Skip to main content

५ साल केजरीवाल........ दिल्ली निवडणूक २०१५

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 10/02/2015 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
(खरे तर नविन धागा काढणार नव्हतो पण श्री गुरुजी यांच्या धाग्यावर फक्त भाजपच कशी बरोबर हेच त्यांनी जास्त बिंबवण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरा धागा विश्लेषण युक्त असल्याने त्यात जाहीर मुद्दे जास्त बोलता आली नाहीत, ह्या धाग्यावर रिप्लाय नसले तरी चालतील पण फक्त हाच पक्ष कसा महान असे काही मला म्हणायचे नाही किंवा भाजप, कॉन्ग्रेस ची कशी जिरली हे सुद्धा अधोरेखित करावयचे नाही. धागा हा फक्त पुढील मुद्देसुद अ‍ॅक्शन प्लॅन साठी आहेआणि तो ही मी थोडक्यात देणार आहे. कारण आपण न्युज चॅनेल वर फक्त विज .. पाणी येव्हडेच जास्त पाहिले आहे) प्रथम मुद्दे खुप होउ नयेत म्हणुन १५ -१५ मुद्दे एका रिप्लाय मध्ये देतो. आणि या मुद्द्यांना प्रश्न विचारले तरी मी उत्तर देवु शकत नाही. कारण ते आप कसे करणार हे येणारा काळच दाखवेल. आपण जसे मोदी.. फडणवीस सरकारचे कारभार पाहतो आहोत आण इथे बदल घडवतील असे म्हणतो आहोत तसेच येथे ही केजरीवाल हे करतील असे वाटते.. -------------------- किती तरी आरोप झेलत, भगोडा आणि स्वार्थी अहंकारी अशी विभुषणे घेवुन ही गेली १ वर्षे आपले काम इमानदारीने करत अरविंद केजरीवाल लढत राहिले. टीव्ही वर दाखवलेल्या फुकट देणारे हे सरकार असेन अशी टीका ही करण्यात आली. आपण ही फक्त त्याच न्युज पाहत त्यांना दुषणे देत असु ही.. कारण खुद्द मोदी जी पंतप्रधान झाले होते.. त्यांच्या अच्छे दिन च्या वाद्यापुढे हे असले फुकट नको असेच आपले मत होते.. पण आपण त्या न्युज च्या पलिकदे कधी जावुन बघितले का असा प्रश्न मनात येतो.. दिल्लीतील जनतेला तुम्ही बटाटे कांद्याच्या भावा साठी आप ला निवडुन दिले असे आपण सर्रास बोलतो.. कदाचीत ते बरोबर असतील आणि आपण फक्त जे ऐकतो त्यावर विश्वास ठेवतो.. आपल्या बुद्धीचा वापर आप कशी सामान्य पार्टी आहे त्यात काय येव्हडे असे बोलतो .. पण कदाचीत प्रामाणिकते बरोबरच विश्वास .. सादगी आणि मुद्दे या जीवावर दिल्लीत आता ५ साल केजरीवाल ७० अ‍ॅक्शन सुत्री कार्यक्रम आणि माझी मते मी येथे देण्याचा प्रयत्न करत आहे: १. दिल्ली जनलोकपाल बिल ह्या ज्ञलोकपाल बिलाबाबत वेगळे म्हणता येइल की आप चे म्हणणे आहे मुख्यमंत्री, सर्व मंत्री आणि विधायक सगळे लोकपाल च्या कक्षेत येतील. सरकारी अधिकार्‍यांना दरवर्षी त्यांच्या मालमत्तेची माहीती द्यावी लागील. लोकपाल ला भ्रष्टाचार आरोपी लोकांवरती केस चालवण्याचा आणि जॉच करण्याचा अधिकार असेन. सर्व सरकारी कार्यालयात नागरिक चार्टर सुरु केले जातील या गोष्टींना विरोध करण्याचे तसे कारण नाहीये .. पण बघुयात. २. स्वराज विधेयक स्थानिक नागरिकांना, तिथले काही प्रश्न सोडवायचे असल्यास त्यांच्या म्हणण्याने सचिवलायची परवानगी घेवुन ते प्रश्न सोडवले जातील ( जसे की नगरसेवक काम करु शकतात तसे, फक्त हे स्थानिक लोक निर्नय घेतील मोहल्ला सभा आणि स्थानिक नागरीक असोशीएशन द्वारे. त्यांना काही प्रमाणात फंड ही दिला जाईन. हा नागरिक ना सुक्ष्म अधिकार असला तरी निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात जागृत करण्यासाठी चांगले पाउल वाटते. ३. दिल्लीला पुर्ण राज्याचा दर्जा- दिल्लीला पुर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी संविदानिक कक्षेत राहुन आम आदमी प्रयत्न करणार आहे, त्या बरोबरच केंद्रा च्या अंडर असणारे दिल्लीतील पोलिस आनि इतर हे दिल्ली सरकारच्या कक्षेत घेण्याचा प्रयत्न केला जाईन. - भाजप बर्याच दा छोट्या छोट्या राज्यांच्या निर्मितीस अनुकुल आहे. लोकसभेला पण त्यांनी दिल्लीला पुर्ण राज्याचा दर्जा देवु असे अश्वासन