Skip to main content

सोने : बघावे, घ्यावे की -----

लेखक प्रसाद भागवत यांनी शुक्रवार, 20/12/2013 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिल च्या मध्यास लिहिलेला हा पोस्ट अधिक विचारमंथनाच्या अपेक्षेने मिपाच्या वाचकांबरोबर शेअर करतो आहे.- आमच्या १५ हुन अधिक वर्षांच्या वैवाहिक वाटचालीत काल प्रथमच सौ. ने माझ्या व्यावसायिक बुद्धीमत्तेवर थोडासा विश्वास दाखवत असल्याचे दाखवुन स्वतःच्या बुद्धीमत्तेची चुणुक दाखवली. "सोने खुप खाली आले आहे म्हणे, लोकं घेतायत, तुझे काय मत आहे??" ह्या तिच्या 'लाखामोलाच्या' प्रश्नाने मी गडबडलो. याशिवाय अपेक्षे्प्रमाणे क्लायंट्सच्या जवळ्पास प्रत्येक फोनमध्येही हा विषय येत् होताच. खरे तर सोने हा काही माझ्या आकलनाचा प्रांत नाही पण तरीही जागतिक बाजारांत मागणी पुरवठा तत्वावर मोठ्या प्रमाणांत व्यवहार होणारी ती एक कमॉडिटी असल्याने मुलभुत नव्हे पण काही तांत्रिक बाबींचा उहापोह करता येतो का ते पहातो. एकदा सोने ही कमॉडिटी असल्याचे मान्य केले की भावातील चढ-उतार होतच असणार हे ओघाने आलेच आणि जेथे तेजी आहे तेथे कधी ना कधी मंदी येणारच, खरे तर हा तर्क अगदी जन्म आहे म्हणजे मृत्यु असणारच या गृहितकाएवढाच स्पष्ट आहे. पण तरीही आपण अनेकदा विवेकबुद्धी सोडुन वागतो आणि अडचणींत येतो. सोने कधीच घसरत नाही.-- अशा अज्ञानमुलक गृहितांच्या पार्श्वभुमीवर बाजाराने दिलेले असे अनपेक्षित झटके ( ते देणे हे बाजाराचे व्यवच्छेदक लक्षणच आहे) ठळक मथळ्यांचे विषय होतात. अशा परिस्थितीत माझ्यासारख्या किरकोळ गुंतवणुकदाराने काय करावे ह्या प्रश्नावरील हा माझा व्यक्तीगत दृष्टीकोण मी सांगणार आहे. असा रामायणाला सुरवात होते ती काही ना काही कारणाने बाजारांत एखाद्या वस्तुकडे पहाण्याचा गुंतवणुकदारांचा कल बदलल्याने. त्या कारणांची मीमांसा हा आताच्या लेखनाचा विषय नाही मात्र, येथे सोन्याबाबत तो तेजीकडुन मंदीकदे बदलला आहे एवढेच आपण गृहित धरु या, बाजारांत विक्रीचा जोर वाढुन भावपातळी खाली जावु लागते. परिस्थितीनुसार अशा विक्रीची तीव्रता कमी अधिक असते. कधीतरी भावांतील फरक मोठा असुन भाव नुसते घसरण्याऐवजी गड्गड्ल्यास बाजारांत प्रमुख दोन प्रतिक्रिया पहावयास मिळतात. (१) भाव खुप खाली गेल्याने सुरवातीस आक्रमकपणे विक्री करणारे थोडीशी उसंत म्हणुन का होईना थांबतात अणि (२) स्वस्ताईच्या प्रतिक्षेत असलेले किरकोळ गुंतवणुकदार खरेदी साठी गोळा होतात. यामुळॅ भावपातळीत सुधारणा होते. खुप मोठ्या घसरणीनंतर आलेल्या भावांतील अशा उसळीला तांत्रिक परिभाषेंत 'Dead Cat Bounce' असे म्हटले जाते. ( अगदी मेलेला प्राणीही खुप उंचावरुन खाली आपटल्यास उसळु शकतो या अर्थी.) या अशा फसव्या तेजीमुळे वर उल्लेखलेले किरकोळ खरेदीदार त्यांच्या फायदेशीर सौद्याचा आनंद उपभोगणार, तोच बाजारातील आणखी एक वर्ग या धुमश्चक्रींत सामील होतो, हा असा वर्ग असतो, ज्याने तेजीचा कल असताना असा वस्तुची खरेदी ( अर्थातच चढ्या दराने) केलेली असते व नंतर आलेल्या मंदीत वेळीच भाग घेता न आल्याने घुसमटुन तो बाजार सुधारताच 'बाहेर पड्ण्याच्या' मनस्थितींत असतो. पॉज घेण्यासाठी थांबलेले आधीचे मंदीवाले व हे घायकुतीला आलेले गुंतवणुकदार विक्रीचे पुढ्चे आवर्तन सुरु करतात व बाजार अधिक खालची पातळी दाखवु शकतो. ----ह्या खेळाचे प्रयोग अनेकदा होतात. असे अनुभवास येते की प्रदीर्घ कालावधीनंतर जेंव्हा बाजारात अशी एखादी मोठी घसरण येते, तेंव्हा प्रकरण एका भागांत संपत नाही, थोड्या थोड्या अंतराने असे मंदीचे धक्के बसलेले दिसतात. बाजार विश्लेषकांच्या मते बा्जार कधीच एखाद्या कारणाने , एखाद-दुसरया दिवसासाठी वगैरे आपला दीर्घकालीन कल बदलत नाही. या बाबत कारण मीमांसा करताना नेहमीच 'cockroach theory' चा मनोरजक दाखला दिला जातो.म्हणजेच ज्या प्रमाणे if you see one cockroach in your home, there are likely many more,----- मंदी्ला कारणीभुत असणारया कारणांचेही काहीसे असेच आहे. ती ही झुरळांप्रमाणेच एक एक करुन दृष्टॉत्पत्तीस येउ लागतात. आपण लक्षांत ठेवावयास हवे की भावपातळीचा तळ निश्चित होणे ही एक प्रक्रिया आहे, घटना नाही. ('Bottom formation is a process, not an event') खरे म्हणजे गुंतवणुकदाराच्या दृष्टीने खरेदी हा भविष्यकाळाशी निगडित व्यवहार आहे, म्हणजेच वस्तुची भविष्यकालीन किंमत ही आजच्या किंमतीपेक्षा अधिक असावी हे कोणत्याही गुंतवणुकीमागील सोपे गृहित आहे पण अनेकदा आपण खरेदी चा संबंध भुतकाळाशी जोडतो. कालच्या पेक्षा आज स्वस्त आहे,--- केवळ हाच खरेदीचा निकष कसा काय असु शकतो ? --- उद्याचे काय ?? हा प्रश्न माझ्या मते अधिक महत्वाचा आहे तेंव्हा केवळ वृत्तपत्रीय मथळ्यांकडे पाहुन दिवाळी/दसरा साजरा करण्याची अनाठायी घाई केल्यास कदाचित शिमगा ह्या सणाचे स्मरण ही नंतर होवु शकेल ह्याची जाणीव असो द्यावी.

वाचने 71906
प्रतिक्रिया 152

प्रतिक्रिया

In reply to by ज्ञानव

साहेब, मी CA नाही किंवा कायदे तज्ञ हि नाही एक सामान्य माणूस आहे. परंतु "प्रामाणिकपणे" माझा कर भरतो. मी केलेले कोणतेही विधान बेकायदेशीर कसे ते आपण मला समजावून द्याल तर बरे होईल. पी पी एफ बद्दल काही माहिती मी वाचली आहे तिचे दुवे खाली देत आहे. ते आपण मुळापासून वाचावे आणी माझेही शंका निरसन करावे http://profit.ndtv.com/news/cheat-sheet/article-seven-must-know-facts-a… http://www.personalfn.com/knowledge-center/fixed-income/fip-tutorials/1… जर आपण दर वर्षी ८००० रुपये सोन्या ऐवजी PPF मध्ये टाकलेत तर पाचव्या वर्षानंतर आपण त्यातून ८००० रुपये काढू शकता. आणी हेच पैसे बँकेत भरून दुसरे ८००० दुसर्या दिवशी दिवशी आपण परत PPF मध्ये भरल्यास त्यावर्षीच्या करपात्र उत्पन्नातून आपले ८००० रुपये वजा होतील म्हणजे त्यावर लागलेला २४०० रुपये कर (आयकर कलम ८० क ) आपला कमी होईल आता यात बेकायदेशीर काय आहे ते आपण सांगाल काय ? ""आणि एकूण कर भरण्यापेक्षा कर न भरण्याकडेच सगळ्यांचा भर आहे. हे तर दुर्दैव आहे. मी काही देणार नाही आणि सरकारने मात्र गुंतवणूक दाराला विश्वासात घ्यायलाच पाहिजे. पुन्हा विसंगती. कर माफी हा उद्देश अंमळ जास्तच आहे लोकांत मी म्हणतो घ्या कर पण द्या भरपूर."" हा निष्कर्ष आपण कशावरून काढलात ते कळेल काय? ""कारण हे मुद्दल तुम्ही गेली ५ वर्षे पी पी एफ्ला भरता आहात ते आज ह्या वर्षी एकदम इंकम म्हणून कसे दाखवता कारण पी पी एफ मध्ये तुम्ही दर वर्षी आधीच ते इन्कम च्या रुपात दाखवून झालेले असते आणि कर वाजवट हि घेतलेली आहे. आणि तरीही तुम्ही पुन्हा कर वजावट जर मागाल तर ते विसंगत किंवा बेकायदेशीर होते. असो किचकट आहे थोडे."" कदाचित आपल्या विधानातील विसंगती दाखविल्याने आपल्याला राग आला असेल किंवापण पाच वर्षे ज्यात यशस्वी रित्या पैसे कमावले ती स्कीम पुढे तशीच चालणार नाही हे दाखविल्याने आपल्याला राग आला असेल परतू लोकांच्या प्रामाणिकपणा वर असे सरसकट विधान करणे बरोबर नाही असे मला वाटते. बाकी आपले मत आपल्यापाशी अवांतर:-- आपल्याला कोणतीही गोष्ट तारण ठेवून बँकेकडून कर्ज घेताना त्याचे कारण लिहून द्यावे लागते आणी सोने तारण ठेवून कर्ज परत सोने विकत घेण्यासाठी आपल्याला आपली बँक कर्ज देत असेलही पण ते बँकेच्या नियमात बसत नाही असे वाटते.( माझ्या भावाने बर्याच वेळेस धंद्यासाठी सोने तारण ठेवून अल्प मुदतीसाठी कर्ज उचललेले आहे.) असो आपले मत आपल्याजवळ. मला फक्त एवढेच म्हणायचे होते कि आपली स्कीम सर्वसामान्य माणसासाठी सुलभ आणी "सर्व काळ" चालेल असे वाटत नाही. बाकी लोक सुज्ञ आहेतच.

In reply to by सुबोध खरे

जर आपण दर वर्षी ८००० रुपये सोन्या ऐवजी PPF मध्ये टाकलेत तर पाचव्या वर्षानंतर आपण त्यातून ८००० रुपये काढू शकता. आणी हेच पैसे बँकेत भरून दुसरे ८००० दुसर्या दिवशी दिवशी आपण परत PPF मध्ये भरल्यास त्यावर्षीच्या करपात्र उत्पन्नातून आपले ८००० रुपये वजा होतील म्हणजे त्यावर लागलेला २४०० रुपये कर (आयकर कलम ८० क ) आपला कमी होईल आता यात बेकायदेशीर काय आहे ते आपण सांगाल काय ?
एक शंका आहे साहेब... १)तुम्ही पीपीएफमधून पैसे काढा आणि परत पीपीएफला लगेच ट्रान्स्फर करा अशी बँकेला विनंती करू शकता का ? जर करू शकता तर माझी चूक मला मान्य आहे आणि जर नाही करू शकत तर का? बँक ते डायरेक्ट तुमच्या सांगण्या नुसार का ट्रान्स्फर देत नाही ते कळायला हवे. पण जर मी ते पी पी एफ मधून काढून घेतलेली रक्कम भरली नाही मी दुसरे पैसे आणून भरले असे सांगाल तर दोन प्रश्न येतात १)जर दुसरे पैसेच भरायचे होते तर पी पी एफ मधून काढून का घेतले ? २)आणि जर तेच पैसे पी पी एफ मधून काढून मी इथे भरले आहेत हे विवरण पत्रात कसे दाखवले ? म्हणजे कोणत्या हेड खाली. कारण बँक एन्ट्री दाखवतेय कि हे पैसे पी पी एफ मधून काढले आहेत ती कशी लपवणार? आणि कुठल्याच गोष्टीचा राग येण्याचे कारण नाही कारण हा माझा अभ्यास आहे मी काही सर्वज्ञ नाही हे एक कारण आणि माझी सिस्टीम मला लखलाभ हे समजतेच आहे मला. हि शंका दूर करा बाकीचे ठळक मुद्देही समजून घेतो..

