Skip to main content

फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल

लेखक संदीप डांगे यांनी रविवार, 11/01/2015 04:02 या दिवशी प्रकाशित केले.
फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल सगळीकडे गदारोळ सुरु आहे. हजारो लोक रस्त्यांवर आले आहेत "अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला", "आम्ही सगळे चार्ल्स हेब्डो", वैगेरे वैगेरे. आणि त्यातल्याच काही अतिउत्साही महाभागांनी परिसरातल्या मस्जीदी उध्वस्त करून आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क बजावला. मृतांबद्दल सहानुभूती असणे योग्यच आहे पण ती किती योग्य ते जरा तपासून बघायला हवी. मी स्वतः एक कलाकार असून कट्टरवाद्यांच्या भूमिकेतून मी ह्या हल्ल्याचे समर्थन केले कारण कुणीतरी हा वेगळा दृष्टीकोन मांडणे आवश्यक आहे, जो काही धाडसी वार्तापत्रे मांडत आहेतच. जेणे करून ह्या हत्याकांडाच्या इतर बाबींवर प्रकाश पडावा व मुस्लिमांची जी एकच एक प्रतिमा रंगवली जात आहे तो प्रयत्न हाणून पाडवा. पण काही मित्रांना माझा हा पवित्रा खटकला आणि त्याचे चेपू वर पडसाद उमटले. तिथे उदधृत काही विचार माझ्यापेक्षा जास्त चांगला,व्यवस्थित आणि माहितीपूर्ण विचार करणाऱ्या जाणकार मिपाकारांसमोर ठेवत आहे. चर्चा अपेक्षित आहे. "चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने केलेल्या खोडसाळपणाबद्दल आज कुणीही बोलत नाही कारण कुणाची हत्या होणे म्हणजेच फार भयंकर एवढेच सामान्यपणे लोक समजतात. ज्याची हत्या झाली तो भारी निष्पाप आणि मारणारा क्रूर अविचारी नराधम. त्याच वेळेस गोडसेच कसे बरोबर, गांधी कसे मारण्याच्याच लायकीचे होते हे गेली साठ वर्षे आपण चघळत आहोत. म्हणजेच काय तर मारणारा आणि मरणारा ह्यापैकी जो आपला त्याचीच बाजू बरोबर. ह्यासंदर्भात आपण दोन अतिशय वेगळ्या गोष्टी लक्ष्यात घेतल्या पाहिजेत, एक म्हणजे, "चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने फार खवचट आणि असंस्कृत अश्या व्यंगचित्रातून पैगंबरांचा अपमान केला. त्या साप्ताहिकाचा असे करण्यामागचा हेतू जाणून बुजून भावना दुखावून उचकवणे (provocative) असाच होता. माझा आक्षेप हा हत्याकांडाच्या पूर्वी झालेल्या बेजबाबदारपणाबद्दल आहे. लोक आज म्हणत आहेत कि "साधे एक चित्र काढले तर थेट गोळ्या घालायची काय गरज होती?" ते चित्र इतरांसाठी साधे असेल मुस्लिमांसाठी नाही हा एक मुद्दा, त्यातल्या एका व्यंगचित्रकाराचे मत असे होते "माझ्यासाठी पैगंबर पवित्र वैगेरे काही नाही, मी काही कुराणाचा कायदा मानत नाही, मी फ्रेंच कायदा मानतो." म्हणजेच इतरांच्या श्रद्धास्थानाला घाणेरड्या पद्धतीने चितारणार, त्यांचा अपमान करणार, वरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गळे काढणार. म्हणजे त्याला ज्या पद्दतीने इतरांच्या आत्मसन्मानाची हिंसा करता येणार ते तो करणार, त्याच्यावर इतरांनी त्यांच्या पद्दतीने प्रतिकार केला तर चूक. हा काय तर्क आहे? शब्द आणि चित्रांचे वार जास्त घातक असतात. बंदुकीपेक्षा लेखणी ताकतवान ते उगाच नाही म्हणत. एक गोळी एका वेळेस एकाला मारते. एकच चित्र लाखोंना लाखो वेळा आणि आयुष्यभर मारते. त्यामुळे लेखणी चालवताना हजारदा विचार करावा लागतो. दुसरी गोष्ट अशी कि जाणून बुजून केल्या जाणाऱ्या अपमानाचा बदला घेण्याची त्यांची ती रीत असेल, चांगली आहे कि वाईट आहे ह्यावर "आपण" कितीही काथ्याकुट केला तरी ते लोक बदलणार नाही. "हम करे सो कायदा" असाच सगळा प्रकार आहे तिकडे. जे काही बदलायचे आहे ते हेच बदलायचे आहे. जगातल्या सर्व मुस्लिमांना हे जाणवून देणे आवश्यक आहे कि "हम करे सो कायदा" हा प्रकार त्यांच्या जीवावर इतर मुठभर लोक करत आहेत. आणि आज तो शांतीप्रिय मुस्लिमांना व जगाला त्रासदायक ठरत आहे. ते करायचे सोडून तुम्ही जर पैगंबर आक्षेपार्ह स्थितीत दाखवले तर शांतीप्रिय मुस्लिम सुद्धा भडकून उठतील आणि जो उद्देश आहे तो उरणारच नाही. माझा मुद्दा फार साधा आहे. दहशतवाद (कोणताही, कारण जगात मुस्लिम दहशतवाद सोडून इतर अनेक धर्माचे, देशाचे, समाजाचे दहशतवादी आहेत. मिडिया त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो हा भाग वेगळा) व त्याबद्दल लिहिताना किंवा चित्र काढताना किमान एक लक्ष्यात घेतले पाहिजे कि कुठल्याही दहशतवादाला केवळ एकच एक बाजू नसते. हजारो कारणे आहेत. एक कलाकार म्हणून तुम्हाला सर्वांगीण विचार किंवा समजूतदारपणा दाखवता येत नसेल तर तुम्ही मरण्याच्या लायकीचेच असाल. हुसैनला आपण हिंदुनी का भारताबाहेर घालवले मग? पिके विरुद्ध का आंदोलन चालू आहे? जे चूक आहे त्याबद्दल जरूर लिहावे. लिहायला, छापायला मिळते म्हणून मर्यादा ओलांडू नये. साधीशी गोष्ट आहे. माझ्या-तुमच्या हातून काही गुन्हा घडला तर मला -तुम्हाला शिक्षा व्हावी किंवा ज्याने कुणी पाणउतारा करायचा त्याने माझा-तुमचा करावा. पण कुणी चारचौघात त्या गुन्ह्याला धरून आपल्या आई-बापावर अतिशय वाह्यात टीका केली तर ते तुम्ही किंवा मी सहन करू शकू काय? मुस्काट नाही का फोडणार त्याचे? बाकी राज्यघटना आणि कोर्टस याबद्दल, तर खूप दिवसांपासून चारली हेब्दो ला त्याचे धंधे बंद करण्यास सांगितले होते, त्याने ऐकले नाही. त्याच्याविरुद्ध केस म्हणजे "अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी" म्हणून केस होत नव्हती. त्याचवेळेस स्वेच्छेने बुरखा घालणाऱ्या स्त्रियांवर बुरखा न घालण्याची सक्ती करून फ्रेंच सरकार एक वेगळ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत होते. (बहुतेक मुस्लिम स्त्रियांना बुरखा घालणे आवडते असे साधारणपणे वाचनात आले आहे, किंवा त्यांना ते त्यांचे दमन वैगेरे वाटतच नसेल कदाचित.) आंतरराष्ट्रीय स्तरावर मुस्लिम समाजाबद्दल फार दुटप्पी कारभार आहे. प्रत्येक कट्टरवादी आपलेच तेच खरे म्हणत असतो. तो धार्मिक असो वा कुठलाही. दोन घटना सांगतो. माझ्या ओळखीतले एक वयस्कर दलित पोलिस इन्स्पेक्टर होते, ते मला म्हणाले तू एक चित्र प्रदर्शन भरव, तुला काय पैसा लागेल तो मी पुरवतो. पण चित्रे माझ्या संकल्पनेनुसार असली पाहिजेत. श्रीराम आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया याबद्दल अतिशय गलिच्छ प्रकारे त्यांनी वर्णन केले व म्हणाले हाच खरा इतिहास आहे. शबरी काही म्हातारी नव्हती तर ती एक तरणीताठी युवती होती, त्यांच्यात प्रेमालाप दाखव इत्यादी इत्यादी. त्यावेळेस मीसुद्धा देव वैगेरे मानणारा नव्हतो आणि रामायणातल्या असंख्य विसंगती मलाही दिसत होत्या. पण त्यांचे उद्दिष्ट वेगळे होते, त्यांना रामाचे जनमानसात असलेले पूज्यस्वरूप मलिन करायचे होते. कारण काय तर हिंदू धर्म कसा फालतू आहे हे सिद्ध करायचे. आणि "त्यांनी" स्वीकारलेला बौद्ध धर्म कसा श्रेष्ठ असे मिरवायचे. मी त्यांना सरळ नकार दिला कारण हे सगळेच बेसलेस आहे. मुद्दलातच चुकीचे आहे. एखाद्या धर्मात काही चुकीचे चाललेले असेल तर ते बदलण्याऐवजी त्यांच्या पुज्यस्थानावर हल्ला करा ते डळमळीत करा, हेच केले जाते. म्हणजे जे चुकीचे आहे ते तर चालू राहते, लोक मूर्ख राहतात आणि फ्रेममधला राम जाऊन बुद्ध किंवा जीजस येतो. कारण लोक शहाणे झाले तर सगळ्याच फ्रेम्स फेकून देतील, मग ह्या तमाम धर्मगुरुंचे कसे चालणार? पु ल देशपांडे यांचा एक अतिशय सुंदर वैचारिक लेख आहे यावर. त्यात त्यांनी धर्मश्रद्धांवरील आक्रमण आणि त्याचे माणसाच्या मनावर होणारे परिणाम याबद्दल लिहिले आहे. दुसरी घटना. एकदा एका मित्राशी वाद झाला होता "भारतीय मुस्लिम शाळांमधून वन्दे मातरम म्हणत नाहीत" यावरून. त्यावेळी तो जो पेटला होता आणि त्याच्या डोळ्यांतून अक्षरश आग बरसत होती. मी म्हणालो कि त्यांना म्हणायचे कि नाही त्यांचे त्यांना ठरवू दे आपण त्यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत. त्यावर तू फारच चिडला होता. तेव्हा ते त्याचे वन्दे मातरम "लादणे" असेच होते. स्वतंत्र भारतात प्रत्येकाला आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे. कुणी एक त्यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत, हिंदू संघटना मुस्लिम शाळेतल्या वन्दे मातरम बद्दल फार संवेदनशील आहेत. जणू काही त्यांनी वन्दे मातरम नाही म्हटले म्हणजे ते देशद्रोही. मग आपले हिंदू धड राष्ट्रगीत ना म्हणू दे ना, तिकडे लक्ष नाही देणार. हा एक प्रकारचा पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन आहे. मोठ्या संख्येने मुस्लिम सैन्यात आहेत, शहीद होतात, देशात इतरही क्षेत्रात देशाचे नाव मोठे करतात, तरी त्यांच्यावर संशय घेतोच. दोन धर्मात कुणीतरी दंगली घडवून आणतो, आपण एकमेकांची डोकी फोडतो. आणि दोघेही आयुष्यभर त्यांनी असे केले म्हणून आम्ही तसे केले म्हणत असतो. फायदा घेणारा फायदा घेऊन मोकळा. आपले बरेच मुस्लिम मित्र असतील. कधी त्यांना फेस टू फेस विचारून बघा. त्यांना काय वाटते ते. ते काहीही बोलले तरी "ते आपल्याशी कधीच खरे बोलणार नाहीत" हाच गंड सर्वसामान्य हिंदू बाळगून असतो. दुर्दैवाने तो खरा कि खोटा हे कुणीच कधी सांगू शकणार नाही. समाजसुधारणेचा आव आणणाऱ्या सर्वाना परिस्थितीचे पूर्ण भान आवश्यक आहे. समाजात सुधारणा करण्याची खरीच अपेक्षा व तळमळ असणारे कुणाची खिल्ली उडवत नाहीत. नाहीतर प्रकाश आमटे आदिवासींना नुसते "तुम्ही किती बावळट आणि मागासलेले आहात" असेच म्हणत राहिले असते कि झाली असती त्यांच्यात सुधारणा. आणि राजा राम मोहन राय यांनी घाणेरडी व्यंगचित्रे काढली असती तर सतीप्रथा बंद झाली असती. महात्मा फुले लोक मुलीना शिकवत नाहीत म्हणून लोकांना वाकुल्या दाखवत राहिले असते. इतरही अनेक उदाहरणे आहेत. याउपरही हाच आणि असाच मार्ग असेल तर शेवटही असाच होईल. मुस्लिमांच्या शरिया ची भीती घातली जाते. इतर लोक छुप्या मार्गाने तेच करतात ते मात्र नामानिराळे. दुतोंडी जे म्हणतो मी ते हेच. सगळीकडेच हे होत आहे. आपणच काहीतरी करायला पाहिजे दरी मिटवायला. नाही का? जाता जाता: ज्या जगात अमेरिका सारखा देश आहे, त्याने कधीही शांततेने जगता येईल असा विचार करू नये. अमेरिका फार कुटीलतेने दोन राष्ट्र, दोन समूह, दोन समाजामध्ये तेढ व अविश्वास निर्माण करण्यासाठी व त्यातून आपला फायदा आणि वर्चस्व मिळवण्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या दोन महिन्यात तेल-जगतात काय चालले आहे ते बघावे आणि आस्ट्रेलिया व फ्रांस मध्ये झालेल्या हल्ल्यांचा संबंध जोडता येतो का ते पाहावे. घटना फार सरळ आणि उघड जरी असल्या तरी त्या तितक्या सरळ कधीच नसतात. माझे मत तर असे आहे कि नेहमीप्रमाणे मुस्लिम जगताविरुध्द जनमत तापवण्याचा हा प्रकार अमेरिका करत आहे. सदर दोन्ही हल्ले अमेरिका पुरुस्कृत आहेत. कारण दोन्ही हल्ल्यांच्या कार्यपद्धतीत फारच विसंगती आहेत. ज्या साधारणपणे आढळत नाहीत.

