Skip to main content

चुंबकीय क्षेत्र आणि प्राण्यांची उभी रहाण्याची दिशा

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 26/08/2008 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
आजच बी.बी.सी.वर ही बातमी वाचली. बातमीचा सारांश असा की, प्राणी चरताना, झोपताना साधारणतः दक्षिणोत्तर असतात. आणि याचा संबंध संबंधित शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी लावला आहे, वारा इत्यादिंचा नाही. मला प्रश्न असा पडला की आपल्याकडे पूर्व-पश्चिम झोपावं असं सांगतात. दक्षिणोत्तर झोपलं तर दक्षिणेला डोकं करू नये असं सांगतात. याचा संबंधही पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी असावा असं मला बरीच वर्ष वाटत होतं. कुणाला याबद्दल जास्त माहिती आहे का? जर चुंबकीय उत्तरेला माणसाचं डोकं असेल तर काय फरक पडतो (पृथ्वीच्या बाबतीत चुंबकीय उत्तर, भौगोलिक दक्षिणेला आहे)? माणसाच्या शरीरावर पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा काय परीणाम होतो? माणूस इलेक्ट्रीकली न्यूट्रल असतो, पण चुंबकीय गुणधर्मांबद्दल काय? त्यातपण dimagnetic, paramagnetic किंवा ferromagnetic या कुठल्या प्रकारात माणसाच्या शरीराची गणना होते? रक्त प्रवाहित असण्यामुळे काही फरक पडतो का, कारण मृतदेहाचं डोकं दक्षिणेकडे केलं जातं!

वाचने 28174
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

माणूस इलेक्ट्रीकली न्यूट्रल असतो, हे काही विशिष्ठ परिस्थीतच शक्य असते. मानवी शरीरावर स्टॅटीक इलेक्ट्रीसीटी चार्जेस असतात. साधारणत: कोरड्या हवामानात मानवी शरीरावर ११ ते १८ के व्ही एवढे स्टॅटीक इलेक्ट्रीसीटी चार्जेस असतात. त्वचेच्या प्रकारानुसार काहींच्या शरीरावर ते जास्तही असतात. या चार्जेस मुळेच कॉम्प्युटर प्रोसेसर वगैरे नाजूक सेन्सेटीव्ह चिप्स उडु( जळु) शकतात, अवांतरः आता ४४० व्होल्ट की लडकी वगैरे हे वेगळेच प्रकरण आहे पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

पण एकूण मिळून न्यूट्रलच असणार, नाहीतर काय काय मजेशीर गोष्टी होतील याचा विचार करा (आणि विजुभौ, एक काव्य/कथा/पोथी लिहाच). (न्यूट्रल) अदिती

In reply to by विजुभाऊ

आता ४४० व्होल्ट की लडकी वगैरे हे वेगळेच प्रकरण आहे ४४० व्होल्ट की लडकी इलेक्ट्रीकली कशी असते? ४४० व्होल्ट की लडकी काही विशिष्ठ परिस्थीतच काय करु शकते? ४४० व्होल्ट की लडकीच्या शरीरावर स्टॅटीक इलेक्ट्रीसीटी चार्जेस असतात का? ४४० व्होल्ट की लडकी कोरड्या हवामानात काय करते? ४४० व्होल्ट की लडकी च्या चार्जेस मुळेच कोणते नाजूक सेन्सेटीव्ह भाग उडु( जळु) शकतात?

In reply to by अवलिया

माझ्या मते हे अनुभवाण्याची गोष्ट आहे, सांगण्याची नाही. पण विजुभौ खुलासा देतीलच! ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

४४० व्होल्ट की लडकी माझ्या मते हे अनुभवाण्याची गोष्ट आहे, सांगण्याची नाही. पण विजुभौ खुलासा देतीलच! दोन ध्रुवां मधे असणार्‍या पोटेंशीयल डिफ्रन्स ची परीणीती असते बाकी दोन ध्रुवांमधे असणार्‍या विभवांतराला वोल्टेज म्हणतात. हे त्या दोहोत असणार्‍या अंतराच्या व्यस्त प्रमाणात आणि आकर्षणाच्या समप्रमाणात असते. अवांतर : अधुन मधुन इलेक्ट्रीक डिस्चार्ज झाल्यास विद्युत घट पुन्हा चार्ज करुन घेता येतात. विद्युत घटांच्या बाबतीत डिस्चार्ज आणी रीचार्ज या अत्यावश्यक गोष्टी आहेत. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

नाना, मी तर चुंबन चिकीत्सेचा पंखा आहो. तुम्ही जेव्हाही कराल, तेव्हा चांगल, तोंड धुवाल, म्हणजे समोरचा बेशुध्द होणार नाही. :D चुंबन चिकीत्सा जिंदाबाद....

