Skip to main content

पाकिस्तानात लोकशाही?

लेखक सचिन कुलकर्णी यांनी सोमवार, 13/05/2013 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
अंतिमत: पाकिस्तान मधल्या निवडणूक निकालांचे सूप वाजले आणि नवाज शरीफ यांची पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज ही पार्टी छोट्या पक्षांसामावेत आघाडी करून १३७ हा बहुमताचा जादुई आकडा गाठणार असे दिसतेय. पण लाख टके का सवाल है कि -नवाज शरीफ किती दिवस टिकणार ? मुशरर्फ प्रणीत लष्कर (मिलित्रि)त्यांना जास्त दिवस टिकू देईल असे वाटत नाही. आणि भारताबरोबर त्यांनी (खरोखरच) शांतता, सलोखा प्रस्थापित करायचा प्रयत्न केला तर त्यांची गच्छन्ति निश्चित आहे. अर्थात ते पण लवकरात लवकर मुशरर्फला लटकवायचा पूर्ण प्रयत्न करतील. ISI चे पंख छाटणेदेखील तितकेच आवश्यक आहे. ISI आणि लष्कर -ए - तोयबा यांची अभद्र युती भारतासाठी डोकेदुखी ठरते आहेच. अर्थात आतंकवाद प्रामाणिकपणे कमी करण्याचे प्रामाणिक प्रयत्न कोणत्याही पाकिस्तानी राज्याकर्त्याकडून होतील असे वाटत नाही तरीही पाकिस्तान आणि भारतालाही एकंदरीत शांतता हवी असेल तर पाकमध्ये लोकशाही बळकट करण्यावाचून पर्याय नाही. आणि जरा स्वत:च्या तुंबड्या भरण्याबरोबर जनतेचा विकास वैगेरे पण बघा म्हणा म्हणजे जिहाद च्या नावाखाली तरुणांची माथी भडकणार नाहीत.

वाचने 10563
प्रतिक्रिया 72

प्रतिक्रिया

वैधानिक मार्गाने होणारी संथ उत्क्रांती कितीही क्लेशकारक असेना का ती रक्तरंजित क्रांती पेक्षा परवडते. सध्या पाकिस्तान त्याच्या मार्गावर हळूहळू वाटचाल करू लागला आहे , त्यांच्या मार्गात लष्कर ,कट्टरपंथी , ह्यांच्यासारखे खाचखळगे आहेत. पण पाकिस्तानी तालिबानचा पाकिस्तान ला पडलेला विळखा व त्यांच्या जाळ्यात अडकलेला पाकिस्तानी अशिक्षित ,गरीब वर्ग ह्यांच्या विरुद्ध पाकिस्तान मधील मध्यम व श्रीमंत वर्गाने लोकशाहीला प्राधान्य दिले. कारण लष्कराचे कट्टरपंथी कनेक्शन त्यांच्या जनतेला चांगलेच माहीत आहेत. लष्कराचे पाकिस्तानी समाजात झालेले अवमूल्यन हे ह्या निवडणुकीचे ठळक वैशिष्ट्य आहे. कयानी ह्यांना अनेकदा संधी असून सुद्धा त्यांनी सत्ता हातात घेतली नाही. ह्यांचे प्रमुख कारण हक व मुशरफ ह्यांना अमेरिकेकडून जसा निधी व मदत मिळत गेली ज्याद्वारे पाकिस्तानी प्रस्थापित वर्गाला अर्थकारण सुलभ होत गेले तशी मदत मिळणे शक्य नव्हते. म्हणजे ढासळलेली अर्थव्यवस्था पूर्व पथावर आणण्याचे अजून कोणताही मार्ग त्यांच्याकडे नव्हता. अमेरिकेला द्रोण हल्ले बंद करा हे सांगण्याची कुवत लष्कराकडे नाही. त्यात लादेन प्रकरणाने तर त्याची अजून नाचक्की झाली आहे. ह्यामुळे सत्तेवर आल्यावर अमेरिकेच्या दांडगाई ला उत्तर देणे शक्य नसल्याने कट्टर पंथीय व सामान्य जनतेचा रोष ओढवून घेणे त्यांना परवडणारे नव्हते. त्यातच पाकिस्तानी लष्कर आपली बहुतांशी शस्त्र खरेदी ही अमेरिकेच्या ऐवजी चीन कडून करते त्याचवेळी भारत अमेरिकेकडून शस्त्र विकत घ्यायला सुरवात करत आहे. ह्यामुळे अमेरिकेचा मुक्त वरदहस्त पाकिस्तानवर पूर्वी सारखा असणार नाही. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे ह्या शस्त्र खरेदीत अनेक अधिकारी , सत्ताधारी व प्रशासकीय अधिकारी गुंतले असतात त्यामुळे त्यांचे चीन शी मिंधे होणे व त्यांच्या इशाऱ्यावर नाचणे क्रमप्राप्त आहे. ह्यामुळे त्याचसोबत अमेरिकेचे भारताशी सर्व स्तरावर मैत्री व सहकार वाढत असल्याने त्याला उत्तर म्हणून चीन व पाकिस्तान ह्यांची नैसर्गिक मैत्री जशी अमेरिका व भारताची आहे होणे साहजिकच आहे. कयानी ह्यांना हक सारखे पैगंबरवासी किंवा मुशरफ सारखे हतबल ,निष्क्रिय होण्यापेक्षा सन्मानाने निवृत्त होणे व निवृत्त होऊन सन्मानाने पाकिस्तानात राहणे जास्त पसंद होते. ह्यामुळे ह्या निवडणुकीत लोकशाही मार्गाने सरकार निवडून येणे अपरिहार्य होते. पाकिस्तानी जनतेपुढे उत्तर प्रदेश सारखे दोन समर्थ पर्याय होते. त्यांनी कसे मायावती मग अखिलेश असे आलटून पालटून दोन्ही खाऊ पक्षांना समान खाऊ खाण्याची संधी देतात तसे येथे येथील जनता पी पी पी व मुस्लिम लीग ला समान संधी देत असतात. ह्या निवडणुकीचे अजून एक वैशिष्ट्ये म्हणजे पठाणांचा मसीहा म्हणून इम्रान चा उदय व कराची मध्ये मुजाहीर पक्षाची हुकमत असलेल्या एम एक्यू एम ला समर्थ पर्याय म्हणून निवडून येणे व छोट्या का होईना प्रांतात आपले सरकार बनवणे शक्य झाले हे आहे. इम्रान चा खर्या अर्थाने ह्या निवडणुकीतून पाकिस्तानी राजकारणात बस्तान बसू लागले आहे. पाकिस्तान मध्ये लोकशाही म्हणजे भारताच्या दृष्टीने काय हे पुढील वेळी जमेल तसे लिहीन