Skip to main content

sadism एक आदिम मानवी प्रवृत्ती.

लेखक मारवा यांनी शनिवार, 26/04/2014 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
या शब्दाचा उगम मार्क्वीस द साद या १८ व्या शतकातील फ़्रेंच सरदार व लेखक याच्या नावावरुन झाला. याचा जन्म तेव्हाच्या एका प्रभावशाली उमराव कुटुंबात झाला. हा सुरुवातीपासुन इतरांना यातना देउन लैंगिक आनंद मिळविण्यात समाधान मानत असे. याला अनेकवेळा वेश्यांशी अत्यंत क्रुरतेने वागल्याच्या कारणासाठी तुरुंगात टाकण्यात आले. बॅस्टील च्या कुप्रसिद्ध तुरुंगात ही याला टाकण्यात आले होते. तेथे त्याने त्याची अनेक कुप्रसिद्ध पुस्तके लिहीली. त्यात जस्टाइन आणि १२० डेज ओफ़ सॅडोम या बहुचर्चित पुस्तकांचा समावेश आहे. यातील १२० डेज ऒफ़ सोडोम वर आधारीत असलेला सिनेमा सालो १२० डेज ओफ़ सोडोम या नावाने पिएर पाउलो पासोलीनी या दिग्दर्शकाने बनविला. हा अत्यंत उग्र असा सिनेमा आहे. हा सिनेमा अनेक देशांत अनेक वर्षांसाठी बॅन करण्यात आला होता. मात्र इंटरनेट ने आता हा सहज उपलब्ध झालेला आहे. (कृपया अतिसंवेदनशील व्यक्तींनी हा सिनेमा पाहण्याचे टाळावे यातील उग्रतेने/क्रौर्याने कदाचित काहींना त्रास होउ शकतो म्हणुन ही आग्रहाची नम्र विनंती) तर सॅडीझम या शब्दाचा ऒक्सफ़र्ड डिक्शनरी ने दिलेला अर्थ मला अतिशय अचुक वाटतो तो म्हणजे एन्जॊयमेंट ऒफ़ क्रुएल्टी टु ऒदर्स आणि दुसरा सेक्शुअल परव्हर्ज्न कॅरेक्टराइज्ड बाय धिस यात सॅडीझम च्या दोन्ही महत्वाच्या बाजु कव्हर होतात असे मला वाटते एक म्हणजे लैंगिक संबधातील क्रुरता व इतर प्रकारची (लैंगिक नसलेली क्रुरता). दुसरया अ-लैंगिक क्रुरते चा स्कोप फ़ार वाइड आहे. यावरुन च बनलेला शब्द आहे सॅडीस्ट म्हणजे अशी व्यक्ती जी निरनिराळ्या प्रकारचा क्रुर व्यव्हार इतरांशी करुन आणि त्यामुळे इतरांना होत असलेल्या यातनेने आनंदीत होते. सॅडीस्ट लोकांनी सामुदायिक रीत्या असा आनंद घेण्याची अनेक उदाहरणे अगदी प्राचीन काळापासुन आहेत. रोम मधील ग्लॅडीएटर च्या स्पर्धांमधुन असे हिंसेचे क्रुरतेचे व्यवस्थित आयोजन च करण्यात येत असे. यात होत असलेली क्रुरता पाहुन.. यातना पाहुन चेकाळणारे प्रेक्षक निश्चीतच सॅडीस्ट होते. कॅलिगुला चा काळ अशा अनेक उदाहरणांनी भरलेला आहे. मध्ययुगीन इस्लामी शासन काळात देण्यात येणारया अनेक प्रकारच्या शिक्षा ज्यात गुन्हेगाराला सरळ साधे मारुन टाकण्यापेक्षा हाल हाल करुन सार्वजनिक रीत्या मारणे यामध्ये तेथील लोकांची सॅडीस्टीक प्रवृत्ती दिसुन येते. उदा. एखाद्याला जमिनीत पुर्णपणे गाडुन केवळ मुंडके बाहेर ठेउन नंतर त्यावर जमलेल्या सर्व लोकांनी दगड मारुन त्याला