बारा वर्षांपूर्वी कॊलेजमधून बाहेर पडलो होतो त्यावेळी काही विशिष्ट बाबतीत माझी ( आता असं वाटतं की) टोकाची मतं होती.
त्याबद्दल मी शक्य तेवढा वाद घालत असे.हल्ली असं लक्षात यायला लागलंय की मी आता तितका हट्टी उरलो नाहीये.
जगाला वाटेल ते जगाने करावं, आपण कोण सांगणारे? असं हल्ली वाटतं...
१. लग्नसमारंभातली उधळपट्टी : मुलगे आणि मुली आपल्या आई-बापांचे पैसे लग्नाच्या चैनीत हक्काने का उधळतात, हा मला पडलेला प्रश्न असे..वरवर आनंदी दिसलो तरी मी तेव्हा कोणतेही लग्नसमारंभ मनापासून अजिबात एन्जॉय करू शकत नसे....
असल्या उधळपट्टीच्या लग्नात उपस्थित राहणं नको असंही वाटत असे. तेव्हा तर मी बर्याचशा लग्नांना जाणं टाळत असे. (
कधी विषय निघालाच तर यावरून मी तावातावाने भांडत असे...( हौस हौस असं उत्तर देऊन त्याआड दडणार्यांना मी विचारत असे की दुसर्याचे पैसे घेऊन स्वत:ची चैन का करावी... स्वत:च्या लग्नात स्वत:ला ( म्हणजे फ़क्त स्वत:ला, आईबापांना नव्हे) परवडेल तितकेच खर्च करावेत..संपलं. मग बरोबर मर्यादित खर्चात लग्नं होतील.. इत्यादी इत्यादी)
... आता मी याबाबतीत थोडा मवाळ झालो आहे ( कारणं अनेक असतील... उधळपट्टीची माझ्या दृष्टीने बदलती व्याख्या असेल... उत्तर भारतीयांची वधुपित्याचे कंबरडे मोडणारी प्रचंड उधळपट्टीची लग्नं पाहिल्यावर ( त्यामानाने मराठी लग्नं काहीच नाहीत अशी -पळवाट असेल...)..... किंवा खूप नातेवाईक एकत्र येणं आणि धमाल करणं यासाठी तरी लग्नसमारंभ व्हावेत असं वाटत असेल...
किंवा थोडक्यात सांगायचं तर आता वय झालं असेल..... हल्ली मी लग्नसमारंभांना उपस्थित राहतो, मनापासून एन्जॉय करतो...
तेव्हाचं सारं आर्ग्युमेंट चूक असं वाटत नाही मला, पण आता इतकाच विचार करतो की आपण आपल्याला पाहिजे तसं केलं..जगाला शिकवणारे आपण कोण?
२. समाजसेवी क्लब : माझ्या ओळखीचे एक ज्येष्ठ डॉक्टर आहेत.स्वभावाने विनोदी... ते एका समाजसेवी क्लबचे सभासद होते. सारखी पुस्तकं नि पत्रकं छापून आम्ही समाजसेवा करतो असा उदोउदो करणारे हे क्लब..... हे डॉक्टर स्वत:च हळूच तसं सांगायचे....मी विचारलं मग समाजसेवेचं काय ? ते हसत म्हणाले ,"बाकीच्यांचं माहित नाही, पण मी तरी तिथे सेवा करायला जात नाही.मी दारू पिऊन रिलॆक्स व्हायला जातो... आम्ही पुढची दारू प्यायला मीटिंग कुठे घ्यावी हा विचार करण्यासाठी आज एका ठिकाणी दारू पीत मीटिंग घेणार आहोत...."
...तेव्हा असं अजून दोघातिघांचं पाहिलं.... हे असे क्लबवाले लोक माझ्या फ़ार डोक्यात जात असत.. ( सरळसरळ मज्जा करायला एकत्र या ना, ही सेवेची नाटकं कशाला ? त्यात त्यांची सेवाज्येष्ठतेची उतरंड, त्या निवडणुका आणि गवर्नर की काहीतरी झाल्याबद्दल स्वकौतुकाच्या वर्तमानपत्रीय बातम्या इत्यादी इत्यादी सगळंच उबग आणत असे.)
..शिवाय प्रत्येक सभासद वर्षाला बारा चौदा हजार देणार तर मग या क्लबचा किती प्रचंड निधी जमायला हवा, आणि त्यांचे किती समाजोपयोगी काम व्हायला हवे असे वाटत असे पण
वर्षाला हे लोक जी सभासद वर्गणी गोळा करणार त्यातली बरीचशी परदेशात मुख्य शाखेला जाते असं ऐकलं तेव्हा हे सारंच एकूण भंपक वाटायला लागलं होतं...
..... या सार्या भावनांची तीव्रता आता खूप कमी झाली आहे....आता इतकंच वाटतं,लोक व्यावसायिक संबंध वाढवायला असले क्लब जॉईन करतात आणि स्वत:च्या पैशाने मज्जा करतात,त्यात माझं काय गेलं?