दिलेले आहे. त्यामुळॅ या गोष्टीला जर संविधानिक कक्षेत राहुन केंद्राने ही मदत केली तर दिल्ली नक्कीच पुर्ण राज्य होयील. याचे फायदे तोटे असतीलही. परंतु दिल्ली सरकारच्या कक्षेत त्यांचे पोलिस दल असायलाच हवे असे मला वाटते. स्वताचे पोलिस दल नसेन तर बर्याच गोष्टींवर सरकारला केंद्रावर अवलंबुन रहावे लागेल आणि हे चुकीचे आहे. ४. वीज बिल अर्धे - हे सर्वांना माहीतीच आहे पुन्हा येथे लिहित नाही, फक्त वीज मुफ्त नाहिये ५० % कटोती आहे , हे कृपया लक्षात ठेवावे. आणि माझ्या अंदाजानुसार पहिल्या ४०० युनिट मधेय ही कटोती आहे. आणि मिटर घोटाळे आणि त्यामुळॅ परेशान नागरिकांना त्यांचे पृओब्लेम लवकर सोडवण्यास सरकार जबाबदार असेन. ५. वीज कंपण्यांचे ऑडिट 5.डिस्कॉम चे स्वतंत्र ऑडिट- आप वीज कंपण्यांचे ऑडीट करणार आणि विध्जानसभेत मांडुन पुन्हा बिजबिलाबाबत पुनर्गठण केले जाईन . - ऑडीट बद्द्ल कंपण्या कोर्टात वगैरे जाणे मला योग्य वाटत नाही, जर तुम्ही बरोबर असाल तर ऑडीट काही तुम्हाला भ्रष्ट ठरवणार नाही. पण तुमच्या चुका समोर यायला नको असे वाटते आहे का ? ऑडीट होणे हे चांगलेच आहे, याला विरोध कोणाचा नसावा असे वाटते. ६.. स्वताचे इलेक्ट्रीक पावर स्टेशन आप स्वता दिल्लीत पॉवर स्टेशन उभारुन दिल्लीची ६२००MW वीज पुरवण्याचे उद्धीष्ट साध्य करेल आणि राजघाट व बवाना सांयंत्र चे ही कुशलतापुर्ण अध्यायन करेल. ७. वीज वितरण कंपण्यांचे प्रतिस्पर्ध्यांची सुरुवात प्रतिस्पर्धी आल्याने व्यव्स्थीत सेवा आणि योग्य वीज दर यामध्ये नागरीकांचा फायदा होयील असे आप ला वाटते. त्या साठी ते अश्या कंपण्यांना प्रोत्साहीत करतील . जसे मोबाईल सर्विसेस चे झाले आहे, तसेच त्यांना वीज क्षेत्रात हवे आहे. ८. सोलर सिटी बनवण्याची योजना घर, सोसायटी उद्योग आणि इतर ठिकाणी सओर उर्जेच्या मार्फत वीज घेवुन २०२५ पर्यंत जरुरत च्या २० % वीज मिळवण्याचे ध्येय आणि हे धोरण असने काही जास्त तोट्याचे आणि वइरोध करण्याजोगे नक्कीच नाही. आपण्ही आपल्या येथे ही हे करु शकतो. ९ पाण्याचा अधिकार आणि १०. मोफत पाणी हा मुद्दा ही सर्वांना माहिती आहेच लिहित नाही, परंतु . पाईप कनेक्शन हे सीवेज नेटवर्क मध्ये जोडण्याचे काम आप करेन आणि पाणी सप्लाई आणि वितरण प्रणालीची जोच आप करुन व्यव्स्थीतता आणण्याचे काम आप करेन ११.निष्पक्ष और पारदर्शी पानी मूल्य निर्धारण- पिण्याच्या पाण्यासाठी सुविधा जास्तीच्या पाण्यासाठी चे मुल्य योग्य ठवले जाईन आणि दरवर्षी १० % पाण्याच्या मुल्यांमध्ये वाढ आप थांबवणार आणि कधी वाढ करायची असेन तर विचार-विमर्श नुसारच ती वाढ केली जाईन आम आदमी पार्टी सस्ती व स्थायी कीमत पर दिल्ली के सभी नागरिकों को पीने के पानी की सुविधा मुहैया कराएगी। पानी की दरों में अनिवार्यत: सालाना 10 प्रतिशत की बढ़ोतरी के प्रावधान को समाप्त करेगी और किसी भी तरह की बढ़ोतरी विचार-विमर्श के बाद ही की जाएगी। १२. मुनक नहर मधुन पाणी- दिल्ली हरियाणा पेक्षा ही अतिरिक्त पाण्याची हकदार आहे । उच्च न्यायालयाच्या या आदेशानुसार दिल्लीला जास्त पाणी मिळावे या साठी आप कायद्याच्या चौलटीत राहुन प्रयत्न करणार १३, जल संवर्धन वाढवण्यावर जोर - जल संचयन, विहिरींचे पुनर्भरण, मिटी जल संरक्षण संबंधी जोडल्या गेलेल्या योजनांना पाठपुरवठा आप करेन आणि मोहल्ला सभेच्या द्वारेच जवळील झरे, तळी आणि इअतर जल संचयांना पुनर्जिवीत करेन १४ . पाणी माफियांच्या विरुद्ध कारवाई - आप राजनैतिक आधार घेतलेल्याठेकेदार आणि पाणी माफियांविरुद्ध कारवाई करुन, पारदर्शी टैंकर पानी वितरण प्रणाली विकसित करेन . सक्र्य टँकर ची अनुसूची ऑनलाईन आणि मोबाईल वर उबलब्ध केली जाईन १५ यमुना पुनर्जीवित- यमुना नदि चे जीवनदायीनी म्हणून पुनर्जीवन करतानाच, औद्योगीक आणि अनोपचारीक पाणी यमुनेत मिसळण्यास सरकार रोक लावेल.