ठार मारणे ही बहुप्रचलित शिक्षा. यात ही विशेष बाब म्हणजे शासकांना आम लोकांतील या सॅडीस्ट प्रवृत्तीची असलेली पुरेपुर जाण व त्यांना या प्रकारच्या शिक्षेत सहभागी करुन घेउन वा ग्लॅडीएटर सारख्या उदाहरणांत प्रेक्षक बनवुन घेणे, व अशा पद्धतीने या मुळ सॅडीझम च्या वृत्ती ला खतपाणी च घातले जात असे व एक प्रकारे एनकरेज केले जात असे. अर्थात यात ही सत्ताधारयांचे हितसंबंध गुंतलेले असत. ही केवळ प्रातिनीधीक उदाहरणे झाली. मानवी इतिहास अशा अनेक उदाहरणांनी खचाखच भरलेला आहे. सॅडीझम अगदी लहान मुलांमध्ये ही दिसुन येतो. एकत्र खेळतांना लहान मुल अनेकदा एकमेकाला पनीशमेंट्स देतांना दिसतात. अनेक लहान मुलामध्ये प्राण्यांना मारण्याची यातना देण्याची प्रवृत्ती दिसुन येते. एखाद्या मांजराला पकडुन पाण्यात टाकणे, इ. अनेक प्रकारे लहान मुल असा छळ अतिश्य निरागसपणे करतांना दिसतात. अनेक सीरीयल कीलर च्या हीस्ट्री त अनेकदा त्याच्या बालपणात या सॅडीस्ट वृत्ती ठळकपणे आढळुन आलेल्या आहेत. त्यात त्यांना तर नैतिक ते वगैरेचा ही फ़ारसा सेन्स ही डेव्हलप झालेला नसतो त्यामुळे तर त्यात त्यांना काहीही गैर वाटत नाही. एक गोष्ट तर माझ्या अनेकदा पाहण्यात आलेली आहे एखादी वेडी व्यक्ती असेल तर अशा भिकारी वेड्या व्यक्तीमागे साधारण टीन एजर वा लहान मुलांचा ग्रुप लागतो. आणि ते त्याच्या मागे जाउन जाउन त्याला दगड मारतील कींवा डिवचतील की मग जेणेकरुन तो वेडा संतापाने त्यांच्या मागे धावतो आणि मग या मुलांना अधिकच आनंद येतो. हा प्रकार ही मुल अगदी बोर होइपर्यंत अथवा कोणी मोठ्यांनी आडकाठी आणेपर्यंत करत असतात. मला खात्री आहे आपणापैकी अनेकांनी हा प्रकार भारतात तरी बघितलेला असावा. धार्मीक संदर्भात सॅडीझम अतिशय ग्लोरीफ़ाइड रीतीने व्यक्त होतो. अनेक धार्मीक साहीत्यात आलेले उदा. गरुड पुराण इ. आलेले नरक यातनांचे वर्णन. अमुक अमुक पाप केल्यास कढईत टाकण्यापासुन च्या व्हरायटी शिक्षा अगदी बारीक सारीक वर्णन देउन केलेल्या आहेत. या वर्णनांतुन सॅडीस्टीक प्रवृत्ती ठळकपणे दिसुन येते. महाभारतातले अनेक प्रसंग बघावेत. सर्वच धर्मांच्या साहीत्यात या सॅडीस्टीक वृत्तीने भरलेले अनेक कंटेट आढळतात. धार्मीक संदर्भात मात्र मॅसोचिझम अधिक आढळतो. मॅसोचिझम मध्ये व्यक्ती स्वत:ला यातना देण्यात आनंद मानते. याला अजुन एका रीतीने एक्स्प्लेन करता येते. मॅसोचिझम इज सॅडीझम टर्न्ड टुवर्ड सेल्फ़ फ़्रॉम ऒदर्स. हा मुबलक प्रमाणात सर्व धर्मात आढळतो. जैन धर्मात हा अनेकदा दिसुन येतो. या धर्मात एक विधी आहे. जो मी स्वत: बघितलेला आहे. जे संन्यासी असतात त्यांच्यासाठी एक केश लोचन विधी असतो. यामध्ये