In reply to by ज्ञानव

साहेब बँकेत आपल्याच खात्यातून त्याच खात्यात पैसे "ट्रान्स्फर" करता येत नाहीत. बँक एन्ट्री दाखवणारच त्यात लपवण्यासारखे काय आहे? तुम्हाला ppf मधून पैसे काढायचे आहेत तर काढा. ते पण एक खातेच आहे. त्यातून आज पैसे काढले आणी उद्या टाकले तर चालते मग तुम्ही त्याच नोटा किंवा दुसर्या टाका. तुमच्या PPF खात्यात एक पैसे काढल्याची नोंद येईल आणी दुसरी पैसे भरल्याची. त्या खात्याचे पासबुकची प्रत आपण आपल्या आयकर विवरण पत्राला जोडा. त्यात गैर किंवा बेकायदेशीर काहीच नाही.

In reply to by सुबोध खरे

जरा विस्तृत सांगा. जर मी दर वर्षी १ लाख रुपये भरले असे मी ७ वर्ष भरले आठव्या वर्षी मी त्यातून १ लाख रुपये काढले आणि तुम्ही सांगता त्याप्रमाणे (त्याच नोटा बर का )दुसर्या दिवशी भरले आणि समजा हि केस स्क्रुटिनीला आली तर पी पी एफ च्या गुंतवणुकीचा सोर्स ऑफ इन्कम काय सांगणार?

In reply to by ज्ञानव

तुम्ही सात वर्षे कुठून गुंतवले ते तुम्हाला सांगायला लागेल पण आठव्या वर्षी सरळ लिहिता येईल कि PPF मधून काढले आणी परत गुंतवले. त्यात अनैतिक काय आहे ?

In reply to by सुबोध खरे

पण आठव्या वर्षी सरळ लिहिता येईल कि PPF मधून काढले आणी परत गुंतवले.
हि केस तुम्ही सी ए ला किंवा तुमच्या ओळखीत एखादे आयकर आयुक्त, आयकर निरीक्षक असतील तर त्यांच्याकडे कन्फर्म करा. ( फक्त पी पी एफ मधून काढून परत पी पी एफ लाच पैसे भरले असता ते करपात्र नाहीत असे तुम्ही लेखी देऊ शकता का आणि त्या वाजवटीचा फायदा मीळू शकतो का? ) कारण मी स्क्रूटिनीज अटेंड करतो माझी प्रक्टीस आहे ती. एक क्षण विचार करा कि मी जे सांगतोय तर काही तरी त्यात तथ्य असेलच. जर उपाशी बोका म्हणतात त्याप्रमाणे मिन्ग्लिंग ऑफ फंड्स असेल तर केस वेगळी होते आणि ते अलाऊ होऊ शकते. पण सरळ लिहिता येईल कि पी पी एफ मधून काढले आणि भरले तर ते डीसअलाव होऊन add back होऊन कर भरावा लागेलच. तुम्ही सिरीयसली घ्यावे हि विनंती आहे. ह्या केसचे टेक्निकल मुद्दे प्रतिसादातून किंवा मुळ धाग्यातून मांडणे केवळ अशक्य आहे कारण income tax act हा एक मोठा आवाका असलेला कायदा आहे.

In reply to by ज्ञानव

साहेब, मी काही अर्थ क्षेत्रातील नाही,किंवा मला कोणतेही अर्थविषयक शिक्षण मिळालेले नाही. तेंव्हा तुमचे म्हणणे मान्य केले कि तेच पैसे भरता येत नाहीत. ठीक आहे ते पैसे घरी वापरा आणि दुसरे पैसे (पगारातील किंवा दुसर्या उत्पन्नातील) PPF मध्ये गुंतवा. त्या दुसर्या पैशाच्या गुंतवणुकीवर कर वाचेलच ना ? म्हणजे माझा मुद्दा आपल्या लक्षात आला असेल कि तसे पैसे फिरवून आपल्याला कर वाचवता येतो कि आणि त्यात कोणतीही लबाडी नाही. (आपण म्हणता तसे सरकार डीस अल्लाऊ करणार असेल तर). शब्दच्छल करण्यात काय हशील आहे? मूळ मुद्दा सोन्यात गुंतवण्यात असलेल्या धोका आणि सुरक्षित गुंतवणूक ज्यात भांडवल सुरक्षा आहे यातील फरक हा आहे. गेली पाचवर्षे आपली स्कीम चालली कारण सोन्याचे भाव चढत होते. आता ते उतरणार असतील तर आपली गुंतवणूक आतबट्ट्याची ठरेल. मला एवढेच म्हणायचे होते. I AM RATHER A PRAGMATIST THAN PURIST

In reply to by सुबोध खरे

पण आठव्या वर्षी सरळ लिहिता येईल कि PPF मधून काढले आणी परत गुंतवले.
हा तुमचा इंनोसंस पाहूनच मी तुम्हाला आयकर विषयक कायदा सांगण्याचा प्रयत्न केला. सोन्याची गुंतवणूक आणि ट्रेड हा विषय तुमच्यासाठी नवीन आहे आणि मी त्यात तितकाच माहीर आहे जितके तुम्ही तुमच्या व्यवसायात. आयकर विक्रीकर सेवाकर एक्साईज सेबी बँकिंग हे आमचे अविभाज्य घटक असल्याने त्याचा संबंध माझ्याशी रोजचा आहे. आगदी आजच ९ वर्षापूर्वी आयपीओला पैसे भरूनहि कंपनीने रिफंड दिला नाही म्हणून एक केस होती त्याचा रिफंड त्यांना मिळाल्याचा फोन मला सदर क्लायंटने केला होता. त्यांचे कुठेच काम झाले नाही त्यामुळे माझ्याकडे आल्या होत्या हे सांगण्यामागचा उद्देश हा कि कायदा बरेचजण ऐकून असतात त्याचे इंटप्रीटेशन फार कमी लोक जाणतात मग काम होणार नाही हा सल्ला देण्याची हि फी घेतात. तसे होऊ नये म्हणून. मला वैद्यकीय क्षेत्रातील काही कळत नाही त्यामुळे तो सल्ला त्या प्रांतातल्या व्यक्तीकडूनच ग्राह्य मानतो मी. पण पी पी एफ मधून काढून कर भरताना जर मी ते आयकर विभागाला तसे सांगितले तर ते डीसअलौ होईलच ह्यात दुमत होऊच शकत नाही आणि ते जर मी केले परंतु आयकर विभागला सांगितले नाही म्हणजे पीपीएफचे पैसेच पण दुसर्या सोर्स मधून दाखवून कर वजावट घेतली तर ते अनैतिकच आहे हे माझे वैयक्तिक मत झाले.

In reply to by ज्ञानव

मूळ मुद्द्याला फाटा फोडून शेवटी जितं मया असे तुम्हाला म्हणायचे असेल तर मला काही म्हणायचे नाही. पण तुमचा ट्रेड PPF सारख्या सुरक्षित स्किंपेक्षा चांगला आहे हे तुम्ही पटवूनहि देऊ शकत नाही.म्हणून मग तुम्ही त्या पुनर्गुंतवणुकीचा मुद्दा घेऊन त्यावर शब्दाचा डोंगर रचलाआणी मूळ मुद्द्याला फाटा फोडला. एखाद्याने आपल्या PPF मधून पैसे काढले कुठेही वापरले आणि नंतर दुसर्या खात्यातून आपली वर्षाची CONTRIBUTION भरली तर त्याला तुम्ही अनै तिक ठरवून मोकळे होता आणि मी जेंव्हा विचारले कि सोने गहाण ठेवून कोणते कारण देऊन कर्ज घेता तेंव्हा मात्र बँकेचा नियम माहित नाही असे सांगून मोकळे होता ते मात्र अनैतिक नाही? असो हि माझी शेवटची पोस्ट कारण तुम्ही मोठ्या शब्दांचा डोंगर रचलात तसा मी न रचता सरळ हि गोष्ट सर्वसामान्य माणसाला झेपणारी नाही असे म्हटले आहे. त्यात मी या क्षेत्रात माहीर आहे असे मला काहीही म्हणायचे नाही. एवढेच ट्रेड करताना बुडालेले असंख्य लोक आपल्याला दिसतात.पण सरकारी स्कीम मध्ये पैसे गुंतवून बुडालेले लोक दिसत नाहीत. DISCLAIMAR --माझा स्वतःचे PPF खाते नाही कि मी PPF चा एजंट हि नाही

In reply to by सुबोध खरे

माझा स्वतःचे PPF खाते नाही कि मी PPF चा एजंट हि नाही
हे तुम्ही न सांगताच मी जाणून आहे. सोन्याच्या गुंतवणुकीबाबत, ट्रेडबाबत बँकेचे कर्जबाबत आणि पीपीएफबाबतहि तुम्ही काही जाणत नाही आहात म्हणूनच तुम्हाला सगळे फक्त "शब्दच" वाटणे साहजिक आहे त्याचे अर्थ कळणे जरा कठीणच आहे. कारण INCOME TAX हा जर "समजला" नाही तर ते नुसतेच "शब्द" असतात मग लोक आम्हाला ८० सी वाचण्याचे सल्ले देतात.खात्यातातून ट्रान्स्फर कशी होते ते शिकवतात.असो चालायचेच. मी इथे हार जीत म्हणून किंवा तुम्हाला चार चौघात खोटे पडावे म्हणून काहीच लिहित नव्हतो पण " जितं मया" ह्या शब्दाने निराशा केली. त्यामुळे तुम्ही जिंकण्यासाठी स्वतःची बाजू मांडताय हे आणि तेही सर्व विषयाचे प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला नसताना हेहि कळाले. हे वेदनादायी आहे.मनापासून आवडले नाही. कारण गैरसमाजातून तुमचे(म्हणजे डॉक्टर सुबोध खरे ह्यांचे नाही सर्वांचे) नुकसान होऊ शकते म्हणून मी तुम्हाला वेळोवेळी सावधच करण्याचा आगाऊपणा करत आलोय (तुमचे बँकेच्या बाबतीतले मत ,100000 चा विमा सौरक्षण जर आठवत असेलत तर त्या संदर्भात). माझ्या क्षेत्रात मी माहीर असल्याचा सार्थ गर्व आहे मला, तिथे मला कुणीही हलवू शकत नाहीच.पण ह्या मी पणामुळे मी अंध झालेलो नाही पूर्ण जमिनीवर आहे आणि काहीतरी दिशा घेऊन काम करतो आहे. म्हणजेच अर्थ क्षेत्रात माहीर असतानाही लोकांना इंजिनिअर कसे व्हावे हे शिकवत नाही किंवा एखाद्याच्या इंजीनिआरीन्ग मधल्या चुका दाखवत नाही कारण तो माझा प्रान्तच नाही. ब्राम्हण असल्याने विद्यार्जन आणि विद्यादान करण्याचे कार्य करतो आहे.हे अप्रस्तुत वाक्य नाही तर जो स्वतःच्या जातीचा गुणधर्मच सोडू शकत नाही तो मूळ मुद्द्याला बगल देतो हे म्हणणे कितपत योग्य? ते सुज्ञ जाणतातच. पण मी केवळ प्रतिसादातून प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली जे प्रश्न तुम्ही मला विचारलेत त्यामुळे प्रश्नरुपी सुकाणू तुमच्याच हातात होता माझ्या नाही. मी मुद्दा सोडलाच नाही कारण मी मुळ धाग्यात सोने ह्या विषयावर चर्चा असताना मी त्याच्या ट्रेड बद्दल माहिती दिली आणि फक्त सोन्याच्या ट्रेडबद्दल सविस्तर लेखन केले ह्याचा तुम्ही सोयीस्कर अर्थ पुंर्गुंताव्णूक हा पर्याय मी स्वतःला वाचवण्यासाठी लिहिला असा काढलात तरी हि तसे करण्याचा अधिकार मला आहेच कारण मी तसे (म्हणजे ट्रेड आणि गहाण वगैरे ) केले आहे करतो आहे आणि पुढील २५ वर्षे करतच राहीन. पण तुम्हीहि (म्हणजे डॉक्टर सुबोध खरे ह्यांनी नाही सर्वांनी ) तेच करावे हे म्हणण्याचे धाडस मी कधीच करणार नाही कारण जसे "डॉक्टर" होणे येर्या गबाळ्याचे काम नाही तसे ट्रेड हेही नाही हे मी जाणतो पण सोन्याच्या धाग्यात पी पी एफला (ज्यात तुमची गुंतवणूकहि नाही ) गुंतवून तुम्हीच मुद्द्याला फाटा फोडलात असे नाहीका होत ? सर्वांगीण गुंतवणुकीचा धागा असता तर ते बरोबर होते. बँकेचे नियम बँकेला माहित ह्याचा अर्थ मला ते माहित नाहीत असा होत नाही हा एक भाग आणि बँक सोने तारण ठेवताना मलाच नाही कुणालाच काही प्रश्न विचारात नाही (ज्या सरकारी बँकेवर तुमचा विश्वास नाही असे तुम्ही अन्यात्रे एका धाग्यात म्हंटले आहे त्याच सरकारी बँकेत आणि तुमच्या लाडक्या का-ओपेरेटीव बँकेतहि )एक सोनार जो व्ह्यल्युअर म्हणून फी भरून बँकेत रजिस्टर असतो तो तुमच्या सोन्याची किंमत करतो आणि पैसे ठरवतो ज्यानुसार बँक तुम्हाला पैसे देते फक्त २ तासात. आणि मी तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे देत आलो आहे त्यामुळे "जितं मया" म्हणण्याची गरजच नाही जे "सोने" आहे ते "सोनेच" असते पण चकाकते ते सर्व "सोने" (इथे पी पी एफ.) असतेच असे नाही. आयकर विभागाच्या ट्रिब्युनलला केसेस लढवणार्या आम्हा (श्री व सौ पेठकर )ला आयकर म्हणजे काय ते थोडे तरी समजत असेलच ना ? शब्दांचे अर्थ जेव्हा कळत नसतात तेव्हा ते डोंगर बनूनच पुढे येतात अवांतर : बाकी माझा हा शेवटचा प्रतीसाद नाही कारण मी प्रत्यक्ष भेटीतच तुम्हाला सांगितले होते कि मी एक "कडक मास्तर" आहे मी कुणी चुकीचे काही बरोबर म्हणून सांगत असेल तर सोडतच नाही.

