Skip to main content

मोदींच्या स्तुतीची किंमत?

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 10/11/2013 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
भारतरत्न लता मंगेशकरांनी मोदींचे जाहीर कौतुक केले आणि त्यांनी पंतप्रधान व्हावे अशी सगळ्यांची इच्छा असल्याचे वक्तव्य केल्यापासून सरकारी वक्रदृष्टी त्यांच्याकडे वळली आहे की काय असे वाटते. ही बातमी पहा http://maharashtratimes.indiatimes.com/nation/VIPs-named-kin-for-Padma-… पद्म पुरस्कारासाठी लताबाईंनी उषा मंगेशकराच्या नावाकरता वशिला लावल्याचा आरोप आहे. आता ह्या पुरस्काराकरता लोक आपले वजन वापरतात हे एक उघड गुपित आहे. नाहीतर सैफ अली खान ह्याला पद्मश्री मिळण्याचे काय कारण? आणि कोणी किती वजन वापरले तरी निर्णय सरकारचाच असतो ना? अचानक लताबाईंवर असले किटाळ यावे हा योगायोग वाटत नाही.

वाचने 16603
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

परा मोड ऑन मला वाटते प्रिया दत्त यानी संजय दत्त यांची भारतरत्न साठी शिफारस करावी ! मोड ऑफ अन हे झाल्यास मूड ऑफ .

धाग्याचे विषय काय , जातो आता . मोदीमुळे आणखीन कुणा शिलीब्रिटीला त्रास होतोय का पाहतो .

नुकतेच वाचण्यात आले कि बंगाल मधील एका सदगृहस्थाला सरकारने त्याचे नाव थोडेसे बदलून पुन्ह: एकदा पद्मश्री दिली. तरी या असल्या बिरुदाना फार महत्व देण्यात अर्थ नाही. सरकारने ही बिरुदे पहिल्यांदा घोषित करताना त्यांचा उपयोग पद्मश्री अमुक अमुक किंवा अमुक अमुक पद्म्भूष्ण असा करू नये असे सांगितले होते. तरीसुद्धा सब चलता है. बाकी त्या गृहस्थांची शिफारस करणारी दोन्ही वेळची मंडळी कोण होती हे RTI ने जाणून घेणे मनोरंजक ठरेल.

लताबाईंनी उषा , सुरेश वाडकर , राजमल पारेख यांची शिफारस केली आहे . सरोजवादक उस्ताद अमजद अली खान यांनी 6 जणांची शिफारस केली आहे ज्यात त्यांचे दोन मुलांचे नाव आहे .
हि पेरलेली बातमी म्हणूनच मोदिस्तुतीचा परिणाम वाटते आहे.

In reply to by इष्टुर फाकडा

हि 1300 जणांची यादी rti अतंर्गत उघड झाली आहे . यामध्ये राजील शुक्ल , मोतीलाल व्होरा , पंडीत जसराज , अमर सिंग ,सुशील कुमार शिंदे , सलमान खुर्शिद , विजय दर्डा यांनी दोन ते 9 जणांची शिफारस केली आहे

In reply to by जेपी

माहितीचा स्त्रोत जरी RTI असला तरी बातमी पेरलेलीच आहे तशी नसती तर फक्त लता बाईंचा उल्लेख वशिलेबाज म्हणून करण्याची काय गरज होती ? अमजद अलींचा पुसट तरी उल्लेख असणे स्वाभाविक नाही का ? शिवाय मोदींच्या समर्थकांच्या बाबतीत हल्ली हा पॅटर्न झाला आहे.

In reply to by इष्टुर फाकडा

मी बातमी लोकसत्ता मध्ये वाचली , तिथे लताबाईचा उल्लेख फक्त यादी देण्यापुरता आहे . मथळा पद्मपुरस्कारातील वशीलेबाजी बद्दल आहे . सगळी कडे बातमी पेरता येत नाही .

कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांनी असा दावा केला आहे की पद्म पुरस्कार देतान मोठ्या प्रमाणात दबावतंत्राचा वापर केला जातो . त्यामुळे पुरस्कारार्थींना आर्थिक लाभ होत असतो .

संस्थाने खालसा केली, त्याप्रमाणे असले पुरस्कार देणे कायमचे बंद करावे.