सर्व लोक ज्याचे केस वाढलेले आहेत अशा साधु/साध्वी भोवती जमतात मग त्या साध्वी चे केस हाताने ( कात्री/ब्लेड चा वापर न करता) एक एक करुन उपटले जातात. आणि याने होणारी वेदना त्या साध्वी ने चेहरयावर व्यक करणे अपेक्षीत नसते. आणि हा सोहळा सहसा सार्वजनिक रीत्या च अनेक प्रेक्षकांच्या साक्षीने केला जातो. व असे करणे ही गौरवाची आत्मसंयमाची त्यागाची बाब आहे असे अतिशय अभिमानाने मानले जाते. हे प्रातिनीधीक उदाहरण आहे अनेक धर्मात स्वत:ला यातना देण्याच्या अनेक परंपरा आढळुन येतात. स्वत:ला फ़टके मारणे, रक्त बंबाळ करणे इ. मात्र एरवी जो सॅडीझम वा मॅसोचिझम विकृती च्या व्याख्येत सरळ सरळ टाकला जातो. तो मात्र धार्मीक संदर्भात आला तर विकृती तर दुरच त्याला एखाद्या पवित्र भावनेने बघितले वा मानले जाते. या उलट लैंगिक संदर्भात मुळ संभोगा च्या वेळी ही सॅडीझम/मॅसोचिझम चा वापर दिसुन येतो. इंटरनेट वर तर या संदर्भात एक स्वतंत्र शाखाच आहे जीला बी.डी.एस.एम. असे म्हटले जाते.याला विरोधक विकृती तर समर्थक एक जीवनशैली म्हणुन संबोधतात. समर्थकांच्या मते दैंनदिन लैंगिक आयुष्यात येणारा कंटाळा घालविण्यासाठी आणि आपल्यातील आदिम प्रवृत्ती ना तॄप्त करण्यासाठी याचा सुरक्षीत एका मर्यादेत फ़ॅन्टसी म्हणुन वापर करण्यात काही गैर नाही. यासाठी विवीध साधने इत्यादींची नेट वर रेलचेल आहे. संभोगा दरम्यान एकमेकांना चावणे दंतक्षत करणे आदि मध्ये ही सुक्ष्म हिंसा दडलेली च असते. तीची डीग्री वाढवल्या वर मग तो ठळक असा सॅडीझम दिसु लागतो. या सर्वांमधील विरोधाभास म्हणजे धार्मिक पातळी वरचा प्रत्यक्ष सॅडीझम/मॅसोचिझम हा पवित्र आणि बेडरुम मधील बोरींग सेक्स लाइफ़ स्पाइस अप करण्यासाठी वापरलेला तसा निरुपद्रवी गमती जमतीचा सॅडीझम/मॅसोचिझम हा विकृत मानला जातो. तरुण मुलांमध्ये रॅगिंग संदर्भात सॅडीझम अत्यंत तीव्रतेने समोर येतो. रॅगिंग मध्ये अतिशय आक्रमक उघड्या नागड्या स्वरुपात सॅडीस्ट वृत्ती उफ़ाळुन आलेली दिसते. याचे प्रत्ययकारी चित्रण मागे महेश एलकुंचवारांच्या होळी नावाच्या नाटकात वाचले हते. परंतु होळी कीस झाडकी पत्ती असे भयानक रॅगिंग आज च्या तारखेला भारतात अनेक कॊलेजेस मध्ये होताना दिसते. यात विशेष बाब म्हणजे जी उच्च शिक्षण देणारी कॉलेजेस आहेत खासकरुन इंजिनीयरींग आणि मेडीकल मध्य याचे तुलनेने फ़ार जास्त प्रमाण दिसुन येते. म्हणजे जो सर्वात जास्त हुशार अभ्यासु असा एज्युकेटेड क्लास आहे त्यात सॅडीझम तर जास्त च दिसुन येतो. संस्कृतीने चढविलेली शिक्षण संस्काराची पुटे कीते तकलादु असतात ती आय आय टी च्या रॅगिंग च्या घटना बघितल्यावर कळुन येते. बर विशेष म्हणजे