In reply to by ज्ञानव

कोणतीही 'टान्स्फर' होण्याकरिता दोन वेगळ्या ठिकाणांची आवश्यकता असते . मग एका अकाउंट्मधुन त्याच अकाउंट्ला 'टान्स्फर' कसी होणार ?? मात्र म्युचुअल फंड मधे एकाच अकाउण्ट्च्या डिव्हीडंड वा ग्रोथ अशा वेगवेगळ्या शाखा असल्याने तिथे हे शक्य होते. उदा. टॅकस वाचविण्याचा ०३ वर्षाचा लॉक-इन संपल्यानंतर तीच गुंतवणुक आपण केवळ पर्याय बदलुन ( म्हणजे मुळ पर्याय ग्रोथ असल्यास तो डिव्हीडंड करुन घेवुन) नव्याने करसवलत मिळवु शकतो. कायद्याने हे पुर्णपणाने संमत आहे.

In reply to by सुबोध खरे

आपल्याला कोणतीही गोष्ट तारण ठेवून बँकेकडून कर्ज घेताना त्याचे कारण लिहून द्यावे लागते आणी सोने तारण ठेवून कर्ज परत सोने विकत घेण्यासाठी आपल्याला आपली बँक कर्ज देत असेलही पण ते बँकेच्या नियमात बसत नाही असे वाटते.
बँकेचे नियम बँकच जाणे पण मला बँक ऑफ बरोडाने असे काही विचारले नाही की नियम दाखवला नाही.
""कारण हे मुद्दल तुम्ही गेली ५ वर्षे पी पी एफ्ला भरता आहात ते आज ह्या वर्षी एकदम इंकम म्हणून कसे दाखवता कारण पी पी एफ मध्ये तुम्ही दर वर्षी आधीच ते इन्कम च्या रुपात दाखवून झालेले असते आणि कर वाजवट हि घेतलेली आहे. आणि तरीही तुम्ही पुन्हा कर वजावट जर मागाल तर ते विसंगत किंवा बेकायदेशीर होते. असो किचकट आहे थोडे.""
मुळात हा मुद्दा तुम्हाला समजला का ?

In reply to by सुबोध खरे

PPF offers multiple tax benefits: Deposits in a PPF account qualify for a deduction under section 80C. Furthermore, the entire maturity amount including the interest is non-taxable. Not only is the interest earned tax free, PPF deposits are exempt from wealth tax too.
एका प्रतिसादात (श्री उपाशी बोका आणि घाटपांडे साहेब ) ह्यांना जी माहिती मी पुरवली तीच हि माहिती आहे पण बँकेतून पी पीएफ मधून काढून परत पी पी एफ मध्ये भरायची आयडिया कशी ते सांगा कारण मग मी वर्षाला १ लाख भरून ७ वर्षाने जे पैसे जमा होतील त्यातून ५०% काढून घेऊन वजावट घेत जाईन. त्यामुळे १००००० रुपयावर दरवर्षी मला वजावट मिळतेच आहे आणि सात वर्षाने काढलेल्या पैश्यावर हि मला वजावट मिळेल कारण ते माझे उत्पन्न असेल? असे काही तुम्ही सांगताय का ? कारण तुम्ही ज्या लिंक्स दिल्यात त्यात कुठे हि हि आयडिया डिस्कस केली नाहीये

In reply to by ज्ञानव

माझे पीपीएफ चे खाते नाही, पण एकंदर मला समजले ते असे. समजा: तुमचे वार्षिक उत्पन्न आहे ६ लाख आणि तुम्ही दर वर्षी पीपीएफ मध्ये ६० हजार टाकले. सोयीसाठी समजू की दर वर्षी तितकेच उत्पन्न आहे आणि ६० हजारच पीपीएफमध्ये टाकले. असं तुम्ही ७ वर्ष केलं. तुमचा पगार जमा होतो युनियन बँकेत आणि पीपीएफ खाते आहे स्टेट बँकेत. आता ७ वर्षांनी (मला नक्की ५ की ६ की ७ ते माहीत नाही, earliest possible allowed समजा), तुम्ही ४० हजार (maximum possible allowed समजा) पीपीएफमधून काढून युनियन बँकेत जमा केलेत. दुसर्‍या दिवशी जाऊन ४० हजार स्टेट बँकेत जाऊन पीपीएफमध्ये भरले. १. जर काढलेले ४० हजार टॅक्स-फ्री आणि कायद्यानुसार काढता येत असतील, तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसावा. बरोबर? २. तुम्ही म्हणताय की पीपीएफ खातातल्या खात्यात मला ट्रान्स्फर करून का भरता येत नाहीत? पहिला मुद्दा म्हणजे एकाच खात्यातल्या खात्यात, पैसे फिरवता येणार नाहीत. दुसरे म्हणजे पीपीएफ हे earned income मधूनच भरले पाहिजेत असा काही नियम असेल. आता तुम्ही पीपीएफमधून काढलेले ४० हजार जर युनियन बँकेत जमा केले (जिथे तुमचा पगार पण जमा होतो) म्हणजे ते एकत्र झाले, ज्याला co-mingling of funds असे पण म्हणतात, आणि दुसर्‍या दिवशी युनियन बँकेतून ४० हजार काढून पीपीएफमध्ये भरले, तर तुम्ही असं कसं काय म्ह्णू शकता की ते ४० हजार माझ्या उत्पन्नातले नाहीत आणि पीपीएफच्या withdrawal पैकीच आहेत? माझी समज बरोबर असेल आणि कायद्यानुसार हे बरोबर आहे. मग तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? प्रत्येकाने फायनान्शियल सल्ला घेताना, टॅक्सचा पण जरूर विचार करावा. It matters what you keep, not what you earn. जाताजाता: तुमच्या सिस्टीमवर तुमचा किती विश्वास असावा, हे तुमचे वैयक्तिक मत आहे. पण इतर सर्वांना कळकळीची विनंती आहे की टिप्सवर विश्वास ठेऊ नका. If it is too good to be true, it probably is. आपले ज्ञान स्वतः वाढवा.

In reply to by उपाशी बोका

@उपाशी बोका - जर तुम्ही भारतात असाल आणि पीपीएफ अकाउंट काढले नसेल तर लगेच काढा. बायकोचे पण काढा. शक्य असल्यास त्यात दर वर्षी १ लाख भरत रहा. मग बाकीच्या पैश्याची गुंतवणूक वगैरे करा.

ही गुंतवणूक म्हणजे फारच कटकट आहे ब्वॉ! १) सहा वर्षांनी पीपीएफ मधील काही रक्कम काढली २) पंधरा वर्षांनी पीपीएफ खाते बंद झाल्यावर ( रिन्यु न केल्यास) मिळणारी रक्कम तर अशा केस मधे मिळणारी रक्कम त्या वर्षाचे इनकम पकडतात का?

In reply to by प्रकाश घाटपांडे

होय, त्या रकमेतील मिळालेले व्याज हे निश्श्चितच उत्त्पन्न आहे, मात्र ते करमुक्त असल्याने टॅक्स वाढ्णार नाही हे महत्वाचे.

मुद्दा १ आणि मुद्दा २ ह्याचे उत्तर खालील प्रमाणे. जे व्याज मग ते ६ वर्षांनी मिळाले कि १५ वर्षांनी मिळाले ते कर मुक्त आहे तसेच तेव्हढे व्याजच फक्त त्या वर्षाचे (म्हणजे ६ किंवा १५ वर्षाचे )इन्कम होऊ शकते. आता गेली ६ वर्षे किंवा १५ वर्षे जी मुद्दल तुम्ही पी पी एफ ला दिलीत त्यावर तुम्ही कर वजावट दर वर्षी आधीच घेतली आहे त्यामुळे त्या मुद्दलास ६ किंवा १५ वर्षानंतर इन्कम म्हणून गणता येणार नाही आणि ते कुठल्याही वजावटीस पात्र असणार नाही.