वाचने 123833
प्रतिक्रिया 358

प्रतिक्रिया

लेख आवडला. एक इशारा-आता स्वत:पुरता आनंद शोधणारी दांभिक लोक येतीलच धाग्यावर. त्यामुळे आमची कल्टी. उगाच स्वत:चा वेळ वाया घालवुन लोकांना शहाणे करण्यात अर्थ नाही. (हभप) जेपी

In reply to by जेपी

उगाच स्वत:चा वेळ वाया घालवुन लोकांना शहाणे करण्यात अर्थ नाही.> +१००

एक कलाकार म्हणून तुम्हाला सर्वांगीण विचार किंवा समजूतदारपणा दाखवता येत नसेल तर तुम्ही मरण्याच्या लायकीचेच असाल
समाजाला अशाच प्रबोधनाची गरज आहे. देव करो आणि तुमची इथल्या संपादकमंडळावर नेमणूक होवो.

थोडे पटले,थोडे नाही. असो. रविवार सकाळ आहे.मिपाकर पोहे,खिचडी,भजी हाणण्यात मग्न आहेत. येतीलच थोड्या वेळात चहा घेऊन हो.

@ओ माईसाहेब, शेम टु षेम प्रतिसाद देउ नका. नाय तर 'त्या' यादित आम्च बी नाव जोडायला लोक कमी कर्णार नाहित : )

In reply to by संचित

दाभोलकरांच्या हत्येबद्दल मत देऊ शकत नाही. कारण त्यांची हत्या कुणी,कशासाठी केली याचे सत्य अजूनही बाहेर आलेले नाही. पूर्ण सत्य समजल्याशिवाय मत देणे माझ्या मते उचित नाही. त्यांच्यावर कुणाचा वैयक्तिक राग हि असू शकतो, इतरही शंभर करणे असू शकतात. एक आपला तर्क लावून कुणावर तरी दोषारोप करण्यात आपले फक्त मनोरंजन होते. दोन्ही बाजू समोर असल्या तर काही निर्णय घेता येतो.

त्या कार्टूनिस्टांना मरण मंजूर होते आणि धोक्याची संपूर्ण जाणीव असूनही त्यांनी ती चित्रं काढली. मुख्य म्हणजे त्यांनी इतर धर्मांबद्दलही कार्टून्स काढली होती त्यामुळे तुमचा सल्ला अनाठायी आहे. उद्या कोणी काहीही कल्पना करेल आणि "त्या कल्पनेचा आदर करा नाहीतर गोळी घालेन" असे म्हणू लागले तर त्याला वेड्यांच्या इस्पितळात धाडले पाहिजे.

In reply to by संदीप डांगे

त्यांनी जशी चित्रे काढली तशी ती व्यक्ती लहानपणी नसेल का? त्यांना वॉर्निंग मिळूनही तशी चित्रं काढली किंबहुना वॉर्निंग मिळाल्यामुळेच तशी चित्रे काढली कारण "जीव घेऊ" असं कोणी म्हटलं म्हणून चित्रे बदलायची असतील तर न काढलेलीच बरी. म्हणजे मी उद्या म्हणालो की मी फ्लाईंग नूडल्स मॉन्स्टर पंथाचा अनुयायी आहे आणि तुम्ही काळ्या रंगाच्या सोडून इतर नूडल्स खाल्ल्यात तर तुमचा जीव घेईन तर तुम्ही काळ्या नूडल्स खाणे सुरु करणार आणि इतर नूडल्स खाणे सोडणार की नूडल्स खाणेच सोडणार की माझी पर्वा न करता हव्या त्या नूडल्स खाणार? आणि अमेरिकेला फूट पाडायची असेल पुष्कळ; पण मुळात धर्म ही गोष्ट शांतीप्रिय असती तर लोक भडकलेच नसते ना. आणि हे फक्त इस्लामच नव्हे प्रत्येक धर्माच्या बाबतीत लागू आहे.

In reply to by नगरीनिरंजन

जीवाला घाबरून चित्रे काढूच नये असा मला म्हणायचे नाही. पण ते करण्यामागचा उद्देश आणि अपेक्षित परिणाम काय आहे ते स्पष्ट दिसत आहे. आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून कुणाही व्यक्तीबद्दल अपमानस्पद चित्रण करून नक्की काय साध्य झाले? मी वर दिलेल्या लिंक वर काही मुसालामानांच्याही प्रतिक्रिया आहेत. त्या बऱ्याच बोलक्या आहेत. तुम्ही नुडल्स चे उदाहरण दिले. ते काही मला समजले नाही. त्यापेक्षा चांगले उदाहरण मी देतो हिंदू गायीला पवित्र मानतात. क्रिश्चन गायी कापून खातात. हिंदुना मानसिक त्रास व्हावा म्हणून क्रिश्चन गायी खात नाहीत तर ते त्यांचे अन्न आहे. आणि हे हिंदू समजून घेतात. ते आपल्या पवित्र गायी खाउन आपल्या चीथावतात असे हिंदू म्हणू लागला तर तो वेडेपणाच म्हणायचा. किंवा आमच्या धार्मिक भावनांचा अपमान होतो म्हणून क्रिश्चन लोकांनी गायी खाऊ नये असे म्हणणे सुद्धा वेडेपणाच आहे. पण त्याच वेळेस मुसलमानांना निषिद्ध असलेले डुक्कर घेऊन कुणी मशिदीत जाईल आणि म्हणेल तुम्हाला असेल अपवित्र पण मी इथेच बसून खाणार तर ते खोडसाळपणा ठरेल. व्यंगचित्रे किंवा लेखन हे एखाद्या अस्तित्वात व माहित असलेल्या गोष्टीमधली विसंगती हास्यास्पद रीतीने दाखवण्याची कला आहे. त्यात कुणाचा अपमान न करता नेमक्या विसंगतीवर बोट ठेवतात. चार्ल्स हेब्डोची चित्रे हि विचारहीन व प्रक्षोभक आहेत. ती फार तात्विक किंवा उदात्त नाहीत. मी त्यांची तुलना आपल्याकडे होणाऱ्या ब्राह्मणविरोधी हिडीस आणि हिणकस लेखनाशी करतो.

In reply to by संदीप डांगे

>>पण त्याच वेळेस मुसलमानांना निषिद्ध असलेले डुक्कर घेऊन कुणी मशिदीत जाईल आणि म्हणेल तुम्हाला असेल अपवित्र पण मी इथेच बसून खाणार तर ते खोडसाळपणा ठरेल. व्यंगचित्र हे मशिदीत काढले नव्हते. मशिदीच्या भिंतीवर चिकटवले नव्हते. मुस्लिम वस्तीत जाऊन त्याच्या प्रती वाटल्या नव्हत्या. ते नियतकालिक जिथे अन्य नियतकालिके विकत मिळतात तिथे विक्रीस होते. ज्यांना इच्छा आणि कुवत आहे त्यांनी ते प्रकाशन विकत घ्यायचे असा सरळसरळ मामला होता. एकदा व्यक्तीस्वातंत्र्याचा गळा घोटायचा असे ठरवले तर मग कुठल्याही गोष्टीला खोडसाळपणाचे लेबल लावून त्याला शिक्षा करता येते. कसे ते बघायला पाकिस्तान, सौदी अरब वा इजिप्तची उदाहरणे आहेतच. >>व्यंगचित्रे किंवा लेखन हे एखाद्या अस्तित्वात व माहित असलेल्या गोष्टीमधली विसंगती हास्यास्पद रीतीने दाखवण्याची कला आहे. त्यात कुणाचा अपमान न करता नेमक्या विसंगतीवर बोट ठेवतात. चार्ल्स हेब्डोची चित्रे हि विचारहीन व प्रक्षोभक आहेत. ती फार तात्विक किंवा उदात्त नाहीत. मी त्यांची तुलना आपल्याकडे होणाऱ्या ब्राह्मणविरोधी हिडीस आणि हिणकस लेखनाशी करतो. तुम्ही त्या चित्राची हिणकस लेखाशी तुलना करा वा पिकासो वा मॉनेटशी करा. तो तुमचा अधिकार आहे. मात्र कलेची तुमच्या मनात जी संकल्पना आहे तीच ह्या चित्रकारांनी अनुसरावीत असा आग्रह ही हुकुमशाही आहे. स्वातंत्र्य नाही. जर त्या देशात हवी तशी चित्रे काढायला व प्रकाशित करायला मुभा असेल तर ती प्रकाशित झाल्यावर असा रडीचा डाव खेळता कामा नये.