मा. सम्पादक, हल्ली मिपावर एकुणच 'भि.....ट प्रतिसाद' वाढताहेत, केवळ तसे स्वातन्त्र्य आहे म्हणून त्याचा दुरुपयोगच होताना दिसतोय हे वरील काही प्रतिक्रिया (चिखलफेक) वाचुन आपल्याही लक्षात आले असेलच [ मुळ मुद्दा सोडुन चर्चा भलतीकडे भरकटवणे तेही जाणीवपूर्वक व नसलेली अक्कल फार असल्यासार्खे दाखवून टीका करणे त्यामुळे काहीन्ना 'विकृत आनन्द होतो' हे सरळ सरळ दिसते आहे. ], मला वाटते मिपाचा असा आखाडा होउ नये याची काळ्जी आपण घ्यावी. बाकी 'चेकु_८५ महाराज' तुमचा पन्ढरपुर प्यासेन्जरचा प्रवास कायम सुखाचा होवो त्याला माझ्या शुभेच्छा....... लगे रहो. विनोद१८

प्रॉब्लेम काय आहे ? शिफारस करणं हे उघड गुपीत आहे म्हणता तर घाबरायचं कशाला ? किटाळ बिटाळ काय ? काही चुकीचं केलंच नाही तर टेण्शन कायकू लेनेका ?

अचानक लताबाईंवर असले किटाळ यावे हा योगायोग वाटत नाही.
योगायोग असू शकेल असे वाटते.पद्म पुरस्कार देताना 'फिल्डिंग' लावली जातेच कारण कला क्षेत्राचा प्रॉब्लेम हा की त्यात नक्की नि़कष कोणते लावायचे ह्याला काही मर्यादा नाहीत. लोकप्रियता,शास्त्रशुद्धता,मेहनत,गुणवत्ता ह्या सर्वांची गोळाबेरीज कदाचित म्हणता येईल. हल्ली दाक्षिणात्य ख्यातनाम गायिका एस. जानकी ह्यांनी पुरस्कार नाकारला होता.उत्तर भारतिय्-विशेष करून हिंदीत करीयर करणार्‍या कलावंतांना सरकार नेहमी झुकते माप देते असे त्यांचे म्हणणे होते.त्यात तथ्यही आहे.
आणि कोणी किती वजन वापरले तरी निर्णय सरकारचाच असतो ना?
हो.कार्यकर्ते सुभाष अग्रवाल ह्यांना शिफारस करणार्‍यांची यादी मिळाल्याने काय फायदा झाला ठावूक नाही.एखाद्या कलावंताची शिफारस करणे ह्यात गैर काय ते कळले नाही.

लताबैनी मोदीची स्तुती केली , तर घाबरायचं कशाला? लताबैनी बाजपेयींची स्तुती केली , त्यानंतर ते पडले. आता जरा दम धरा, मोदीही पडतील. लताबै काँग्रेसला लई लकी आहेत. :)

In reply to by चेतनकुलकर्णी_85

तुझी अर्थ लावायची समज बघता तू अर्थ लावून नाही घेतलास तरी चालेल. रच्याकने: पुण्यातल्या शिवाजी मार्केट मध्ये 'भेजा' ३००-३५० रु. किलॉने मिळतो.

In reply to by मी-सौरभ

पुण्यातल्या शिवाजी मार्केट मध्ये 'भेजा' ३००-३५० रु. किलॉने मिळतो. प्रॉब्लेम हा आहे की लोकं तोच घेउन येतात. अर्थात काहिच नसण्यापेक्षा मेलेल्या बोकडाचा असणे वाईट नाही म्हणा.

कोणतीही कला असो..ती संगीत,चित्रकला,वादनाची ख्याती किंवा कोणत्याही खेळात तुम्ही अग्रेसर असाल तर तुम्ही समाज उपयोगी काहिच केले नाही हे म्हणणे शुध्द मुर्खपणा आहे. खरतर समाज बनतो तो सुसंक्रुत लोकांच्या सहभागा मधुन.समाजाची किंवा एकाद्या देशाची लायकी त्याच्या सैन्यबळावर जर ठरत असती तर चीन ने खेळात व इतर कलात आपली पत वाढवायचा प्रयत्न केला नसता.काही लोकांचे प्रतिसाद तर इतके गटारु आहेत कि त्यात दगड मारावासा वाटत नाही.

In reply to by वेताळ

काही लोकांचे प्रतिसाद तर इतके गटारु आहेत कि त्यात दगड मारावासा वाटत नाही. चपखल शब्द !!!