वाचने 147454
प्रतिक्रिया 255

प्रतिक्रिया

In reply to by नांदेडीअन

क्षमस्व! एका दुसर्‍या पानावर हीच लिंक मी पाहून वाचली होती आणि काही वेळातच इथे पण दिसली. त्यामुळे तीच लिंक परत आली असा समज झाला. पुन्हा एकदा क्षमस्व!

bihar याऊपरही जर केजरीवाल आणि कंपनी लालूंच्या उमेदवारांच्या प्रचाराला गेलीच, तर सर्वप्रथम त्याचा विरोध आप पक्षाचे समर्थकच करतील याची मला खात्री आहे.

In reply to by नांदेडीअन

काहितरी लोचा आहे.लोकसत्ताने हि बातमी खोडसाळपणे दिली असावी काय? कि केजरीसाहेब फक्त लालु (आणि काँग्रेस? ) साठी मतं मागणार नाहि, पण नितीशकुमार अ‍ॅण्ड पार्टीसाठी प्रचार करतील? इन दॅट केस केजरीवाल जास्तच हिपॉक्रसी दाखवताहेत... बघु.

In reply to by अर्धवटराव

खालील चित्रफितीतली जी हवी ती घ्या आणि सुखात रहा... दिल्ली को पूर्ण राज्य और बिहार को विशेष दर्जा दो! इथे आषुतोष मात्र म्हणतात की आमच्याशी कोणी प्रेमाने वागणार असेल तर आम्ही पण प्रेमाने वागू. मात्र आम्ही कुणासाठी मते मागणार नाही! ;) अर्थात आआप ने असे पण म्हणले आहे की आम्ही भाजपाच्या विरोधात मते मागू म्हणून! इतकी स्पष्ट आणि पारदर्शक भुमिका कुठल्याही राजकीय नेत्याने अथवा पक्षाने घेतली नसावी! ;)

In reply to by विकास

हम्म्म्म... याबद्दल आमचा पास :) या आणि आतापर्यंत घडलेल्या इतर लहान-मोठ्या घटनांवरुन मला एक प्रश्न पडायला लागला आहे... आआप/केजरीवाल जे काहि करताहेत ते भारतातल्या एकुणच स्वच्छ राजकारणाची मर्यादा आहे कि केजरीवाल या माणासाची??? माणसाची मर्यादा म्हणावं तर इन जनरल अशी अनेक उदाहरणं दिसतील. राजकारणाची मर्यादा म्हणावं तर ते दाहक वास्तव स्विकारायला मन तयार होत नाहि :(

In reply to by अर्धवटराव

केजरीवाल हे साक्षात मर्यादापुरषोत्तम आहेत. म्हणजे, थोडक्यात - या पुरुषाच्या उत्तमपणाला मर्यादा आहेत... =))

In reply to by विकास

>>> या पुरुषाच्या उत्तमपणाला मर्यादा आहेत परंतु त्यांच्या माकडचेष्टांना आणि ढोंगीपणाला कोणतीच मर्यादा नाही.