In reply to by संदीप डांगे

पण त्याच वेळेस मुसलमानांना निषिद्ध असलेले डुक्कर घेऊन कुणी मशिदीत जाईल आणि म्हणेल तुम्हाला असेल अपवित्र पण मी इथेच बसून खाणार तर ते खोडसाळपणा ठरेल.
हे मान्य आहे. पण स्वतःच्याच देशात, स्वतःच्या पेपरमध्ये, स्वतःच्या कामाचा भाग म्हणून चित्रे काढणे हा गुन्हा कसा काय होऊ शकतो? शिवाय फक्त मुस्लिमांचीच नव्हे सगळ्या धर्माची चित्रे काढायचे ते लोक. असो. काल शार्ली हेब्दोच्या व्यंगचित्रकाराने स्टेटमेंट दिले ते आवडजर, तो म्हणाला: "सगळेच लहान असताना चित्रं काढतात आणि हे अतिरेकीसुद्धा कधीतरी लहान असतील, पण मोठे होताना कधीतरी या जगाकडे थोडं दुरुन पाहण्याची क्षमता त्यांनी गमावली."

In reply to by नगरीनिरंजन

The Times is, rightfully respectfully reasonably and sensibly so, not showing the cover because it will only feed the flame of fanaticism. Why would anyone want to see the cover, anyway? What purpose does it serve? This has gone beyond freedom of the press, it's now misplaced defiance that may very well result in many more deaths. The cartoonist who describes himself as having been a child, loving to draw cartoons. Well, that child never grew up unfortunately except that his 'I'm going to do what I want to I don't care what you think' attitude has gone far beyond the immaturity and inability to think beyond this very moment behavior that one would expect from a six-year-old. This is life and death, and all because he wants to draw cartoons. He's also an extremist.

In reply to by संदीप डांगे

He's also an extremist अगदी बरोबर. पण ते स्वतःचा जीव पणाला लावताहेत दुसर्‍यांचा नाही. मेलो तरी चित्रे काढणे सोडणार नाही असा त्यांचा हट्ट असेल तर आपण कोण अडवणारे? ज्याप्रमाणे मुस्लिमांना व इतर धर्मीयांना "देव आहे आणि देवानेच आपल्याला निर्माण केले आणि देवानेच कुराण/बायबल/गीता सांगितले" असा हट्ट सोडायचा नाहीय तसेच हे. मुस्लिमांना तर मुस्लिम सोडून इतर लोक वाट चुकलेले (काफीर) आहेत असे ठामपणे शिकवले जाते आणि त्याला ते विरोध करत नाहीत. धर्म म्हणजे अल्टिमेट काहीतरी आहे आणि बाकीच्यांनी त्याविरुद्ध बोलायचंच नाही अशी कल्पना कुठुन शिरलीये कोण जाणे. हे चित्रकार लोक जीव गेला तरी खोडसाळपणा सोडत नाहीयेत म्हणून ते बालिश आणि धर्मामुळे आजवर कोट्यवधी जीव गेले तरी धर्म सोडावासा न वाटणारे ते फार महान. चांगलंय.

In reply to by नगरीनिरंजन

धर्मामुळे कोट्यावधींचा जीव गेला वैगेरे ह्या मुद्द्यावर लेख नाही आहे. एखाद्या धर्माला जाणून बुजून डिवचण्याचा, अपमानित करण्याचा, खिल्ली उडवण्याचा प्रकार चुकीचा आहे हा मुद्दा आहे. चर्चा भरकटू देऊ नये. चित्रे काढण्याला माझा विरोध अजिबात नाही, पण त्याचा खरंच काही प्रबोधनपर उपयोग आहे कि नुसते नपुंसक खिल्ली उडवणे आहे हे महत्वाचे आहे. उद्देश महत्वचा आहे. हिंदू धर्म व हिंदू धर्म हा बेस असलेले धर्म सोडून जगात सगळ्या धर्मांनी, पंथांनी क्रूरता केली आहे. बाकी हिंदू धर्मही काही फार सोवळा राहिला आहे असे नाही. चातुर्वर्ण व स्त्री-दमन, जाती-पातीवरून चाललेल्या सद्यस्थितीतल्या हत्या हे त्याचेच उदाहरण आहे. त्यामुळे कुठल्याही धर्माला त्याच्या बळींच्या संख्येवरून किती क्रूर आणि किती मवाळ हा निकष लावायचा तर कठीण आहे कारण सगळी सांख्यिकी कुठून मिळवणार? बलात्कार वैगेरे तत्सम गंभीर गुन्हे झाल्यावर आपल्या कडे मध्यपुर्वेचे हात-पाय छाटण्याचे, लिंग छाटण्याचे कायदे करावे अशी जनमानसात मागणी होते. ह्या अघोरी प्रथा तिकडून उचलण्यास आपला समाज फारच उत्सुक आहे. पण तोच न्याय कट्टरवाद्यांनी स्वतः लावला कि त्रास होतो. माझा लेख हा दुटप्पीपणाबद्दल आहे. हत्याकांड बरोबर व चूक हा मुद्दा सापेक्ष आहे.

In reply to by संदीप डांगे

धर्मांधांच्या वेडाचाराची खिल्ली उडवणे हाच तर हेतू आहे आणि ती खिल्ली नपुंसक आहे असे म्हणायला माझी काहीच हरकत नाही. हिंदू धर्म सोवळ्यातला आहे असं कोण म्हणतंय? हिंदू धर्मानेही पुष्कळ हिंसा केलीच आहे आणि केवळ हिंसाच नव्हे तर अतिभयंकर असे शोषणही केले आहे. हिंदू धर्मातल्या खुळचट कल्पनाही खिल्ली उडवण्याच्याच लायकीच्या आहेत. बाकी दुटप्पीपणाबद्दल म्हणायचं तर माझ्या या आधीच्या प्रतिसादातलं शेवटची २ वाक्यं दुटप्पीपणाच दाखवणारी आहेत.

In reply to by नगरीनिरंजन

काहीही कारण असलं तरी एकदम बारा जणांना गोळ्या घालुन मारणे समर्थनीय ठरत नाही. एकुणच मुस्लीम धर्म असहिष्णु आहे हे खरंच. लेखकाने किती मुस्लीम धर्मीयांचा अनुभव घेतलाय हे माहीत नाही. पण जर घेतला तर नक्कीच हेच मत होईल. ज्या धर्मात स्त्रीयांवर जातातजाचक बंधनं घातली जातात त्यांच्या कडुन काय अपेक्षा करणार ? 'तस्लीमा नसरीन' वाचा म्हणजे कळेल. ती सुद्धामुल्स्लीमच आहे....

In reply to by खटपट्या

अचूक भाकिताबद्दल तीनशे वेळा अभिनंदन! धागाकर्त्याने धाग्याच्या मूळ विषयाबद्दल व आपल्या मतांबद्दल केव्हाच माफीनामा सादर केला. परंतु त्यानंतर सुद्धा ताबूत थंड न होता अजून डावीउजवी सुरूच आहे. चौशतकाचा टप्पा दूर नाही.

In reply to by श्रीगुरुजी

धागाकर्त्याने धाग्याच्या मूळ विषयाबद्दल व आपल्या मतांबद्दल केव्हाच माफीनामा सादर केला
वाक्यांचा विपर्यास आणि सोयीस्कर शब्दांची घुसड करून धागाकर्ता आपणास नमला असा खोटा आविर्भाव निर्माण करण्यात गुर्जींचा कुणीच हात धरू शकणार नाही. "माझ्यामुळे हरभरा टरारून वर" आठवले... कृपया स्वत:ला झालेले गैरसमज अफवा म्हणून पसरवू नये. कायदेशीर गुन्हा आहे.

In reply to by संदीप डांगे

>>> कृपया स्वत:ला झालेले गैरसमज अफवा म्हणून पसरवू नये. कायदेशीर गुन्हा आहे. स्वतःचाच कबुलीजबाब एकदा नीट वाचा. चुकून कबुलीजबाब दिला असेल तर तसा कबुलीजबाब द्या आणि आपल्या मूळ मतांचे पुन्हा एकदा समर्थन करा. गैरसमज तुम्हालाच झाले होते आणि तुमच्या कबुलीजबाबानंतर तुमचे ते स्वतःचे गैरसमज दूर झाले होते अशी माझी श्रद्धा होती. पण आता तसे दिसत नाही. काहीतरी केमिकल लोच्या दिसतोय.

In reply to by श्रीगुरुजी

त्यांचे म्हणणे बरोबर आहे गुर्जी. तुम्ही चुकीचा अर्थ लावलात असे वाटते. त्यांनी फक्त आपली चूक कबूल केली आहे. माफी मागितलेली नाही. उगाच खोटे बोलु नका.

समाजात सुधारणा करण्याची खरीच अपेक्षा व तळमळ असणारे कुणाची खिल्ली उडवत नाहीत. हे आवडले. बाकी थोडे आवडले, थोडे नाही.

श्रद्धास्थानांच्या मानहानिविरुद्ध जीवघेणी प्रतिक्रीया एव्हढच असावं का हे कांड ?

In reply to by अर्धवटराव

मला तरी एवढे सरळ आहे असे अजिबात वाटत नाही. हे हत्याकांड राज्य पुरस्कृत असावे याची दाट शंका आहे. चार्ल्स हेब्दो ला प्रोत्साहित करणे, त्याचा पद्धतशीर प्रसार करणे आणि मग मुस्लिम भावना दुखावल्याच्या नावाखाली हत्या घडवून आणणे. जेणे करून मुस्लिम व बिगर-मुस्लिम यांच्यात कायमची तेढ निर्माण होईल. ह्या तापलेल्या वातावरणाचा फायदा घेऊन जनमत बदल्याच्या धुंदीत पेटवणे आणि आपला कार्यभाग साधणे असा मामला दिसतो.

मी स्वतः एक कलाकार असून कट्टरवाद्यांच्या भूमिकेतून मी ह्या हल्ल्याचे समर्थन केले कोणतीही भूमिका असो, हल्ल्याचे समर्थन समर्थनीय नाही! तुमची भूमिका तार्किक टोकाला नेली तर काय होईल हा विचारही थरकाप उडवणारा आहे. असो.

