Skip to main content

पायरसी टाळणे शक्य आहे काय ?

लेखक धर्मराजमुटके यांनी शनिवार, 17/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
पायरसी टाळणे शक्य आहे काय ? जी चराचराला व्यापून दशांगुळे उरली आहे. पायरसी टाळण्यात कुणी पुढाकार घ्यावा ? उत्पादकाने, विक्रेत्याने की खरेदीदाराने ? की कायद्याचे पालन करणार्‍या व्यवस्थेने ? पायरसी मधून मिळणारा बराच पैसा समाजविघातक कामांसाठी वापरला जात असेल हे मला कळत असले तरी वळत असेलच असे नाही. ४०-५० रुपयांत ५-६ चित्रपट दाखविणार्‍या रस्तोरस्ती मिळणार्‍या डीव्हीडींचे प्रस्थ कमी करण्यासाठी मोझरबेअर ने त्याच किंमतीत २-३ चित्रपट देणार्‍या सीडी / डीव्हीडी उपलब्ध करुन देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. घरी संगणक घेतला तर त्यावर गरज नसतांनाही ग्राहकाला कोरल, फोटोशॉप, आणी इतर सॉफ्टवेअर हवी असतात म्ह्णून मग विक्रेता नाईलाजाने / खुषीने उपलब्ध करुन देतात. ही सॉफ्टवेअर नको असली तरी ऑफीस सुट तर प्रत्येकाला हवाच असतो. २५-३०-५० हजार खर्च करुन संगणक विकत घेतला तरी सॉफ्टवेअरच्या किंमती इतक्या आहेत की सामान्य माणूस त्या विकत घेऊ शकत नाही आणी ज्याच्याकडे पैसा आहे त्याला तो खर्च करायचे जीवावर येते. बर लीनक्सचा उपाय सुचवावा तर पडीले वळण इंद्रियां सकळां या न्यायाने विंडोजची आस आणि कास सोडवत नाही ? तुमच्या मोबाईल मधील निम्मी अर्धी गाणी तर तुम्ही Songs.PK या पाकीस्तानी संस्थळावरुन घेतलेली असतात. ही तर मला माहित असलेली उदाहरणे आहेत. तुम्ही अजून उदाहरणे देऊ शकता. उपाय सुचवू शकता ? इस सडे हुए सिस्टम को उखाडके फेंकना है ! आप उखाडेंगे ? मिलके उखाडेंगे ना सर ! थोडा आप ! थोडा हम !!

वाचने 2000
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

जिचा खूप लोकांना फायदा आणि थोड्या लोकांचे नुकसान, ती गोष्ट चालत राहणारच. सर्वात आवश्यक असलेली हवा जर फुकट मिळते, तर इतर गोष्टी का मिळू नयेत?

In reply to by चित्रगुप्त

सदाफ कंपनीने पायरेटेड सीडी / डीव्हीडी च्या मार्केटचा जवळजवळ ९०% हिस्सा व्यापला आहे. ही कंपनी कोण चाल वितो आणी त्या पैशांचा विनीयोग कसा होतो हे आपणास माहितीच असेल. आता ह्यात खूप लोकांना फायदा आणि खूप लोकांचे नुकसान होतेय पण ते दिसत नाही एवढाच काय तो फरक आहे.

In reply to by धर्मराजमुटके

सदाफ कंपनी वगैरे विषयी काही माहिती नाही, माझ्यापुरते बोलायचे तर मी पायरेटेड काय किंवा ओरिजिनल काय, कोणतीच सीडी/डीव्हीडी घेत नाही, गरजच नाही. डीव्हीडी खेरीज अनेक उत्तमोत्तम ज्ञानवर्धक, मनोरंजक, नि:शुल्क गोष्टी जगात ठायी ठायी विखुरलेल्या आहेत. मिसळपाव त्यापैकीच एक. आपल्यापैकी किती जणांच्या पीसीवर ओरिजिनल सॉफ्ट्वेयरे आहेत?

In reply to by चित्रगुप्त

सदाफ कंपनी वगैरे विषयी काही माहिती नाही, माझ्यापुरते बोलायचे तर मी पायरेटेड काय किंवा ओरिजिनल काय, कोणतीच सीडी/डीव्हीडी घेत नाही, गरजच नाही. डीव्हीडी खेरीज अनेक उत्तमोत्तम ज्ञानवर्धक, मनोरंजक, नि:शुल्क गोष्टी जगात ठायी ठायी विखुरलेल्या आहेत. मिसळपाव त्यापैकीच एक.
तुम्ही मागच्या पीढीतले दिसता. ;)
आपल्यापैकी किती जणांच्या पीसीवर ओरिजिनल सॉफ्ट्वेयरे आहेत?
मुक्त प्रणाली (ओपन सोर्स) चे भक्त वगळता बाकी सगळ्यांच्याच पीसीवर पायरेटेड सॉफ्टवेअर्स असतात.

