Skip to main content

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग १

लेखक गवि यांनी शुक्रवार, 12/06/2015 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
सदस्यहो.. हा धागा, हे पान मिसळपावच्या नवीन उपक्रमाचा भाग आहे. एकोळी धागे, मदत हवी, माहिती हवी, प्रश्न पडला आहे, अशा प्रकारचे अनेक धागे येतात. आणि त्याहून जास्त धागे अनेकांच्या मनात असूनही "केवळ एक शंका, प्रश्न विचारण्यासाठी कुठे धाग्याची मांडणी करणार?" अशा विचाराने काढलेच जात नाहीत. एका ओळीत प्रश्न विचारावा तर धाग्याचं "मटेरियल" होत नाही आणि एकोळी म्हणून धोरणानुसार तो अप्रकाशित होतो. त्यामुळे सदस्यांनी एकमेकांना आपल्या मनात येणारे प्रश्न किंवा एखाद्या विषयावर माहिती नसल्यास ती मिळवणं अशा कारणांसाठी कोणीही या धाग्यात प्रतिसाद लिहू शकेल. रोचक प्रश्न किंवा अडचणी, मग त्या कोणत्याही क्षेत्रातल्या का असेनात, इथे विचारा. त्या क्षेत्रातली माहिती असलेले अनेकजण इथे असण्याची खूप शक्यता आहे. शंभरच्या आसपास प्रतिसाद झाले की धाग्याचा पुढचा भाग काढला जाईल.. आणखी एक पान जोडलं जाईल. त्यामुळे वाचनातली सोयीस्करपणा राहील. शंभरच्या आसपास प्रतिसाद पोहोचल्यावर त्यानंतरच्या एखाद्या नवीन प्रश्नाचा नवीन धागा त्या प्रतिसादलेखकाच्या नावानेच सुरु करण्यात येईल. प्रश्न छोटे, मोठे, साधे, क्लिष्ट कसेही असोत. माझ्या मनातला सध्याचा प्रश्न असा की: कार / वाहनाच्या इंजिनबाबत बोलताना "डिसप्लेसमेंट" आणि "पॉवर" असे दोन शब्द वापरले जातात. एकच डिसप्लेसमेंट असलेल्या (उदा १२०० सीसी) इंजिनची दोन वेगवेगळ्या गाड्यांमधली "पॉवर" कमीजास्त बीएचपी कशी असू शकते?

वाचने 57182
प्रतिक्रिया 153

प्रतिक्रिया

कपड्यांचा वास घालवणे, रंग उजळवणे आणि स्वच्छ करणे या तीनही कामांसाठी एकच रामबाण उपायः खाण्याचा सोडा! कपडे भिजवतांना बादलीभर पाण्यात नेहमीच्या सर्फ/एरीयल्/टाइड सोबत २-३ ग्रॅम खा.सो. आणि २-३ ग्रॅम मीठ टाकावे. कपडे धुवून झाल्यावर शेवटी १० मिनिट फक्त खा.सो.च्या पाण्यातून बुचकळून काढावे. नव्यासारखे चमकतात. फॅब्रीकचा फील कमालीचा सॉफ्ट होतो, रंग उजळतात. वास घालवतो, (कम्फर्ट वैगेरे वापरायची गरज राहत नाही). ३ वर्ष जुनी जीन्स नव्याने चमकू लागली आहे. घरातले सगळे कपडे, चादरी इत्यादींसोबत हाच प्रयोग केला आहे. उत्तम रीझल्ट्स. सूचना: वेगवेगळ्या पावडरींसोबत खा.सो. आणि मीठाचे प्रमाण वेगवेगळे ठेवावे लागते. आम्ही सर्फ एक्सेल वापरतो, ५ ग्रॅम सोडा एका मशीनला व्यवस्थित रीझल्ट देतो.

In reply to by सूड

सांगीतले की वरच... १ बादली पाण्यात २-३ ग्रॅम खायचा सोडा व मीठ. धुतल्यावर तेवढ्याच पाण्यात तितकाच सोडा घेऊन परत १० मिनिटे भिजत घाला, नीट पिळून झटकून झटकून (खांदे दुखेपर्यंत) वाळत घाला. मुंबईत असाल तर आर्द्रता कपड्यांची मदर-सिस्टर करते. मूळ कपड्यांतून घामाचा वासच जात नसतो, तो ही आर्द्रता अजून असह्य करते. त्यासाठी आधी घामाचा वास पूर्ण जाण्यासाठी सोडा. नंतर झोडा. कोरड्या वातावरणात इतका त्रास होत नाही. ( मुंबई सोडा! ;-) )

संदीपभाऊ नावे घेतलीत तर नवीन मंडळ तुमच्या पोस्टीला कमर्शलचा चार्ज लावेल.झैरातींच्या रेटची चाचपणी सुरू आहे.