In reply to by आतिवास

माझेच मत कायम बरोबर ह्या मताचा मी नाही. ह्या विशिष्ट परिस्थितीत हल्लेखोरांच्या बाजूने काय दिसते हे पाहण्याचा प्रयत्न आहे. दोन प्रकारच्या हल्ल्यांचा आपण इथे विचार केला पाहिजे, एक म्हणजे मानसिक हल्ला आणि दुसरा शारीरिक हल्ला. सर्वसाधारणपणे नेहमीच शारीरिक हल्ल्याला निषिद्ध मानले जाते. आपल्याकडे एक म्हण आहे "कुणी काही म्हटले तर तुझ्या अंगाला काय भोकं पडतात काय?" म्हणजेच अंगाला भोकं पडणे हेच भयानक पण मनाला भोकं पडतील तर ते चालते. चार्ल्स हेब्दो चे चित्र वैचारिक किंवा तात्विक वैगेरे नव्हते, ते असंस्कृत आणि विनाकारण चिथावण्याचा प्रकार होता.

In reply to by संदीप डांगे

तुमच्या बाजूने धमकी आलेली आहे आख्ख्या फ्रान्सला. काळजी सोडा डांगे साहेब. आता फ्रेंच लोकांनी जर त्यांची निदर्शने बंद नाहीत केली, ऑस्ट्रेलियासारखे ताबडतोब "I ride with you" अशी टी शर्टस नाही घातली, ताबडतोब सगळ्या धर्मियांनी इस्लाम हा शांतीप्रिय धर्म आहे हे नुसते मान्यच नव्हे तर त्याचा उदोउदो नाही केला, तर आण्खी जीव घेउ अस सांगितल आहे. तेंव्हा तुमचा नुसता मुद्दा समजूनच नव्हे तर त्याची ताबडतोब अंमलबजवणी सुद्धा सुरु आहे.

In reply to by स्पंदना

ताबडतोब सगळ्या धर्मियांनी इस्लाम हा शांतीप्रिय धर्म आहे हे नुसते मान्यच नव्हे तर त्याचा उदोउदो नाही केला, तर आण्खी जीव घेउ अस सांगितल आहे.
एका प्रतिसादात शांतीवाद्यांची केवढी हिप्पोक्रसी ठासुन भरलीये. @संदिप डांगे, आपलं काय म्हणणं आहे ह्या धमकीवर?