In reply to by नांदेडीअन

याऊपरही जर केजरीवाल आणि कंपनी लालूंच्या उमेदवारांच्या प्रचाराला गेलीच, तर सर्वप्रथम त्याचा विरोध आप पक्षाचे समर्थकच करतील याची मला खात्री आहे.
याला वेड पांघरून पेडगावला जाणे म्हणतात.हे म्हणताना म्हणणार की यांनी नितीश कुमारांशी हातमिळवणी केली आहे आणि लालूंशी यांचा संबंध नाही. आणि हे स्वतः उमेदवार उभे करणार नाहीत पण भाजपचा पराभव व्हावा यासाठी प्रचार करणार!! दोन मुद्दे आहेतः १. अ=ब आणि ब=क असेल तर त्याचा अर्थ अ=क असाच होतो. म्हणजे हे नितीश बरोबर आणि नितीश लालूबरोबर याचा अर्थ हे सुध्दा लालूबरोबरच आहेत.उगीच कसलीतरी मल्लीनाथी करू नका. केजरीवाल नितीशबरोबर आहेत हे नक्कीच सिध्द झालेले आहे.तरीही नेहमीच्या आपटर्डांनी त्याचा विरोध सोडाच त्याच्याविरूध्द अवाक्षर काढल्याचे ऐकिवात नाही. २. हे म्हणे भाजपविरोधात प्रचार करणार. बिहारमध्ये भाजप आघाडी आणि लालू-नितीश आघाडी हे उघड-उघड दोनच पर्याय आहेत.म्हणजे हे भाजपचा पराभव व्हावा यासाठी प्रचार करणार म्हणजेच त्याचा फायदा लालू-नितीशला होणार हे न कळण्याइतके इतर लोक दुधखुळे नाहीत. म्हणे केजरीवाल हे बिहारमध्ये भाजपविरोधात घराघरांमध्ये प्रचार करणार आहेत असेही कुठल्याशा हिंदी न्यूज चॅनेलवर दाखवत आहेत. तसे केजरीवालांनी केल्यास आश्चर्य वाटणार नाही.म्हणजे हे दिल्लीचे मुख्यमंत्री. दिल्लीत चांगले प्रशासन देणे वगळता इतर सगळ्या गोष्टी करायला यांना वेळ आहे.आणि ढोंग आणि नाटकीपणा इतका की काही विचारूच नका. बिहारमध्ये एखाद्या घरात थोबाडात खायला लागली किंवा अंगावर शाई उडवली गेली तरी परत फुकटची प्रसिध्दी मिळवायला आणि स्वतःला व्हिक्टिम म्हणून प्रोजेक्ट करून मोदी सरकारविरूध्द गरळ ओकायला हे परत मोकळे.

In reply to by गॅरी ट्रुमन

गॅरी ट्रुमन, +१ http://indianexpress.com/article/india/politics/in-the-works-arvind-kej… वरील बातमीत खालील वाक्ये स्पष्टपणे लिहिली आहेत. AAP leader and Delhi Chief Minister Arvind Kejriwal will campaign against the BJP in the run-up to the Bihar assembly polls. JD(U) secretary general and Rajya Sabha member K C Tyagi told The Indian Express that Kejriwal will share a public platform with Nitish Kumar. “He has also promised to depute his party workers to supplement our poll drive,” he said. >>> बिहारमध्ये एखाद्या घरात थोबाडात खायला लागली किंवा अंगावर शाई उडवली गेली तरी परत फुकटची प्रसिध्दी मिळवायला आणि स्वतःला व्हिक्टिम म्हणून प्रोजेक्ट करून मोदी सरकारविरूध्द गरळ ओकायला हे परत मोकळे. थोबाडात खायला नाही लागणार. आआपच्या एखाद्या कार्यकर्त्याला सांगून आपल्याला थोबाडीत मारायला सांगणार किंवा आपल्या अंगावर शाई उडवायला सांगणार आणि तसे मॅनेज केल्यावर भाजपवर आरोप करणार.

२०१५ च्या दिल्ली निवडणुकीची पार्श्वभूमी रोचक आहे असं मला वाटतं. २०१३ मध्ये विद्यमान कोन्ग्रेस ची धुलाई करत २८ जागा मिळालेली आप. कोन्ग्रेस आणि भाजपने आपचा बिमोड करण्यासाठी केलेला झंझावाती प्रसार. सत्ता सोडून " पळुन" गेलेली आप. केजारीवालांची लोकांना पुर्ण बहुमत देण्यासाठी केलेली आळवणी. २०१४ मध्ये राज्या राज्यात भाजपचा दौडणारा विजय रथ. लोकसभेला दिल्लीकरांनी भाजपला दिलेला भरघोस प्रतिसाद. या पार्श्वभूमीवर आपला मिळालेलं अभूतपूर्व यश. विधानसभेला भाजपला भरभरून मते देणारी दिल्ली जर राज्यसभेत आपला संपूर्ण पाठींबा देत असेल तर दिल्लीकर मूर्ख म्हणावेत का? आप लबाड कि सच्ची याची खरी कसोटी पुढच्या निवडणुकीतच लागेल. तो पर्यंत वाट पाहू.

In reply to by दत्ता जोशी

लोकसभेला भाजपला भरभरून मते देणारी दिल्ली जर विधानसभेत 'आप'ला संपूर्ण पाठींबा देत असेल तर दिल्लीकर मूर्ख म्हणावेत का? असं वाक्य असायला हवंय ना जोशी????

In reply to by दत्ता जोशी

अर्थात ! ईथे अक्कल फक्त एक-दोघांनाच आहे. त्याची खाजवली नाही की बाकीचे मूर्ख आणि खोटारडे

In reply to by कपिलमुनी

दिल्लीकर मूर्ख नसले तरी फुकटे असावेत. एकंदरच आआप समर्थपणं* उभा राहीला असता तर प्रस्थापित पक्षांच्याहून वेगळा आणि मुख्यत्वे चांगला एक पर्याय भारतीय मतदारांना मिळाला असता. आ आ प च्या अपरिपक्वतेमुळं (की आणखी काही?) एका चांगल्या संकल्पनेचं वाटोळं होताना आणि पुन्हा एकदा राजकीय पक्षांना पर्याय नाही म्हणून त्याच वळचणीला मतदारांना उभं राहावं लागणं हे सगळं बघून खरंच वाईट वाटतंय. केजरीवाल डोक्यात जातो तो मुख्यत्वे त्यामुळे. *समर्थपणं म्हणजे एखाद्या चांगल्या प्रोजेक्टप्रमाणं सरकार चालवणं. इन्फ्लो आऊटगो सगळं व्यवस्थित, सुशासन आणि प्रशासन दोन्ही नेटकं. उगाच अकारण मोकळं सोडणं नाही कि मुद्दाम त्रास देणं नाही.

