर या धाग्यासाठी भाष्याची विशेष जरूरी तुर्तास तरी नाही) आ) व्यासांचा नियोग प्रसंग चित्रण हा भाग प्रक्षिप्त असावयास नको. कारण महाभारतात नियोग प्रसंग चित्रीत केलेला नसता तरीही धृतराष्ट्र आणि पंडू यांच्या पुत्रांमध्ये जो सत्ता संघर्ष व्हावयाचा तो झालाच असता. (याचा अर्थ असा नव्हे की आपण ते प्रसंगचित्रण प्रक्षिप्त आहे हे आत्ताच गृहीत धरून चालू शकतो.) इथे एक उल्लेखनीय भाग म्हणजे व्यासांच भाषेवरच प्रभूत्व एवढ विशीष्ट आहेतर महाभारतातील विवीध संघर्ष प्रसंग हाता बाहेर जाण्या पुर्वीच व्यासांनी इफेक्टीव्ह हस्तक्षेप करून स्वतःच भाषा प्रभूत्व सिद्ध का केले नाहीत. त्यांनी इफेक्टीव्ह हस्तक्षेपाचा प्रयत्न केला असता तर त्यांनी कृष्णाने युद्ध कर म्हणून गीता लिहिली त्याच्या तोडीस तोड युद्ध करू नका अशी गीता अथवा स्वतःचे इतर इफ्फेक्टीव्ह संवाद आंतर्भूत केले असते. (महाभारतात असे संवाद असतील तर त्या बद्दल मला कल्पना नाही असे असू शकते आणि महाभारत जाणकारांनी व्यासांच्या अशा संवाद श्लोकांवर प्रकाश टाकावा) इ) जर नियोग प्रसंग चित्रण वस्तुनिष्ठ आहे आणि त्यांचा तदनंतरच्या प्रसंगात इफेक्टीव्ह प्रेझेन्स दिसत नाही तर एक शक्यता अशीही असू शकते की व्यासांचा मूळ जय ग्रंथ हा केवळ त्यांच्या पिढी पर्यंतचे आणि फारतर धृतराष्ट्र आणि पांडू या दोन पूत्रांच्या उदया पर्यंतचा असेल आणि नंतरचे सर्व चित्रण इतरांनी केले असेल.

In reply to by माहितगार

नियोगाच्या अटी नुसार नियोगकर्त्याने त्या स्त्रीशी बोलूही नये असा संकेत होता. त्याने अर्थातच अशा संततीबद्दल ममत्व बाळगणे किंवा त्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप करणे हे ही संमत नव्हते.

In reply to by पैसा

काही जण नियोगकर्ते चेहराही पहात नाहीत शरीराच्या इतर भागास स्पर्शही करत नाहीत स्वरुपाचे दावेही करत असावेत. इतर वस्तुस्थिती माहित नाही. जिथपर्यंत महाभारत कथेचा संबंध आहे अंबिका आणि अंबालिका (नावे बरोबर आहेत ना? चुकभूल देघे) यांना चेहरा पाहून भिती वाटली आणि विदुराच्या मातेस भिती वाटली नाही असा किमान उल्लेख आहे म्हणजे चेहर्‍याचे दर्शन प्रत्ययही होत नसावे असे किमान महाभारतात नसावे. दुसरे पांचालनगरीस पोहोचण्यापुर्वी वनात अज्ञातवासातील पांडवांना व्यास भेटघेऊन मार्गदर्शन करून जातात असा किस्सा शरद रावांनी सुचवलेल्या महाभारतात वाचला प्रक्षिप्त आहे अथवा नाही हा भाग वेगळा पण व्यासांचा बाजू घेणारा एक उल्लेख आढळला. कुंतीचे देवतांना आवाहन हा प्रकार नियोगात मोडणारा नसावा पण महाभारतात कुंतीचे संबंधीत देवतांशी संवाद झाले असावेत आणि पाच पांडवात वयाचे अंतर असावे असे काहीसे वाचल्याचे स्मरते पुन्हा एकदा हे स्मरणावर आधारीत आहे इतर अभ्यासकांनी दुजोरा द्यावा अथवा माझी धारणा चुकीची असल्यास तसे नजरेस आणावे. मी माझी धारणा बदलण्यात तत्पर असेन. आणि प्रक्षिप्ततेचा मुद्दा आहेच.

In reply to by माहितगार

अंबा नाही. अंबा ने भीष्माचा सूड घेण्याची प्रतिज्ञा करून प्राणत्याग केला नि पुढील जन्म शिखंडीचा मिळाला असं आहे बहुतेक. अंबिका आणि अम्बालिका या दोघीन्ची लग्न हस्तिनापुर च्या युवराजांबरोबर लावून दिली गेली.

बॅट्या . बोलायचं म्हणलं तर खूSSSSSSS प बोलता येईल . तो विषयच असा आहे . पण 'आम्ही येडे' असं भांडणाच्या सुरत बोलल्यावर नै बोलता येणार . चर्चा करायची असेल तर बोलण्यात अर्थ
विज्ञानाच्या पल्याडच्या योगादी सामर्थ्याच्या तथाकथीत कल्पनांमबद्दल वि.का. राजवाड्यांचा एक मस्त लेख बर्‍याच वर्षांपुर्वी वाचला होता असे आठवते.
वि.का. राजवाड्यांचा 'योग' ह्या विषयावर काही अभ्यास आहे का हे आधी महत्वाचं .त्यांचं लिखाण हि सुधा तथाकथीत कल्पनाच म्हणता येईल .अर्जुना , तू योगी हो म्हणून सांगणारे श्रीकृष्ण येडे , ज्ञानेश्वर महाराज येडे , रामकृष्ण परमहंस , स्वामी विवेकानंद , वासुदेवानंद सरस्वती , स्वामी राम , परमहंस योगानंद आणि असे पुष्कळ योगी सगळे येडे . राजवाडे तेवढे शहाणे

In reply to by तुडतुडी

कशाला एवडा प्रतिसाद प्रपंच ? अशावेळी फक्त होय शक्तीमान, स्वारी शक्टीमॅन, ओके शक्तीमान म्हणून विषय मोकळा करायचा.

