✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

संकेतस्थळांचे उपयोग - मिपा सदस्यांना विनंती

व
विकास यांनी
Fri, 06/27/2008 - 04:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11594 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

ब
बेसनलाडू Fri, 06/27/2008 - 04:57 नवीन

उत्तम | पर्याय

उत्तम उपक्रम. यात सक्रीय सहभागी व्हायला आवडेल.मात्र भौगोलिक मर्यादांमुळे प्रत्यक्ष अंगराबते न होता उपक्रमाची रूपरेषा,नियोजन आणि आर्थिक मदत या मार्गांनी सहभागी होता येईल. (उपक्रमी)बेसनलाडू दोन प्रकल्प मनात आकार घेत आहेत;त्याबद्दलची सविस्तर रूपरेषा सवडीने तयार करून येथे टाकतो.तूर्तास त्यांचे थोडक्यात स्वरूप येथे सांगतो -
  1. अपत्य दत्तक योजनांबद्दल सामाजिक जागरूकता आणि उत्तेजन - उपवर/विवाहोत्सुक तरुण-तरुणींमध्ये तसेच नवविवाहित जोडप्यांमध्ये अपत्य दत्तक घेण्यासंबंधीं जागरुकता निर्माण करणे,माहिती पुरवणे - कायदेशीर प्रक्रिया,संबंधित संस्था आणि इतर आवश्यक माहिती ,आणि दत्तक प्रक्रियेला उत्तेजन देणे
  2. कचरा व्यवस्थापन - ओल्या व सुक्या कचर्‍याची विभागणी,विल्हेवाट,पुनर्वापरयोग्य कचर्‍याचे व्यवस्थापन यांबद्दल जागरुकता,माहितीचे आदानप्रदान,उत्तेजन आणि सक्रीय पाठपुरावा
(कल्पक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 06/27/2008 - 13:21 नवीन

असेच म्हणतो

१)अपत्य दत्तक योजनांबद्दल सामाजिक जागरूकता आणि उत्तेजन - २)कचरा व्यवस्थापन दोन्ही कल्पना उत्तम. सहभागी व्हायला नक्कीच आवडेल. सविस्तर रुपरेषा लवकरात लवकर टाकावी,अशी विनंती. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
स
संदीप चित्रे Fri, 06/27/2008 - 05:07 नवीन

उत्तम विचार...

जशी जमेल तशी मदत करायला नक्कीच आवडेल. सध्या, सामाजिक कार्यासाठी कार्यक्रम सादर करणार्‍या, एका म्युझिक गृपचा सदस्य आहेच. अधिक माहितीसाठी पहा http://www.hidden-gems.com ---------- बेसनलाडू -- दत्तक घेण्यासंबधी योग्य सूचना. नवीन जोडपी / विवाहोत्सुक जोडप्यांइतकेच आवश्यक आहे घरच्या मोठ्या लोकांना प्रोत्साहन देणे जेणेकरून एखाद्या जोडप्याने दत्तक घेतल्यास त्यांना योग्य ती सपोर्ट सिस्टीम उपलब्ध असेल. -------------------------- www.atakmatak.blogspot.com --------------------------
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Fri, 06/27/2008 - 05:11 नवीन

उपक्रम चांगला आहे

केवळ वेबपेजवर न राहता अंमलात येण्यासाठी अनेक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 06/27/2008 - 06:42 नवीन