In reply to by खादाड_बोका

परत तेच नीट सांगा ना राव तोंड बाहेरुन धुवायचे की आतुन? तुम्ही अर्धीच माहिती देता अन मग मी फसलो म्हणजे ? तुम्ही याल का नंतर फसलेली सेटलेमेंट करुन समजुन द्यायला कि जावु दे यावेळेस नाहि जमले पुढिल वेळेस नक्की जमेल म्हणुन? काय राव ? समजुन घ्या माहित नाहि म्हणुन विचारतो.

जाऊ द्या...लिहीण्यापेक्षा प्रात्यंक्षीक करुन दाखवायला तयार आहो मी. फक्त एक सुंदर ललना लागेल त्याकरीता. तुमची आवड मात्र वेगळी असु शकते... ;) ;) चुंबन चिकीत्सा जिंदाबाद........

ही ती कॅलिफोर्निया मधील जागा, फोटो पाहण्यासारखे आहेत. पण मला स्वत:ला या जागी (थोडासा तोल जाण्यापलिकडे) फार काही विचित्र अनैसर्गिक जाणवलं नाही, मुळात वास्तू बांधतांनाच चलाखी करून तिरकी बांधली असावी असं वाटलं, पुन्हा गेलो की जास्त लक्ष देऊन पाहीन. ह्या ठिकाणी तिकिटे आणि इतर वस्तू (कार स्टिकर्स, टी शर्टस वगैरे) भरपूर महाग आहेत, तेंव्हा कमाई चांगलीच होत असणार!

आदिती वा इथले कोणीहि तज्ञ, माझ्या माहितीप्रमाणे पुण्याजवळ कानिफनाथाचे एक गुहा कम मंदिर आहे.त्या मंदिरात/गुहेत सरपटतच प्रवेश करावा लागतो. त्या मंदिरात/गुहेत गेल्यावर जर चुंबक टांगला तर तो दक्षिणोत्तर दिशेत स्थिर न राहता दुस-याच कोनात स्थिर राहतो. (फक्त ऐकीव माहिती) बुलढाण्याजवळिल "लोणार" सरोवराच्या आसपास पण असाच प्रकार अनुभवायास येतो, ह्यावर काहि शास्त्रीय कारणीमिमांसा आहे का? अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

>> (फक्त ऐकीव माहिती) बुलढाण्याजवळिल "लोणार" सरोवराच्या आसपास पण असाच प्रकार अनुभवायास येतो, मी हे बघितलेलं आहे. पण ते एका मंदिरात होतं, बहुतेक मारुतीचं आहे. या सगळ्यांचं कारण एकच, प्रचंड चुंबकिय क्षेत्र! तो लोणारचा जो मारुती (मूर्ती) आहे, तोच एक मोठा चुंबक आहे. तुम्ही सांगितलेल्या कानिफनाथाच्या मंदिरातपण कुठेतरी असाच प्रचंड चुंबक असणार. त्यामुळेच टांगलेला चुंबक दुसय्राच कोनात स्थिर रहाणार. लोणारच्या तळ्याचा/खड्ड्याचा उगम प्रचंड अशनी पडल्यामुळे झाला. तेव्हा अतिशय जास्त दाब, तापमान अशा स्थितीमुळे अतिशय बलशाली चुंबक तयार होऊ शकतात; लोणारच्या मारूतीची मूर्ती अशाच दगडातून काढली असणार, त्यामुळे त्याच्या प्रचंड, नैसर्गिक चुंबकीय बलाचं स्पष्टीकरण देता येतं. अवांतर: माझ्या शेवटच्या वर्षाच्या भौतिकशास्त्राच्या प्रयोग परीक्षेत एक्सटर्नल परीक्षक खिशात चुंबक घेऊन फिरत होते. माझा प्रयोग चुंबकीय क्षेत्रांबद्दलच होता. ते शेजारी उभे राहिल्यावर उत्तरं विचित्र यायला लागली. मी त्यांना जरा थोडं लांब उभं रहाण्याची विनंती केली. आणि मग हे माझ्या लक्षात आलं. त्याबद्दल मला त्यांनी मला तोंडी परीक्षेत पैकीच्या पैकी गुण दिले. अदिती