@संपादक, खालील प्रतिसादात काही आक्षेपार्ह आढळल्यास प्रतिसाद काढून टाकावा. ________________________________________________________ लेख वाचून जबरदस्त धक्का बसला. लेख अजिबात पटला नाही. लेख एखाद्या निधर्मांधाने लिहिल्यासारखा वाटतो किंवा अल-कायदाच्या समर्थकाने लिहिल्यासारखा वाटतो. मणिशंकर अय्यर किंवा तत्सम मंडळींनी याआधीच या हत्याकांडाचे समर्थन केले आहे. या लेखात तसेच समर्थन आहे. >>> मृतांबद्दल सहानुभूती असणे योग्यच आहे पण ती किती योग्य ते जरा तपासून बघायला हवी. या हत्याकांडात फक्त मासिकाचा संपादक व व्यंगचित्रकार यांना मारले असून इतर १० कर्मचार्‍यांना आणि नंतर दुसर्‍या दिवशी ४ निरपराध नागरिकांना या धर्मांध अतिरेक्यांनी मारले आहे. या सर्व मृतांबद्दल सहानुभूती योग्यच आहे. >>> मी स्वतः एक कलाकार असून कट्टरवाद्यांच्या भूमिकेतून मी ह्या हल्ल्याचे समर्थन केले कारण कुणीतरी हा वेगळा दृष्टीकोन मांडणे आवश्यक आहे, जो काही धाडसी वार्तापत्रे मांडत आहेतच. कोणत्याही दृष्टीकोनातून या हल्ल्याचे समर्थन होऊ शकत नाही. व्यंगचित्रामुळे महंमद पैगंबरांची जी बदनामी झाली असावी त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने बदनामी इस्लामच्या नावाखाली केलेल्या अतिरेकी हल्ल्यांनी व कुराणचा आधार घेऊन होत असलेल्या स्त्रियांवरील हल्ल्यामुळे रोज होत आहे. अशा कालबाह्य आणि क्रूर गोष्टींमुळेच हा धर्म जगात सर्वत्र बदनाम झाला आहे. मात्र या बदनामीबद्दल हे धर्मांध किंवा तुमच्यासारखे त्यांचे समर्थक चकार शब्दही काढत नाहीत. >>> जेणे करून ह्या हत्याकांडाच्या इतर बाबींवर प्रकाश पडावा व मुस्लिमांची जी एकच एक प्रतिमा रंगवली जात आहे तो प्रयत्न हाणून पाडवा. मुस्लिमांची जी काही प्रतिमा जगभर तयार झाली आहे ती त्यांच्या वर्तनातूनच तयार झाली आहे. ती जगाने रंगविली नसून स्वतः मुस्लिमांनीच त्यात रंग भरले आहेत. >>> "चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने केलेल्या खोडसाळपणाबद्दल आज कुणीही बोलत नाही कारण कुणाची हत्या होणे म्हणजेच फार भयंकर एवढेच सामान्यपणे लोक समजतात. व्यंगचित्र काढणे या कृत्यासाठी थेट मारून टाकणे हे भयंकर कृत्यच आहे. >> ज्याची हत्या झाली तो भारी निष्पाप आणि मारणारा क्रूर अविचारी नराधम. असं नेहमीच नसतं. अनेक नराधम गुन्हेगारांना फाशी देण्यात येते म्हणजे त्यांची अधिकृत हत्याच केलेली असते. परंतु ते निष्पाप नसतात व त्यांच्या गळ्यात फासाचा दोर लटकविणाराही नराधम नसतो. >>> त्याच वेळेस गोडसेच कसे बरोबर, गांधी कसे मारण्याच्याच लायकीचे होते हे गेली साठ वर्षे आपण चघळत आहोत. म्हणजेच काय तर मारणारा आणि मरणारा ह्यापैकी जो आपला त्याचीच बाजू बरोबर. तुम्हीही तेच करताय ना >>> एक म्हणजे, "चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने फार खवचट आणि असंस्कृत अश्या व्यंगचित्रातून पैगंबरांचा अपमान केला. त्या साप्ताहिकाचा असे करण्यामागचा हेतू जाणून बुजून भावना दुखावून उचकवणे (provocative) असाच होता. मी ती व्यंगचित्रे जालावर पाहिली आहेत. त्यात खवचट किंवा असंस्कृत किंवा अपमानास्पद असे काहीही नव्हते. खरं तर इस्लाम म्हणजे शांती असे गोडवे एकीकडे गाताना दुसरीकडे हे रक्तपिपासू अतिरेकी शाळकरी मुले, महिला, निरपराध नागरिक असे काहीही न बघता सरसकट त्यांच्या हत्या करून आपली विकृत मानसिकता पुर्ण करतात हाच इस्लामचा व महंमद पैगंबरांचा सर्वात जास्त अपमान आहे. व्यंगचित्र हे यापुढे काहीच नाही. >>> माझा आक्षेप हा हत्याकांडाच्या पूर्वी झालेल्या बेजबाबदारपणाबद्दल आहे. काय बेजाबदारपणा झाला होता? लोक आज म्हणत आहेत कि "साधे एक चित्र काढले तर थेट गोळ्या घालायची काय गरज होती?" ते चित्र इतरांसाठी साधे असेल मुस्लिमांसाठी नाही हा एक मुद्दा, मुस्लिमांना व्यंगचित्र सोडाच, महंमद पैगंबरांचे कोणत्याही स्वरूपातले चित्र मान्य नाही. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात ८ वी च्या इतिहासाच्या पुस्तकात थोर पुरूष या शीर्षकाखाली अनेक धर्मसंस्थापकांची चित्रे दिली होती (गुरू नानक, गौतम बुद्ध, महावीर जैन इ.). त्यात कोणाचेही व्यंगचित्र नव्हते. साधी कृष्णधवल चित्रे होती. परंतु त्या चित्राविरूद्ध महाराष्ट्रात इतका गदारोळ झाला की शेवटी ते पुस्तक रद्द करावे लागले होते. >>> त्यातल्या एका व्यंगचित्रकाराचे मत असे होते "माझ्यासाठी पैगंबर पवित्र वैगेरे काही नाही, मी काही कुराणाचा कायदा मानत नाही, मी फ्रेंच कायदा मानतो." म्हणजेच इतरांच्या श्रद्धास्थानाला घाणेरड्या पद्धतीने चितारणार, त्यांचा अपमान करणार, वरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गळे काढणार. जर व्यंगचित्र घाणेरड्या स्वरूपात असते तर ते चूकच आहे. >>> म्हणजे त्याला ज्या पद्दतीने इतरांच्या आत्मसन्मानाची हिंसा करता येणार ते तो करणार, त्याच्यावर इतरांनी त्यांच्या पद्दतीने प्रतिकार केला तर चूक. प्रत्येकजण स्वतःच्या पद्धतीने वागू लागला तर कोणत्याही देशात अराजक माजेल. त्यासाठीच राज्यघटना व कायदे केलेले असतात व त्या देशात राहणार्‍या नागरिकांवर ते बंधनकारक असतात. जर व्यंगचित्र अपमानास्पद वाटले असेल तर त्यासाठी कायद्याची मदत घेता येते. स्वतः कायदा हातात घेऊन व्यंगचित्रकाराला व इतरांना ठार मारणे हा गुन्हाच आहे. >>> हा काय तर्क आहे? शब्द आणि चित्रांचे वार जास्त घातक असतात. बंदुकीपेक्षा लेखणी ताकतवान ते उगाच नाही म्हणत. एक गोळी एका वेळेस एकाला मारते. एकच चित्र लाखोंना लाखो वेळा आणि आयुष्यभर मारते. त्यामुळे लेखणी चालवताना हजारदा विचार करावा लागतो. बरोबर आहे. टीका व निराधार निंदा यातील फरक कायद्याला समजू शकतो. परंतु त्यासाठी माणसे मारत सुटणे हा उपाय नाही. >>> दुसरी गोष्ट अशी कि जाणून बुजून केल्या जाणाऱ्या अपमानाचा बदला घेण्याची त्यांची ती रीत असेल, चांगली आहे कि वाईट आहे ह्यावर "आपण" कितीही काथ्याकुट केला तरी ते लोक बदलणार नाही. "हम करे सो कायदा" असाच सगळा प्रकार आहे तिकडे. जे काही बदलायचे आहे ते हेच बदलायचे आहे. जगातल्या सर्व मुस्लिमांना हे जाणवून देणे आवश्यक आहे कि "हम करे सो कायदा" हा प्रकार त्यांच्या जीवावर इतर मुठभर लोक करत आहेत. आणि आज तो शांतीप्रिय मुस्लिमांना व जगाला त्रासदायक ठरत आहे. ते करायचे सोडून तुम्ही जर पैगंबर आक्षेपार्ह स्थितीत दाखवले तर शांतीप्रिय मुस्लिम सुद्धा भडकून उठतील आणि जो उद्देश आहे तो उरणारच नाही. त्या व्यंगचित्रात पैगंबर कोणत्याही आक्षेपार्ह स्थितीत दाखविलेले नाहीत. केवळ त्यांना चितारले या कारणासाठीच हे हत्याकांड झालेले आहे. >>> माझा मुद्दा फार साधा आहे. दहशतवाद (कोणताही, कारण जगात मुस्लिम दहशतवाद सोडून इतर अनेक धर्माचे, देशाचे, समाजाचे दहशतवादी आहेत. मिडिया त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो हा भाग वेगळा) व त्याबद्दल लिहिताना किंवा चित्र काढताना किमान एक लक्ष्यात घेतले पाहिजे कि कुठल्याही दहशतवादाला केवळ एकच एक बाजू नसते. हजारो कारणे आहेत. इस्लामी दहशतवादामागे कोणती कारणे आहेत? पेशावरमधील १३२ शाळकरी विद्यार्थ्यांना मारण्यामागे कोणते समर्थनीय कारण होते? भारतात असंख्य निरपराध नागरिकांचे प्राण घेण्यामागे कोणती समर्थनीय कारणे आहेत? कोणत्याही राष्ट्रात जायचं व घेटो करून रहायचं. सुरवातीला संख्या कमी असताना अल्पसंख्य म्हणून अवाजवी लाड करून घ्यायचे. त्याचवेळी भरपूर संतती जन्माला घालून वेगाने संख्या वाढवायची. पुरेशी संख्या झाली की आमच्यावर अन्याय होतोय , आम्हाला वेगळा देश पाहिजे अशी हाळी ठोकून सौदीसारख्या कर्मठ देशांकडून मदत घेऊन अतिरेकी हल्ले सुरू करायचे व सर्वत्र दहशत निर्माण करायची. हीच दहशतवादाची एकमेव बाजू आहे. >>> एक कलाकार म्हणून तुम्हाला सर्वांगीण विचार किंवा समजूतदारपणा दाखवता येत नसेल तर तुम्ही मरण्याच्या लायकीचेच असाल. हुसैनला आपण हिंदुनी का भारताबाहेर घालवले मग? पिके विरुद्ध का आंदोलन चालू आहे? हुसेनने हिंदू देवतांची अत्यंत आक्षेपार्ह व किळसवाणी चित्रे काढली होती. त्याबद्दल त्याला कोणीही गोळ्या घातल्या नव्हत्या. लोकशाही पद्धतीप्रमाणे त्याच्याविरूद्ध न्यायालयात खटले दाखल केले होते. त्या खटल्याला तोंड देण्याऐवजी तो देशातून कतारला पळून गेला. एका अर्थाने तो फरारी आरोपी होता. त्याला कोणीही भारतातून घालविलेले नव्हते. शिक्षेच्या भीतिने तोच देशातून पळाला होता. जर एखादी गोष्ट आक्षेपार्ह वाटली तर त्याचा निषेध करणे व आंदोलन करणे हे पूर्णपणे कायदेशीर आहे. पीके च्या कलाकारांविरूद्ध कोणीही अतिरेकी हल्ला केलेला नाही हे लक्षात घ्या. >>> जे चूक आहे त्याबद्दल जरूर लिहावे. लिहायला, छापायला मिळते म्हणून मर्यादा ओलांडू नये. साधीशी गोष्ट आहे. माझ्या-तुमच्या हातून काही गुन्हा घडला तर मला -तुम्हाला शिक्षा व्हावी किंवा ज्याने कुणी पाणउतारा करायचा त्याने माझा-तुमचा करावा. पण कुणी चारचौघात त्या गुन्ह्याला धरून आपल्या आई-बापावर अतिशय वाह्यात टीका केली तर ते तुम्ही किंवा मी सहन करू शकू काय? मुस्काट नाही का फोडणार त्याचे? जर तुम्ही स्वतःच्या आईबापाचा हवाला देऊन त्यांनी मला असेच शिकविले आहे किंवा आमच्या घराण्यात अशीच परंपरा आहे असे सांगून स्वतःच्या चुकीच्या वागणुकीचे समर्थन केलेत तर तुमच्याबरोबर तुमच्या आईबापाचाही उद्धार होणारच. >>> बाकी राज्यघटना आणि कोर्टस याबद्दल, तर खूप दिवसांपासून चारली हेब्दो ला त्याचे धंधे बंद करण्यास सांगितले होते, त्याने ऐकले नाही. त्याच्याविरुद्ध केस म्हणजे "अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी" म्हणून केस होत नव्हती. चार्ली हेब्दोचे धंदे? >>> त्याचवेळेस स्वेच्छेने बुरखा घालणाऱ्या स्त्रियांवर बुरखा न घालण्याची सक्ती करून फ्रेंच सरकार एक वेगळ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत होते. (बहुतेक मुस्लिम स्त्रियांना बुरखा घालणे आवडते असे साधारणपणे वाचनात आले आहे, किंवा त्यांना ते त्यांचे दमन वैगेरे वाटतच नसेल कदाचित.) कोठे वाचले हे? सौदी किंवा इतरत्र ४०-४५ डिग्री तापमानात मुस्लिम स्त्रिया स्वेच्छेने काळाकुट्ट बुरखा वापरतात का? कोणतीही स्त्री असे एकतर्फी बंधन मान्य करत नाही. बुरखाबंदीचा कायदा योग्यच आहे. ज्यांना तो मान्य नसेल त्यांनी त्या देशात राहू नये. >>> आंतरराष्ट्रीय स्तरावर मुस्लिम समाजाबद्दल फार दुटप्पी कारभार आहे. फक्त मुस्लिम नव्हे तर सर्वच समाजाबद्दल दुटप्पी कारभार आहे. >>> प्रत्येक कट्टरवादी आपलेच तेच खरे म्हणत असतो. तो धार्मिक असो वा कुठलाही. बरोबर कट्टरवादी हे फक्त धार्मिक नसतात. निधर्मीपणाचा अतिरेक, साम्यवादाचा अतिरेक, राष्ट्रवादाचा अतिरेक, जुन्या रूढींना चिकटून राहणे हाही कट्टरपणाच आहे. >>> स्वतंत्र भारतात प्रत्येकाला आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे. कुणी एक त्यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत, बरोबर आहे. परंतु हे वागणे कायदेशीर असले पाहिजे. हम करे सो कायदा हे चालत नाही. दुसर्‍यांच्या अधिकारांवर गदा न आणता किंवा कायदा न मोडता कोणी कसेही वागू शकतो. >>> आपले बरेच मुस्लिम मित्र असतील. कधी त्यांना फेस टू फेस विचारून बघा. त्यांना काय वाटते ते. ते काहीही बोलले तरी "ते आपल्याशी कधीच खरे बोलणार नाहीत" हाच गंड सर्वसामान्य हिंदू बाळगून असतो. दुर्दैवाने तो खरा कि खोटा हे कुणीच कधी सांगू शकणार नाही. काही वर्षांपूर्वी मी एका हैद्राबादच्या इंजिनिअर असलेल्या व संगणक क्षेत्रात असलेल्या मुस्लिमाबरोबर काही महिने अपार्टमेंट शेअर करीत होतो. तो फक्त शुक्रवारी डोक्यावरून स्नान करायचा. इतर दिवशी फक्त खांद्याच्या खाली. लहानपणापासून शिकविलेली एक रूढी म्हणून तो असे करत असे. त्यावेळी काही वेळा त्याच्याबरोबर ही रूढी व मुस्लिमातील इतर काही रूढी याबद्दल चर्चा झाली होती. अशा अनेक रूढी तो पाळत होता व त्या रूढी खरोखरच योग्य आहेत का त्या कालबाह्य झाल्या आहेत याविषयी त्याने कधीही विचार केला नव्हता. १९९० च्या दशकात लेडी डायना व प्रिन्स चार्ल्सने पाकिस्तानला भेट दिली होती. त्यावेळी एका मशिदीच्या मुल्लाने डायनाबरोबर हस्तांदोलन केल्यामुळे तिथे मोठा गदारोळ उठून त्या मुल्लाला मशिदीतून हाकलण्यात आले होते. या घटनेचे माझ्याबरोबरील मुस्लिमाने समर्थन केले होते. >>> समाजसुधारणेचा आव आणणाऱ्या सर्वाना परिस्थितीचे पूर्ण भान आवश्यक आहे. समाजात सुधारणा करण्याची खरीच अपेक्षा व तळमळ असणारे कुणाची खिल्ली उडवत नाहीत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की तो चेष्टेचा विषय होतो. अतिरेकी राष्ट्र्वाद, अतिरेकी धर्मांधता, अतिरेकी निधर्मांधता, अतिरेकी साम्यवाद हे अशाच अतिरेकामुळे चेष्टेचा विषय होतात. याउपरही हाच आणि असाच मार्ग असेल तर शेवटही असाच होईल. मुस्लिमांच्या शरिया ची भीती घातली जाते. इतर लोक छुप्या मार्गाने तेच करतात ते मात्र नामानिराळे. अतिरेकाविरूद्ध लढण्याचे अनेक मार्ग आहेत. लेखन व व्यंगचित्रातून जनजागृती हा एक मार्ग आहे. >>> जाता जाता: ज्या जगात अमेरिका सारखा देश आहे, त्याने कधीही शांततेने जगता येईल असा विचार करू नये. अमेरिका फार कुटीलतेने दोन राष्ट्र, दोन समूह, दोन समाजामध्ये तेढ व अविश्वास निर्माण करण्यासाठी व त्यातून आपला फायदा आणि वर्चस्व मिळवण्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या दोन महिन्यात तेल-जगतात काय चालले आहे ते बघावे आणि आस्ट्रेलिया व फ्रांस मध्ये झालेल्या हल्ल्यांचा संबंध जोडता येतो का ते पाहावे. घटना फार सरळ आणि उघड जरी असल्या तरी त्या तितक्या सरळ कधीच नसतात. माझे मत तर असे आहे कि नेहमीप्रमाणे मुस्लिम जगताविरुध्द जनमत तापवण्याचा हा प्रकार अमेरिका करत आहे. सदर दोन्ही हल्ले अमेरिका पुरुस्कृत आहेत. कारण दोन्ही हल्ल्यांच्या कार्यपद्धतीत फारच विसंगती आहेत. ज्या साधारणपणे आढळत नाहीत. ९/११ चा हल्ला जॉर्ज बुशने प्लॅन केला होता. भारतात २००१ मधील संसदेच्या हल्ल्याची योजना अडवाणींनी बनविली होती. मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यामागे रा.स्व.संघ होता. कारगिल युद्धाचा कट वाजपेयींनी आखला होता. असे अनेक हास्यास्पद दावे आहेत. तुमचा वरील दावा त्यापैकीच एक.

