Skip to main content

खाद्यभ्रमंती - पुणे

लेखक नांदेडीअन यांनी गुरुवार, 22/01/2015 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
खाण्या-पिण्यासाठीच्या पुण्यातल्या चांगल्या जागांचा एक नवीन डेटाबेस तयार करायचा का ? बादशाही, श्रेयस, पीके, गुडलक, वैशाली या हॉटेल्सची महती एव्हाना पुण्याच्या बाहेरसुद्धा पोहोचली असेल. थोडा वेळ काढून काही नवीन हॉटेल्सची नावं सांगा, जेणेकरून माझ्यासारख्या खादाडांना खाद्यभ्रमंती करता येईल. चला, सुरूवात मीच करतो. - चांदणी चौक (बावधन) जवळचे ’टेस्टी टंग्स’ चाटसाठी चांगले आहे.

- औंधला असलेल्या ’कढाई’मध्ये रबडी जलेबी आणि पाणीपुरी चांगली मिळते.

- कर्वे नगरच्या स्पेन्सर चौकात महिन्याभरापूर्वी ’ममता डायनिंग हॉल’ सुरू झाला आहे. कमी पैशात फार चांगली थाळी मिळते इथे.

- कर्वेनगरलाच आंबेडकर चौकाजवळ ’कॅफे स्क्वेअर’ नावाचे एक छोटेसे चायनिज हॉटेल आहे. इथले चायनिज पदार्थ इतरत्र मिळतात तसेच आहेत, पण इथली शेजवान चटनी मला खूप आवडते.

- विमान नगरच्या दत्त मंदिर चौकाजवळ ’लझीझ’ नावाचे एक हैद्राबादी हॉटेल आहे. इथली चिकन बिर्याणी पुण्यातल्या सर्वोत्तम चिकन बिर्याणींपैकी एक आहे. ’कुबानी का मिठा’ ही स्वीट डिशसुद्धा मस्तच !


वाचने 124836
प्रतिक्रिया 251

प्रतिक्रिया

F.C रोड, ललित महल शेजारी - सर मिसळ (नविन चालू झालय, चव छान ) सोमाटणे फाटा: रुपेश मिसळ औंध आणि चिंचवड: निसर्ग मिसळ हाऊस सांगवी फाटा - डाळ वडे (सायंकाळी हाथगाडी असते) बाणेर रोड - idlicious (सर्व सौथ इंडिअन, special बिशीबेळी भात, इडली, मेदू वडा ) सांगवी - हॉटेल गोमंतक (sea फूड special) वाकड (हिंजेवाडी पुलाशेजारी ) - हॉटेल रानजाई (मटन भाकरी special ) दापोडी - दत्त बोर्डिंग (कमी पैशात मस्त मांसाहारी जेवण ) पानशेत रोड: घरगुती शाकाहारी तसेच मांसाहारी (मटन , चिकन घेऊन जाणे ते बनवून देतात) औंध संघवी नगर : भेळ (संघवी नगर end ला )

In reply to by प्रचेतस

पुण्यात चांगली बाकरवडी कुठे मिळते ? चितळे सोडून.
त्यांची चव राखून आहेत आणि अता सगळीकडे केंद्रे थाटली आहेत त्यांनी. पिंची काका हलवाईंचा ग्राहक नाखु

रास्ता पेठच्या M.S.E.B.हापिस्च्या डाव्या अन्गाला मसाला ताक अप्रतीम चवदार मिळते.

काल कोथरूडच्या गार्निशमध्ये (यशवंतराव चव्हाण नाट्यगॄहाजवळ) पनीर मालवणी खाल्ली. फार छान चव होती. भाजीसोबत जी वेगळी ग्रेव्ही दिली होती, ती तर अमृततुल्यच !

महर्षी नगर मधले नागब्रह्म 1 नंबर साउथ फूड अप्पे इडली बटर डोसा सगळेच पदार्थ चविष्ट आणि शेवटची फिल्टर काप्पी खा खा खाऊन प्रति माणूस 200 च्या वर बिल काय जात नाय पण छोटे आणि बाकडी स्टाईल बसायची जागा आहे त्यामुळे ambiance ० पण चवि बद्दल वाद नाय

In reply to by सामान्य वाचक

काय सांगता? आप्पे हाटेलात मिळतात? . कुणि पुणेस्थित मिपाकर नागब्रह्म इथे माझ्यासाठी आप्पेकट्टा साजरा आणि स्पॉन्सर करेल काय?