In reply to by आदूबाळ

नाहीतर काय "खायच्या" बाता आहेत त्या!!

कर्णाळा किल्यावर जुलै महिन्यात जाण्यासाठी परवानगी असते का? आणि यावेळी जाणे ठिक होइल का?

छातीत दुखत असलेल्या रुग्णाला अतीदक्षता कक्षात ठेवले जाते. छातीत दुखण्याची अनेक कारणे असतात पण तपासण्या झाल्यावर त्याचे निदान १५ मिनीटे ते साधारणपणे ८/१० तासात होते. ECG नॉर्मल, हृदयासाबंधी काहीही आजार नाही, रक्ताच्या तपासणीतही गंभीर असे काहीही नाही असे असताना २४ तासानंतरही रुग्णाला ICU मध्ये का ठेवले जाते?

In reply to by भिंगरी

कोणतेही निदान अचूक असेल याची खात्री नसते खास करून ECG ! ECG ही प्राथमिक टेस्ट आहे, जर निदान चुकीचे ठरले आणि आणीबाणीची परीस्थीती आली तर उपचार लगेच्ग मिळावेत म्हणून रुग्णाला ICU मध्ये ठेवले जाते

कृष्ण ह्या शब्दाचा अर्थच मुळी "काळा" असा आहे. किंवा शामल, सावळा असा देखील असू शकतो. मग गोकुळातला कृष्ण निळा कां अन कधीपासून चित्रात किंवा वर्णनांत दाखवू लागले? या विषयी काही माहीती असेल तर सांगा!

In reply to by अरुण मनोहर

कृष्ण काळाच आहे, राम निळा. कदाचित भारतीयांचा काळ्या रंगाबद्दलचा तिरस्कार पाहून तसा बदल केला गेलेला असावा. -
काळा
पहाड.

In reply to by अरुण मनोहर

लहानपणचे उपद्व्याप खोड्या इत्यादि पाहता मोठ्या लोकांकडून भरपूर मार खात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काळेनिळे होणे आपणांस ठाऊक आहेच. ;)

In reply to by स्पा

ब्रेड आणि अंड्यात आहे तेवढाच. :-) जोक्स अपार्ट, प्रश्न नेमका कशा संदर्भात आहे त्यावर उत्तर अवलंबून आहे. म्हणजे रासायनिक, जैविक, पोषणमूल्य, चयापचयातले त्यांचे कार्य की अजून वेगळं काही?

आपला आधार कार्ड नंबर वोटर कार्ड नंबरशी संसग्न करण्यासाठीचे काम चालू आहे. १) मोबाइल sms पद्धतीने झाले नाही. २)ceo-Maharashtra site वरून झाले नाही. ३) National voter service portal च्या साइटवरून होत आहे. Page-- वोटर कार्ड प्लस आधार असं दिसेल- आधार कार्डावरचे नाव, EPIC NO वोटर कार्ड नंबर,आधार चा बारा आकडी नंबर चार चार असा तीन चौकोनात ,मोबाइल नंबर,owner id=self,emai,भरून "submit करा. लगेच "Your request for associating Aadhaar number with Electoral Roll has been registered successfully" असा मेसेज येईल.

L2 विजा वर जाणारी व्यक्ती आपला कंपनीचा लॅपटॉप US ला नेऊन तिथे काम करु शकते का? (बिनपगारी रजा टाकली आहे आणि काही अभ्यास करायचा असल्याने लॅपटॉप नेणे आवश्यक आहे.) नेता येत असेल तर सोबत काय डॉक्युमेंट्स लागतील? कोणताही लॅपटॉप नेताना (पर्सनल / कंपनीचा) सोबत पावती / परवानगीचे पत्र लाग्तेच का?

In reply to by पिलीयन रायडर

माझ्या माहिती व निरिक्षणाप्रमाणे नेहमीच्या ओळखीतले कुठलेही उपकरण अमेरिकेत कुठल्याही व्हिसावर येताना वेगळी परवानगी लागत नाही. कंपनी लॅपटॉप अमेरिकेत नेणारे कंपनीकडून पत्र सोबत घेतात कारण भारतात परतताना ते नवा लॅपटॉप सोबत आणू शकतात. ते पत्र नसल्यास अन भारतील विमानतळावर उतरल्यावर कस्टम्स अधिकारी नव्या लॅपटॉपवर कस्टम्स ड्युटी आकारू शकतात. प्रत्येक व्यक्ती परदेशातुन परतताना १ पर्सनल लॅपटॉप अन ₹२५,००० किमतीचे सामान आणु शकते. यावर कुठलेही आयात शुल्क लागत नसते. या नियमात एवढ्यात काही बदल झाला असल्यास ठाऊक नाही.