In reply to by श्रीगुरुजी

या असल्या तद्दन गुडघ्यातल्या आडाणी लेखावर इतकी सविस्तर प्रतिक्रिया देऊ शकणार्‍यांचे प्रचंड कौतुक वाटल्यावाचून राहत नाही. :) हे असले विचार करणारे सदस्यही मिपावर आहेत हे बघून एक मिपाकर म्हणून नक्कीच शरम वाटली. असो.

In reply to by श्रीगुरुजी

कट्टरवादी हे फक्त धार्मिक नसतात. निधर्मीपणाचा अतिरेक, साम्यवादाचा अतिरेक, राष्ट्रवादाचा अतिरेक, जुन्या रूढींना चिकटून राहणे हाही कट्टरपणाच आहे. +1

In reply to by श्रीगुरुजी

गुर्जी, तुमच्याकडून टाईम मॅनेजमेंटचे धडे घ्यायचे आहेत. ( बरा वेळ असतो हो तुम्हाला एवढ्या सविस्तर प्रतिक्रिया द्यायला !;) हघ्या )

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी, तुमच्या संयमाची कमाल वाटते. अक्षरशः बेअक्कल आर्टिकल आहे. बादवे, पैगंबराची चित्रे कुराणाने खरेच प्रतिबंधित केली आहेत का? http://www.newsweek.com/koran-does-not-forbid-images-prophet-298298

In reply to by निशदे

___/\___. आज भोगीची भाजी म्हणजे काय ते कळाले. धागाकर्त्यांच्या सगळ्या सरमिसळ केलेल्या (कट्टर वाद) भलामण मुद्द्यांना गुरुजींनी व्यवस्थीत "सोलून", "निवडून" निगुतीने भाजी बनविली आहे. :BRAVO: :bravo: :clapping: सर्वांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा !!! तिळ्गुळ घ्या आणि येता जाता "सर्वधर्मसमभावाचा* डांगोरा पिटा" *YAHOO* *YAHOO!* :YAHOO: :yahoo: *याचा शासकीय सोडून अंमलबजावणी अर्थ "हिंदूना शिव्या घालत बसणे" हाच भारतात तरी आहे

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, तुम्ही वेळ काढून या लेखातील वाक्या-वाक्यावर छान प्रतिवाद केला. धन्यवाद! कुठल्याही गोष्टीच्या तीन प्रकारच्या सत्यता असतात. एक मला वाटते ती, एक तुम्हाला वाटते ती आणि एक प्रत्यक्षात असते ती. प्रत्येकजण आपापले पूर्वग्रह घेऊन अधिकाधिक सत्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो. कधी आपण आपल्या पुर्वाग्रहालाच वाहन बनवतो. आपला पूर्वग्रह अंतिम सत्यासारखा असेल तर आपण तिथे पोचतोच, किंवा चकवा लागून गोल गोल फिरत राहतो. माझ्या मते तरी जगात चूक-बरोबर, चांगले-वाईट हे सगळे सापेक्ष असते. ही सापेक्षता आपल्या अनुभव आणि विचारांवर अवलंबून असते. त्यामुळे इथे धागाकर्ता म्हणून मी इस्लाम-प्रेमी आहे असा होत नाही किंवा तुम्ही प्रतिवाद करता म्हणून दिसणाऱ्या प्रत्येक मुस्लीमास तुम्ही कापत सुटणार असाही होत नाही. तरीही शेवटी माझ्या मनात एक स्वाभाविक प्रश्न उभा राहिलाय. दहशतवाद हा कधीही समोरासमोर येउन न केले जाणारे एक युद्ध आहे. त्यात अनेक अनामिक, चेहरे नसलेले, ओळख नसलेले, शिकलेले, न शिकलेले, श्रीमंत, गरीब, सुसंस्कारित, असंस्कारित असे सगळेच सामील आहेत. इस्लामी दहशतवादात साहजिक सगळे मुस्लिमच आहेत आणि असणार. तर मग आपण एक हिंदू म्हणून म्हणा किंवा एक सज्जन, पापभिरू, न्यायप्रिय, कायदेप्रिय, घटनाप्रिय सुजाण नागरिक म्हणून एकूण मुस्लिम लोकांशी कसे वागावे? कसे वागावे म्हणजे एक तर रोजच्या जीवनात आणि विशिष्ट परिस्थितीत. विशिष्ट परिस्थिती जसे कि दंगल, मारहाण, बाचाबाची यात आपण स्वाभाविक प्रतिक्रिया देतो. पण रोजच्या जीवनात कसे वागावे? म्हणजे अब्दुल कलाम यांनी भारताच्या संरक्षण सज्जतेत आणि अंतराळ विज्ञानात जी बहुमोल कामगिरी केली आहे त्यांच्याशी मी कसे वागावे? झाकीर हुसैन यांचा तबला ऐकू कि नये? झहीर खान याने एखाद्या पाकिस्तान्याचा त्रिफळा उडवला तर आनंदाने उडी मारावी कि नको? उत्तम काम करणाऱ्या एखाद्यास आपल्या संस्थेत कामाला ठेवावे कि नको? एखाद्या मुस्लिम व्यापाऱ्याकडून अतिशय स्वस्तात आणि आदराने वस्तू अथवा सेवा मिळत असेल तर ती घ्यावी कि नको? अझीम प्रेमजी यांच्या विप्रो मध्ये काम करावे कि नको? त्यांच्या कंपनीच्या सेवा किंवा वस्तू घ्याव्यात कि नको? रेहमान चे संगीत ऐकावे कि नको? कारण ते सर्व मुस्लिम आहेत आणि सर्व मुस्लिम हे दहशतवादी आहेत. (दहशतवाद्यांना समाजातूनच प्रोत्साहन आणि पैसा मिळतो म्हणून.) म्हणजे कसे आहे, वर वर जरी ती व्यक्ती व्यवस्थित वागत असली तरी आतल्या आत दहशतवादी असू शकते, त्यांना पैसा पुरवू शकते, माहिती पुरवू शकते. तेंव्हा नेमके वागायचे कसे? एक माणूस म्हणून मी दुसऱ्या माणसाशी कसे वागावे? त्याचा जात-धर्म ध्यानात ठेवून वागलो तर ते आपल्या मूळ संस्काराशी जुळत नाही. (मूळ संस्कार "सगळ्यांशी माणुसकीने वागावे"). माझ्या समोर असलेला, बसलेला, राहत असलेला व्यक्ती (तो हिंदू, मुस्लिम, गुजराती, मद्रासी, पुरुष, स्त्री , काहीही ) प्रत्यक्ष माझ्यासमोर काहीही वाईट कृत्य करत असेल तर मी त्यावर तिथेच आणि त्यालाच प्रतिक्रिया देऊ शकतो किंवा परिस्थितीनुसार नाही देऊ शकत. पण फक्त त्याच माणसाबद्दल मी माझ्या मनात एक प्रतिमा बनवेल आणि आयुष्यभर त्याच्याशी तसाच वागेन. पण तो ज्या धर्माचा आहे त्या सगळ्या धर्माच्या लोकांशी तसेच वागावे का?

In reply to by संदीप डांगे

>>> माझ्या मते तरी जगात चूक-बरोबर, चांगले-वाईट हे सगळे सापेक्ष असते. ही सापेक्षता आपल्या अनुभव आणि विचारांवर अवलंबून असते. प्रत्येकवेळी सापेक्ष असतेच असे नाही. उदा. तान्हे मूल हे निरागस आहे ही भावना सापेक्ष नाही. ती व्यक्तीनुसार, अनुभवानुसार किंवा विचारानुसार वेगळी असूच शकत नाही. किंवा पेशावरमधील १३२ शाळकरी मुलांना मारण्याचे कृत्य हे अत्यंत क्रूर असून ते करणारे नराधम आहेत हा विचार सापेक्ष असूच शकत नाही किंवा ही भावना व्यक्तीनुसार, अनुभवानुसार किंवा विचारानुसार वेगळी असूच शकत नाही. >>> तर मग आपण एक हिंदू म्हणून म्हणा किंवा एक सज्जन, पापभिरू, न्यायप्रिय, कायदेप्रिय, घटनाप्रिय सुजाण नागरिक म्हणून एकूण मुस्लिम लोकांशी कसे वागावे? कसे वागावे म्हणजे एक तर रोजच्या जीवनात आणि विशिष्ट परिस्थितीत. विशिष्ट परिस्थिती जसे कि दंगल, मारहाण, बाचाबाची यात आपण स्वाभाविक प्रतिक्रिया देतो. पण रोजच्या जीवनात कसे वागावे? देशाचा एक सज्जन, पापभिरू, न्यायप्रिय, कायदेप्रिय, घटनाप्रिय सुजाण नागरिक देशाच्या दुसर्‍या सज्जन, पापभिरू, न्यायप्रिय, कायदेप्रिय, घटनाप्रिय सुजाण नागरिकाशी जसे वागणे अपेक्षित आहे तसेच वागावे. >>> म्हणजे अब्दुल कलाम यांनी भारताच्या संरक्षण सज्जतेत आणि अंतराळ विज्ञानात जी बहुमोल कामगिरी केली आहे त्यांच्याशी मी कसे वागावे? एखाद्या देशप्रेमी शास्त्रज्ञाबरोबर जसे वागणे अपेक्षित आहे तसेच वागावे. >>> झाकीर हुसैन यांचा तबला ऐकू कि नये? नक्कीच ऐकावा व आनंद घ्यावा. >>> झहीर खान याने एखाद्या पाकिस्तान्याचा त्रिफळा उडवला तर आनंदाने उडी मारावी कि नको? एक कशाला, अनेक उड्या माराव्यात. >>> उत्तम काम करणाऱ्या एखाद्यास आपल्या संस्थेत कामाला ठेवावे कि नको? एखाद्या मुस्लिम व्यापाऱ्याकडून अतिशय स्वस्तात आणि आदराने वस्तू अथवा सेवा मिळत असेल तर ती घ्यावी कि नको? अझीम प्रेमजी यांच्या विप्रो मध्ये काम करावे कि नको? त्यांच्या कंपनीच्या सेवा किंवा वस्तू घ्याव्यात कि नको? रेहमान चे संगीत ऐकावे कि नको? जोपर्यंत मुस्लिम किंवा हिंदू किंवा इतर कोणीही देशाशी द्रोह करत नाहीत तोपर्यंत ते आदरणीयच आहेत. >>> कारण ते सर्व मुस्लिम आहेत आणि सर्व मुस्लिम हे दहशतवादी आहेत. (दहशतवाद्यांना समाजातूनच प्रोत्साहन आणि पैसा मिळतो म्हणून.) असं कोण म्हणालं? >>> म्हणजे कसे आहे, वर वर जरी ती व्यक्ती व्यवस्थित वागत असली तरी आतल्या आत दहशतवादी असू शकते, त्यांना पैसा पुरवू शकते, माहिती पुरवू शकते. तेंव्हा नेमके वागायचे कसे? जेव्हा त्या व्यक्तीचे खरे स्वरूप उघड होईल तेव्हा एखाद्या देशद्रोह्याशी वागावे तशी वर्तणूक असावी. मी पूर्वी अझरूद्दीनचा जबरदस्त फॅन होतो. मनोज प्रभाकरची आक्रमकता मला आवडायची. हसतमुख अजय जडेजा आवडायचा. जेव्हा त्यांचा मॅचफिक्सिंगमधील सहभाग सिद्ध झाला व त्यांच्यावर बंदी झाली तेव्हापासून ते टीव्हीवर दिसले तरी संताप येतो. >>> एक माणूस म्हणून मी दुसऱ्या माणसाशी कसे वागावे? त्याचा जात-धर्म ध्यानात ठेवून वागलो तर ते आपल्या मूळ संस्काराशी जुळत नाही. (मूळ संस्कार "सगळ्यांशी माणुसकीने वागावे"). दुसरा माणूस असेल तर माणसासारखेच वागावे. दुसरा जनावरासारखा वागत असेल तर वागणूक वेगळी द्यावीच लागेल. >>> माझ्या समोर असलेला, बसलेला, राहत असलेला व्यक्ती (तो हिंदू, मुस्लिम, गुजराती, मद्रासी, पुरुष, स्त्री , काहीही ) प्रत्यक्ष माझ्यासमोर काहीही वाईट कृत्य करत असेल तर मी त्यावर तिथेच आणि त्यालाच प्रतिक्रिया देऊ शकतो किंवा परिस्थितीनुसार नाही देऊ शकत. पण फक्त त्याच माणसाबद्दल मी माझ्या मनात एक प्रतिमा बनवेल आणि आयुष्यभर त्याच्याशी तसाच वागेन. पण तो ज्या धर्माचा आहे त्या सगळ्या धर्माच्या लोकांशी तसेच वागावे का? याची आवश्यकता नाही.