In reply to by तुडतुडी

वि.का. राजवाड्यांचा 'योग' ह्या विषयावर काही अभ्यास आहे का हे आधी महत्वाचं. ...... राजवाडे तेवढे शहाणे.
हे राजवाड्यांनी त्या लेखात काय लिहिलय हे पाहून मगचं ठरवता येईल ना, तुर्तास त्यांचा लेख आंजावर तरी उपलब्ध दिसत नाही. त्यामूळे तोपर्यंत तरी राजवाड्यांची योग परीक्षा होऊ शकणार नाही. योग आणि योगी शब्दाच्या एकापेक्षा अधिक व्याख्या आहेत. बाकी तुम्ही ज्यांच्या बद्दल उपरोधानी लिहिले आहे त्यांच्या योगा बद्दल आम्ही उपरोधानेही लिहित नाही, त्यांच्या पैकी प्रत्येकाच्या योगा बद्दल वस्तुनिष्ठ कल्पना बाळगतो आणि त्यांच्या योगसामर्थ्या बद्दल अवास्तव कल्पनाही बाळगत नाही.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अतिनेमके!!!!! कृष्णासारखे देव आणि भीमार्जुनासारखे योद्धे असले तरी बेशिक गोष्ट म्हंजे भावकीची भांडणे असल्यामुळेच ही कथा इंड्यन जन्तेला जास्त आपल्यातली वाटली असावी असे वाटते. राम वगैरे ठीके, पण तो तर बोलूनचालून आदर्श, त्यामुळे जरा आवाक्याबाहेरचाच. महाभारत मात्र एकदम "आपल्यातले" वाटते.

In reply to by बॅटमॅन

आमची आय कीर्तनकार तिच्या शब्दांत बोलायचे झाल्यास रामायण :- मानवी स्वभावातल्या चांगल्या गुणांचा चांगुलपणाचा अतिरेक झाल्यावर जे होते त्याची कथा महाभारत :- मानवी स्वभावातल्या नीच गुणांचा अतिरेक झाल्यावर जे होते त्याची कथा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

क्या बात है, परफेक्ट वर्णन एकदम! सहीच. आता काही सेकुलर आणि लिबरल लोक्स या वर्णनावरून दोन्ही ग्रंथ 'अतिरेक्यां'ना पोषक आहेत असा जावईशोध लावायलाही कमी करणार नाहीत. ;)

In reply to by बॅटमॅन

मुद्दा हा गोथम नरेश का अतिरेक टाळा! अतिरेक टाळणे ह्या सदरा खाली सेक्युलर अन लिबरल सदरे काढून डोसक्याला गुंडाळतात हेच खरे साले :(

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

त्याला काही इलाज नाय सरजी, एकवेळ कुत्रा म्यांवम्यांव आणि मांजर भू भू करेल पण यांच्यात बदल काही व्हायचे नाहीत. तरी अलीकडे जागृती होतेय हे चांगलेच आहे.

In reply to by बॅटमॅन

शिवचरीत्र माहीतीची लेखमाला चालू कर!!!(हे धागे सध्या साईडलाईन ला टाक) अन्यथा रोज दहा खरडींचा मारा करीन. नाखुस सुपारीवाला चिमण हटेला गँग.

In reply to by नाखु

:) नाखु रोज दहा खरडींचा माराची सुपारी घेण्या आधी बहुसंख्य मिपा धागे गुणीले प्रतिसाद लिहिणारे गुणीले दहा-दहा खरडी = ? खरडी हा गुणाक्रार केलाय ना. काल रात्री मिपावरील सर्व धागे आमच्या स्वप्नात येऊन विचारत होते कि बहुतेक धागालेखाच्या मुख्य मुद्द्यापासून भरकटत राहणे यात आम्हा धाग्यांचा काय दोष. आमचा हा धागा तर या चिंतेत पडला होता शिवचरीत्र माहीतीची लेखमालेतही लोक केवळ भावकीपाहू लागले बाकी काही दिसलच नाही तर आपल्या नाखुस सुपारीवालांना किती खरडींचा मारा करावा लागेल ? :)

In reply to by माहितगार

अहो भावकी चा प्रतिसाद विषय सोडुन वाटल्यास मी माफ़ी मागतो तुमची, पण थेट बोला की राव हे काय उगा आडून आडून, उरता उरला नंतर च्या प्रतिसादांचा प्रश्न तर ते एकातुन एक येत गेले _/\_

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अहो तसं कै नै, नाखुंच्या खरड्यांना धास्तावून आमच्या धाग्यावर खरेच बहिष्कार झाला तर काय म्हणून धास्तावलो आणि बाकी आम्ही पण :) स्मायली टाकूनच विनोदानी लिहिलकी त्यामुळे ह. घ्या. बाकी चालू द्या.