येथे आलेला क्लास हा जनरली सर्वच बाबतीत सहसा उच्च असतो आणि त्यातही परत शहरी भागातुन आलेल्यांकडुन ग्रामीण विद्यार्थ्यांची रॅगिंग अधिक तीव्रतेने होत असलेले हे दिसते. यात परेश रावल चा सिनेमा टेबल नं २३ आठवतो. सॅडीझम कधी कधी अतिशय सुक्ष्म अशा स्वरुपात समोर येतो. विजय तेंडुलकरांच नाटक बघा शांतता ! कोर्ट चालु आहे, यात बेणारे बाइना ज्या असामान्य पद्धतीने टॉर्चर केल जात तो समाजातल्या लोकांच्या मनातला अगदी गाभ्यातला सुक्ष्म सॅडीझम विजय तेंडुलकरांनी उलगडुन दाखविलेला आहे त्याला खरोखर तोड नाही. जे नाटक ते सर्व लोक मिळुन बेणारे बाई बरोबर खेळतात तो तर माणसाच्या या आदिम प्रवृत्तीचा घेतलेला अगदी खोल असा मागोवा आहे. अबु गरीब च्या तुरुंगात जगाने सॅडीझम चा सर्वोच्च अविष्कार बघितला. अमेरीकन सैनिकांनी जे अफ़गाणी कैद्यांवर अत्याचार केले त्यात विशेष म्हणजे काही अमेरीकन महिला सैनिकांचा देखील समावेश होता. या अमेरीकन महीला सैनिंकांनी अतिशय भीषण अशी सॅडीस्टीक प्रवृत्ती पुरुष सहकारयांच्या बरोबरीने दाखविली. विशेष म्हणजे हे स्त्री पुरुष ऑदरवाइज त्यांच्या कुटुंबात अगदी प्रेमळ वगैरे होते. त्यानंतर ज्या प्रचंड दांभिकतेने या अत्याचारांचे समर्थन केले ते काही काळापुर्वी रीलीज झालेल्या अबु गरीब पेपर्स मध्ये मुळातुन वाचण्यासारख आहे. युध्द कैद्यांवरील अत्याचाराने जागतिक इतिहासाची अनेक पाने भरलेली आहेत. नेमकी कुठली प्रेरणा असते सॅडीझम मागे ? एक माणुस स्वत:च्या हातात पॉवर आल्यानंतर दुसरया व्यक्तीला यातना देण्यात आनंद का मानतो? माणसाची घडण च अशी आहे का ? संवेदनशीलता, दयाळुपणा च्या बुरख्या मागे संस्काराच्या कंडीशनींग मागे प्रत्येकाच्या आत एक सॅडीस्ट दडुन बसलेला असतो का ? डोक बाहेर काढण्याची वाट बघत ? अनुकुल परीस्थीती येताच व्यक्त होण्यासाठी? याची सहसा अनेक बाजुने स्पष्टीकरणे दिली जातात एक म्हणजे सॅडीस्टीक व्यक्ती ही त्याच्या बालपणात अशा च कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या हिंसेचा शिकार झालेली असते ज्याचा खोलवर परीणाम अशा व्यक्तीच्या व्यक्तीमत्वावर होत असतो. व अशी व्यक्ती मग पुढे जाउन सॅडीस्ट बनते. दुसर अस सांगण्यात येत की मुळात या सॅडीझम मागे ही अधिक खोलवर असलेली प्रेरणा ही इतरांवर सत्ता गाजविण्याची असते व त्यांचे पुर्ण नियंत्रण करणे ही असते. व त्यासाठी इतरांना यातना देणे अथवा अपमानित करणे हे त्या मुळ पॉवर प्ले चा एक भाग फ़क्त असतो. अशी व्यक्ती स्वत:त असलेली कमतरता न्युनगंड कुठेतरी दडपुन या मार्गाने स्वत:चे समाधान शोधत असते. चर्चे च्या माध्यमातुन या विषयाचा खोलवर वेध घ्यायला आवडेल.