In reply to by सुबोध खरे

हीहीहीहीहीही. डोक्टरसाहेब समजून घ्या ना तुम्ही. उगी लग्नाआधीच कीती राबवायचे बिचारीला. ;) (एकदा लग्न झाले की असले काही लिहिणार नाही की बोलणार नाही. गप्प आप्पे खाणार)

In reply to by अभ्या..

आय माय स्वारी. मला माहित नव्हतं तुमचं लग्न झालेलं नाही. तरीच ती "फक्त तुमच्यासाठीच" आपलेसे (आप्पे) करते

In reply to by सामान्य वाचक

महर्षी नगर मधले नागब्रह्म 1 नंबर साउथ फूड
+१ एक दुरुस्ती. ते नाव "नादब्रह्म" आहे. आप्पे व इतर सर्व दाक्षिणात्य पदार्थ अत्यंत उत्कृष्ट असून तेथील फिल्टर कॉफी देखील अतिशय चविष्ट आहे. सांबारात मात्र डाळीचा दाणा चुकुनही सापडत नाही. नुसतेच पाणी देतात. चटणी अतिशय चविष्ट आहे.

हा लेख मुख्य पानावर जेव्हा जेव्हा आला, तेव्हा प्रत्येक वेळी वाचनखूण म्हणून ठेवायचा प्रयत्न केला. पण जमलं नाही, आजही जमलं नाही.

अरे वाह! खाद्यभ्रमन्ती-आमची मुंबई नाही का मिपावर? असल्यास लिन्क द्या ना.

सिंहगड रोडला गंगा भाग्योदय मधे यम्मी पराठा ओपन झाले आहे. मस्त गरमागरम पराठे मिळतात तिथे. खूप प्रकारचे पराठे आहेत. तिथे जाऊन खाल्ले तर जास्त चांगले लागतात. पार्सल आणले होते पण ती मजा नाही त्यात.

१) सदाशिव पेठेमधे 'हॉटेल नागपूर' अप्रतिम नागपूरी मांसाहारी जेवण मिळते. हॉटेल तसे छोटेसेच आहे जेम-तेम १० ते १२ माणसच एकावेळेला जेवू शकतात पण मटणाची चव अप्रतिमच आहे. ईथे बिर्याणी मिळत नाही. पण मटण पुलाव झक्कास मिळतो. इकडे चिकन जास्त मिळत नाही बहुधा मिळतही नसावे बहुतेक.. मटण थाळीत ज्वारी, बाजरी भाकरी, मटणाचा रस्सा, साधा भात, सोबत कांदा, पापड, कोशिंबीर किंवा लोणचे आसे आसते. सुक्या थाळीत सुके मटण, मटणाचा रस्सा, ज्वारी, बाजरी भाकरी, साधा भात, लोणचे किंवा कोशिंबीर व कांदा.. तसेच कलेजी फ्राय हि वेगळी डिशही मिळते. व मटन पुलाव हवा आसल्यास एक्स्ट्रॉ पे करावे लागते. पण चव अप्रतिमच... २) कोथरुड बसस्टॅड जवळ शिवाजी पुतळ्या जवळ 'मालवणी नाका' नावाचे हॉटेल अप्रतिम मालवनी मांसाहारी जेवन मिळते. मालवनी फिश करी व तळलेले मासे, फ्राय मासे मालवनी पद्धतीने बनवतात. सोलकढी एकदम झक्कास आसते. ३) डेक्कन जिमखान्या जवळ जे.एम (जंगली महाराज) रोडवर 'बोरावके'ज् कु-कुच-कु चिकन' नावाचे हॉटेल आहे. चिकनच्या सर्व डिशेस अप्रतिमच आसतात. खासकरुन बटर चिकन, चिकन लॉलीपॉप्स, चिकन कबाब. इकडे व्हेज डिशेस पण मिळतात पण त्या काही खास नसतात. फक्त एकच आडचण ती म्हणजे इथे कुपन पद्धत आहे. म्हणजे आपल्याला जे पदार्थ मागवायचे आहेत त्यांचे कुपन काढावे लागतात. व पैसे पे करावे लागतात. व नंतर वेटरला ते कुपन द्यायचे आसते. पण जेवन काचैका आसते. गर्दीसुद्धा भरपुर आसते. त्यामुळे वेटिंगवर रहावे लागते १५ ते २० मिनिटांसाठी. ४) कोथरुड बसस्टँड जवळ/समोर जो पादचरी पुल आहे ना तिथे.. पी.के. बिर्याणी हाऊस वाल्यांनीच नविन हॉटेल काढले आहे. 'पी. के मटण भाकरी' म्हणून आजुन गेलो नाहीये पण जाईन एखाद दिवशी. त्या हॉटेलच्या जागी आधी 'द कोल्हापूर दरबार' नावाचे मांसाहारी हॉटेल होते. मस्त चिकन व मटण थाळी मिळायच्या. पण ते हॉटेल भाडेकरारावर होते त्यामुळे भडेकरार संपला म्हणून ते हॉटेल मालकाला बंद करावे लागले..