माझ्या मित्राला घराच्या वारसा हक्कासाठी (नॉमिनी) कायदेशीर मदत हवी आहे. त्याची माहिती त्याच्याच शब्दात पुढे देत आहे. आजोबांचे दादरला चाळीत दोन खोल्यांचे घर होते. आजोबांच्या पश्चात, चाळीच्या पुनर्विकासात तिकडे इमारत झाल्यावर, ते घर आजीच्या नावावर झाले. त्यांना चार अपत्ये आहेत. दोन मुले आणि दोन मुली. आजीच्या पश्चात ते घर चारही भावंडांना मिळाले. आता त्यातला एक मुलगा (मोठा) ते घर आपल्या नावावर करून द्यावे असे म्हणतो आहे. दुसऱ्या मुलाचे स्वत:चे घर आहे. त्यामुळे बाकी भावाबहिणींचा याला विरोध नाही आहे. सध्या यात कुठलाही आर्थिक व्यवहार होणार नाही आहे. पण ज्याच्या नावावर घर करायचे आहे त्याला अपत्य नाही आहे. त्यामुळे सध्या वारसदार म्हणुन त्याच्या बायकोचे नाव टाकायचे ठरले आहे. इतर दोन मुलींना आणि एका मुलाला अपत्य आहेत. इतर तिन भावंडांच्या मुलामुलींचा, वडिलोपर्जित मालमत्ता म्हणुन, आजीआजोबांच्या मालमत्तेवर कायदेशीर हक्क आहे का? ते आत्ता घर एकाच्या नावावर करताना, नातवंडे आपल्या आईवडिलांकडे, आपल्या वारसा हक्कासाठी आग्रह धरू शकतात का? एकदा घर मोठया मुलाच्या आणि बायकोच्या नावावर झाल्यावर नंतर त्यांच्या पश्चात त्या घरावर हक्क सांगणे इतरांना अशक्य आहे. मोठया मुलाची बायको आपल्या पश्चात आपल्या माहेरच्या लोकांना ते घर देईल अशी शक्यता आहे.

In reply to by भाते

इतर तिन भावंडांच्या मुलामुलींचा, वडिलोपर्जित मालमत्ता म्हणुन, आजीआजोबांच्या मालमत्तेवर कायदेशीर हक्क आहे का? माझ्यामते असला पाहिजे. आजोबांची मालमत्ता ही नातवांच्या नावे सरळ ट्रांसफर होत असते. या प्रकरणात चारही भावंडांच्या मुलांचाही ह्या घरावर समान हक्क आहे. पण भावांनी आपसातल्या समजूतदारीने हा फ्लॅट रितसर पुर्णपणे मोठ्याच्या नावावर केला आणि आपआपली ना-हरकत प्रमाणपत्रे दिलीत तर नातवंडे हक्क सांगू शकणार नाहीत. पण पुढे तंटा होऊ नये म्हणून आताच मोठ्या भावाने बाजारभावाप्रमाणे पैसे देऊन तो फ्लॅट रितसर विकत घ्यायला पाहिजे. अथवा चौघांचा हक्क कायम ठेवला पाहिजे. भविष्यात ज्या कुणाला ती जागा स्वतःकरिता हवी असेल त्याने त्यावेळेच्या बाजारभावाप्रमाणे सगळ्यांना पैसे चुकते करावे. बाहेरच्याला विकायची असेल तर आलेले पैसे समान वाटून घ्यावे. माझ्या नात्यात हेच प्रकरण झाले आणि सर्वात लहान असलेल्या एकट्या भावाने इतर चार बहिणींना हुशारीने भुलवून १-१.५ लाखाला मनवले, प्रत्यक्षात फ्लॅटची बाजारभावाप्रमाणे किंमत ४५-५० लाख होती. बहिणींना सगळं कळत असून भावाशी काय भांडायचं म्हणून विषय सोडून दिला. त्यातल्या दोन बहिणींची अगदी हलाखीची परिस्थिती असूनही रग्गड पैसा असलेल्या भावाने काहीच विचार केला नाही. माझ्यामते हा प्रश्न नेहमीचाच आहे, त्यामुळे मेनबोर्डावर वेगळा धागा म्हणून काढावा.

मला तात्या अभ्यंकरांचा नंबर मिळेल का? खरड्वहीत पाठवेल का कोणी? धन्स

मेल बॉक्स मध्ये येणारे नको असलेले मेल कसे थांबवावेत? जसे होरोस्कोप फ्री,युवर डेली याहू स्टोरिज्.....इ.

In reply to by भिंगरी

नको असलेली मेल्स उघडा. त्याच्या तळाला Unsubscribe असे लिहिलेली लिंक असते. त्यावर क्लिक करून स्वतःचा ईमेल आयडी टाकून त्या मेल्सला Unsubscribe करा. समजा तशी लिंक नसेल तर ऑप्शन्स मध्ये जा. काही विशिष्ट शब्द असलेली ईमेल्स किंवा विशिष्ट आयडीकडून येणारी ईमेल्स ब्लॉक करता येतात. तेथे जाऊन होरोस्कोप फ्री,युवर डेली याहू स्टोरिज् असे शब्द असलेली ईमेल्स थांबवा किंवा ती मेल्स पाठविणारे मेलआयडी ब्लॉक करा.