वाचने 24829
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

In reply to by शुचि

पण त्या वस्तुस्थितीचा अनुभव आल्याशिवाय सर्वांशी नातं जुळत नाही. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर संवेदनाशील माणूस आपसूक शाकाहारी होतो. मला आहाराविषयी वाद निर्माण करायचा नाही, फक्त हिंसेचा मुद्दा अधोरेखित करायचा आहे. आपली सांप्रत नाती (निव्वळ) मानसिक आहेत, ती जाणीवेतून निर्माण झालेली नाहीत त्यामुळे तिसर्‍या समूहाला `असंबधित' म्हटलंय. इस्लामी पद्धतीचं वर्णन आणि हेतू मॅसोचिजम आहे आणि त्या अनुषंगानं ती पद्धत न्यायं वाटणं सॅडिजम आहे असा विचार मांडला आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर संवेदनाशील माणूस आपसूक शाकाहारी होतो.
बुद्धाबद्दल काय मत आहे?

In reply to by संजय क्षीरसागर

मला तर उलटं वाटतं अतिभावनिक (= संवेदनाशील????) लोकांनाच न्याय्य कायदाव्यवस्थेचे महत्त्व कळेल. ज्यांनी विकृती अनुभवलीच नाहीये त्यांना कळणारच नाही अन ते भूतदया भूतदया करत गुन्हेगारांना पाठीशीच घालत रहाणार. . . . हां आता त्यांनी जोशींच्या टीनेजर मुलाला नग्न करुन, नायलॉनच्या दोरीने फास आवळून मारले असेल ना का, अभ्यंकरांच्या नातीला जाईला नग्न करुन घरभर फिरुन मौल्यवान वस्तू दाखवायला लावून मग मारले असेनाका पण आपले भूतदया दाखविणारे आडवे पडणारच! कारण ...... जाई परत येणार नाही, मुलगा परत येणार नाही, त्यांचे ह्युमिलिएशन मिटणार नाही पण हे बिचारे गुन्हेगार कशाला फासावर लटकवायचे? अन काय विदा आहे की फाशीमुळे गुन्हे कमी झालेले नाहीत याचा? मान्य आहे पूर्ण नामशेष झालेले नाहीत पण कशावरुन कमी झालेले नाहीत?

In reply to by शुचि

आपण काय साधण्याचा प्रयास करतोयं हा आहे. जर गुन्हेगाराला त्याच्या दुष्कृत्याची जाणीव झाली तर तो सुधारण्याची शक्यता आहे पण त्याला देहदंड दिला की विषयच संपला. मी गुन्हेगारीची भलामण करत नाही, संवेदनाशीलता कशी वाढवता येईल याचा विचार व्हावा असा मुद्दा मांडतो. समाजाची संवेदनाशीलता वाढली की गुन्हेगारी आपोआप आवाक्यात येईल.

