Skip to main content

तुम्हि नॉनव्हेज खाताना वार पाळता/बघता का?

लेखक दिपक.कुवेत यांनी गुरुवार, 11/07/2013 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आपल्याकडे वारांना खुप महत्व आहे किंबहुना आपण प्रत्येक वार हा त्या त्या देवाचा म्हणुन मानतो. उदा. सोमवार शंकराचा, मंगळवार बाप्पाचा, गुरवार साईबाबांचा, शनिवार मारुतिचा ई. तर प्रत्येक देवांसठिचे हे वार कोणी ठरवले? त्याच्यामागे काहि शात्रिय कारण आहे का? तसं ह्या वारांची अडचण अशी नाहि (माझ्याबातीत) पण असं पाहिलय कि नॉनव्हेज खाणारे शक्यतो फक्त बुधवार आणि रविवारी खातात. माझ्यापासुन सुरवात करायची झाल्यास मी काहि पट्टिचा नॉनव्हेज खाणारा नाहि. म्हणजे रोज ताटात मासळिचा तुकडा, चिकन किमानपक्षी ऑम्लेट्/उकडलेलं अंड हवचं असा काहि आग्रह नसतो. कधीतरी चेंज म्हणुन आम्हि आपलं नॉनव्हेज खातो. कदाचीत असं असल्यामुळे माझा मंगळवारचा उपास सोडला तर मी ईतर कोणत्याहि दिवशी नॉनव्हेज खाउ शकतो. तर तुम्हि नॉनव्हेज खाताना हे वार पाळता/बघता का? आपल्या प्रतिक्रिया / व्हेजवाल्यांचीहि मत जाणुन घायला आवडेल.

वाचने 19859
प्रतिक्रिया 76

प्रतिक्रिया

ल्हानपणी एकदा घरी आई नसताना, कार्तिकी एकादशीला वडीलानी स्वतःचे पाक कौशल्य पणाला लावून अन्डा करी, ऑम्लेट, फ्रेन्च टोस्ट असे नानाविध प्रकार बनवून मला व माझ्या भावाला खाउ घातल्याचे चान्गले आठवते. घरी माउली आल्यावर वडिलान्च्या पाक कौशल्याने प्रभवित होउन समग्र वर्णन केले. पुढे काय झाले असेल ते आपण सूज्ञ जाणताच. पण आज इतक्या वर्षानि एक कोडे उलगडले नाहि, ते हे की जिकडे पन्ढरपुरच्या माउलिने निषेधाचा एक शब्दही उचचारला नाही तिकडे आमच्या घरच्या माउलिने एवढा थयथयाट का करावा ???

आजवर कुठलाच उपास / वार वगैरे पाळला नाही. खाताना वेज्/नॉन-वेज असा विचारच मनात येत नाही त्यामुळे वार / तिथी वगैरे पाळण्याचा प्रश्नच नाही. पोटाला झेपेल एवढेच खायचे एवढा संयम ठेवला की झाले.

तब्बल एक तप हॉस्टेल-लाइफ आणि दुर्गभ्रमण enjoy(!?) केल्यावर असा भेदभाव कधीच विसर्जित केलाय. अनेक गुरूवारी बायकोचा फलाहार आणि माझे समिष भोजन (बुधवार special) सोबत करतो !!

घरात खाताना तारीख वार वेळ मुहुर्त तिथी सगळं बघून खावं लागतं. कारण अभक्ष भक्षण करणारा मी एकटाच. बाहेर मात्र काही नाही. चापून चोपून ओरपायला हमेशा तैय्यार. कामानिमित्त इंदूरला असताना रोज रात्री जेवणात चिकन मसाला खायचो. अगदी श्रावणात सुद्धा ३० दिवस रोज खाल्ला. आमचा देव आमच्या पोटात. त्याला आवडता प्रसाद दिला की तो आमच्यावर प्रसन्न.. :))

मुळात नास्तिक असल्याने, देवालाच मानत नसल्याने ना वार पाळत ना सण पाळत.. जे आवडेल ते खातो.. मात्र घरच्यांच्या मते मी सोमवार पाळतो.. त्यामुळे सोमवारी घरी तरी खायला मिळत नाही.. बाहेर खातो संधी मिळाली तर, पण घरी सांगत नाही..