In reply to by प्यारे१

आ आ प च्या अपरिपक्वतेमुळं (की आणखी काही?) एका चांगल्या संकल्पनेचं वाटोळं होताना आणि पुन्हा एकदा राजकीय पक्षांना पर्याय नाही म्हणून त्याच वळचणीला मतदारांना उभं राहावं लागणं हे सगळं बघून खरंच वाईट वाटतंय.
केजरीवालांचा बाकी काही नाहीतरी एक परिणाम नक्कीच जाणवेल. भविष्यात कोणीही भ्रष्टाचार विरोध, सुशासन वगैरे मुद्दे घेऊन राजकारणात आले तर त्याला लोक गांभीर्याने घेणार नाहीत. भ्रष्टाचारविरोधी चळवळीचे प्रचंड नुकसान अरविंद केजरीवाल या माणसाने केले आहे.
केजरीवाल डोक्यात जातो तो मुख्यत्वे त्यामुळे.
माझ्यासाठी तरी कित्येक कारणे आहेत केजरीवाल डोक्यात जायची :) किंबहुना केजरीवाल डोक्यात न जायचे कारण शोधायला गेले तर ते मिळायचे नाही :) (अण्णांच्या एप्रिल २०११ मधील पहिल्या उपोषणापासून अण्णा-केजरीवाल जोडगोळीचा आणि त्यांनी फैलावलेल्या अराजकतेचा कडवा विरोधक) गॅरी ट्रुमन

In reply to by गॅरी ट्रुमन

आण्णा साधे आहेत हो.... त्यांची समजूत जुने मुख्यमंत्री आरामात काढायचे. ;) चाणक्य तर केजरी साहेब होते ना रामलीला वर.

आजकाल कोणी " अण्णा" म्हटलं की मला तो सुनिल शेट्टी आठवतो बघा "आन- मेन अ‍ॅट वर्क" मधला

काहीही असो. "केजरीवाल" हि सगळ्याच प्रस्थापित पक्षांची दुखरी नस आहे हे मात्र खरं. सध्या भारतातील राजकारण इतक्या खालच्या थराला जावून लाथाळ्या करीत आहेत कि त्यापासून दूर राहिलेलंच बरं!

In reply to by दत्ता जोशी

योग्य बोललास रे दत्ता. भाजपा,कॉन्ग्रेसला 'आप'ला खाउ की गिळू असे झालेय तर तिसरे व डावे ह्यांना त्यांचे अस्तित्व संपत चाललेय म्हणून अरविंदची मदत हवीय. चाणक्य पोल वाले काय म्हणतात ?त्यांचे अंदाज अनेक्वेळा बरोबर येतात असे म्हंटले जाते.

Court admits political vendetta, grants bail to AAP’s Surender Singh nsg

In reply to by नांदेडीअन

जामिन मिळणे याचा अर्थ कोर्टाने निर्दोष म्हणून जाहीर करणे आणि पक्षी सुटणे असा आहे का? आणि हो या दुसर्‍या केसचे काय झाले?
Delhi High Court gives last chance to AAP MLA Surender Singh in forged degree case