श्रीमान ज्ञानवजी, आपण आपल्या आधीच्या पोस्ट्मध्ये काही विधानांबाबत ( माझ्या नव्हे) " हि तर निव्वळ दिशाभूल आहे किंवा अभ्यास न करता केलेलं विधान आहे" अशी आक्रमक भाषा वापरता, वस्तुस्थितीची संभावना 'गंमतीशीर वल्गना ' अशी करता आणि वर बिनादिक्कत 'कसा हो वाचतो जरा मलाही समजावा.(म्हणजे आयकर कलम कोणते ?) असा 'अहं ब्रह्मास्मि' थाटाचा प्रश्न विचारता------ मी यावर फक्त खुलासा केला आहे. . तर सांगावयाचे हे की, कायद्याने असे करता येते. आणि कायद्याचा अर्थ लावायला कोणी C.A असायलाच हवे असे नाही. आपण करसवलत मिळण्यासाठीच्या गुंतवणुकीसाठी असलेले कलम 80C मुळांतुन वाचावे अशी आपणास नम्र विनंती आहे.. करसवलत मिळविण्यासाठी करावयाची गुंतवणुक करदात्याने त्याच्या करपात्र उत्पन्नंतुन करावी एवढीच आयकर खात्याची अपेक्षा आहे. ' ती त्या वर्षाच्या इन्कम मधूनच व्हायला हवी असा नियम आहे' हा तुम्ही लावलेला अर्थ आहे ज्याला आधार नाही. माझे म्हणणॅ एवढेच आहे की एखाद्याने पी पी एफ मध्ये पैसे भरल्यास त्या पैशांवर त्याला कर वजावट मिळेल. ते पैसे त्याने कोठुन आणले, त्याच्या त्याच PPF खात्यातुन काढुन, की अन्य एखाद्या खात्यातुन ह्याचा विचार कोणी करण्याचा प्रश्न येतच नाही. सबब पीपीएफमधून जमा रकमेच्या २५% रक्कम काढून कर वाचवून पुन्हा पीपीएफलाच भरणे ह्यात अयोग्य अनैतिक असे काहीही नाही. रहिला प्रश्न तो अशा काढलेल्या रकमेचा आपल्या रिटर्न मधे दाखवायचा, त्यावर खुलासा हा की ते मुद्दल असल्यास प्रश्नच नाही, व्याज असल्यासही ते करमुक्त असल्याने उन्पन्न वाढ्ले तरी कर वाढ्णार नाही. असे असताना कोणी मुद्दल/ इन्कम याचा गोंधळ करावाच का ?? आणि करीत असेल तर त्याचा विचार आपण का करावा ?? बाकी आपली डबल कर वजावट वगैरे शंका अगम्य आहे. आपण एक व्यावसायिक अर्थसल्लागार आहात, अशा वेळी आपल्या विधानांचे महत्व अनेकपटीने वाढते. आपण पैसा मिळविण्यासाठीच तर हा सारा उद्योग करतोय, अशावेळी कर बचत, कर नियोजन या सारख्या महत्वाच्या पैलुंवरही आपण मार्गद्रशन करावयास हवे, मात्र आपली त्या विषयाचा अभ्यास आणि भुमिका अनाकलनीय आहे. आपण एखाद्या विषिष्ट कालावधीत यशस्वी झालेली गोष्ट 'सिस्टीम' म्हणुन अवलंबण्यापेक्षा( आणि तो 'फॉर्मुला' चालत नाहीशी विपरित परिस्थिती उद्भवली की मी 'थांबलोच' होतो अशी लंगडी कारणमिमांसा देण्यापेक्षा) अधिक व्यापक विचार करुन आमच्या सारख्या सामन्यांचा फायदा करुन द्यावा असे वाटते. "-----आर्थिक उत्पन्न हे नेहमी विक्रीतून येते मग ती बुद्धीची विक्री असो, सेवेची विक्री असो कि एखाद्या वस्तूची विक्री असो त्या विक्रीतून आणि फक्त विक्रीतूनच झालेला नफा हा करपात्र असतो. -----जगभरातल्या खाणीतून होणारे सोन्याचे उत्पादन आणि जगभरातली मागणी लक्षात घेता सोन्याचा भाव खाली जाईल का हे सांगयला श्री ब्रह्मदेव ह्यांना त्रास द्यायची गरज नाही. -----सोन्याचा भाव जो आज ३२००० आहे तो रुपये १,००,०००/- होईल" अशी अर्थहीन विधाने आपल्यासारख्या अनेक वर्षे बाजारात धालवलेल्या धुरिणाने करावीत हे एक आश्चर्यच आहे. खरे म्हणजे लिहायला संकोच वाटतो पण आपले या धाग्यामधले बहुतेक पोस्ट हे तार्किकतेच्या कसोटीवर टिकणारे नाहीत आपण 06 वर्षांच्या मुदती संदर्भात बरोबर बोलला आहात असे मी आधीच म्हणालो आहे पण तरीही एकुणांत मुळ मुद्याला बगल देवुन, कल्पनांची गल्ल्त करुन वा मध्येच अत्यंत गैरलागु प्रश्न विचारुन आपण एका आर्थिक विषयावरील चर्चा दिशाहीन करीत आहात असे माझे मत आहे. क्षमस्व.

In reply to by प्रसाद भागवत

*** करसवलत मिळविण्यासाठी करावयाची गुंतवणुक करदात्याने त्याच्या करपात्र उत्पन्नंतुन करावी एवढीच आयकर खात्याची अपेक्षा आहे.
ह्या संदर्भात, तुम्ही सांगितल्या बर हुकुम ८०सी परत वाचला मुळातून. आता २ गोष्टी १)तुम्ही जी आयकर खात्याची अपेक्षा सांगितली आहेत त्या नुसार करपात्र उत्पन्न जे त्याच आर्थिक वर्षाचे दाखवले जाते तेच तुम्हाला अपेक्षित आहे ना? जर असेल तर माझ्या
' ती त्या वर्षाच्या इन्कम मधूनच (म्हणजेच तुम्ही म्हणता त्या करपात्र उत्पनामधून)व्हायला हवी असा नियम आहे' हा तुम्ही लावलेला अर्थ आहे ज्याला आधार नाही.
हा वाक्याला तुम्हीच आधार दिला आहे. आणि SECTIONS 80C TO 80U SPECIFIES THE DEDUCTIONS TO BE MADE FROM THE GROSS TOTAL INCOME. GROSS TOTAL INCOME MEANS THE TOTAL INCOME, UNDER ALL HEADS OF INCOME, COMPUTED IN ACCORDANCE WITH THE PROVISION OF THE ACT [SECTION 80B(5)]. इथे वर मांडलेल्या सेक्शन नुसार जे उत्पन्न UNDER ALL HEADS OF INCOME, COMPUTED म्हणून डिफाईन केले आहे ते कोणत्या वर्षाचे? GROSS TOTAL INCOME कोणत्या वर्षाचे असते त्याच वर्षाचे असतेना ? आणि मी तुम्हाला तुम्ही सी ए आहात का ? हे जे विचारले ते केवळ तुम्हाला माझे म्हणणे सांगताना तुम्ही सी ए असाल तर काही गोष्टी गृहीत धरून बोलता येतील ह्या अपेक्षेने. पण बोलल्या गेलेल्या शब्दांना भावना असतात लिहल्या गेलेल्या शब्दांच्या भावना वाचाणाऱ्या वर अवलंबून असतात त्यामुळे कदाचित तुम्हाला राग आला असावा त्याबद्दल क्षमस्व...

In reply to by ज्ञानव

शब्दाचा अथवा कायद्याचा कीसच काढावयाचा झाला तर " --- total income computed in accordance with the provisions of this Act, before making any deduction under this Chapter ---" ही वाक्य रचना फक्त याच वर्षासाठी आहे असे कशावरुन ?? व्याकरण वा काळांचा अभ्यास केलेली कोणीही व्यक्ती हे वाक्य वर्तमानाईतकेच भुतकाळालाही लागु पडते हे सहज सांगु शकेल. याचाच अर्थ स्पष्ट आहे, गेल्या वर्षी विवरण पत्रकांत दाखविलेल्या उत्पन्नातुनही ( जे आता या वर्षी करीता त्या करदात्याची संपत्ती, wealth म्हणुन गणली जाईल) करदाता अशी गुंतवणुक करु शकतो. खरे तर खरे म्हणजे अशा प्रकारची तरतुद करण्याचा उद्देश हा करदात्यांस सक्तीची बचत करावयास लावणे आणि त्याच वेळी बेनामी व्यवहार टाळणे एवढाच आहे. आणि सदरची गुंतवणुक ही करदात्याच्याच खात्यातुन व्हावी एवढीच अपेक्षा आहे, खात्याकडुन केल्या vividh गेलेल्या निर्धारणांत( assessment) वा दिल्या गेलेल्या निर्णयांतुन ही बाब पुरेशी स्पेष्ट आहे.. समजा एखाद्या करदात्याचे वार्षिक उत्पन्न 3,50,000 आहे, त्याचे पुस्तकांत दिसणारे वार्षिक खर्च रु. ,2,80,000, आहेत आणि त्याने बॅकेकडुन र. 1,50,000 एवढी उचल वा कर्ज घेतले आहे, अशा परिस्थित्तीत तो या कलमाखाली रु.1,00,000 ची गुंतवणुक केल्यास, वर व्यक्त अर्थाप्रमाणे ती रु 70,000 पर्यंतच ग्राह्य मानुन उर्वरित रु 30,000 करदात्याच्या उन्पनातुन आलेली नाही या अर्थी नाकारली जाईल काय ?? --- याचे उत्तर नाही असे आहे. गुंतवणुक ग्राह्य मानली हाईल. एका करदात्याने तर मार्च महिन्यात आपल्या केडिट कार्डाने इन्शुरन्स चा हप्ता भरला आणि कार्ड कंपनीने तो पुढील आर्थिक वर्षांत (म्हणजे अप्रिल मधे) करदात्याकदुन वसुल केला. अशी गुंतवणुक ही खात्याने नव्हे तर ट्रिब्युनलने मान्य केली आहे. बाकी येथे काथ्याकुट करताना काही विद्वानांना अशा विमा वा पीपीफ गुंतवणुकी, पुन्हा एकदा, त्या करदात्याच्याच खात्यातुन केल्या आहेत हे सिद्ध करण्याची जबाब्दारी करदात्यावर असलेने) रोखीने भरु नयेत याचे भान दिसत नाही हा भाग अलहिदा. असो. माझे अनेक अशील अनेक वर्षे अनेकदा या प्रकारचे व्यवहार करीत असलेने मला त्याच्या वैधतेविषयी थोडीही शंका नाही मात्र माझ्याकडे या व्यतिरिक्त अधिक काही सांगण्यासारखे नसल्याने, मी स्वतःला कोणत्याच विषयातला 'माहिर' समजत नसल्याने आणि मुद्द्यांची सरमिसळ, तथ्थ्यांचे गौडबंगाल, वा शब्द्बबंबाळ अतार्किक पोस्ट्स करणे अथवा 'चुकीचे अर्धवट सल्ले' देणारे लिखाण करणे अशी कोणतीही आयुधे मला वापरता येत नसल्याने आपल्याला त्रिवार वंदन करुन मी आपल्याशी या विष्यावरची चर्चा थांबवतो.

आपण एक एक मुद्दा घेऊ प्रथम माझ्या 'सिस्टीम' बद्दल...
आपण एखाद्या विषिष्ट कालावधीत यशस्वी झालेली गोष्ट 'सिस्टीम' म्हणुन अवलंबण्यापेक्षा( आणि तो 'फॉर्मुला' चालत नाहीशी विपरित परिस्थिती उद्भवली की मी 'थांबलोच' होतो अशी लंगडी कारणमिमांसा देण्यापेक्षा).
मुळात तुम्ही फक्त माझ्या सिस्टीमकडे पाहत आहात ती समजून घेण्याऐवजी त्यावर भाष्य करताय. हि जी सिस्टीम जी तुम्हाला पूर्ण अनाकलनीय आहे त्यात शंकाच नाही पण म्हणून ती अयोग्य आहे किंवा मी लंगड्या कारणमीमांसा करतो हे तुम्हाला कसे समजले? त्यासाठी मार्केट आणि ट्रेड (म्हणजे मार्केट मग ते कुठले हि असो रियल इस्टेट, इक्विटी, सोने ई.पैकी कुठलेही)ह्या दोन गोष्टी तुम्ही (म्हणजे प्रसाद भागवत नाहीत...) जाणता असे मी इथे गृहीत धरले होते. त्यामुळे ट्रेड करताना आज जर मी म्हंटले सदनिका घ्या तुम्ही कदाचित म्हणाल नको भाव वाढत नाहीयेत. किंवा सोने घ्या तुम्ही म्हणाल नको भाव खाली येतील हे जे तुम्ही म्हणाल तुम्ही म्हणाल आहे ना ते तुमची निर्णयशक्ती दाखवते. जी प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि ट्रेड हा त्या निर्णयशक्ती वर अवलंबून असतो. निर्णय तुमच्या अभ्यासावर केव्हा एखादी वस्तू घ्यावी आणि केव्हा विकावी ह्याचे मूल्यमापन करावेच लागते आणि मग आपला खरेदीचा किंवा विक्रीचा भाव येईपर्यंत "थांबावेच" लागते तसा मी "थांबलोय" बाजार उलटा फिरला तरीही थांबावे लागते आणि बाजार चढत असताना ही थांबावेच लागते. जर मी थांबलो आहे तर ती लंगडी कारणमीमांसा कशी? मी का थांबलोय ते कळण्यासाठी ट्रेडिंग यायला हवे. २००६ पासून मी सोन्यात अनेक ट्रेड केले ते राम भरोसे बरोबर आले असा जो समज आहे तोच प्रगल्भतेला धरून नाही. त्यासाठी दोन वर्षे मार्केटचा अभ्यास केला , खरेदी कशी करता येईल आणि प्रोफित मार्जिन कसे वाढवता येईल हे पाहिलं आणि हाच महत्वाचा भाग इथे दुर्लक्षिला जातोय किंवा तो तुम्ही जाणता हे मी गृहीत धरतोय. तर केव्हा कुठले मार्केट चालेल हे ज्याचे त्याने अभ्यासानेच शोधावे लागते त्या नुसार कुणी सदनिका मार्केट कधी चालेल ते लक्षात घेऊन सदनिका घेतात आणि ताबा मिळायच्या आधी २ वेळा ट्रेड करून मोकळे होतात.( हि पद्धत तुम्हाला माहित आहे असे गृहीत धरतो.) पण जेव्हा साचुरेशन येते तेव्हा सगळ्या मार्केट मध्ये सगळेच जण थांबतात कारण ती वेळ मार्केट वर जाणार कि खाली हे ठरवणारी असते.....तर "थांबणे" ह्या शब्दाची हि कारण मीमांसा आहे आणि मार्केट प्लेयरला ती समाजलीच असेल.पण तुम्हाला ती लंगडी का वाटली कारण हे सगळे भाव आता इतिहास जमा आहेत त्यामुळे मी हे सांगू शकतोच. जर असे वाटत असेल कुणाला तर बोलणेच खुंटले मी माघार घेतो कि मी चुकलोय. (हे इथपर्यंत माझा मुद्दा लक्षात आला का मग पुढे सरकू या )
"-----आर्थिक उत्पन्न हे नेहमी विक्रीतून येते मग ती बुद्धीची विक्री असो, सेवेची विक्री असो कि एखाद्या वस्तूची विक्री असो त्या विक्रीतून आणि फक्त विक्रीतूनच झालेला नफा हा करपात्र असतो. -----जगभरातल्या खाणीतून होणारे सोन्याचे उत्पादन आणि जगभरातली मागणी लक्षात घेता सोन्याचा भाव खाली जाईल का हे सांगयला श्री ब्रह्मदेव ह्यांना त्रास द्यायची गरज नाही. -----सोन्याचा भाव जो आज ३२००० आहे तो रुपये १,००,०००/- होईल"
ह्यात एक्झाटली काय अर्थहीन आहे ते मला सांगा मी तेही मुद्देसूद समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन. हे दोन मुद्दे आधी समजावून घेऊ म्हणजे माझ्या चुका मला ज्ञात होतील. नंतर कर आणि ८०सी बद्दल बोलू. म्हणजे माझी गल्लत व्हायला नको तसेच मी (?!!) दिशाहीन चर्चा करायला नको.