मिलिंद सोमण यांच्या आयर्नमॅन ट्रायथलॉनमधल्या कामगिरीवरचा हा लेख वाचनीय आहे. Why I Run.

@ सुबोध खरे @ कंजूस आणि गवी गाडी चे "डिसप्लेसमेंट" आणि "पॉवर" चा ९ अनेक लोक समजतात तसा काहीही समंध नाही . आणि एकच डिसप्लेसमेंट असलेल्या (उदा १२०० सीसी) इंजिनची दोन वेगवेगळ्या गाड्यांमधली "पॉवर" कमीजास्त बीएचपी कशी असू शकते? कारण तंत्राद्यान सध्या अशी इंजिन बनतात - कि त्यात अनेक प्रकारचे तंत्राद्यान असू शकते . नवी सर्व इंजिन मध्ये संगणक कंट्रोल करतो . तसेच प्रत्येक टप्प्यात वेगळे तंत्राद्यान असते , त्यामुळे नवीन इंजिन हे पॉवर बरोबर उत्तम मायलेज देणारी हि असू शकतात. हे इंजिन बघा. http://www.indiancarsbikes.in/cars/1-5-litre3-cylinder-400-bhp-engine-n… १५०० सीसी , फक्त ३ सिलीन्देर आणे टाकत - ४०० अश्वशक्ती आणि हिरो होंडा हि ४ स्ट्रोक तर बाकी सर्व २ स्ट्रोक गाड्या होत्या . हे पूर्णत;; वेगळे तंत्राद्यान आहे.

हेमन्त आणि श्रीरंग,तुम्ही दिलेल्या लिंकस वाचल्या. प्र श्न डिस्प्लेसमेंट/पावर/ बद्दल आहे हे धरून -एक ग्रम इंधन (पेट्रोल /डिझेल/नॅचरल गॅस/एथनॅाल वगैरे)जाळल्यास प्रत्येकातून किती ( गणिती /therotical)शक्ती निर्माण होऊ शकते ते केमिस्ट्री /फिजिक्समधून कळते .त्यात काही बदल होणार नाही.आता ती शक्ती वेगासाठी वापरायची का वजन वाहून नेण्यासाठी वापरायची एवढाच पर्याय शिल्लक राहतो.A)रेसिंग कार्सच्या बाबतीत { आणि B)सैन्यातल्या वाहनाच्या बाबतीत } इंधन किती वापरावे लागले हा मुद्दा गौण असतो.A मध्ये वेग आणि Bमध्ये वजन वाहून नेणे महत्त्वपूर्ण असते.आपण उत्सुक आहोत ती वाहने इकनॅामिकल म्हणजे १०० किमी ला ६ ते ८ लिटरस पेट्रोल खाणारी असतात. मला वाटतंय की हा मुद्दा समजावता आला आहे.

चीनने जशी 2000 कि.मी. भिंत बांधुन परकीय आक्रमणापासून देशाचे रक्षण केले. तसे भारतातील खैबर खिंड बंद करून अफगाणी आक्रमणापासून देशाचे रक्षण करण्याचे त्यावेळच्या एकाही राजाच्या मनात कसे आले नसेल. यावर आपले मत मांडा.

In reply to by हेमंत लाटकर

खैबरखिंड ताब्यात असणार्‍या त्यावेळच्या सगळ्या राजांची नावे सांगा ना म्हणजे सगळ्यांचे एकेक प्रॉब्लेम सांगता येतील क्रमाने? कसय ते.. ७/१२, एफेसाय, सिंमेंट, रेती, दगड, लोन, घरगुती अडचणी असे बरेच जेन्युन प्रॉब्लेम असायचे हो. ;)

In reply to by हेमंत लाटकर

वेगळा धागा काढा आणि मंग बगा. ;) बादवे, तूर्तास गूगल मॅपवरुन खैबर खिंड पहा. मग थोडी फार कल्पना येईल अशी आशा.. (पण कल्पना रंजक आहे)

In reply to by हेमंत लाटकर

काही महिन्यांपूर्वी मार्को पोलो ही मालिका नेटफ्लिक्सवर पाहिली. मार्को पोलो हा चंगेझ खानाच्या दरबारातला महत्वाचा माणूस असतो. चंगेझ खान यास एका चिनी राजावर आक्रमण करायचे असते. त्या राजाच्या राजधानीच्या ठिकाणाभोवती भक्कम व उंच तटबंदी असते. त्यापूर्वी कुणीही ती भेदू शकलेलं नसतं. मार्को पोलो संशोधन करून एक अजस्त्र यंत्र बनवतो जे अवजड दगडही लांबवर फेकू शकते. जेव्हा चढाई केली जाते तेव्हा सर्वप्रथम या यंत्राचा वापर करून त्या तटबंदीवर स्फोटकांचा मारा केला जातो. त्या तटबंदीचा एक भाग कोसळल्याची वार्ता त्या चिनी राजाला पोचते तेव्हा त्याचे उद्गार असतात. That wall was built by men. It can be destroyed by men. तसेच तुम्ही सुचवलेली कामगिरी व्यवहार्यही नव्हती. कित्येक पिढ्या ते काम चालले असते. काम पूर्ण होई पर्यंत खूप सारे मनुष्यबळ याच कामात राहिले असते जे आक्रमकांच्या पथ्थ्यावर पडले असते.