In reply to by नांदेडीअन

>>> Court admits political vendetta, grants bail to AAP’s Surender Singh
नांदेडिअन, जरा बातम्या नीट लक्ष देऊन वाचा आणि तुमचं इंग्लिशचं ज्ञानही वाढवा. या बातमीत खालील वाक्ये आहेत.
"it has been averred that this case is actuated by political vendetta. Thus, no prejudice is likely to be caused to the prosecution in case the accused persons are admitted to bail," the court said.
averred या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ claimed / alleged / said असा आहे. "it has been averred that this case is actuated by political vendetta" या वाक्याचा मराठीत "हा खटला राजकीय सूडभावनेतून भरला गेला आहे असे सांगण्यात आले आहे" असा अर्थ होतो. "हा खटला राजकीय सूडभावनेतून भरला गेला आहे" असे सुरिंदर सिंग यांनीच मॅजिस्ट्रेट समोर सांगितले. खालील वाक्ये पहा. Singh alleged before metropolitan magistrate Gomati Manocha that the case against him was politically motivated and was being pursued to "stifle and embarrass the ruling party (AAP)". याचा अगदी सरळ अर्थ असा आहे की "हा खटला राजकीय सूडभावनेतून भरला गेला आहे" असे सुरिंदर सिंग यांनी स्वतःच मॅजिस्ट्रेट समोर सांगितले आहे. मॅजिस्ट्रेटने तसे प्रमाणपत्र दिलेले नाही. तसेच "हा खटला राजकीय सूडभावनेतून भरला गेला आहे" असे मॅजिस्ट्रेटने मान्य सुद्धा केलेले नाही. किंबहुना जामिनावर निर्णय देताना मॅजिस्ट्रेट किंवा न्यायाधीश एकतर्फी आणि खटल्याच्या सुनावणीत पक्षपाती वाटतील असे मतप्रदर्शन करूच शकत नाहीत. जर मॅजिस्ट्रेटना "हा खटला राजकीय सूडभावनेतून भरला गेला आहे" असे जामिन देताना वाटले असेल व त्यांची तशी खात्री होउन ते मान्य केले असेल तर त्यांनी तातडीने हा खटला रद्द केला असता. ते न करता त्यांनी फक्त जामिन दिला आहे कारण ज्या कलमांखाली खटला भरला आहे ती कलमे जामीनप्राप्त आहेत. त्यामुळे निव्वळ जामीन मिळाला म्हणून हुरळून जाऊन विजयोत्सव साजरे करण्यासारखे काहीही झालेले नाही. परंतु तुमच्यासारख्या आआपच्या अंधभक्तांनी लगेचच "Court admits political vendetta, grants bail to AAP’s Surender Singh" असे दिशाभूल करणारे वाक्य लिहून टाकले. इथे न्यायालयाने राजकीय सूडभावना आहे असे मान्य केलेले नाही. राजकीय सूडभावनेतून गुन्हा दाखल केला आहे असा सुरिंदर सिंगानी दावा केला आहे व न्यायालयाने फक्त तेवढाच उल्लेख केला आहे. राजकीय सूडभावना आहे किंवा नाही यावर न्यायालयाने कोणतेही मतप्रदर्शन केलेले नाही. अवतारी महापुरूष केजरीवाल सुद्धा सुरिंदर सिंगांना जामीन मिळाल्यावर लगेच हुरळुन गेले आणि आपल्या उपजत लबाड स्वभावाला अनुसुरून त्यांनी लगेच खालील ट्विट केले.
Modi govt gets Commando Surinder arrested. In less than 24 hrs, he gets bail. What is Modiji trying to achieve?
२४ तासांच्या आत जामीन मिळाला म्हणजे गुन्हेगार निर्दोष ठरतो अशी केजरीवालांची समजूत असावी. खुनासारख्या अनेक भयंकर गुन्ह्यात गुन्हेगार जामिनावर सुटुन मजेत असतात. इथे तर फक्त मारहाणीचा गुन्हा आहे. त्यात जामीन मिळाला यात विशेष ते काय आणि जामिन मिळाल्यावर लगेच ट्विट करून मोदींना शिव्या कशाला द्यायच्या? केजरीवाल आपल्या पक्षातील गुन्हेगार मंत्र्यांवर दिल्ली पोलिसांनी कारवाई केली की लगेच मोदींना दोषी धरतात. मात्र आपल्या पक्षातील गुन्हेगार हे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत असे गृहित धरून ते त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करीत असतात. जितेंद्र तोमरच्या अटकेनंतर आआपवाल्यांनी असाच तमाशा करून राजनाथ सिंह व मोदींना शिव्यांची लाखोली वाहिली होती. परंतु तोमरने सर्वच कागदपत्रे बनावट तयार केली हे लक्षात आल्यावर न्यायालयाने त्याला तब्बल ४९ दिवस तुरूंगात ठेवले होते आणि शेवटी तपास पूर्ण झाल्यावर ४९ दिवसांनी त्याला जामीन मिळाला. त्याला जामीन मिळाल्यावर केजरीवाल ट्विट करून मोदींना शिव्या द्यायला का बरे विसरले?

In reply to by श्रीगुरुजी

मॅजिस्ट्रेटने उच्चारलेली प्रत्यक्ष वाक्ये - "it has been averred that this case is actuated by political vendetta" हिंदुस्तान टाईम्सच्या बातमीचे शीर्षक - "Court admits political vendetta, grants bail to AAP’s Surender Singh " मला आश्चर्य वाटतंय ते हिंदुस्तान टाईम्सचं. मुद्दामच ही दिशाभूल करणारी बातमी दिलेली दिसतेय. मॅजिस्ट्रेटने "averred" असा शब्द वापरलेला असताना (ज्याचा अर्थ आरोपीने असा दावा केलेला आहे/असा आरोप केलेला आहे/असे सांगण्यात आले आहे असा होतो), बातमीच्या शीर्षकात "admits" (ज्याचा अर्थ न्यायालयाने असे मान्य केले आहे/असे कबूल केले आहे असा होतो)असा शब्द वापरून वाचकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे ,