काय ही चर्चा. आम्ही सामान्य लोक थोडे पीपीएफ थोडे पॉलिसी थोडे सोने सगळ्यात पैसे गुंतवतो. मात्रं हे खरेय की सोने इंस्टंट सोर्स ऑफ मनि आहे. अ‍ॅज गुड अ‍ॅज हार्ड करन्सी. आमच्या हास्पिटलात ऐनवेळी अ‍ॅडमिट होणारा गाबठी पेशंटचा नातेवाईक चटकन सराफ कट्ट्यावर जाऊन अंगठी गहाण ठेऊन पैसे घेऊन येति. बँका , एटीएम्स कधी बंद कधी चालू याची ग्यारंटी नाही. (किमान टायर थ्री सिटीत तरी) आणि पिपिएफ वैगेरे गुंतवणूक शेवटी एका लिमिटमध्येच करता येते ना. बाकी आपण मराठी माणसं नैतिकतेने वागून टॅक्स भरून टॅक्स चुकविणार्या, बुडविणार्यांचे भले करून देत असतो हे ही खरेच. सोने विकत घेणारे ८० टक्केहून अधिक लोक तरी ते आपल्या अ‍ॅसेटमध्ये दाखवित नाहीत असे माझे निरीक्षण आहे. याऊलट पहिल्याच डिक्लरेशन मध्ये तुमच्याकडे वडिलोपार्जित / स्त्रीधन म्हणून खूप जास्तं सोनं आहे असे दाखवून ठेवा (नसतानाही) म्हणजे नंतर सरप्लस कॅशचा कधी प्रश्न आला तर सोनं विकलं असं दाखविता येईल असा माझ्या सीएचा सल्ला होता. माझा मात्रं कुठल्याही गावठी डॉक्टरप्रमाणे जमिनीत गुंतवणुकीवर विश्वास आहे.

In reply to by साती

याऊलट पहिल्याच डिक्लरेशन मध्ये तुमच्याकडे वडिलोपार्जित / स्त्रीधन म्हणून खूप जास्तं सोनं आहे असे दाखवून ठेवा (नसतानाही) म्हणजे नंतर सरप्लस कॅशचा कधी प्रश्न आला तर सोनं विकलं असं दाखविता येईल असा माझ्या सीएचा सल्ला होता.
आणि हे
सोने विकत घेणारे ८० टक्केहून अधिक लोक तरी ते आपल्या अ‍ॅसेटमध्ये दाखवित नाहीत असे माझे निरीक्षण आहे.
हि प्राक्टिस खूप कॉमन आहे. खूप मोह होतोय पण जाऊ देत....कारण मला काय म्हणायचे आहे ते समजणारा / समजणारी एक तरी आहे इथे. बाकी मी सगळे सोने दाखवले आहे हं (असलेले)म्हणूनच बिनधास्त इथे माझ्याकडे ४० ग्राम (क्या य ते ४०च)आहे असे बोलू शकतो. एखाद्याच्या खातेवहीत जेव्हा "ADJUTMENTS" येते तिथेच अनैतिकता,बेकायदेशीरपणा सुरु होतो. "दाखवा हो काहीपण कोण विचारताय इथे?" असे सल्ले आमचेच क्लायंट आम्हाला देतात किंवा एखादी "ADJUTMENTS" वहिवाटीसारखी वापरतात तेव्हा त्यात काय गैर आहे असे त्यांना जाणवतहि नाही.

In reply to by ज्ञानव

मी पण . बाकी मी माझे' सग्गळे अ‍ॅसेट्स ओपनली दाखविले आहेत' असे मला परवा एकजण सांगत होती आणि मी मला उकळून फुटणारे हसू दाबायचा प्रयत्न करत होते ते आठवलं. ;)

In reply to by साती

ह्या रुक्ष विषयात तेव्हढाच विरंगुळा....

In reply to by साती

=)) =)) =))

सुखवस्तु गरिबांनी सुखवस्तु गरिबांसाठी काढलेला धागा. विशिष्ट गरजेसाठी केलेली दूरगामी गुंतवणूक आणि पैशासाठी पैसा कमावण्यासाठी केलेल्या उलाढाली यात फरक आहे इतकी अर्थसाक्षरता असणे सामान्य माणसाला पुरेशी आणि आवश्यक आहे असे वाटते. असो.

In reply to by नगरीनिरंजन

तुमच्याशी सहमत आणि एकमत हि आहे. कारण गुंतवणूक हि मुळातच वय आणि उद्दिष्टे लक्षात घेऊन केली जाते. पण जर संततीचे शिक्षण, लग्न आणि आपली निवृत्ती हि आपल्या आयुष्याची उद्दिष्टे जर असतील तर. माझ्या सर्व लेखात मी गुंतवणूक आणि ट्रेड ह्याची योग्य सांगड घालता आली पाहिजे असे म्हंटले आहे आणि टीप पासून हि लांब राहा सांगत आलोय तरी हि......??? उलाढाल करणे गैरच आहे का ? आणि सामान्य माणूस कोण ? एखादा शेतकरी जेव्हा शेतात काही पिकवतो तेव्हा तो जुगार खेळतो का? तो सामान्य माणूस नसतो ?त्याला भीती नसते का की पिक नाही आले तर हि ? तो नसती उलाढाल करत असतो का ? तो हि अनेक घटकांवर अवलंबुनच असतो, प्रयोगशील असतो तेव्हा तो सामान्य माणूस नसतो ? रेकॉर्डतोड उत्पन्न घेणारे अशिक्षित शेतकरी वाचले पहिले आहेत आणि आत्महत्या केलेले हि वाचनात आहेत म्हणून ते "सामान्य शेतकरी " जगणे सोडत नाहीत कि स्वतःच्या जमिनीला, ना येणाऱ्या पावसाला किंवा कुठल्याच घटकांना दोष देत बसत नाहीत ते संघर्ष करतात उमेदीने कारण ते सामान्यच असतात ना. ज्या दगडावर काही पिकवणे शक्य नाही तिथे टायर्समध्ये माती भरून शेती केलेली माणसे आहेत. ती सगळी "नशिबाने" यशस्वी झाली असे म्हणणे माझ्याच्याने कधीच होणार नाही कारण त्यांची मेहनत आणि अडचणीवर मात करण्याची जिद्द ह्याला सलाम आहे माझा. जो अशिक्षित (आणि सुशिक्षित हि ) शेतकरी आहे तो माझा कायम आदर्श राहिला आहे. ते शेतकरी जे करतात तेही सामान्यच आहेत. सोन्याचा ट्रेड जो मी सांगितला त्यावर तो कसा फक्त चालणार्या मार्केट मध्येच योग्य आहे हे सांगण्यात आले ते मला पसंत नाही. आणि सोने गहाण ठेऊन पैसे देणारी बँक नियमबाह्य काम करतेय किंवा एकूणच मी जे सांगतो ते काहीतरी जुगारी तत्वाने भरलेले आहे खूप कठीण आहे असे दाखवले गेले. ते वेदनादायी होते. सोने हा विषय होता मी माझी पद्धत मांडली बस इतकेच होते ते. कुठलाहि डॉक्टर जेव्हा अत्यंत क्रिटीकल केस वाचवतो (सामन्यतः भाजलेल्या पेशंटला एक उदाहरण म्हणून तशा बाळंतपणाच्या सुद्धा )तेव्हा तो त्या पेशंटच्या जीवावर satta खेळतो कि त्या डॉक्टरचे कौशल्यहि असते? आणि तो डॉक्टर सामान्य म्हणायचा कि असामान्य ? थोडक्यात ज्या क्षेत्रात जो माणूस असतो त्याबद्दल तो लिहितो बोलतो त्या क्षेत्राची भलामण तो करतो आणि त्या क्षेत्राबद्दल अनंभिज्ञ असणारे "सामान्य माणूस" ह्या टर्म मध्ये येत असतील तर त्यांनी "आपलेच खरे" असे सांगण्याचा असामान्य प्रयत्न करावा का ? मी कधी ज्या प्रांताची माहिती नाही तिथे इतके छाती ठोक कुणाला आज तागयात बोललेलो नाही आणि पुढे हि ते घडणार नाही. आणि म्हणूनच मी वेगळे दालन काढा असे म्हणतोय जेणे करून चार जाणकारच तिथे फिरकतील.

In reply to by ज्ञानव

>> माझ्या सर्व लेखात मी गुंतवणूक आणि ट्रेड ह्याची योग्य सांगड घालता आली पाहिजे असे म्हंटले आहे. तुमचे लेख वाचले. बहुतेक ठिकाणी ट्रेडबद्दल आणि ट्रेडिंग कसे करावे याचीच माहिती दिसतेय. गुंतवणूकीबद्दल कधी लिहिणार आहात? >>सोन्याचा ट्रेड जो मी सांगितला त्यावर तो कसा फक्त चालणार्या मार्केट मध्येच योग्य आहे हे सांगण्यात आले ते मला पसंत नाही. >>सोने हा विषय होता मी माझी पद्धत मांडली बस इतकेच होते ते. leverage किती घातक ठरू शकतो, हे मी वर उदाहरण देऊन स्पष्ट केले आहे आणि ते तुम्हालाही मान्य आहे. सोने गहाण ठेऊन अजून सोन्यावर पैसे लावायची तुमची सिस्टीम तुमच्या स्वतःच्या अनुभवात, आत्तापर्यंत यशस्वी झाली, ती चढत्या मार्केटमध्ये सफल झाली म्हणून कायमच होईल असे नाही आणि विशेषतः नवख्या आणि अननुभवी लोकांसाठी तर अतिशय घातक आहे इतकेच सांगायचे आहे. (नाण्याची दुसरी बाजू समजा). >>कुठलाहि डॉक्टर जेव्हा अत्यंत क्रिटीकल केस वाचवतो... डॉक्टर (किंवा दुसरा कोणी प्रोफेशनल म्हणा) यांनी शिक्षण घेऊन, परीक्षा देऊन त्यांचे ज्ञान सिद्ध केलेले असते. केवळ इंटरनेटवर अभ्यास करून किंवा अनुभव आहे म्हणून कोणी स्वतःला डॉक्टर किंवा सी.ए. म्हणवून घेत नाही. (मी डॉक्टर किंवा सी.ए. नाही, गैरसमज नसावा, पण त्यांच्या ज्ञानाबद्दल मला आदर जरूर आहे.) तसेच तुम्ही आर्थिक सल्लागार म्हणून सल्ला देता, तेव्हा तुम्ही CFP वगैरे क्वालिफिकेशन मिळवली असतील, असा अंदाज आहे. एखादा प्रोफेशनल सल्ला देतो, तेव्हा "मी त्या जागी असतो तर मी स्वतः काय केले असते" असा विचार करून त्याने सल्ला देणे, इतपत अपेक्षा असते. आणि तो सल्ला मला पटतो की नाही, हा विचार मला करता आला पाहिजे. बाकी काही नाही. त्याच्यासाठी इतरांवर घसरण्याची गरज नाही.

