Skip to main content

कठोर (पण सभ्य) टिका कशी करावी ?/ करतो ?/ करतात ?

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 22/02/2013 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, हा मिपावर मी सुमारे ५ वर्षांपुर्वी काढलेला चर्चा धागा . पाच एक वर्षे उलटून गेली आहेत तेव्हा चर्चेचा अजून एक राउंड करुन पाहू , या वेळी विकि हे टार्गेट नाही मिपाच राहू देऊ, 'रचनात्मक टिका कशी स्विकारावी' (How to accept constructive criticism) आणि 'रचनात्मक टिका कशी करावी' (How to do constructive criticism) या बद्दल आंतरजालावर इंग्रजी भाषेत बरच मार्गदर्शन उपलब्ध दिसत, पण कठोरतेचा टच कसा द्यावा या बद्दल फारशी माहिती वाचण्यास मिळाली नाही. रागावल्या नंतर व्यक्तिगत टिका (आपल्या मराठी) संस्कृतीचा भागही आहे. अशा रागावलेल्या व्यक्तींना उपयोगी पडेल असा त्यांचा राग मनमोकळेपणाने व्यक्त करू देणारे "कठोर टीकात्मक लेखन", सभ्यतेच्या (संसदीय) मर्यादेत पुर्णतः राहून आणि व्यक्तिगत रोख टाळून कसे करावे ? या बद्दल 'कठोर पण सभ्य टिका कशी करावी' असा लेख 'मराठी विकिबुक्सवर' लिहिण्यात सक्रीय सहभाग अथवा या विषयाच्या अनुषंगाने चर्चा अथवा मराठी शब्द, शब्द समूह, वाक्यरचना तुमच्या अनुभवातून किंवा मराठी साहित्यातील उदाहरणे हवी आहेत. चर्चेत सहभागाबद्दल आणि विषयांतर टाळण्यात सहकार्याबद्दल सदस्य आणि मॉडरेटर मिपा व्यवस्थापन सर्वांचे आभार.

वाचने 36453
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

In reply to by माहितगार

हा उतारा कोणत्या पुस्तकातून ढापलात तुम्ही? तुमचा ओरिजिनल उतारा असेल तर तुम्ही लेखक बनायला हरकत नाही.

सदर लेखाचे व लेखाच्या लेखकांच्या प्रतिसादांचे सुगम मराठी भाषांतर देखील 'विकी' वरती दिल्यास काही उमाज पडेल असे वाटते.

अगंबै ! मलासुद्धा हे समजलं तर बरं होईल. मला तर बै टीकाच करता येत नै. एखाद्याला फुकटात निरुपद्रवी सल्ला दिला तरी अंगावर भुंकत थयथयाट करत राहतात मग टीका तर लांबच राहीली. विकीच्या पानाच्या अपेक्षेत आहे. इथेच लिंकवलं तरी चालेल.

अत्यंत वेडझवा धागा आणि त्याहून वेडझव्या प्रतिक्रिया.

In reply to by परिकथेतील राजकुमार

कठोर टीका आहे पण रचनात्मक काही दिसत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तसे लिहिण्यासाठी आजूबाजूला रचनात्मकता समजणारी लोकं असायला नकोत का? गाढवांपुढे गीता कशाला ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

टीका रचनात्मक आहे किंवा नाही तो ते समजून घेणे हे लेखकावर अवलंबून आहे. गाढवापुढे गीता कशाला यातही कठोरपणाच आहे. कठोर टीका करणे सोपं आहे, पण त्यातून रचनात्मक संदेशही गेला पाहिजे, ते बहूतेक होत नाही. अमूक अमूक लिहिणारा फाल्तू लिहितो तेव्हा ते फाल्तूपणा कुठे कसा आहे हे सांगितलं पाहिजे, म्हणजे हे 'खर्रच हे लिहिण्यात नको होतं का ' असा विचार लिहिणार्‍याच्या मनात आला पाहिजे, लिहिण्यापासून नाऊमेद करणं म्हणजे कठोर टीका नव्हे. असो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नुसत्या टिकेने कोणी लिहिण्यापासून नाऊमेद होत असेल तर त्या मनुष्याची किव वाटते. प्रतिसादकाने लेखक / लिखाणाला फाट्यावरती मारले की मग लेखकाने प्रतिसादक / प्रतिसादाला फाट्यावरती मारावे. हाय काय आन नाय काय !

In reply to by परिकथेतील राजकुमार

माणसं हळवी असतात, माणसं कठोर असतात. काहींना मोजक्या शब्दांचा मार पुरेसा असतो, काहींना कितीही लिहा काहीही फरक पडत नाही. चर्चाप्रस्तावकाने म्हणूनच म्हटलं असावं की 'रचनात्मक टीका स्वीकारताही आली पाहिजे' टीका करणार्‍याने काही कठोर टीकेबरोबर रचनात्मक टीकाही केली पाहिजे, इतकेच म्हणायचे होते. बाकी, फाट्यावर मारणे, अनुल्लेखाने मारणे, दुर्लक्ष करुन निव्वळ समाचार घेणे, टोमणे, येता-जाता ढुसण्या, चिमटे, मला वाटतं हे केवळ कठोर टीकेत येतं. कठोर टीकेबरोबर 'रचनात्मक टीकेवर' फार काही प्रतिसादाता आलं नाही. बाय द वे, इंग्रजी साहित्यावर आपलं चांगलं वाचन आहे, तेव्हा रचनात्मक टीकेवर कै पुस्तक-बिस्तक आहे का ? काही मराठीत अनुवाद-बिनुवाद ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संपादकाच्या झूलीआडून प्राध्यापकांनी दिलेला प्रतिसाद वाटला. जलमं का हो आता ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

आता जमलं :) -दिलीप बिरुटे

नमस्कार, हा मिपावर मी सुमारे ५ वर्षांपुर्वी काढलेला चर्चा धागा . पाच एक वर्षे उलटून गेली आहेत तेव्हा चर्चेचा अजून एक राउंड करुन पाहू , या वेळी विकि हे टार्गेट नाही मिपाच राहू देऊ. माझे कठोर टिकेचे अधिकतम स्वातंत्र्य जपण्यासाठी धागा वर जाढत आहे,

In reply to by माहितगार

तुम्ही टार्गेट द्यायचे आणि इतरांनी बोंब मारायला निदान शिमग्याला तरी धागा वर काढायचात. वर्षभर शंखध्वनी करणारे त्या दिवशी तोंड दाबून बसतात. बादवे लै काय काय लिहायची न तेच तेच उकरु उकरु काढायची दांडगी हौस ब्वा तुम्हाला.

In reply to by अभ्या..

...बादवे लै काय काय लिहायची न तेच तेच उकरु उकरु काढायची दांडगी हौस ब्वा तुम्हाला.
असे करनारा मी येकला न्हाई आनी समद्यात म्होर बी न्हाई , बाकीच्ये बी करत्यात पन त्याम्चे त्यान्चे वीषय लावून धरत्यात !
...वर्षभर शंखध्वनी करणारे त्या दिवशी तोंड दाबून बसतात.
संक्रांतीला घाबरत्यात ! ...... :) ) आमी बी घाबरतो म्हना