अरविंद केजरीवाल या गृहस्थाला कोणत्याही कायदे आणि पध्दतींची कशी अजिबात चाड नाही आणि प्रत्येक वेळी स्वतःच सर्वगुणसंपन्न आणि इतर कोणाला काही कळत नाही असे समजून प्रत्येक ठिकाणी स्वतःचेच घोडे दामटायच्या त्यांच्या कार्यपध्दतीला कोर्टाने चांगलेच फटकारले आहे. मटामधील बातमीनुसार--- "दिल्लीसाठी लोकायुक्त वा उपलोकायुक्त नियुक्त करण्यासाठी १९९५ मध्ये एक कायदा करण्यात आला आहे. त्यानुसार, माजी मुख्य न्यायाधीश किंवा ७ वर्षे उच्च न्यायालयात न्यायाधीशपद भूषवलेल्या व्यक्तीची या पदावर नियुक्ती केली जाते. सर्वप्रथम केंद्रीय कायदा मंत्रालयाशी चर्चा करून पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या काही व्यक्तींची नावं निश्चित करावी लागतात. ही नावं नंतर विरोधी पक्षनेते, नायब राज्यपाल व मुख्य न्यायाधीशांच्या समितीकडं पाठवली जातात. ही समिती सर्व नावांवर चर्चा करून कोणत्याही एका नावावर शिक्कामोर्तब करते. केजरीवाल यांनी मात्र यातील कोणतीही प्रक्रिया न अवलंबता स्वत:च्या पसंतीचा एकच उमेदवार निवडला. त्या उमेदवाराच्या नावाची फाइल त्यांनी थेट दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी यांच्याकडं पाठवली.....हे प्रकरण न्या. रोहिणी यांच्यापुढं आलं असता त्यांनी केजरीवाल सरकारला खडे बोल सुनावले. कायद्यानुसारच लोकायुक्त पदावरील व्यक्तीची निवड व्हायला हवी, असं स्पष्ट करत न्यायालयानं केजरीवाल सरकारची फाइल परत पाठवून दिली." http://maharashtratimes.indiatimes.com/nation/hc-chief-justice-objects-… केजरीवालांनी ज्याचे नाव लोकायुक्त म्हणून सुचवले होते तो मनुष्य यांच्या व्याख्येप्रमाणे भ्रष्ट नसलेला (पक्षी आआप समर्थक) असणार हे सांगायला कुणा ज्योतिर्विदाची गरज नाही. काय म्हणता नांदेडीअन?

In reply to by गॅरी ट्रुमन

केजरीवालांनी केले म्हणजे ते बरोबरच असणार.... न्या. रोहीणींचा लेखनिक त्या दिवशी रजेवर होता, म्हणून तात्पुरता पंतप्रधान कार्यालयातून एक पाठवला. त्याने रोहिणी जी काय सांगतात यापेक्षा मोदींना काय हवे ते टंकले. त्यामुळे असे लिहीले गेले आहे. हे सगळे मोदींमुळे होते हे किती वेळेस सांगायचे?

In reply to by गॅरी ट्रुमन

आपल्याला अनिर्बंध माकडचेष्टा करता याव्यात, भरपूर चित्रपट पाहता यावेत, सतत ट्विट्स टाकता यावेत, मोदींविरूद्ध भरपूर आरडाओरडा करता यावा, आपण या व्यवस्थेचा बळी आहोत आणि सर्व जग आपल्याविरूद्ध एकवटले आहे असा कांगावा करता यावा म्हणूनच केजरीवालांनी दिल्ली सरकारमध्ये स्वतःकडे कोणतेही खाते किंवा मंत्रीपद घेतलेले नाही. जनतेच्या पैशांची मनसोक्त उधळण, कायदे/नियम/घटना इ. सर्व धाब्यावर बसवून मनमानी कारभार, ढोंगीपणा, जनतेचा विश्वासघात, स्वपक्षातील गुन्हेगार आमदारांना संरक्षण, इतरांवर खोटे आरोप, कांगावा ... एवढेच फक्त ते करीत आहेत. त्यामुळे त्यांनी लोकपाल निवडताना कोणतेही नियम्/कायदे/पद्धती न पाळणे यात काहीही आश्चर्य वाटण्यासारखे नाही.

काळा पैसा परत आणण्याच्या कलटीनंतर दुसरी जबरदस्त पलटी
भारतीय जनता पक्षाने कधीही म्हटले नव्हते "अच्छे दिन" येतील.

>>> काळा पैसा परत आणण्याच्या कलटीनंतर दुसरी जबरदस्त पलटी पहिली पलटी कधी मारली? आय मीन काळा पैसा परत आणण्याच्या विषयावर कधी पलटी मारली?

In reply to by कपिलमुनी

अच्छे दिन कुठे आलेत हे मोदी आणि मोदी सरकारला सामान्य जनताच काय पण काँग्रेसचे युवराज पप्पुश्री राहूल गांधी देखील विचारत आहेत. त्यावरून एक नक्की आहे, की आधी अच्छे दिन कधी बघितल्या नसल्याने सर्वांना ते बघण्याची घाई झाली आहे.

In reply to by कपिलमुनी

त्या प्रतिसादात दोन जबरदस्त पलट्यांचा उल्लेख आहे. पहिली पलटी नीट समजल्यानंतरच दुसर्‍या पलटीबद्दल बोलणे संयुक्तिक ठरेल.