मेधा ही उपजत असते. तिची पायरसी करता येत नाही. विरेंद्र सहवागच्या फटक्याची सहजता अगदी मास्टर सचिनमधेही नाही. फटकेमारण्याचे कौशल्य दोघानाही सरावाने आलेले असते. काहीच जणांचा मेंदू मूलभूत संशीधन करण्याच्या लायकीचा असतो. प्रत्येक माणूस तसा कोणत्या ना कोणत्या पातळीवर संशोधक असतोच. कौशल्य हे सरावानेच प्राप्त होत असल्याने ते ज्याचे त्यानेच प्राप्त करून घ्यावे लागते. उदा चांगला वेल्डर होणे किंवा चांगला सर्जन होणे. ज्ञान हे मात्र पायरसीने एका मनाकडून दुसरीकडे नेता येते. कारण ते नेण्यासाठी मेधाविनांनीच अनेक साधने निर्मिलेली आहेत.फोटोशॉपचा कोर्स न करता चांगले काम फोटो एडिटींग मधे करता येते. कारण संगणक हे माध्यम पण त्यात अतिखास काम करणे यासाठी मेधा लागते. गायकीचे ही तसेच असते. स्वतः च्या शारिरीक वा मानसिक समस्येची काही प्रमाणात उकल होण्यासाठी डोक्टरच व्हायला पाहिजे असे नाही. अलिकडे सीए ला असलेले ज्ञान, वकिलाला असलेले ज्ञान पायरसीने माध्यमांचा वापर करून नेता येते. असे जर आहे तर मग पायरसीचे कायदे करून काय उपयोग्?

पायरसी टाळणे शक्य आहे काय ?
जे उत्तर "भारतातील भ्रष्टाचार बंद होईल का?" या प्रश्नाचे असेल तेच उत्तर पायरसी टाळणे शक्य आहे काय? या प्रश्नाचे असेल. पायरसी करण्यासाठी मुळात लागतेच काय? एक ओरिजिनल कॉपी आणि दोन की स्ट्रोक, कंट्रोल सी आणि कंट्रोल व्ही. जगाच्या पाठीवर पळवाटा शोधण्यात आपला हात कुणीच धरणार नाही. आणि ही ईतकी सहजसाध्य पळवाट आपण टाळू हे निव्वळ अशक्य आहे. वाहतूक शिपायाने पकडल्यावर सुमडीत त्याच्या हातावर पाच पन्नास टेकवून सटकणे जितके आमच्या नसानसात भिनले आहे तितकीच पायरसीही आमच्या नसानसात भिनली आहे.

अ‍ॅन्टीव्हायरस क्रॅक करता येतो?? शिनेमाच्या पायरसी झाल्यातरी आठवड्याभरात शंभर अन् दोनशे कोटी पर्यंत या कमाया जातातच आहेत. गाण्यांबाबत म्हणलं तर त्याचा मार्केटिंग मध्ये फार मोठा भाग असतो त्यामुळे ऑडीओ सीडी मधला डायरेक्ट पैसा गेला तरी मार्केटिंग बजेटमधून आणि लाईव्ह शो यातून कलाकारांना पैसा मिळतो. अन्, सदाफला जो पैसा मिळतो तो टिप्स किंवा इतर कंपनीने घ्यावा की, जर का उत्पन्न वाढणारच आहे तर टिप्स स्वतःच कमी पैशात सीडी का नाय विकत ? एकंदर उत्पन्न थेटरचे दोनेकषे कोटी आणि सीडीचे, असं काहीसं वाढलेलंच राहील ? अन् इतकी पायरसी असून इंडस्ट्री व्यवस्थित कशी काय चालते ?? बहुदा कंपन्यांना माझ्यासारख्या चिंधी पायरसीमुळे फरकच पडणार नाही त्याचं मुख्य गिऱ्हाईक वेगळंच आहे. मी पायरेटेड एक्सेल मारलं तर मला पकडून दंड घेण्यापेक्षा दुसऱ्या कंपनीकडून दंड घेणे सोयीस्कर ना ? सिम्युलेशन/डिझाईन वगैरे सोफ्टवेअरचे लायसंस करून शिकायचं ठरवलं म्हणलं तर काहीच शिकताच येणार नाही इतकी महाग आहेत. याबाबतीत काही कंपन्या स्टुड्ंट एडिशन आणि कॉलेजेसना लायसेंस फुकटात देतात त्यां बद्दल आदर वाटतो. जर इंजिनिअरिंगच्या पोराने पुस्तकं झेरॉक्स न मारता विकत घ्यायची ठरवली तर ५०%+ टक्के पोरांना परवडणार नाही, यावर मागे बहुदा मिपावरच चर्चा झाली होती (मूळ दुवा सापडला नाही पण त्या विषयावरचे बाकी लेख सापडले). http://www.thehindu.com/opinion/op-ed/article3911971.ece http://www.thehindu.com/opinion/op-ed/article3911970.ece http://kafila.org/2012/09/19/academic-publishers-an-insiders-perspectiv… तात्विकदृष्ट्या पायरसी ही चोरी हे मान्य आहे पण फक्त पैसा या बेसवर राहिल्या तर गोष्टी एका क्लास पुरत्या राहतील. आणि कस्टमर पाहून आणि त्याला परवडेल अशा किमतीत या गोष्टी दिल्या तर पायरसी कदाचित थोडीफार आटोक्यात येईल. हे आपलं डोस्क्यात येईल ते खरडतोय, पैशाच्या प्रवाहाची एकंदर कल्पना असलेल्याने मत दिल्यास नेमकं समजेल.