सायबर क्राइम - काळजी घ्या
नुकतीच नासिकअपडेट वर वाचलेली बातमी
क्रुपया योग्य काळजी घ्या
http://nasikupdate.com/node/440
बातमी खालिलप्रमाणे
----------------------------------------------------------------------------------------
नाशिकमध्ये सायबर क्राईमचा शिरकाव; उद्योजकाच्या नावाने बनावट मेल; गंडा घालण्याचा प्रयत्न फसला
मी नायजेरियात आलो आहे. माझी पैशांची बॅग टॅक्सीत राहून गेली, आता भारतात परतण्यासाठी मला दोन हजार डॉलर तातडीने पाठवा.... दक्षिण आफ्रिका अथवा नाजयेरियाचे तोंडही न पाहणारे नाशिकचे उद्योजक अविनाश शिरोडे यांच्या नावाने असे त्यांच्या संबंधातील सुमारे पाचशे व्यक्तींना मेल पाठवून लाखो रुपये हडपण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सायबर क्राईममध्ये चपखल बसलेल्या या प्रकाराने शिरोडे यांना धक्का बसला असून, आपण भारतातच आणि नाशिकला आहोत, असे सांगणारे मेल आप्तेष्ट आणि मित्रपरिवाराला पाठवून त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. याप्रकरणात आता पोलिसांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंचवटीतील विजयनगर भागात राहणारे आणि घरावर उभारलेल्या पवनचक्कीद्वारे वीजनिर्मितीचा प्रयोग केल्यामुळे चर्चेत आलेल्या अविनाश शिरोडे यांनी आपल्यावर बेतलेल्या या प्रसंगाची माहिती दिली. शिरोडे यांचा जी-मेलवरील ई-मेल आयडी अडीच वर्षांपासून वापरत आहे किंबहुना होता. मंगळवारी (ता. 30 ऑक्टो.) रात्री त्यांना नाशिकचे त्यांचे मित्र अनुराग केंगे यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून कुठे आहात वगैरे चौकशी सुरू केल्यावर शिरोडे यांनी आपण नाशिकमध्येच असल्याचे सांगितले. त्यावेळी केंगे यांनी त्यांना शिरोडे यांच्याच मेल आयडीवरून डॉलरचे मागणी करणारे पत्र आल्याची माहिती दिली आणि त्या पत्राची प्रतही दुसऱ्या मेल आयडीवर दिली.
मी तुम्हाला माहिती न देता आफ्रिकेत एचआयव्ही, एड्सविषयक कार्यक्रमासाठी अचानक आफ्रिकेत आलो, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून पत्रात नायजेरियात आल्यानंतर एका टॅक्सीत पैशांची पर्स विचारल्याने अडचणीत आलो आहे. येथील हॉटेलचे बिल एक हजार डॉलरपर्यंत पोहोचले असून, हॉटेल व्यवस्थापन मला पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या तयारीत आहेत.
त्यामुळे मला तुमच्या मदतीची नितांत गरज आहे. तरी 30 मिनिटांच्या आत दोन हजार डॉलरची मदत करावी, अशी विनंती करण्यात आली असून, मनी ग्राम किंवा वेस्टर्न युनियनच्या माध्यमातून रक्कम द्यावी. मी परतल्यानंतर सदरची रक्कम परत देईन, असे शिरोडेंच्या नावाने आणि त्यांच्या ई-मेल आयडीवरून पाठवलेल्या मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. सदरचा मजकूर बघून शिरोडे यांना धक्काच बसला. त्यांनी आपल्या मेलआयडीवर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र मेल अकाऊंट हॅक झाल्याचे लक्षात आले. या प्रकारानंतर त्यांना बंगलोर, मदुराई अशा ठिकठिकाणाहून दूरध्वनी आले आणि नायजेरियाच्या प्रकाराबद्दल विचारणा करू लागले. काहींनी त्यांना रक्कम देण्याची तर काहींना राजनैतिक संबंधातून मार्ग काढण्याची तयारी दर्शवली. परंतु तो आपला मेल नव्हता, असे शिरोडे यांनी त्यांनी सांगितल्यानंतर संबंधितांना धक्का बसला. त्यानंतर शिरोडे यांनी आपल्या दुसऱ्या मेल आयडीवरून सर्व मित्रपरिवाराला तो मेल फसवा असल्याचे कळवले. अखेरीस सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. परंतु इंटरनेटच्या विशेषतः इंटरनेट बॅंकिंग करणाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन शिरोडे यांनी केले आहे.
-----------------------------------------------------------------------
वाचने
7840
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
हा दुवा पहा
मेल आय डी कसा हॅक झाला असावा?
बरेच मार्ग आहेत
अजुन कोणाला माहिती असल्यास
Enable 2 factor authentication
सायबर क्राईमला उपाय काय?
भयानक आहे हे...