मोदींचे समर्थन करणार्‍यांचे पुरस्कार काढून घ्या. ़़काँग्रेसची मागणी. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/---/articlesh… भारतरत्न लताबाईंचे नाव घ्यायची हिंमत नाही झाली. पण मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षाने जाहीरपणे अशी निर्लज्ज मागणी केली आहे की मोदींचे समर्थन करणार्या लोकांचे पुरस्कार काढून घ्यावेत. विशिष्ट मतपेढीच्या लोकांच्या टाळ्या घेण्याकरता हे विधान केले गेले की काय? आता हे त्या चांदुरकराचे वैयक्तिक मत आहे काँग्रेसचे नाही अशी (नेहमीची यशस्वी) मखलाशी ऐकायला मिळते का ते बघू या! पण ज्याने ही मुक्ताफळे उधळली आहेत त्याला असे वाटते का की हे पुरस्कार काँग्रेसने दिले आहेत म्हणजे ते ज्यांना दिले ते आता काँग्रेसचे मिंधे आहेत आणि त्यांना कुणाही काँग्रेसविरोधी लोकांशी चांगले संबंध ठेवायचा हक्क नाही? लताबाईंना भारतरत्न दिले म्हणजे ते काँग्रेसने त्यांच्यावर केलेले उपकार आहेत असा ह्या नादान चांदूरकराचा समज असल्यास तो त्वरित दूर झाला तर बरे. अशा वैचारिक दुगाण्या झाडून काँग्रेसची लोकप्रियता वाढेल असे वाटत असल्यास अशा नेतृत्वाला कोपरापासून प्रणाम!

अशी दनादन (विधाने) चांदुरकर करतच असतात, त्यात काय येवढे शेवटी त्यांच्यात व अव्हाडात महाराष्ट्राचा दिग्विजय होन्याची चुरस आहे ओ :-)

काँग्रेस भारत देशाच्या दुर्दैवाने परत सत्तेवर आली तरी मोदींची स्तुती करणार्‍यांना फार मोठी किंमत मोजावी लागेल.

आणि फेकू सत्तेवर आले तर देशालाच किंमत राहणार ना
^^^^^^ मिपा चे दिग्गी हि पदवी द्यावी का यांना?

चांदूरकराची वाचाळ बडबड ऐकून झाली आता वारसाहक्काने राजकारणात आलेले नितेश राणेही तोच राग आळवत आहेत. आता लताबाईंचे थेट नाव घेऊन त्यांचा भारतरत्न पुरस्कार काढून घ्या अशी मागणी ह्या राणे कुलदीपकाने केली आहे. दिल्लीची मोगलाई आणि महाराष्ट्राचे हे नवे जहागिरदार आपल्या दौलतीच्या जिवावर चांगलेच माजले आहेत. भारतरत्न दिलेल्या व्यक्तीने अमुक एका पक्षाशी एकनिष्ट राहिले पाहिजे असे काही कलम आहे का? भारतरत्न काढून घेण्याची भाषा करणार्‍या लोकांना निवडणुकीत चौदावे रत्न दिसेल अशी आशा!

In reply to by हुप्प्या

भारतरत्न ही काँग्रेसच्या बापाची जहागिर नाही .काँग्रेसचा णिषेध! असा सूड उगवणे हे बालिशपणाचे लक्षण आहे.

पंडित ह्रीदाय्नाथ मंगेशकर यांना बांडगुळ म्हणून इथे अकलेचे तारे तोडले गेले , जाऊन अगोदर त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी ऐकावी

In reply to by निशांत५

जगात अनेकांकडे प्रतिभा असते. परंतु त्यातील काहीजणांनाच कर्तृत्व सिद्ध करता येते. दुसर्याच्या प्रसिद्धीचा फायदा उठवणे ही बांडगुळी वृत्तीच आहे.

हुप्प्या यांचे मिपावरील इतर लिखाण बरेच रिजनेबल आहे, अन्यथा त्यांनाच मिपाचे बांडगूळ म्हटले असते. त्या मंगेश कर द्वयींना काही पदव्या अनावश्यक आहेत आणि प्रसिद्धी अवाजवी आहे हे नम्रपणे नाही तर कठोरपणे म्हणता येते. पण बांडगूळ शब्द अगदीच पातळी सोडून आहे.