In reply to by उपाशी बोका

आणि मी कुणावर घसरत नाहीये. मी कुठल्याच प्रश्नाचे उत्तर लपवले नाही अगदी मी ब्रोकर आहे हि हि . शिक्षण जेमतेम बी कॉमच आहे. कुठलेही सी एफ पी वगैरे प्रोफेशनल सर्टिफिकेट नाही. गुंतवणूक विषयक पुरेपूर १० लेखांची सिरीज लिहितो आहे ती प्रकाशित करायला १० १५ दिवस लागतील सोन्याचे ट्रेडबद्दलची माहिती मी माहिती म्हणूनच दिली होती मी कुणालाही माझे सल्ले ग्राह्य माना असे सांगत नाहीह्ये किंवा मी कुणालाही मी किती हुशार आहे हे सांगत नाहीये. बाकी लीवार्जेचे म्हणाल तर ती दुधारी तलवार आहे हे मी पुरेपूर जाणतो आणि त्याचा उपयोग हि जाणतो.पण ते करणारा मी ह्या जगात एकमेव यशस्वी ट्रेडर असा दावाहि केला नाही तसेच जे मी करतो ते कुणालाच जमणार नाही हा भ्रमही बाळगला नाही. मी ह्या गैर समजात नक्कीच होतो कि मिसळपाववर जे लेखन येते ते माहिती म्हणून आहे हे समजण्याची कुवत सगळ्यांमध्ये आहे. आणि त्या माहितीचे विश्लेषण करून किंवा त्या माहितीबद्दल अधिका अधिक जाणून घेऊन ती माहिती योग्य कि अयोग्य हे ठरवल्या नन्तर निष्कर्ष काढण्या इतकी प्रगल्भता इथे असेल पण तसे न होता मी दिशाभूल केली हे सांगितले गेले मी विचारलेल्या प्रश्नानापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले गेले नाही. तुमचे प्रतिसादच फक्त विषयाची माहिती घेण्याच्या उद्देशाने होते किंवा तुम्ही त्यात थोडे तरी जाणकार आहात असे माझे मत झाले. कुणाला दुखावणे हा हेतूच नव्हता तो माझा पिंड नाहीच. पण सोने ह्या विषयावर कुणीतरी धागा काढला आहे आणि मी त्यातल्या ट्रेड ह्या विषयाचे एक लेखन केले जे मूळ धाग्याला लागुनच होते. पण त्यावर पी पी एफ,आयकर आणि हाइट म्हणजे पैसे ट्रान्स्फर करायला किमान दोन खाती लागतात हे मला शिकवण्याचा प्रयत्न हास्यास्पद होता.' जगात दोनच माणसे असतात एक चांगला आणि एक वाईट. मी सतत आपण कुठल्या प्रकारात बसतो ते जाणून त्याचे भान ठेऊन वागत असतो. आणि माझ्या त्याच तत्वाने मी सी ए..ज्यांच्यात माझी रोजची उठबस आहे त्यात हि चांगले आणि वाईट दोन्ही सी ए आहेत. त्यांचे लोकांना दिलेले गेलेले सल्ले आणि त्यांचे frauds पाहत आलोय (ह्या सर्तीफिकेट धारकांनी स्वतःच्या सख्या भावालाही कधी सोडले नाही)जर मी ह्या सरटीफिकेट धारक लोकांचे भारतात संगणक येण्यापूर्वीचे frauds आणि नंतरचे frauds ह्याबद्दल लिहिले तर ते फारच रंजक होईल पण गुन्हा पाहणे लिहिणे,वाचणे रंगवून सांगणे म्हणजे गुन्ह्याला प्रोत्साहन देणेच आहे असे मला ठामपणे वाटते. माझ्या भावना आपल्या पर्यत पोहोचल्या असतील असे वाटते. कदाचित misalpav वर पूर्वी काही घटना घडून गेली आहे जी मला माहित नाही त्याचा परिणाम म्हणून माझ्याकडे पाहण्याचा सगळ्यांचा दृष्टीकोन कदाचित नकारात्मक असावा. असो.

मिपावर आल्यापासुन किमान 10 धाग्यावर मी शतकी प्रतिसाद दिलाय . बाकी लगे रहो .

फार कन्फ्युजन आहे.. मला एक साधी गोष्ट कोणी सांगेल का? १. मी दर वर्षी माझ्या व बायकोच्या नावे १-१ लाख पीपीएफ मधे भरतो. माझे ८०सी आधीच ओव्हर्फ्लो असल्याने (पॉलिसी, एम्प्लोयी पिएफ वगैरे) मला त्याच्या टॅक्स बेनेफिट काहीच नाही. आता ज्यावेळी मला माझे पैसे परत मिळतील (१५+५+५ वर्षांनी) त्यावेळी टीडीएस कापला जाईल का? की मला ते पैसे इन्कम म्हणून दाखवावे लागतील? की मला ते पैसे एक रकमी टॅक्स न भरता मिळतील? २. मुलाच्या/मुलीच्या नावाने १ लाखाचे पीपीएफ भरावे का? की मी पीपीएफ वर जास्तच भरवसा ठेवतो आहे आणि ते पैसे म्युच्युअल फंड मधे वगैरे गुंतवावे?

In reply to by काळा पहाड

तुम्हाला जेंव्हा कधी पैसे परत मिळतील (१५+५+५ वर्षांनी) त्यावेळी (जर आजचेच नियम लागु असतील तर) टीडीएस कापला जाणार नाही, ते पैसे एक रकमी टॅक्स न भरता मिळतील. पीपीएफ मध्ये शिल्लक रकमेवर प्रतिवर्षी व्याज मिळते, आणि व्याज म्ह्टले की ते सहाजिकच उत्त्पन्न म्हणुन धरले जाते. आपण असे दरवर्षी मिळालेले व्याज खरे तर त्या त्या वर्षीच्या रिटर्न मध्ये दाखवावयास हवे परंतु हे व्याज करमुक्त असल्याने आणि ते उन्पन्नत मिळविल्याने कोणताही करभार वाढत नसल्याने आयकर अधिकारी सुद्धा त्या बाबत आग्रह धरीत नाहीत. मात्र असे व्याज दाखविण्याचा कोणाताही तोटा नसलेने आपले रिटर्न अधिक बाळसेदार होण्याच्या द्रुष्टीने ( कर्जे वगैरे मिळण्यासाठी) असल्यास ते पैसे इन्कम म्हणून जरुर दाखवावे. ते पैसे एक रकमी टॅक्स न भरता मिळतील? मुलाच्या/मुलीच्याच काय पण करसवलत मिळत नसल्यास आपणही पीपीएफ वरील भर कमी करावा आणि ते पैसे म्युच्युअल फंड मधे वगैरे गुंतवावे. अधिक माहिती हवी असल्यास व्य.नि करावा.

In reply to by काळा पहाड

मुलाच्या/मुलीच्याच काय पण करसवलत मिळत नसल्यास आपणही पीपीएफ वरील भर कमी करावा आणि ते पैसे म्युच्युअल फंड मधे वगैरे गुंतवावे.
जरी हे बरोबर वाटत असले तरी १)म्युच्युअल फंड्स हे शेअर मार्केटशी संबधित असल्याने रिस्कसुद्धा शेअर्सबरोबरच निगडीत असते... २)म्युच्युअल फंड्सचे परतावे आणि पी पी एफ चे परतावे आणि मुख्य म्हणजे दोन्ही गुंतवणुकीची उद्दिष्टे... ३)आणि गुंतवणूक किंवा पी पी एफ चे उद्दिष्ट फक्त आणि फक्त कर वाचवणे आहे का ? ह्या वरील ३ गोष्टींचा विचार आपण करावा तसेच जर पी पी एफ ८% वार्षिक परतावा देतय पण करसवलत मिळत नाहीये अथवा मिळते आहे तर त्याची तुलना तशीच एखादी गुंतवणूक योजना बाजारात आहे का असल्यास त्या गुंतवणुकीबरोबर करावी.
मुलाच्या/मुलीच्या नावाने १ लाखाचे पीपीएफ भरावे का? की मी पीपीएफ वर जास्तच भरवसा ठेवतो आहे आणि ते पैसे म्युच्युअल फंड मधे वगैरे गुंतवावे?
तुम्हाला स्वतःला गुंतवणुकीबाबत शंका असेल अथवा अजीबातच माहिती नसेल तर पी पी एफलाच टाकावे. माहिती नसेल तर ती तुम्ही ब्रोकर वर अवलंबून राहाल जे घातकी ठरू शकते.

SECTIONS 80C TO 80U SPECIFIES THE DEDUCTIONS TO BE MADE FROM THE GROSS TOTAL INCOME. GROSS TOTAL INCOME MEANS THE TOTAL INCOME, UNDER ALL HEADS OF INCOME, COMPUTED IN ACCORDANCE WITH THE PROVISION OF THE ACT [SECTION 80B(5)]. इथे वर मांडलेल्या सेक्शन नुसार जे उत्पन्न UNDER ALL HEADS OF INCOME, COMPUTED म्हणून डिफाईन केले आहे ते कोणत्या वर्षाचे? GROSS TOTAL INCOME कोणत्या वर्षाचे असते त्याच वर्षाचे असते ना? अह्सी शंका उपस्थित करन्यात आली होती. त्यावर माझा खुलासा असा- शब्दाचा अथवा कायद्याचा कीसच काढावयाचा झाला तर " --- total income computed in accordance with the provisions of this Act, before making any deduction under this Chapter ---" ही वाक्य रचना फक्त याच वर्षासाठी आहे असे कशावरुन ?? व्याकरण वा काळांचा अभ्यास केलेली कोणीही व्यक्ती हे वाक्य वर्तमानाईतकेच भुतकाळालाही लागु पडते हे सहज सांगु शकेल. याचाच अर्थ स्पष्ट आहे, गेल्या वर्षी विवरण पत्रकांत दाखविलेल्या उत्पन्नातुनही ( जे आता या वर्षी करीता त्या करदात्याची संपत्ती, wealth म्हणुन गणली जाईल) करदाता अशी गुंतवणुक करु शकतो. खरे तर खरे म्हणजे अशा प्रकारची तरतुद करण्याचा उद्देश हा करदात्यांस सक्तीची बचत करावयास लावणे आणि त्याच वेळी बेनामी व्यवहार टाळणे एवढाच आहे. आणि सदरची गुंतवणुक ही करदात्याच्याच खात्यातुन व्हावी एवढीच अपेक्षा आहे, खात्याकडुन केल्या vividh गेलेल्या निर्धारणांत( assessment) वा दिल्या गेलेल्या निर्णयांतुन ही बाब पुरेशी स्पेष्ट आहे.. समजा एखाद्या करदात्याचे वार्षिक उत्पन्न 3,50,000 आहे, त्याचे पुस्तकांत दिसणारे वार्षिक खर्च रु. ,2,80,000, आहेत आणि त्याने बॅकेकडुन र. 1,50,000 एवढी उचल वा कर्ज घेतले आहे, अशा परिस्थित्तीत तो या कलमाखाली रु.1,00,000 ची गुंतवणुक केल्यास, वर व्यक्त अर्थाप्रमाणे ती रु 70,000 पर्यंतच ग्राह्य मानुन उर्वरित रु 30,000 करदात्याच्या उन्पनातुन आलेली नाही या अर्थी नाकारली जाईल काय ?? --- याचे उत्तर नाही असे आहे. गुंतवणुक ग्राह्य मानली हाईल. एका करदात्याने तर मार्च महिन्यात आपल्या केडिट कार्डाने इन्शुरन्स चा हप्ता भरला आणि कार्ड कंपनीने तो पुढील आर्थिक वर्षांत (म्हणजे अप्रिल मधे) करदात्याकदुन वसुल केला. अशी गुंतवणुक ही खात्याने नव्हे तर ट्रिब्युनलने मान्य केली आहे. बाकी येथे काथ्याकुट करताना काही विद्वानांना अशा विमा वा पीपीफ गुंतवणुकी, पुन्हा एकदा, त्या करदात्याच्याच खात्यातुन केल्या आहेत हे सिद्ध करण्याची जबाब्दारी करदात्यावर असलेने) रोखीने भरु नयेत याचे भान दिसत नाही हा भाग अलहिदा. असो. माझे अनेक अशील अनेक वर्षे अनेकदा या प्रकारचे व्यवहार करीत असलेने मला त्याच्या वैधतेविषयी थोडीही शंका नाही मात्र माझ्याकडे या व्यतिरिक्त अधिक काही सांगण्यासारखे नसल्याने, मी स्वतःला कोणत्याच विषयातला 'माहिर' समजत नसल्याने आणि मुद्द्यांची सरमिसळ, तथ्थ्यांचे गौडबंगाल, वा शब्द्बबंबाळ अतार्किक पोस्ट्स करणे अथवा 'चुकीचे अर्धवट सल्ले' देणारे लिखाण करणे अशी कोणतीही आयुधे मला वापरता येत नसल्याने या, आयकर ककम 80C बाबतची,चर्चा माझ्ह्यापुरती थांबवतो.