In reply to by श्रीगुरुजी

पेशावरमधील १३२ शाळकरी मुलांना मारण्याचे कृत्य हे अत्यंत क्रूर असून ते करणारे नराधम आहेत हा विचार सापेक्ष असूच शकत नाही
"We selected the army's school for the attack because the government is targeting our families and females," said Taliban spokesman Muhammad Umar Khorasani. "We want them to feel the pain." हे पठाणी लोक म्हणजे डोळ्यास डोळा न्याय प्रकारातले आहेत. ती त्यांची जीवनशैली आहे. एखाद्यास मित्र मानले तर त्याच्यासाठी जीव द्यायची त्यांची तयारी असते, आणि शत्रू मानले तर मात्र खैर नाही. पण मी मुलांच्या हत्याकांडाचा निषेध करतोच कारण त्या मुलांनी असा काय गुन्हा केला होता कि त्यांचा विनाकारण अशा क्रूर पद्धतीने जीव जावा.
असं कोण म्हणालं?
तुमचे प्रतिसाद तर धर्मालाच टार्गेट करत आहेत, नाही का? दहशतवादी ज्या धर्मातून येतात, ज्या धर्मासाठी स्वत:चे आणि इतरांचे रक्त सांडतात, ज्यांच्या धर्मातच काफरांना जीवे मारण्याच्याबद्दल लिहिलंय, तो धर्मच चुकीचा नाही का झाला मग?
जोपर्यंत मुस्लिम किंवा हिंदू किंवा इतर कोणीही देशाशी द्रोह करत नाहीत तोपर्यंत ते आदरणीयच आहेत.
करत नाही असे म्हणण्यापेक्षा उघडकीस येत नाही तोपर्यंत असे म्हणा. बऱ्याचदा आपल्या हातून कळत नकळत देशद्रोह होऊन जातो, त्याचे काय?
जेव्हा त्या व्यक्तीचे खरे स्वरूप उघड होईल तेव्हा एखाद्या देशद्रोह्याशी वागावे तशी वर्तणूक असावी. मी पूर्वी अझरूद्दीनचा जबरदस्त फॅन होतो. मनोज प्रभाकरची आक्रमकता मला आवडायची. हसतमुख अजय जडेजा आवडायचा. जेव्हा त्यांचा मॅचफिक्सिंगमधील सहभाग सिद्ध झाला व त्यांच्यावर बंदी झाली तेव्हापासून ते टीव्हीवर दिसले तरी संताप येतो.
क्रिकेटचा आणि देशद्रोहाचा काय संबंध? तुमच्यासाठी क्रिकेट हा धर्म असेल पण माझ्यासाठी एक फालतू खेळ असू शकतो. त्यांच्या फिक्सिंग ने कुणाचा जीव नाही गेला मग तुम्हाला एवढा संताप का येतो?
दुसरा माणूस असेल तर माणसासारखेच वागावे. दुसरा जनावरासारखा वागत असेल तर वागणूक वेगळी द्यावीच लागेल.
कोण जनावरासारखे वागवते आणि कोण जनावरासारखे वागते याचे प्रत्येक समुदायात नियम वेगवेगळे आहेत. एकाच पातळीवर कसे मोजणार? बरेच सुशिक्षित हुच्चभ्रु नवरे आपल्या बायकांना जनावरांसारखे वागवतात, मुलीना मारून टाकतात तेंव्हा हा सुशिक्षित हुच्चभ्रु समाज त्यांच्याशी कसा वागतो?

In reply to by संदीप डांगे

>>> हे पठाणी लोक म्हणजे डोळ्यास डोळा न्याय प्रकारातले आहेत. ती त्यांची जीवनशैली आहे. नरमांस खाणे ही एखाद्या गटाची जीवनशैली असली तर ती मान्य करायची का? तद्वत पठाणांची जीवनशैली काहीही असली तरी मुलांची हत्या समर्थनीय नाही. या हत्येसंदर्भात सापेक्ष मत असूच शकत नाही. >>> एखाद्यास मित्र मानले तर त्याच्यासाठी जीव द्यायची त्यांची तयारी असते, आणि शत्रू मानले तर मात्र खैर नाही. बादवे, हा पठाणांबद्दल गैरसमज पसरविलेला आहे. विशेषतः काबुलीवाला, जंजीर इ. हिंदी चित्रपटातून पठाण हा अत्यंत दिलदार, विश्वासू, जीवाला जीव देणारा वगैरे दाखविलेला आहे. अफगाणिस्तानवरील अनेक पुस्तकातून पठाणांचे खरे चित्र रंगविले आहे. पठाण हे अत्यंत विश्वासघातकी असून अगदी थोड्या पैशाकरता विश्वासघात करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. >>> तुमचे प्रतिसाद तर धर्मालाच टार्गेट करत आहेत, नाही का? दहशतवादी ज्या धर्मातून येतात, ज्या धर्मासाठी स्वत:चे आणि इतरांचे रक्त सांडतात, ज्यांच्या धर्मातच काफरांना जीवे मारण्याच्याबद्दल लिहिलंय, तो धर्मच चुकीचा नाही का झाला मग? धर्माचे तत्वज्ञान चुकीचे आहेच. परंतु तुम्ही आधी जी उदाहरणे दिली (डॉ. अब्दुल कलाम, झाकीर हुसेन इ.) सन्माननीय अपवाद आहेत. यांच्याव्यतिरिक्त सुद्धा गायक महंमद रफी, डॉ. यू.म. पठाण असे आदरणीय अपवाद आहेत. >>> क्रिकेटचा आणि देशद्रोहाचा काय संबंध? तुमच्यासाठी क्रिकेट हा धर्म असेल पण माझ्यासाठी एक फालतू खेळ असू शकतो. त्यांच्या फिक्सिंग ने कुणाचा जीव नाही गेला मग तुम्हाला एवढा संताप का येतो? तुमच्यासाठी तो फालतू खेळ असला (हाय कंबख्त, तूने पीही नही!), तरी माझ्यासाठी तो धर्म आहे. हजारो प्रेक्षक पदरचे पैसे खर्च करून तिकीट काढून सामने बघतात. कोट्यावधी प्रेक्षक तो सामना दूरदर्शनवर बघतात. असा सामन्यात फसवणूक करणे हे देशद्रोहाचेच उदाहरण आहे. >>> कोण जनावरासारखे वागवते आणि कोण जनावरासारखे वागते याचे प्रत्येक समुदायात नियम वेगवेगळे आहेत. एकाच पातळीवर कसे मोजणार? बरेच सुशिक्षित हुच्चभ्रु नवरे आपल्या बायकांना जनावरांसारखे वागवतात, मुलीना मारून टाकतात तेंव्हा हा सुशिक्षित हुच्चभ्रु समाज त्यांच्याशी कसा वागतो? प्रत्येकजण स्वतःच्या मनाने वागू नये यासाठीच कायदे, नियम वगैरे असतात. दुर्दैवाने भारतात धर्मावर आधारीत वेगळे कायदे केले आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

तुमच्यासाठी तो फालतू खेळ असला (हाय कंबख्त, तूने पीही नही!), तरी माझ्यासाठी तो धर्म आहे. हजारो प्रेक्षक पदरचे पैसे खर्च करून तिकीट काढून सामने बघतात. कोट्यावधी प्रेक्षक तो सामना दूरदर्शनवर बघतात. असा सामन्यात फसवणूक करणे हे देशद्रोहाचेच उदाहरण आहे.
क्रिकेटच्या सामन्यात फसवणूक करणे हा देशद्रोह कसा होऊ शकतो, काय तर तुम्हाला तो धर्म वाटतो म्हणून… ? जिथे चार टाळकी वर बसून निव्वळ पैसा बघतात, त्यासाठी वाटेल त्या गोष्टी करतात, तो धर्म नाही हो, व्यवसाय आहे शुद्ध. त्यांच्या फायद्यासाठी ते जनतेला सरळ सरळ *** बनवतात, आणि पब्लिक आपली येड्यासारखी क्रिकेट हा आमचा धर्म आहे वैगेरे करत धुंदीत जगत असते. (हाय कंबख्त, तूने पीही नही!) असे म्हणाल तर काय आहे ना की ही तुमची दारू जिथे बनते ना तिथे प्रत्यक्ष सर्वात वरच्या वर्तुळात मी काम केले आहे. कोण किती पाण्यात आहे, कोण किती धुतल्या तांदळाचा आहे ते पण बघितले. त्यामुळे आत काय आहे आणि बाहेर काय आहे याचा पुरेपूर अनुभव आहे (हाय कंबख्त, तूझे पताही नही!) . त्यामुळे त्या दारूपासून आंम्ही चारशे हात लांबच बरे! (माझ्या टिप्सवर एका सट्टेबाज मित्राने आयपीएल मध्ये १करोड कमावले, यावरून काय तो अंदाज घ्या, प्यायची कि नाही ते)

In reply to by संदीप डांगे

जिथे चार टाळकी वर बसून निव्वळ पैसा बघतात, त्यासाठी वाटेल त्या गोष्टी करतात, तो धर्म नाही हो, व्यवसाय आहे शुद्ध. त्यांच्या फायद्यासाठी ते जनतेला सरळ सरळ *** बनवतात
अत्यंत सहमत! छान लिहीलंत. विशेष म्हणजे हे वाक्य प्रत्येक धर्मालाही लागू होते.