In reply to by कैवल्यसिंह

सदाशिव पेठेमधे 'हॉटेल नागपूर' अप्रतिम नागपूरी मांसाहारी जेवण मिळते.
हे आजच ट्राय करण्यात येईल.
डेक्कन जिमखान्या जवळ जे.एम (जंगली महाराज) रोडवर 'बोरावके'ज् कु-कुच-कु चिकन' नावाचे हॉटेल आहे. चिकनच्या सर्व डिशेस अप्रतिमच आसतात
या बद्दल असहमत तिथे एकदाच तंदुरी चिकन घेतले होते. कैच्याकाई तेलकट होते. जणू काही तेलात तळून आणलेत ते.

In reply to by महासंग्राम

कैच्याकाई तेलकट होते. जणू काही तेलात तळून आणलेत ते.
माझा अनुभव चांगला आहे.. कारण १८ ते २० वर्षांपासुन जातोय मी. टेस्टमधे काहीही फरक पडला नाही. त्या वेळेला जी टेस्ट होती ती आजही आहे..

1. नवनाथ चहा पिंपले गुरव--चहा अगदी मस्त फक्त 10 रूपयांत २. अशोक हॉटेल --दापोडी--नाशाता साठी आति उत्तम..

बादवे, सदाशिव पेठेत असलेलं 'रस्सा' आता म्हात्रे पुलाजवळ डी.पी रोड ला स्थानांतरित झालं आहे. तिथली बिर्याणी आणि कोल्हापूरी जेवण सुंदर असते. नॉनव्हेज चे माहेरघर हा सदाशिव पेठेचा नावलौकिक कमी होत चालला आहे हल्ली !!!

आवारे लंच होम/खानावळ मधले झणझणीत चिकन व मटण एकदमच भारी... रूमाल जवळ बाळगल्या शिवाय पर्यायच नसतो.. पण आत्ता ती खानावळ चालु आहे का नाही ते माहीत नाही. चालु आसल्यास कृपया कळवावे. म्हणजे एखाद दिवशी जाता येईल. बिर्याणीसाठी 'पी. के बिर्याणी हाऊस' व 'एस. पी'ज बिर्याणी हाऊस' हि दोन्ही बिर्याणीची रेस्टॉरंटस् झकास आहेत. त्यातल्या त्यात 'एस. पी'ज बिर्याणी हाऊस' मला खुप आवडले. त्याच्याकड व्हेज-नॉनव्हेज या दोन्ही प्रकारातल्या बिर्याणींचे खुप ऑप्शन्स आहेत..

In reply to by कैवल्यसिंह

आवारे अजूनही सुरु आहे. चवहि तशीच अप्रतिम. पिके सुद्धा सुंदर .एस. पी. ची चव पार बिघडली आहे. बिर्याणीचाय नावाने साजूक तुपातला मसाले भात देतात हल्ली.

In reply to by महासंग्राम

आवारेचा नेमका पत्ता देता का? खुप वर्ष झालीय आता पत्ता विसरुन गेलोय.. बहुतेक सदाशिव पेठ मधेच आहे ते...

मुंबईचे फेमस 'गजाली सी-फूड' हे रेस्टॉरंट/हॉटेल आता पुण्यात.. येथे बोंबील फ्राय, फिश कोशिंबीर, मटणाचा मालवणी हिसका, क्रॅब तंदूरी, टायगर प्रॉंन्स, लॉबस्टर, कोळंबीचं मस्त लोणचं आशी विविध तोंपासु पदार्थ मिळतात.. पन भरपुरच महाग आहे.. हे रेस्टॉरंट बंडगार्डन येथील आयनॉक्स सिनेमा गृहाजवळ मेट्रोपोलिस इकडे नविन शाखा सुरु झाली आहे.. मुंबईचे फेमस 'गजाली सी-फूड' हे हॉटेल आता पुण्यात.