मुळ मुद्दा सोने खरेदी हा होता पण नंतर तो पी पी एफ मधून पैसे काढून परत पी पी एफ ला भरले तर आयकर खात्याला चालते का ? इथे कुणीतरी नेला आणि तिथून तो आयकर ह्या क्षेत्रात गेला....... मी मागे मागे मुर्खासारखा फिरत राहिलो आणि मीच हि चर्चा शब्दबंबाळ अतार्किक आणि शब्दांचे डोंगर उभी करून दिशाहीन केली हे आरोप हि पहिले "आता आपणच बँकेकडून कर्ज हा नवीन मुद्दा उपस्थित केला आहे" जो वरील प्रतिसादात आणि मुळ धाग्यात कुठेही आलेला नाही. ८० सी च्या अनुषंगाने तसेच कर्ज काढून भरलेल्या विम्याच्या हप्त्याआड आपण जे काही खुलासा म्हणून वर मांडले आहे. त्यावर मी पुन्हा "मुद्द्याची सरमिसळ" "शद्बबंबाळ" "अतार्किक" आणि "तथ्याचे गौडबंगाल" ह्याच्या आधारे बराच मोठा खुलासा लिहू शकतो जे मी न करणे हेच आता "शहाणपणाचे" होईल. बाकी आपण सी ए आहात का ? ह्या साध्या शब्दात आणि तर्कशुद्ध भाषेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले असते तर आवडले असते. बाकी माहीर तर मी आहेच.
*** करसवलत मिळविण्यासाठी करावयाची गुंतवणुक करदात्याने त्याच्या करपात्र उत्पन्नंतुन करावी एवढीच आयकर खात्याची अपेक्षा आहे.
हे वाक्य माझे नाही. दिनांक २६/१२/२०१३ रोजी 17.३६ चे पोस्ट मधील आपलेच वाक्य आहे. असो....समाप्त.

In reply to by ज्ञानव

बाकी आपण सी ए आहात का ? ह्या साध्या शब्दात आणि तर्कशुद्ध भाषेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले असते तर आवडले असते. तुम्ही उगीचच फार काथ्याकूट करताय, असं माझं मत झालंय. तुमच्या या अट्टाहासाखातर मी माझ्या सी.ए. मित्राशी बोललो. तो म्हणाला, पीपीएफ गुंतवणुकीवर टॅक्स वाचतो, withdrawals आणि व्याज हे टॅक्स-फ्री असतात. जर किमान १ लाख वार्षिक उत्पन्न असेल, तर तुम्ही किमान ५०० आणि कमाल १ लाखपर्यंत पीपीएफमध्ये भरू शकता (तुम्ही withdrawal घेतले किंवा नाही घेतले तरी). आता तुमचे समाधान झाले का? नसेल झाले, तर "तुमच्या" सी.ए.बरोबर बोला. बाकी माहीर तर मी आहेच. या बाबतीत मी सहमत नाही, असं खेदाने म्हणावे लागेल. तुम्ही स्वतः सी.ए. नाही, CFP पण नाही, तरी आर्थिक सल्लागाराचे काम करताय, म्हणजे आश्चर्यच आहे. तुमचे क्लायंट तुमच्यावर विश्वास ठेवत असतील, पण मी ठेवणार नाही, हे मात्र नक्की. कोणावरही आंधळा विश्वास ठेऊ नये, असे माझे स्पष्ट मत आहे.

In reply to by उपाशी बोका

माझ्या अशीलाना माझा हाच सल्ला असतो. "कुणावरही" आंधळा विश्वास ठेऊ नये. (ह्यात कुणावरही हा शब्द फार महत्वाचा वाटतो मला ) सल्लागाराचे काम आम्ही गेली (१९९६-२०१३ )इतकी वर्षे करतो आहे. सरकार तर्फे केसेस दिल्या जातात (कुठलीही गैरव्यवस्था, लाच लुचपत काहीही न करता)आम्ही त्याला आमच्या "शब्दबंबाळ" प्रतिसादाने प्लीड करतो. नवख्या सीएचे सुद्धा प्रसंगी आभार आणि कौतुक चार चौघात मी केलेलं आहे आणि काही दिग्गज सी ए चुकत असताना त्यांनासुद्धा त्यांच्या वयाचा, अनुभवाचा शिक्षणाचा मान देऊन चूक दाखवली आहे. वाईट इतकेच वाटते कि कायदा हा कीस काढून समजून घ्यावाच लागतो नुसते व्याकरण चेक करून चालत नाही. पी पी एफ गुंतवणुकीवर कर वाचतो.......बरोबर withdrawals आणि व्याज हे टॅक्स-फ्री असतात.....पूर्ण बरोबर किमान ५०० आणि कमाल १ लाखपर्यंत पीपीएफमध्ये.....हे हि बरोबर. पण तुम्ही जर सगळा पोस्ट आणि प्रतिसाद वाचलेत तर मुद्दा वेगळा आहे साहेब. असो शब्द बंबाळ होतंय हळूहळू ...तेव्हा समाप्त. अवांतर : इथे कुणी माझ्यावर विश्वास (आंधळा का होईना )ठेवू नये आणि योग्य मार्गदर्शनपर माहितीपूर्ण लेख इथे अन्य सर्वांकडूनहि यावेत, त्यावर चर्चा व्हाव्यात आणि माझ्याच ज्ञानात भर पडावी ह्यासाठीच वेगळ्या दालनाचा माझा प्रयत्न चालू होता पण आता तो हि मी सोडून देतोय.

ज्ञानवजी सेक्शन ८०सी ची वजावट मिळवण्यासाठी करावी लागणारी गुंतवणूक ही करपात्र उत्पन्नातूनच करावी लागते असं कुठे लिहिलं आहे? सेक्शन ८०सी(१) the whole of the amount paid or deposited in the previous year असं म्हणतो. पेड ऑर डिपॉझिटेड ची रक्कम शेतीचं (किंवा अन्य सेक्शन १०) उत्पन्नही असू शकतं, जे एरवी "ग्रॉस टोटल इन्कम" मध्ये धरलं नाही, तरी "इन्कम" असतंच.

In reply to by आदूबाळ

आपण सी ए चा अभ्यास करताय असे माझ्याच लाभांश ह्या धाग्यावर "dividnd striping" असा जो प्रतिसाद आपण दिला होतात त्या प्रतिसादाखाली वाचनात आले. वर आपण जे म्हणताय त्याबाबत आपण प्रत्यक्ष भेटून बोलू या का? कारण आयकर कायदा हा एक धर्मग्रंथ आहे. तुम्ही जे वर म्हणताय त्याचे खुलासे मी देत बसलो तर पुन्हा माझ्यावरच "शब्दबंबाळ" लेखन हा आरोप होईल. तरीही एव्हढेच लिहितो कि... १)
कारण कर बचती साठीची गुंतवणूक हि त्या वर्षाच्या इन्कम मधूनच व्हायला हवी असा नियम आहे.
Thu, 26/12/2013 - 14:38 हे माझे वाक्य आहे. २)
सेक्शन ८०सी ची वजावट मिळवण्यासाठी करावी लागणारी गुंतवणूक ही करपात्र उत्पन्नातूनच करावी लागते असं कुठे लिहिलं आहे?
हे वाक्य माझे नाही. ३)इन्कम आणि taxable इन्कम ह्यामधील फरक आपणही जाणताच. बाकी मी ह्यावर जास्त काही लिहू इच्छित नाही. पण जर प्रत्यक्ष भेटलात तर तुमचे उदाहरणासहीत शंका निरसन करीन. ज्यांना पी पी एफ मधील withdrawal पुन्हा पी पी एफ मध्येच केले आता मला tax बेनिफिट द्या असे विवरण पत्रात दाखवायचे आहे त्यांनी तसेच करावे (पण मिन्ग्लीग ऑफ फंड्स न करता छातीठोकपणे....) हा सल्ला मी आयुष्यात देणार नाही कारण ते disallow होऊन माझ्या अशिलाचे नुकसान होईल.

.


In reply to by ज्ञानव

सेक्शन ८०सी ची वजावट मिळवण्यासाठी करावी लागणारी गुंतवणूक ही करपात्र उत्पन्नातूनच करावी लागते
हे माझे वाक्य नाही.

MCX वरील सोन्याचा भाव आज रोजी २७०४५/- याचा अर्थ एका वर्षापूर्वी ३२०००/- ने सोने घेणारे एका वर्षात (फक्त) ५०००/-ला झोपले!

१) सामान्य माणसाने , वा सामान्य मराठी माणसाने , चढ उतार होणार्‍या , बेभरवशाच्या , सोन्याच्या गुंतवणुकीपेक्षा , पी पी एफ मध्येच पैसे टाकीत रहावे २) सध्याच्या नियमानुसार पी पी एफ मध्ये दर वर्षी रुपये १,५०,०००/- पर्यंत गुंतवता येतात. ३) बघता बघता १५ वर्षे कशी बचत होते हे कळत नाही. लोक २५/ २५ वा ३० /३० वर्षांची विमा पॉलिसी सहज काढतात, त्यावेळी एव्हढ्या दीर्घ मुदतीचा विचार कोणी करतात काय ? ( म्हणजे मुदत पुर्ण झाल्यावर किती पैसे मिळतील ? त्यावेळी रुपयाची किंमत किती घसरली असेल ? इ इ ) ४) १५ वर्षानंतर , तुमचे पी पी एफ चे खाते पुढे दर पाच पाच वर्षे दोन प्रकारे वाढवू शकता. एक म्हणजे दरवर्षी गुंतवणुकीसह किंवा गुंतवणूक विरहीत. पाच पाच वर्षे, गरज नसेल तर वाढवीत रहाणे अधिक चांगले. ५) पी पी एफ खात्यात दर महिन्याच्या १ ते ५ तारखेच्या आत पैसे भरले तर त्या त्या महिन्याचे सुद्धा व्याज , खात्यावर जमा होते. ५ तारखेनंतर मात्र पैसे भरल्यास, त्या महिन्याचे व्याज मिळत नाही.१ ते ५ तारखेपर्यंत रोख पैसे भरावयाचे नसल्यास, चेकने पैसे भरता येतात. त्यासाठी चेक ५ तारखेपर्यंत क्लिअर व्हावयास हवा. मी त्यासाठी महिन्याच्या शेवटच्या किंवा दोन दिवस अगोदरचा चेक देतो. पैसे आरामात ५ तारखेच्या आत जमा होतात. कारण पाच तारखेनंतर , अन्य बचत खात्यातून पैसे काढलयास , बचत खात्यामधील , काढलेल्या पैशांचे व्याज तर मिळत नाही, शिवाय , पी पी एफ मध्ये सुद्धा व्याज मिळत नाही. दोन्हीकडून व्याजाचे नुकसान कां करून घ्यावे ? ६) पी पी एफ खात्यातुन , उचल मिळणे फारसे अवघड नाही. एक तारखेस अर्ज केला, तर जास्तीत जास्त दुसर्‍या दिवशी पैसे हातात मिळतात. तेच रोख पैसे , पाच तारखेच्या आत ,पी पी एफ मध्ये भरल्यास, गुंतवणुक सुद्धा दाखविता येते. यात गैर काहीच नाही. जगात , किमान भारतात , असा कोणीही नाही, जो प्रत्येक कायदा पाळतो. साधे रहदारीचे नियम घ्या. सिग्नलला पोलिस असला , तर आम्ही नियम पाळतो. आणि पोलिस नसला तर , सिग्नल हिरवा होण्याची वाट थोडीच बघत बसतो ! ! हाण तिच्यायला ! ! ६) शेवटी सर्वात महत्वाचे, लोकांना बचतीची संवय लागली पाहिजे आणि सरकारला सुद्धा विकासासाठी पैसा हवा असतो.