आम आदमी पक्ष हा काँग्रेसचाच 'ब' संघ आहे हे मी पूर्वीच लिहिले होते. २०१३ मधील दिल्लीतील विधानसभा निवडणुकीनंतर आआपच्या केजरीवालांनी काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन केल्यावर हे स्पष्ट झाले. निवडणुकीपूर्वी शीला दिक्षितांच्या भ्रष्टाचारावर बेंबीपासून कंठशोष करणारे केजरीवाल काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाल्यावर शीला दिक्षितांवर कारवाई करायला टाळाटाळ करायला लागले तेव्हा काँग्रेस आणि आआपचं साटंलोटं अजून प्रकाशात आलं. २०१५ च्या दिल्ली विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीत काँग्रेसने आआपला वॉकओव्हर दिल्यावर तर काँग्रेस आणि आआपच्या संबंधांविषयी तिळमात्रही संशय उरला नाही. आआपचा अभिनयसम्राट आशुतोषच्या खालील लेखावरून आआप आता काँग्रेसची तळी उचलायला लागला आहे हे दृग्गोचर होईल. http://www.rediff.com/news/column/ashutosh-no-longer-pappu-he-has-namo-… बिहार विधानसभा निवडणुकीसाठी केजरीवालांनी जदयुच्या नितीशकुमारांना जाहीर पाठिंबा दिला आहे आणि भाजपला पराभूत करण्यासाठी आपण कोणालाही मदत करू असे सांगितले आहे. जदयुने लालूचा राजद आणि काँग्रेसशी युती केली आहे. म्हणजे पर्यायाने आआपने लालू आणि काँग्रेसला सुद्धा पाठिंबा दिलेला आहे.

In reply to by नांदेडीअन

सगळं खोटं. आआपवाल्यांनी आजवर जे जे दावे केलेत, इतरांवर जे जे आरोप केलेत ते सगळे खोटे निघालेत. दस्तुरखुद्द केजरीवालांपासून तोमर, अलका लांबा, दिलीप पांडे, राखी बिड्ला आणि आता सरबजीतवर आरोप करणारी जसलीन कौर यांचे सर्व दावे आणि इतरांवरचे आरोप खोटे सिद्ध झालेत. आयुष्यात कधीही खरं न बोलता कायम खोटंच बोलायचं याच अटीवर आआपमध्ये प्रवेश मिळतो.

केजरीवालांना आपल्याविरूद्ध कोणीही चकार शब्द काढलेला सहन होत नाही. आधी योगेंद्र याद्व आणि प्रशांत भूषण झाले आणि आता धर्मवीर गांधी आणि हरविंदर खालसा यांना केजरीवालांनी झाडूने झटकून टाकले आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/nation/aap-suspends-two-punjab-m…

In reply to by श्रीगुरुजी

केजरीवालांना आपल्याविरूद्ध कोणीही चकार शब्द काढलेला सहन होत नाही. आधी योगेंद्र याद्व आणि प्रशांत भूषण झाले आणि आता धर्मवीर गांधी आणि हरविंदर खालसा यांना केजरीवालांनी झाडूने झटकून टाकले आहे.
डॉ. धर्मवीर गांधी हे पतियाळामधील आदर देण्याजोगे नाव आहे असे ऐकले आहे. त्यांनी केजरीवालला पहिल्यांदा प्रभू आणि योया यांना पक्षातून काढून टाकले त्यावेळी विरोध केला होता. कदाचित लालू-नितीशशी हातमिळवणी करायलाही त्यांनी विरोध केला असेल म्हणून आता त्यांना काढून टाकण्यात आले असले तरी आश्चर्य वाटायला नको. धर्मवीर गांधींबरोबर आआपमधील शेवटचा सेन्सिबल नेता बाहेर गेला आहे आणि आआपमध्ये केजरीवाल सारखे ढोंगी आणि नाटकी तसेच भगवंत मान सारखे जोकर्स यांनाच स्थान आहे हे परत एकदा अधोरेखित झाले आहे.

"I can understand that this is not an issue for those MLAs who have millions of rupees stashed away. There are many in our party too. It is also not an issue for those MLAs who are getting a cut in every financial deal happening in their constituency. It is important for those who are honest, and AAP MLAs are honest. Though I am also not denying that there are honest MLAs in other parties, their number is miniscule.A salary hike is important for honest politics and clean politics. A salary hike is important for an honest MLA if we want him to live with dignity and self-respect" जबराट...लय जबरा... बाकि पार्टिया करे तो साला कॅरेक्टर ढिला है!! ग्रीस पेक्षा वाईट अवस्था होणार आहे दिल्लि ची.

दिल्लीतील वीज वितरण कंपन्यांचे लेखापरीक्षण करण्याचा आदेश कॅगला दिल्ली सरकारने दिला होता. परंतु कॅगला असे लेखापरीक्षण करण्याचा अधिकार नाही असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. आपल्या सरकारला उच्च न्यायालयाने झटका दिला आहे असे वरकरणी केजरीवाल म्हणत असले तरी त्यांना या निर्णयामुळे मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत असणार. कारण या लेखापरीक्षणानंतर आपण आधीच निम्म्यावर आणलेले वीजेचे दर अजून कमी करू असे जाहीर आश्वासन त्यांनी दिले आहे (प्रत्यक्षात भाव कमी केल्यावर काही दिवसांनी त्यात ६% वाढ झाली आहे). आधीच कमी केलेल्या वीजेच्या दरामुळे वीज कंपन्यांवर खूप परीणाम झाला होता. त्यामुळे यापुढे दर अजून कमी करणे शक्य नव्हते. आता या न्यायालयाच्या निर्णयामुळे दर कमी करण्याच्या अप्रिय निर्णयापासून केजरीवालांची आपोआप सुटका झाली आहे.