In reply to by वेल्लाभट

तुपाला मोहन कुठे म्हणतात. गरम तेल बाईंडर म्हणून वापरलं (उदा० पुरीच्या कणकेत) तर त्याला मोहन म्हणतात. का ते माहीत नाय...

In reply to by आदूबाळ

बरोबर. मी पण मोहन च ऐक्लं आहे. आणि तेलाचं पण मोहन असतंच. जर मोहन जास्त पडलं तर भजी , पुर्‍या जास्त तेल पितात.

4K टीव्ही घ्यावा की एचडी? 4K चे तंत्रज्ञान रूळायला, म्हणजे सर्व प्रमुख चॅनेल्स 4K मध्ये उपलब्ध आहेत, असा दिवस उजाडायला अजून किती वर्षे लागतील? फ्लॅट स्क्रीन टीव्हीचे आयुष्य साधारण दोनतीन वर्षे असते. एवढ्या काळात 4K प्रॅक्टिकल झालेले असेल, की 4K साठी वाजवलेल्या एक्स्ट्रा दमड्या वाया जातील? जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा...

In reply to by सायकलस्वार

तांत्रिक विषय असल्याने, मराठीतून टंकणे मला कठीण असल्याने, इथे प्रतिसाद न देता आपल्या खरडवहीत इंग्लिशमधून लिहीत आहे.

मी सध्या कारने लांब (अंदाजे १०० किमी ) जा-ये करतो. या रोजच्या प्रवासात डुलकी न -लागण्याचे उपाय काय आहेत ? सध्या चहा बरोबर नेतो. ए सी प्रवासी सिट कडे करतो . प्रवासाची वेळ सकाळी ७:३० व संद्याकाळी ६ अशी आहे. प्रवास सरळ एकाच महामार्गा वरून आहे.

In reply to by राघवेंद्र

झकास डुलकी काढायचं सोडून कसले प्रयोग करत बसता? विणकाम, भरतकाम, मोबाईलवर गेम खेळणे, पक्षीदर्शन वगैरे होत असेल तर पहा.

In reply to by राघवेंद्र

हा उपाय मला उपयोगी ठरला आहे. तुम्हाला कॉफी आवडत असेल तर कॉफी कँडीज मिळतात त्या जवळ ठेवा, आणि दहा-एक मिनिटांत एक गोळी संपेपर्यंत तरी हुषार रहाल आणि डुलकी लागणार नाही. (त्या गोळ्यांचे पॅकेट उन्हात राहणार नाहीत असं बघा, उन्हात पाघळून त्या आवरणाला चिकटतात, आणि मग गाडी चालवत असतांना ते आवरण सहज दूर करता येत नाही!) अर्थात्, खूपच झोप येत असेल तर मुकाट्याने गाडी रस्त्यावरून बाहेर काढून दहा मिनिटे आराम करणं आणि डोळे धुवून परत ड्रायव्हिंगला बसणं हेच श्रेयस्कर, अपघातात जीव धोक्यात घालण्यापेक्षा थोडा उशीर सहन करणं कधीही चांगलं!

मित्रा हो , यू एस ए मधुन कोणता टीवी न्‍यावा / का नेउच नये या बद्दल काहि माहिती असलयास कृपया पोस्ट करा देस निकाला आहे डिसेंबर मधे

मटामधल्या १५ मुली, एक मुलगा तरीही पुत्रहट्ट! बातमीने हसु आले. मनात पहिले विचार आला कि हा कदाचित एखादा विक्रम तर नसावा. सहज कुतूहल म्हणुन आंजा वर शोध घेतला. तर याही पेक्षा भयानक वाचायला मिळाले. गिनिज बुक मध्ये एकाच पत्नीपासुन सर्वात जास्त अपत्य संख्या ६९ आहे. आणखी शोध घेतला असता हे सुध्दा सापडले.

In reply to by भाते

लादेनच्या बापाला असंख्य बायका होत्या (एकावेळी चारच. पाचवीशी लग्न करायच्या वेळी तो आधीच्या चौघीतल्या एकीला घटस्फोट द्यायचा). त्याला एकूण ५८ मुले झाली (३६ मुली + २२ मुले). लादेन २२ मुलांमधला १८ वा होता. लादेनने देखील एकूण ६ लग्ने केली होती. त्याचे एक लग्न केवळ २ दिवस टिकले होते. त्याला देखील १९-२० मुले होती.