In reply to by जयन्त बा शिम्पि

६) शेवटी सर्वात महत्वाचे, लोकांना बचतीची संवय लागली पाहिजे आणि सरकारला सुद्धा विकासासाठी पैसा हवा असतो.
मग १.५ लाख लिमिट का ठेवली? जर ती नसती ठेवली तर लोकांनी गुंतवले असते व सरकारला विकासासाठी अधिक निधी उपलब्ध झाला असता.

In reply to by पगला गजोधर

मग सरकार नेहमी कर्जबाजारीच का असते? बाहेरुन पैसा घेण्यापेक्षा लोकांकडूनच घ्यावा ना!

In reply to by प्रकाश घाटपांडे

दोन चार टक्क्यांनी कोण सरकारला पैसे देईल ते सुद्धा १०-१५ वर्षे मुदतीचे. खालील प्रतिसाद पहा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

सरकारला जागतिक बँकेकडून किंवा जपान कडून एक ते दोन टक्क्यांनी कर्ज उपलब्ध असेल तर सरकार ३९% (पर्यंत) (९ टक्के व्याज आणि ३०% कर वजावट) दराने पैसे कशाला घेईल. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही सरकारने सामान्य माणसांसाठी उपलब्ध करून दिलेली सुविधा आहे त्यामुळे त्याच्यावर बंधन( लिमिट) आहे.

In reply to by सुबोध खरे

सरकार ३९% (पर्यंत) (९ टक्के व्याज आणि ३०% कर वजावट) दराने??? डॉ. साहेब, अतर्क्य आकडेमोड..

In reply to by प्रसाद भागवत

साहेब जेंव्हा तुम्ही १०,०००/- भविष्य निर्वाह निधीत ठेवता तेंव्हा त्याच्या वर आपल्याला ३०००/- आय कर ( ३०% दर वाल्यांना म्हणून कंसात "पर्यंत"आहे) वजावट ताबडतोब मिळते. म्हणजेच सरकारला मिळणारे ३००० रुपये कमी होतात (आणि वर ९ % व्याज आपल्याला द्यायला लागते.) म्हणजे पहिल्या वर्षात सरकारला सात हजार मिळतात आणि वर्ष अखेरीस ९०० रुपये व्याज द्यायला लागते. म्हणजे सरकारच्या खात्यात ६१००/- रुपये वर्षा अखेरीस जमा होतात वापरासाठी. परंतु त्याचे नक्त मुल्य( सरकारला आपल्याला देणे) मात्र १०,०००/- आहे.

In reply to by सुबोध खरे

असहमत....सरकार देत असलेली कर सवल एकदाच मिळते मात्र पैसे पुढील १५ वर्षे वापरायला मिळतात. या न्यायाने ही करसवलत या पुर्ण कालावधीकरिता विभागुन घ्यावयास हवी. करसवलत हे अल्प व्याजाने दीर्घकालीन रक्क्कम मिळविण्यासाठीचे गाजर आहे. मला या सवलतीची तुलना हुषार व्यापारी देत असलेल्या भरघोस 'डिस्काउंट' शी करावीशी वाटते...अर्थात PPF मध्ये मुदर्पुर्व पैसे काढता येतात ही बेसिक माहिती मलाही आहेच,. या पोस्टचा हेतु ३०% सवलतीचा फायदा पहिल्याच वर्शीच्या परताव्यात दाखविण्याच्या तर्क चुकीचा आहे हे सांगणे हा आहे

In reply to by सुबोध खरे

असहमत....सरकार देत असलेली कर सवल एकदाच मिळते मात्र पैसे पुढील १५ वर्षे वापरायला मिळतात. या न्यायाने ही करसवलत या पुर्ण कालावधीकरिता विभागुन घ्यावयास हवी. करसवलत हे अल्प व्याजाने दीर्घकालीन रक्क्कम मिळविण्यासाठीचे गाजर आहे. मला या सवलतीची तुलना हुषार व्यापारी देत असलेल्या भरघोस 'डिस्काउंट' शी करावीशी वाटते...अर्थात PPF मध्ये मुदर्पुर्व पैसे काढता येतात ही बेसिक माहिती मलाही आहेच,. या पोस्टचा हेतु ३०% सवलतीचा फायदा पहिल्याच वर्शीच्या परताव्यात दाखविण्याच्या तर्क चुकीचा आहे हे सांगणे हा आहे

In reply to by प्रसाद भागवत

करसवलत हे अल्प व्याजाने दीर्घकालीन रक्क्कम मिळविण्यासाठीचे गाजर आहे असहमत-- तसे असेल तर ६ आणि ७ टक्क्याने भांडवली नफ्याचे कर्जरोखे किंवा ८% चे सरकारी कर्ज रोखे सरकार कशाला काढेल? या वरील व्याज करमुक्त नसताना हि त्यात भरपूर गुंतणूक होते. मी परत हेच म्हणेन कि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हि भारत सरकारने सर्व सामान्य लोकांना दिलेली सुविधा आहे आणि तिचा लाभ लोकांनी जरूर घ्यावा.

In reply to by सुबोध खरे

असहमत....सरकार देत असलेली कर सवल एकदाच मिळते मात्र पैसे पुढील १५ वर्षे वापरायला मिळतात. या न्यायाने ही करसवलत या पुर्ण कालावधीकरिता विभागुन घ्यावयास हवी. करसवलत हे अल्प व्याजाने दीर्घकालीन रक्क्कम मिळविण्यासाठीचे गाजर आहे. मला या सवलतीची तुलना हुषार व्यापारी देत असलेल्या भरघोस 'डिस्काउंट' शी करावीशी वाटते...अर्थात PPF मध्ये मुदर्पुर्व पैसे काढता येतात ही बेसिक माहिती मलाही आहेच,. या पोस्टचा हेतु ३०% सवलतीचा फायदा पहिल्याच वर्शीच्या परताव्यात दाखविण्याच्या तर्क चुकीचा आहे हे सांगणे हा आहे

In reply to by सुबोध खरे

ओह.. पोस्ट्च्या पुनुरुक्ती बद्दल क्षमस्व. या शिवाय..... 'पहिल्या वर्षात सरकारला सात हजार मिळतात आणि वर्ष अखेरीस ९०० रुपये व्याज द्यायला लागते. म्हणजे सरकारच्या खात्यात ६१००/- रुपये वर्षा अखेरीस जमा होतात वापरासाठी...... अशा प्रकारची पैशाची Time Value विचारात न घेता केलेली विधाने आकडेवारी ओढुन ताणुन केल्याची साक्ष आहेत.

In reply to by प्रसाद भागवत

प्रसाद साहेब आपण लिहिले इतके सोपे हि ते नाही. कर्जाचा दर सरकारला पहिल्या वर्षात ३९ %च पडतो. तुम्ही तुमचे गृह कर्ज १० लाखाचे ९ टक्क्याने घ्यायचे असेल आणि त्यातील आपल्याला सातच लाख हातात पडणार असतील तर ते घ्याल का? कारण आपल्याला मिळणारी वजावट पहिल्या वर्षातच मिळते. पुढच्या वर्षात हे कर्ज आपल्याला ९% व्याज ( अधीक त्याच्या व्याजावर मिळणारा आयकर २. ७ % हाही बुडतो म्हणजे ११. २७ %). आपण जेवढे अधिक पैसे पुढच्या वर्षात भरता तेवढे परत साकारला ३९ % ने कर्ज दिल्यासारखे आहे. १०००० रुपये १० टक्के व्याजाने घेता तेंव्हा तुमच्या हातात १०००० रुपये येतात. पण १०००० रुपये घेतले म्हणून ३०% कापून मुळातच ७००० रुपयेच हातात पडतात. त्यावर १५ वर्षाचे व्याज( (९ %) १३५०० होते यावरिल पण आय कर सरकारला मिळत नाही. हा कर पण ३०% म्हणजे ४००० होतो. म्हणजे सरकारला एकूण सात हजार मिळतात आणि त्यावर व्याजासकट आणि या न मिळालेल्या करासकट एकूण रक्कम २७५०० होते. म्हणजेच सरकारने ७००० रुपये तुमच्याकडून घेतले तर ते कर्ज एकंदर २७५०० रुपयाला पडते. यात सरळ व्याज धरलेले आहे. चक्रवाढ व्याजाच्या दराने ते अजून जास्त होतील. म्हणजे हे कर्ज किती दराने पडले हे कोणी गणितज्ञ सांगू शकेल काय?

In reply to by सुबोध खरे

डॉ.साहेब, एखाद्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हा त्या गुंतवणुकीचा एकुण कालावधी व त्यात मिळणारा एकुण परतावा याचा एकत्रित आढावा घेवुन मग ठरतो. वेगगेवळ्या वर्षी परताव्याचा दर वेगवेगळा असल्यास वास्तववादी परतावा काढण्यासाठी IRR ( Internal Rate of Return) हे तंत्र वापरावे लागते. येथे आपण गुंतवणुक एकापेक्षा जास्त वर्षे करणार आहोत असे असताना फक्त पहिल्या वर्षी किती फायदा मिळेल याचा विचार करुन निर्णय घेणे तर्क्संगत नाही. शिवाय जो 30% करसवलतीचा भाग आहे...अन्य ठिकाणीही तो उपलब्ध आहेच ही. तेंव्हा 39% ही ( जरी चुकीची असली तरीही) काही असामान्य गोष्ट नव्हे.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, हे जरी खरे असले तरी परत फेड परकी चलनातच करावी लागते. आणि भारतात महागाई जास्त असल्या मुळे दर वर्षी रुपयाचे अवमुल्यन होतच असते. त्यामुळे एकुणात परतफेड करायची रक्कम रुपयात जवळपास तेव्हडीच येते. पीपीएफ ला मर्यादा आहे कारण तितके पैसे सरकारला नको आहेत. मर्यादा वाढवली आणि गरज नसली तरी सरकारला पैसे घ्यावे लागतील आणी त्यावर व्याज द्यावे लागेल.

In reply to by जयन्त बा शिम्पि

तीव्रतेने असहमत...मात्र हा मुद्दा माझ्ह्याकडुन अनेकदा स्पष्ट केला गेला असल्याने नवीन लिहिण्यासारखे काही नाही.

आणी सोन्याचा भाव उतरला तर ? गेली चार ते पाच वर्षे २००७ ते २०१२ सोन्याचा भाव चढतच गेला म्हणून ज्ञानव साहब त्या काळात यशस्वी झाले.(त्या अगोदर असे झाले नसते ही गेल्या ८८ वर्षांच्या सोन्याच्या भावावरून स्पष्ट दिसत आहे.) याच काळात जर सोने पडले असते तर दुहेरी नुकसान झाले असते. हा सट्टा आहे सर्व समान्य माणसाने खेळू नये असे मला वाटते. हा माझा २६ /१२/२०१३ तारखेचा प्रतिसाद होता. वर पहा आज जवळ जवळ २ वर्षांनी सोने वाढले तर नाहीच परंतु १५ टक्क्यांनी कमी झाले आहे. दोन वर्षात झालेल्या महागाईचा ( चलनवाढीचा) दर जरी ६% धरला तरी २०१३ साली सोने आर्थिक गुंतवणूक म्हणून ज्यांनी केली त्याचे २७ % नक्त तोटा झाला असे स्पष्ट दिसून येत आहे. जाणकारांनी स्पष्टीकरण द्यावे. भावनिक गुंतवणूक ( मुलीचे लग्न इ. साठी सोने घेतले तर त्याला आर्थिक गुंतवणूक म्हणता येणार नाही आणि ती हौस म्हणून धरली जाईल. हौसेला मोल नसते