In reply to by संजय क्षीरसागर

जर गुन्हेगाराला त्याच्या दुष्कृत्याची जाणीव झाली तर तो सुधारण्याची शक्यता आहे पण त्याला देहदंड दिला की विषयच संपला.
होय कळतय पण वळत नाहीये :)

In reply to by शुचि

मधे एकदा रवि परांजपे या ज्येष्ठ आणि दिग्गज चित्रकाराशी गप्पा झाल्या. त्यांच्या दृष्टीकोनानं जगण्याचा एक नवाच पैलू उलगडला. ते म्हणाले, "जर लहानपणापासून मुलाची सौंदर्यदृष्टी जोपासली गेली तर जगातली सर्व अराजकता दूर होईल." नाऊ जस्ट सी धिस थॉट, जर आपण जगाच्या सुंदरतेकडेच पाहू लागलो तर आपोआप कृतज्ञता येते. ज्या चक्षुंनी आपण पाहतो त्यांची किमया जाणवायला लागते. द वेरी फॅक्ट दॅट वी कॅन सी इज सच अ वंडरफुल फिनॉमिना. मग नजरेनं चांगल्याच गोष्टी पाहाव्या, सौंदर्यपूर्ण घटना बघाव्या असा भाव निर्माण होतो. स्पर्शाचं सौंदर्य जाणवू लागलं की, वी स्टार्ट फिलींग ग्रॅटिट्यूड टोवर्ड्स अवर पार्टनर्स बॉडी. वॉट अ‍ॅन एक्स्ट्सी इट इज टू बी टुगेदर इन अ स्टार स्टडेड नाईट! स्वादाचं सौंदर्य कळलं की अन्न ब्रह्म होतं! गंधांचं सौंदर्य कळलं की सारी फ्रॅगरन्सेसची दुनिया इतके दिवस कशी गवसली नाही याचं नवल वाटतं. नादाचं सौंदर्य कळायचा आवकाश की आपण शांततेला मार्दवानं हँडल करायला लागतो. आणि उमजतं की, इट इज अ‍ॅन इनवॅल्युएबल ट्रेजर ऑफ ब्लिस अराऊंड अस. जस्ट टू बी सायलेंट इज सच अ प्लेजर! मग सॅडिजम, मॅसोचिजम, हिंसा, गुन्हेगारी अशा गोष्टींना जीवनात स्थानच राहात नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

@संक्षि: प्रतिसाद आवडला, पण एवढी इंग्रजी वाक्यं कशाला हवीत त्यात? या वाक्यातून जे सांगयचंय, ते व्यक्त करू शकण्याएवढी नक्कीच संपन्न आहे मराठी भाषा. एका भाषेत दुसरी भाषा घुसडणं, हा सुद्धा त्या भाषेच्या सौंदर्याचा, संपन्नतेचा अवमान आहे, आणि एकाअर्थी हिंसकपणा देखील आहे. संपूर्ण प्रतिसाद मराठीचं मार्दव्य, पावित्र्य राखत लिहून तर बघा, या भाषेची अद्भुत किमया इतके दिवस कशी गवसली नाही याचं नवल वाटेल...