आपल्याला न पटणार्या गोष्टी आपण केल्या नाहीत म्हणजे झालं, बाकी जगाला शिकवणारे आपण कोण?
वयानुसार बदलत गेली अशी इथे कोणाची अशी काही मतं असतीलच की ... चला लिहूया..
वाचने
35232
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्यालाच
खरे आहे मी
In reply to ह्यालाच by विंजिनेर
आपला चर्चा
मलाही आधी
आता वाटतं
In reply to मलाही आधी by झेल्या
जे अश्या
In reply to आता वाटतं by लिखाळ
अगदी
In reply to आता वाटतं by लिखाळ
हानिकारक शीतपेयांच्या जाहिराती करू नयेत....
In reply to मलाही आधी by झेल्या
व्यक्त्ती तितक्या प्रकृती
भडकमकर
मास्तर
+१
In reply to मास्तर by मराठमोळा
मला पूर्वी
सहमत
फुले
गांधी आणि चर्चील
आताचे विचार
मोटार सायकल वापरता की सायकल ?
In reply to आताचे विचार by मिहिर
हेच खरे.
:)
आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन
छान
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
जाणिवा बदलतात हे खरं आहे !
वयानुसार
मान्स बी
२५
+१११११
In reply to २५ by नितिन थत्ते
व्यवसायात सुद्धा
पूर्वी
मास्तरांनी धागा वर काढला आहे म्हणून:
In reply to पूर्वी by ३_१४ विक्षिप्त अदिती
आळस ∝ वय
हा पाच वर्षांपूर्वीचा धागा
गेल्या ५ वर्षात तुमच्यात काय
In reply to हा पाच वर्षांपूर्वीचा धागा by भडकमकर मास्तर
साक्षात कवटी परत आली! धन्य
In reply to गेल्या ५ वर्षात तुमच्यात काय by कवटी
लग्नसमारंभ, हिंदुत्ववाद, इ.
वयानुरूप माझी मते फारशी
वा !
In reply to वयानुरूप माझी मते फारशी by सुबोध खरे
आपल्या मुलांच्या लग्नात तीन
In reply to वयानुरूप माझी मते फारशी by सुबोध खरे
आपल्या मुलांच्या लग्नात तीन
In reply to वयानुरूप माझी मते फारशी by सुबोध खरे
आपल्या मुलांच्या लग्नात तीन समाजसेवी संस्थांचे स्वयंसेवक पावतीपुस्तक घेऊन तेथे बसवायचे. या तीन संस्था म्हणजे १)श्री बाबा आमटे यांचे आनंदवन २) वनवासी कल्याण आश्रम ३) टाटा कर्करोग रुग्णालय. सर्व आमन्त्रीताना त्यांच्या इच्छा आणि क्रयशक्तीप्रमाणे त्यांच्या आवडीच्या संस्थेला. तिथल्या तिथे देणगी देण्याचे आवाहन करायचे. हि गोष्ट आमंत्रण पत्रिकात सुद्धा लिहून आवाहन करायचे. जेवढी देणगी लोकांकडून येईल तितकीच देणगी माझ्या खिशातून.हे खूप आवडलं ! मुलाच्या लग्नात हा प्रस्ताव मांडला जाईल. घरच्यांचा स्वभाव पहाता काही अडचण येणार नाही. *good* या कल्पनेसाठी खास धन्यवाद ! अर्थात तुमची हरकत नसल्यास आणि कल्पनाश्रेय तुम्हालाच दिले जाईल हे नक्की.एक्का साहेब
In reply to आपल्या मुलांच्या लग्नात तीन by डॉ सुहास म्हात्रे
खरंच काढा
In reply to एक्का साहेब by सुबोध खरे
_/\_
In reply to वयानुरूप माझी मते फारशी by सुबोध खरे
अनिभा
In reply to वयानुरूप माझी मते फारशी by सुबोध खरे
डॉ. तुसी ग्रे८ हो
फारशी यशस्वी
राही ताई
In reply to फारशी यशस्वी by राही
अभिनंदनच
In reply to राही ताई by सुबोध खरे
माझे एक सर सांगायचे, दुसर्
आणि अजून एक,
In reply to माझे एक सर सांगायचे, दुसर् by आनन्दा
चांगला धागा..
वयाप्रमाणे माझ्यात झालेले बदल
जो जे वांछील तो ते लाहो!
काही मत बदलली नाहीत...
जाणत्या राजाची...
वयानुसार बदललेले माझे मत
(लेनीनवादापासून दूर गेलो त्याबद्दल)
सैन्याबद्दलचा दृष्टीकोन
नाटक पिक्चर
मला स्वतःमधे झालेले बदल
अगदी ..
In reply to मला स्वतःमधे झालेले बदल by प्रकाश घाटपांडे
निधर्मी बुरखा घेणार्या