In reply to by श्रीगुरुजी

आजचा धडा: १. मुसलमान खूप लग्ने करतात. दहशतवादी मुसलमानही खूप लग्ने करतात. जगात त्यांनाच खूप पोरे होतात. गृहपाठासाठी प्रश्नः १. हिंदूंमधे 'एकपत्नीपद्धत' केव्हापासून प्रचलित आहे याची माहिती काढणे. २. हिंदू राजांच्या वैवाहिक इतिहासाबद्दल अधिक अभ्यास करणे. परिसर अभ्यासः १. १८-२२ मुले असणारे अनेक घरंदाज, 'सत्ताधारी जाती'तले हिंदू आढळतात. त्याबद्दल निरिक्षण मांडणे. पाठ्यपुस्तकाबाहेरचा अभ्यासः १. काही हिंदूंच्या 'मुसलमानांच्या चार बायका पद्धतीबद्दल' फारच प्रक्षोभक(?) भावना आहेत. त्या नेमक्या कुठल्या मानसिक गंडातून प्रसवतात याचे सर्वेक्षण करणे. *('दहशतवादी मुसलमान' हा एकच शब्द आहे याची पक्की खूणगाठ मारणे) ;-)

In reply to by संदीप डांगे

वा! वा! संदीप डांगे, तुमचा गाढा अभ्यास आणि जलद आकलनशक्ती पाहून धन्य झालो. >>> १. मुसलमान खूप लग्ने करतात. दहशतवादी मुसलमानही खूप लग्ने करतात. जगात त्यांनाच खूप पोरे होतात. बरोब्बर. पैकीच्या पैकी गुण. >>> १. हिंदूंमधे 'एकपत्नीपद्धत' केव्हापासून प्रचलित आहे याची माहिती काढणे. प्रश्न धड्यातील अभ्यासावर हवेत. धड्याबाहेरील अभ्यासावरील प्रश्न गृहपाठात विचारणे अयोग्य आहे. >>> २. हिंदू राजांच्या वैवाहिक इतिहासाबद्दल अधिक अभ्यास करणे. प्रश्न धड्यातील अभ्यासावर हवेत. धड्याबाहेरील अभ्यासावरील प्रश्न गृहपाठात विचारणे अयोग्य आहे. १. १८-२२ मुले असणारे अनेक घरंदाज, 'सत्ताधारी जाती'तले हिंदू आढळतात. त्याबद्दल निरिक्षण मांडणे. >>> 'सत्ताधारी जात' ? ही कोणती नवीन जात? राजपत्रात, राज्यघटनेच्या एखाद्या परिशिष्टात या जातीचा उल्लेख आहे का? असल्यास ही जात उच्चवर्णीय, इतर मागासवर्गीय, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, भटक्या विमुक्त जाती इ. पैकी कोणत्या गटात मोडते? >>> १. काही हिंदूंच्या 'मुसलमानांच्या चार बायका पद्धतीबद्दल' फारच प्रक्षोभक(?) भावना आहेत. त्या नेमक्या कुठल्या मानसिक गंडातून प्रसवतात याचे सर्वेक्षण करणे. प्रक्षोभक भावना म्हणजे नक्की कोणत्या स्वरूपाच्या भावना? या भावना मानसिक गंडातून येतात का? या भावना इतर कोणकोणत्या गंडातून येतात आणि मानसिक गंडातून प्रक्षोभक भावनेव्यतिरिक्त अजून कोणत्या भावना येतात का? >>> *('दहशतवादी मुसलमान' हा एकच शब्द आहे याची पक्की खूणगाठ मारणे) ;-) मारली.

In reply to by संदीप डांगे

>>> अल्पज्ञानाच्या स्वयंकेद्रित मधुकोषात फक्त सडक्या विचारांची पैदास होते. +१ तुमचा स्वानुभावाधारीत सुविचार पटला.

In reply to by श्रीगुरुजी

थांबूया का? धागा पाहून काहीतरी विधीनिषेध मी तरी पाळत असतो. या विषयावर अधिक ज्ञान पाहिजे असेल तर वेगळा धागा काढा. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

>>> थांबूया का? धागा पाहून काहीतरी विधीनिषेध मी तरी पाळत असतो. मला पहिलाच प्रतिसाद देण्याआधी हा विधीनिषेध पाळण्याचं सुचलं असतं तर आज तुमच्यावर ही वेळ आली नसती. >>> या विषयावर अधिक ज्ञान पाहिजे असेल तर वेगळा धागा काढा. न मागता दिलेल्या सल्ल्याबद्दल धन्यवाद!