In reply to by चित्रगुप्त

व्यक्त होतांना मला भाषेचा अडसर येत नाही. पण माझ्या लेखी भाषेपेक्षा संवाद आणि त्याचा परिणाम महत्त्वाचायं. लेखवरच्या प्रतिसादांची भाषा संयुक्त आहे त्यामुळे प्रतिसाद देतांना तसं लिहीलंय. बाय द वे, तुमच्यासाठी तीच जादू, मराठीतून: मधे एकदा रवि परांजपे या ज्येष्ठ आणि दिग्गज चित्रकाराशी गप्पा झाल्या. त्यांच्या दृष्टीकोनानं जगण्याचा एक नवाच पैलू उलगडला. ते म्हणाले, "जर लहानपणापासून मुलाची सौंदर्यदृष्टी जोपासली गेली तर जगातली सर्व अराजकता दूर होईल." किती दुर्लभ विचार आहे पाहा, जर आपण जगाच्या सुंदरतेकडेच पाहू लागलो तर आपोआप कृतज्ञता येते. ज्या चक्षुंनी आपण पाहतो त्यांची किमया जाणवायला लागते. आपण पाहू शकतो हीच किती विलोभनीय गोष्ट आहे. मग नजरेनं चांगल्याच गोष्टी पाहाव्या, सौंदर्यपूर्ण घटना बघाव्या असा भाव निर्माण होतो. स्पर्शाचं सौंदर्य जाणवू लागलं की आपण सखीच्या देहाप्रती कृतज्ञ होतो. चांदण्या रात्रीतला सखीसंग म्हणजे जणू स्वर्गच धरेवर उतरतो! स्वादाचं सौंदर्य कळलं की अन्न ब्रह्म होतं! गंधांचं सौंदर्य कळलं की इतक्या सार्‍या गंधांची, हरक्षणी चित्तप्रसन्न करणारी दुनिया, आपल्याला पूर्वीच कशी गवसली नाही याचं नवल वाटतं. नादाचं सौंदर्य कळायचा आवकाश की आपण शांततेशी मार्दवानं वागायला लागतो. आणि उमजतं की, आपल्याला सतत वेढून असणारा तो रेशीमकोष आहे. नुसतं शांत बसणं ही सुद्धा काय ऐयाशी आहे! मग परपीडन, स्वपीडन, हिंसा, गुन्हेगारी अशा गोष्टींना जीवनात स्थानच राहात नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

अगदी बरोबर. मृत्यूदंडाने अपेक्षीत हेतू साध्य होत नसेल तर निष्कारण एखाद्याचा गिनि पिग करणे कितपत योग्य आहे?

सेडिसम ही कोणती विशिष्ट भावना नसून( विशेषत: खोडसाळ/खोडकर पणाची ) बेसुमार इंटेसिटी आहे. कोनाला तो करायला आवडतो कोनाला सहण करायला आवडत असेल. अथवा याविरुध्द सरां प्रमाने सेडिसम बाबत दिशाभूल व तीव्र तिटकरा व्यक्त करून पुन्हा स्वत:चा सेडिजमच प्रदर्शित करायला पण मान्य मात्र न करायला आवडत असेल. मला स्वत:ला मर्यादित तीव्रतेचा सेडिस्म पसंत आहे. सर्वच बाबतीत.

खासकरुन इंजिनीयरींग आणि मेडीकल मध्य याचे तुलनेने फ़ार जास्त प्रमाण दिसुन येते. म्हणजे जो सर्वात जास्त हुशार अभ्यासु असा एज्युकेटेड क्लास आहे त्यात सॅडीझम तर जास्त च दिसुन येतो. संस्कृतीने चढविलेली शिक्षण संस्काराची पुटे कीते तकलादु असतात ती आय आय टी च्या रॅगिंग च्या घटना बघितल्यावर कळुन येते. बर विशेष म्हणजे येथे आलेला क्लास हा जनरली सर्वच बाबतीत सहसा उच्च असतो आणि त्यातही परत शहरी भागातुन आलेल्यांकडुन ग्रामीण विद्यार्थ्यांची रॅगिंग अधिक तीव्रतेने होत असलेले हे दिसते जनरलायझेशन (सार्वत्रिकीकरण?). संस्कृतीचा, शिक्शणाचा, शहर - खेडेगावात राहण्याचा आणि ही विकृती असण्याचा परस्परांशी काहीही संबध नाही. अमेरीकन सैनिकांनी जे अफ़गाणी कैद्यांवर अत्याचार केले त्यात विशेष म्हणजे काही अमेरीकन महिला सैनिकांचा देखील समावेश होता. या अमेरीकन महीला सैनिंकांनी अतिशय भीषण अशी सॅडीस्टीक प्रवृत्ती पुरुष सहकारयांच्या बरोबरीने दाखविली विषेश म्हणाजे? स्त्रिया कधी काही गुन्हे करत नहीत का? पुन्हा तेच!