बर्‍याच दिवसांपासून पिंपरी मार्केटजवळच्या महादेव पॅटिसवालाबद्दल ऎकून होतो. लोकांना जशी चहाची तलफ लागते, तशी मला चटपटीत खायची तलफ लागत असते अधूनमधून. काल रात्री अशीच तलफ लागली होती म्हणून रेनकोट घालून भर पावसात बाईकवर जाऊन हे ठिकाण शोधून काढलेच. लगेच पॅटिसची ऑर्डर दिली. पूर्ण पॅटिस संपवेपर्यंत मनात एकच विचार होता, की हे पॅटिस इतके फेमस का झाले असेल ? सगळीकडे मिळते अगदी तसेच पॅटिस आहे हेसुद्धा. चव खराब किंवा वाईट होती असे मुळीच म्हणत नाहीये मी, पण जेवढा गाजावाजा झालाय, तेवढे नक्कीच विशेष नाहीये हे पॅटिस. पॅटिस संपवल्यानंतर एक गुलाबजामुन मागवले. तेसुद्धा फार काही विशेष नव्हते. अती जास्त अपेक्षा ठेवून एखाद्या ठिकाणी पोटोबा करायला गेल्यावर आपला पोपटोबा होऊ शकतो, याचे हे उत्तम उदाहरण. असो. महादेव पॅटिसवालामधून बाहेर पडताक्षणी Kalyani A1 हे छोटेसे पाणीपुरी-भेळ सेंटर दिसले. काहीही अपेक्षा न ठेवता एक प्लेट पाणीपुरी खायचे ठरवले. इथे मात्र उलटे झाले. अपेक्षेपेक्षा खूप टेस्टी पाणीपुरी खायला मिळाली. एक प्लेटची दोन प्लेट कधी झाल्या कळलेच नाही. यापूर्वी इतकी चांगली पाणीपुरी मी फक्त दोनच ठिकाणी खाल्ली होती. एक म्हणजे कॅम्पमधले जयशंकर पाणीपुरीवाला आणि दुसरी कोथरूडच्या डीपी रोडवरच्या बधाई स्वीट्समधली पाणीपुरी. Kalyani A1 च्या पाणीपुरीची चव बरीचशी जयशंकर पाणीपुरीसारखीच आहे. कोणाला पिंपरीतील स्ट्रीट फुडसाठी फेमस असलेली ठिकाणं माहीत असतील, तर कृपया शेअर करा. pattice sweet

असल्यास माहिती टाकावी ही नम्र विनंती. -दिलीप बिरुटे

माझेही उत्तर भारतात गेल्यावर काहीसे असेच व्हायचे ... एकदा दिली हुन आग्र्याला जाताना सकाळच्या थंडीत रस्त्याच्या बाजूल खाल्ले,,, गरम होते म्हणून मजा आली पण जडच याला कारण असे असावे : मराठी लोकांना कदाचित पराठा आणि खास करून मेथीचा म्हणले कि गुजराथी पद्धतीचा खुसखुशीत THEPLA सदृश खाण्याची सवय झाली असावी ,, पण मुळात उत्तरेतील पराठा हा प्रकार जाडजूडच असेल ! असो अजून एक गोष्ट भारतात मिळाली तर जरूर खा... फक्त वाटतात किसाचा पराठा म्हणजे स्विस पद्धतीचा " पोटॅटो रोस्टी"

डांगे चौकातून रावेतला जाणार्‍या रस्त्यावर डाव्या बाजुला हॉटेल समाधान आहे. मटन, चिकन अतिशय उत्तम असते. चिकन/मटन सुक्के, एक वाटी रस्सा (अनलिमिटेड), चपाती/ज्वारीची/बाजरीची भाकरी इथे मटन/चिकन सोबत मिळणारा भात अप्रतिम सुगंधित असतो. हे सर्व मोदी लॉकडाउन पुर्वी आता उठा लॉकडाउन मध्ये काय परिस्थिती आहे महिती नाहि.