माझ्या अल्पमतीनुसार पोलीसांना कोणत्याही ठिकाणी धाड घालण्याआधी सर्च वॉरंट मिळवणे बंधनकारक आहे. याचाच अर्थ असा कि जर पोलिसांनी वॉरंट शिवाय एखाद्याच्या घरात प्रवेश केला तर त्यांच्यावर अनधिकृत पणे प्रवेश केल्याची केस तसेच दरम्यान त्यांनी काही वस्तू तपासा साठी नेल्या तरी दरोड्याचे कलम लावता येवू शकते म्हणून खासगी मालमत्तेवर धाड टाकण्या आधी पोलिस वॉरंट घेवून जातात. मात्र हेच पोलिस रस्त्यावर हमखास खासगी वाहने अडवून चेकिंग करतात, प्रसंगी खासगी असणारे सामान जप्त करून कधी कधी अटक देखील करतात. जर खासगी स्थावर मालमत्तेत धाड टाकताना वॉरंट लागतो तर एखाद्याचे खासगी वाहन हे देखील एक खासगी मालमत्ताच असते. मग अशा वाहनाच्या चेकिंग साठी व काही संशयास्पद असल्यास जप्ती व संबधित व्यक्तीच्या अटकेसाठी वॉरंट का लागत नसावा? केवळ एक उत्सुकता म्हणून हा प्रश्न विचारत आहे, जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा.

माझ्या चेपू अकौंट वरून काही अश्लील पोस्ट्स आणि video आपोआप शेअर होत आहेत. चेपू वर बरेच विद्यार्थी व विद्यार्थिनी असल्याने मला हा प्रॉब्लेम तातडीने संपवायचा आहे. हे अकौंट तात्पुर्ते बंद करावे का व ते तसे करता येते का ?

In reply to by दा विन्ची

(१) सर्वात प्रथम आंतरजालाशी जोडणी न करता तुमच्या संगणकावर विषाणूविरोधी कार्यक्रम तातडीने चालवून संपूर्ण कठीण चकती तपासा आणि एखादा विषाणू/ट्रोजन लपलेला असल्यास तो तातडीने नष्ट करून टाका. तो नष्ट केल्यावर पुन्हा एकदा विषाणूविरोधी कार्यक्रम चालवून संपूर्ण कठीण चकती तपासा आणि आता कोणतेही विषाणू/ट्रोजन इ. लपलेले नाहीत याची खात्री करून घ्या. (२) त्यानंतर चेपु खात्याचा कळीचा शब्द ताबडतोब बदला. सुरवातीच्या काळात थोड्या थोड्या वेळाने कळीचा शब्द बदलत रहा. (३) चेपु प्रशासकांना आपल्या समस्येबद्दल कळवून त्यांचा सल्ला मागा. (४) संगणकाला जोडण्याआधी पेन ड्राईव्ह, सीडी इ. ची विषाणूसाठी तपासणी करून मगच वापरा. (५) आंतरजाल जोडणी बंद करताना प्रत्येक वेळी प्रत्येक प्रोग्रॅममधून (ईमेल खाती, चेपु, ट्विटर इ.) लॉगआऊट व्हा. कधीही "रिमेम्बर पासवर्ड" हा पर्याय वापरू नका. कुकीज अलाऊ करू नका. संगणकावर साठलेल्या टेम्पररी फाईल्स नियमितपणे डीलीट करा. भ्रमणध्वनीद्वारे वरील प्रोग्रॅम वापरत असाल तरीसुद्धा हीच खबरदारी घ्या. (६) जर एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या आयडीच्या माध्यमातून व्हिडिओ, अश्लील पोस्ट्स इ. शेअर होत असतील, तर तात्पुरते त्या आयडीला ब्लॉक करा.

मोबाईल बद्दल प्रश्न आहे. कुठे नक्की विचारावं ते कळेना म्हणुन इथे जुलै मध्ये नवर्‍याने US मध्ये Amazon वरुन Lenovo K3 Note मागवला. आता सध्या मी तो वापरतेय. त्याला कधी काही त्रास झाला नाही. मला मात्र खालील प्रॉब्लेम्स येत आहेत. १. बारिक सारिक गोष्टी चीनी भाषेत आहेत. कुणाचाही नंबर डायल केला की सिटीचे नाव चायनीज मध्ये. कॉन्टेक्ट्स मध्ये यल्लो पेजेसचा टॅब चायनीज. काही अ‍ॅप्सची नावं (क्लिन मास्टर) चायनीज. डीफॉल्ट भाषा इंग्लिश आहे तरीही. २. ह्या नंतर त्रास सुरु झाला ते अ‍ॅटोमॅटिक अ‍ॅप्स डाऊनलोड होण्याचा त्रास. कुठलेही चित्र विचित्र चायनीज अ‍ॅप्स (त्यात अश्लील अ‍ॅप्सही येतात मध्येच) आपोआप येतात. मी ते कितीही वेळा उडवले तरी परत हजर. रोज नव नवे अ‍ॅप्स येतात. कधी इंग्लिशही असतात. ३. क्रोम उघडलं की आपोआप एकामागे एक ३-४ साईट्स ओपन होतात. गुगल प्ले स्टॉअरची साईट ओपन होऊन अ‍ॅप्स दिसतात. ४. चेपु ओपन केलं की खाली चायनीज अ‍ॅड्स येत आहेत. ५. मोबाईलमध्ये जो इन्स्टॉल्ड अ‍ॅण्टीव्हायरस आहे तो म्हणतो की कंपनीने आधीच डालो करुन दिलेले थीम सेंट्र्स, ट्विटर हे मालवेअर आहेत. आम्ही उडवु शकत नाही. काही तरी "रुट" करण्या विषयी येतं. नेट्वर शोध घेतला तर अनेकांना हा त्रास आहे आणि तो मोबाईल "रुट" करुन काही प्रमाणात दुर झालाय. एक अ‍ॅप आहे लिनोव्होचं, त्यात मोबाईल डायग्नोस्टीक होते. त्यात मोबाईल रुटेड - येस असं दिसतं. मला ह्या मोबाईलवर अजिबात खात्री नाही. माझा डेटा सेफ आहे असं वाटत नाही. काय करावे?