In reply to by नगरीनिरंजन

हो, अगदी खरे आहे. हे प्रत्येक धर्माला लागू होते. पैसा आणि अनिर्बंध सत्ता जगात सर्व धर्मप्रसाराच्या मुळाशी असते. इतर कुठल्याही सत्तेला लोक सहजासहजी उलथून टाकतात पण धर्मसत्ता महाकठीण.

In reply to by नगरीनिरंजन

जिथे चार टाळकी वर बसून निव्वळ पैसा बघतात, त्यासाठी वाटेल त्या गोष्टी करतात, तो धर्म नाही हो, व्यवसाय आहे शुद्ध. त्यांच्या फायद्यासाठी ते जनतेला सरळ सरळ *** बनवतात अत्यंत सहमत! छान लिहीलंत. विशेष म्हणजे हे वाक्य प्रत्येक धर्मालाही लागू होते.
सहमत

In reply to by पिंपातला उंदीर

साहेब थोडी गल्लत होते आहे. आय पी एल मध्ये फिक्सिंग झाले तर गोष्ट वेगळी. पण जेथे भारत विरुद्ध दुसरा देश यात असे करणे हा देशद्रोह आहे कारण तुमच्या देशाची प्रतिष्ठा पणास लागलेली आहे/असते. आपण आपल्या देशासाठी खेळतो आहे एवढे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा मराठवाडा सिंह विरुद्ध पुणेरी वाघ किंवा विदर्भ घोडे विरुद्ध कोकणी कोल्हा याला कोण विचारतो?

In reply to by सुबोध खरे

बीसीसीआय ही प्रायव्हेट कंपनी आहे. ते खेळतात ते सामने हे भारत वि. दुसरा देश असे असतात ही आपण करुन घेतलेली सोयीस्कर गैरसमजूत आहे.

In reply to by आजानुकर्ण

भारत सरकारविरुद्ध विविध न्यायालयीन खटल्यांमध्ये बी सी सी आय ने आपण स्वायत्त संस्था असून देशाचा व त्यांचा काहीही संबंध नाही असे शपथेवर सांगितले आहे. बी सी सी आय ला लागणारा पैसा ते स्वत: उभे करतात. भारत सरकारचे त्यांच्यावर कसलेही नियंत्रण नाही. खेळाडू त्यांच्यातर्फे खेळतात, देशातर्फे नव्हे. क्रिकेटचा राष्ट्रीय संघ हा खरेतर बी सी सी आय चा राष्ट्रीय संघ असतो. इतर खेळांप्रमाणे क्रिकेटमध्ये देशप्रेम वैगेरे असे काही नसते.

In reply to by संदीप डांगे

>>> भारत सरकारविरुद्ध विविध न्यायालयीन खटल्यांमध्ये बी सी सी आय ने आपण स्वायत्त संस्था असून देशाचा व त्यांचा काहीही संबंध नाही असे शपथेवर सांगितले आहे. बी सी सी आय ला लागणारा पैसा ते स्वत: उभे करतात. भारत सरकारचे त्यांच्यावर कसलेही नियंत्रण नाही. खेळाडू त्यांच्यातर्फे खेळतात, देशातर्फे नव्हे. क्रिकेटचा राष्ट्रीय संघ हा खरेतर बी सी सी आय चा राष्ट्रीय संघ असतो. इतर खेळांप्रमाणे क्रिकेटमध्ये देशप्रेम वैगेरे असे काही नसते. कर वाचविण्यासाठी व माहिती अधिकाराच्या जाळ्यात न येण्यासाठी बीसीसीआय वाटेल ते सांगू शकते. पण त्यात सत्यांश किती? २०११ मध्ये भारतात झालेली विश्वचषक स्पर्धा कोणी जिंकली होती? भारताने की बीसीसीआय ने? जगभरातील वृतपत्रात क्रिकेट संघाचा भारतीय संघ असा उल्लेख असतो का बीसीसीआयचा संघ? क्रिकइन्फो सारख्या क्रिकेटला वाहलेल्या संकेतस्थळावर सामन्यांच्या व संघाच्या उल्लेखात भारत वि. ऑस्ट्रेलिया असा सामना दाखवितात का बीसीसीआय वि. ऑस्ट्रेलिया? डेव्हिस चषक स्पर्धेत भारताचा संघ असतो का आयटीएचा? हॉकीच्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा संघ असतो की आयएचएचा? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भारतातील कोणत्याही नागरिकाला हे प्रश्न विचारा ते काय उत्तर देताहेत ते बघा. त्यांच्या उत्तरावरून कळेल की या सामन्यात फसवणूक करणे हे देशद्रोह करण्यासारखेच का आहे ते.

In reply to by श्रीगुरुजी

अहो गुरुजी जगभरातील वृत्तपत्रांमध्ये मोदींनी मुसलमानांचे शिरकाण केले असेही छापून आले होते. अगदी अमेरिकेने विसाही नाकारला. खरे होते का ते? असं पेपरातल्या गोष्टीवर विश्वास ठेवून चालत नाही. न्यायालयात काय सिद्ध झाले ते पाहा. बीसीसीआयवर भारत सरकारचे आणि पर्यायाने भारतीय जनतेचे काहीही नियंत्रण नाही. पैशासाठी हपापलेली श्रीनिवासन-शरदपवार अशी चार टाळकी ती संघटना चालवतात. त्याला भारतीय संघ म्हणायचं असेल आणि त्यावर तुमची देशभक्तीची व्याख्या अवलंबून असेल तर आनंद आहे.

In reply to by आजानुकर्ण

>>> बीसीसीआयवर भारत सरकारचे आणि पर्यायाने भारतीय जनतेचे काहीही नियंत्रण नाही. निव्वळ बीसीसीआय वर नव्हे तर भारत सरकारचे भारतीय ऑलिंपिक संघटना, भारतीय हॉकी संघटना, भारतीय बॅडमिंटन संघटना अशा कोणत्याही क्रीडा संघटनेवर नियंत्रण नाही. याचा अर्थ असा नाही की भारताचे संघ हे भारत देशाचे नसून या खाजगी संघटनांचे संघ आहेत. ऑलिंपिकमध्ये, आशियायी स्पर्धेत, जागतिक स्पर्धेत भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या माध्यमातून भारत देशाचा संघ सहभाग घेतो. उद्घाटनाच्या सोहळ्यात खेळाडू भारत देशाचा राष्ट्रध्वज घेऊन संचलनात सामील होतात, भारतीय ऑलिंपिक संघटनेचा नव्हे. जेव्हा एखादा भारतीय खेळाडू सुवर्णपदक जिंकतो तेव्हा भारताचे राष्ट्रगीत वाजविले जाते, भारतीय ऑलिंपिक संघटनेचे नव्हे. कारण हा भारत देशाचा संघ असतो. तसेच हॉकी, क्रिकेट अशा कोणत्याही खेळाच्या स्पर्धेत त्या खेळांच्या संघटनेचा ध्वज किंवा गीत नसून भारत या देशाचे राष्ट्रगीत व भारत या देशाचा राष्ट्रध्वज असतो.

In reply to by श्रीगुरुजी

श्री गुरुजी मुद्देसूद प्रतिवाद करण्याची आपली हातोटी आणि धीर वाखाणण्याजोगा आहे. परंतु डोळ्यावर झापडे बांधलेल्या लोकांना शब्दाचा कीस काढण्यात जर आनंद वाटतो तर तसे असो. त्यांना जागे करण्यात किंवा त्यांची झापडे उघडण्यात काय हशील आहे. असे झापडबंद कम्युनिस्ट आणि समाजवादी लोक आपल्याला सर्वत्र दिसतात. सर्व सामान्य माणूस कोणताही संघ भारतीय संघ म्हणूनच ओळखतो. बी सी सी आय चा नाही मग असे चार लोक काहीका म्हणेनात त्याने काय फरक पडतो. आय पी एल चे तसे आहे का ?

In reply to by सुबोध खरे

ही चर्चा वाचून आता माझ्या डोळ्यावरची झापडे निघाली आहेत. बीसीसीआयने केवळ पैशासाठी आम्ही भारताचे अधिकृत प्रतिनिधी नाही असे सुप्रीम कोर्टात खोटे सांगितले होते. सुप्रीम कोर्टाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. बीसीसीआय (स्वतः म्हणत नसले तरी) भारत देशाचा अधिकृत संघ आहे. बीसीसीआयचा विजय हा भारताचा विजय आहे. बीसीसीआय जे काही करते ते सर्व भारत देशासाठी करते. बीसीसीआयचे खेळाडू हे देशावर लढणाऱ्या सैनिकांप्रमाणे देशभक्त आहेत. बीसीसीआय अध्यक्ष आणि राष्ट्रपती यांच्याप्रती मी माझी निष्ठा कायम ठेवीन जय जवान, जय किसान, जय बीसीसीआय.

In reply to by आजानुकर्ण

>>> बीसीसीआयने केवळ पैशासाठी आम्ही भारताचे अधिकृत प्रतिनिधी नाही असे सुप्रीम कोर्टात खोटे सांगितले होते. बरोबर >>> सुप्रीम कोर्टाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. दुर्लक्ष केले का नाही ते अजून स्पष्ट नाही. मुद्गल समितीच्या व आयपीएल मधील फिक्सिंगच्या खटल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलेला आहे. तो ५ जानेवारीला लागेल असे वाटले होते. परंतु सर्वोच्च न्यायालय अजूनही निकाल राखून आहे. नजीकच्या भविष्यकाळात हा निकाल लागेल. त्यावेळी बर्‍याच गोष्टी स्पष्ट होतील असं वाटतंय. >>> बीसीसीआय (स्वतः म्हणत नसले तरी) भारत देशाचा अधिकृत संघ आहे. चूक. बीसीसीआय ही फक्त संघटना आहे. बीसीसीआयचा स्वतःचा कोणताही संघ नाही. जो संघ आहे तो भारत या देशाचा संघ आहे. >>> बीसीसीआयचा विजय हा भारताचा विजय आहे. चूक. विजय किंवा पराभव हा भारत या देशाच्या संघाचा होतो. बीसीसीआयचा नव्हे. ऑलिंपिकमध्ये पदक मिळते ते भारतीय खेळाडूला मिळते, भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या खेळाडू किंवा संघाला नव्हे. >>> बीसीसीआय जे काही करते ते सर्व भारत देशासाठी करते. बीसीसीआयचे खेळाडू हे देशावर लढणाऱ्या सैनिकांप्रमाणे देशभक्त आहेत. बीसीसीआय अध्यक्ष आणि राष्ट्रपती यांच्याप्रती मी माझी निष्ठा कायम ठेवीन जय जवान, जय किसान, जय बीसीसीआय. इतका त्रागा करू नका हो.

In reply to by अनुप ढेरे

ते केवळ सोयीस्कर प्रश्नांना उत्तरे देतात . आता फक्त दुसर्‍या फोटो कडे बघून सांगतील तिथे india पण लिहिला आहे