In reply to by पिलीयन रायडर

तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडसाठी... - कदाचित या धाग्यावर या समस्येबाबत चर्चा झाली असू शकते. पण ५०० हून अधिक प्रतिसाद असल्याने खात्रीशीरपणे सांगता येत नाही.

In reply to by पिलीयन रायडर

मोबाईल रूट करणं म्हणजे मोबाईल ची जी ऑपरेटींग सिस्टीम असते उदाहरणार्थ अ‍ॅन्ड्रॉईड (जे बहुधा लिनक्स ऑपरेटींग सिस्टीमचं एक रूप आहे त्याला) ताब्यात घेणं. साधारणपणे हा प्रकार ऑपरेटींग सिस्टीम चे डेव्हलपर्स वापरतात. पण जर रूट केलं तर तुम्ही तुमच्या अ‍ॅन्टीव्हायरस ला या कंपनीच्या अ‍ॅप्स ना उडवायसाठी वापरू शकता. एक धोका यात असतो की रूट करताना काही प्रॉब्लेम झाला तर तुमचा मोबाईल वीट (ब्रीक) होवू शकतो. म्हणजे पूर्णपणे बाद होवू शकतो. मोबाईल फार महाग नसेल तर करून पहायला हरकत नाही. मी माझा जुना मोबाईल रूट केला होता आणि त्याचा काही प्रॉब्लेम आला नाही. रूट करण्यासाठी सॉफ्टवेअर्स मिळतात. बाकी तुम्ही जे सांगताय त्यानुसार तुमचा डेटा अजिबात सेफ नाही याबद्दल खात्री बाळगा. नेट बँकींग चे व्यवहार मोबाईल वरून करू नका. ही लिंक पहा: http://www.wondershare.com/mobile-phone/android-root-tool.html

'झारीतले शुक्राचार्य' हे पाताळयंत्री माणसांसाठी वापरलं जाणारं विशेषण आहे. यातले शुक्राचार्य म्हणजे दैत्यगुरु शुक्राचार्य असावेत. पण झारी म्हणजे काय? लहानपणी मी तळणाचा झारा जो असतो तो जर लहान आकाराचा असेल तर त्यास झारी म्हणत असावेत असा समज करून घ्यायचो ;-) .

In reply to by श्रीरंग_जोशी

झारीतले शुक्राचार्य हे पुराणातल्या एका कथेवरून रुळलेले आहे. हे पाताळयंत्री माणसांसाठी नसून विनाकारण अडवणूक करणार्‍या माणसासाठी वापरलं जातं. बहुतेक बळीराजा का कोण देवांना काहीतरी दान करण्याचा संकल्प सोडतो तेव्हा पाणी हातावर सोडतांना कमंडलू हातात घेतो तेव्हा जिथून पाणी पडतं त्या हत्तीच्या सोंडेसारख्या भागाला झारी म्हणतात तिथे हे दान घडू नये म्हणून शुक्राचार्य छोटे रुप घेऊन पाणी अडवण्यासाठी बसतात. नंतर कोणी ऋषी त्यात दर्भ का कायतरी घालून अडथळा काढतो आणि दान संपन्न होते. kamandalu

In reply to by संदीप डांगे

या सचित्र प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद. स्व. गोपिनाथ मुंडे स्वपक्षीय विरोधकांच्या बाबतीत असा उल्लेख करत असल्याने मला वाटायचे की त्यांना अशा लोकांचा पाताळयंत्रीपणा दाखवून देण्याचा उद्देश असावा. बाकी जय हनुमान या मालिकेतलं दैत्यगुरु शुक्राचार्य माझं आवडतं पात्र होतं :-) .