विकासराव,

विकासरावांनी मांडलेल्या प्रस्तावाशी पूर्ण सहमत आहे... कोणी येथे येऊन गैरफायदा घेणार नाही ना अशी काळजी वाटू शकेल आणि त्यात काही चूक नाही. म्हणून च ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या सेवाभावी संस्था आणि फोकस्ड प्रॉजेक्ट्सचा विचार व्हावा. हेच म्हणतो.. विकासराव, महत्वाचा अन् मला काळजी वाटणारा मुद्दा इतकाच की मिपाच्या नावाखाली यात कुठेही आर्थिक गैरव्यवहार होता कामा नये/होऊ नये याची मात्र काळजी घेतली पाहिजे. कारण 'पैसा आला की भल्याभल्यांची बुद्धी फिरते' हेच मला मुंबईने शिकवले आहे! आणि म्हणूनच एक मिपाकर उदय सप्रे यांनी नुकताच एक पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव मांडला होता त्यावरही मला महाराजांबद्दल आत्यंतिक प्रेम व आदर असूनदेखील 'मिपाचा' यात काहीही संबंध असणार नाही असा सावध प्रतिसाद नाईलाजास्तव द्यावा लागला होता! तरी प्रत्येकाने केलेली मदत ही त्याची/तिची वैयक्तिक मदत असावी/असेल व त्याचे संपूर्ण श्रेय त्या व्यक्तिचेच असेल. त्याचे श्रेय मिपाला न मिळता मिपा फक्त निमित्तमात्र ठरले तरी उत्तम! परंतु 'मिपाच्या नावाखाली अमूक अमूक रक्कम गोळा केली गेली अन् ती संबंधित संस्थेला पोहोचलीच नाही!' असं कधीही, केव्हाही होता कामा नये!!! यात कुणावर अविश्वास आहे असं नाही, परंतु दुनिया पाहिल्यामुळे काही पाऊलं सुरवातीपासूनच फार सावधपणे टाकावी लागतात! असो, स्पष्ट लिहिल्याबद्दल क्षमस्व, परंतु विकासराव, आपण माझा मुद्दा समजू शकता अशी आशा करतो.. बाकी प्रस्ताव नक्कीच चांगला आहे. चला, लगे हाथ मी माझ्याकडून लगेच एक घोषणा करून टाकतो व या प्रस्तावास शुभारंभाचा होकार भरतो..! :) घोषणा अशी की, जेव्हा जेव्हा मिपाकर मंडळी कट्टा भरवतील तेव्हा तेव्हा माझ्याकडून १०१ रुपयांपासून ते 'अबक' रुपयांपर्यंत (माझ्या त्या त्या वेळच्या ऐपतीप्रमाणे!) मी माझं श्रद्धास्थान असलेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेस मी देणगी देईन अन् त्याची पावती स्कॅन करून इथे प्रसिद्ध करीन. ही पावती इथे प्रसिद्ध करण्यामागे आपण म्हणता त्याप्रमाणे जाहिरातीचा भाग नाही, तर इतरांनीही त्यापासून काही स्फूर्ती घ्यावी हाच विनम्र हेतू असेल... असो.... आपला, तात्या अभ्यंकर, स्वयंसेवक, भाऊबीज निधी महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था, पुणे.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 06/27/2008 - 06:49 नवीन

प्लेजींग (प्रतिज्ञा)

तात्या जेव्हा हिंगण्याकरता फंड-रेझिंग करतील तेव्हा माझ्याकडून रुपये १०,०००/- लागू . पैसे तात्यांपर्यंत चेकने पोचवण्याची जबाबदारी माझी. तात्या , संमेलन-कम-फंडरेझिंगच्या कार्यक्रमाच्या तारखांची थोडी पूर्वकल्पना द्यावी ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ब
बहुगुणी Sat, 06/28/2008 - 00:20 नवीन

प्लेजिंग... उत्तम कल्पना...

एक सर्वांना दिसेल असा प्लेजिंगचा फलक "आजच्या देणग्यांची प्रतिज्ञा" म्हणून सुरू करावा, त्यावर जस-जसे प्रकल्प येतील तस-तसे देणगी देऊ इच्छिणारे 'मिपा'कार यांच्या नावांची नोंद व्हावी. प्रत्येक प्रकल्पाच्या पुरस्कर्त्याने सुयोग्य 'अन्तिम दिन' जाहीर करावा, त्या तारखेचीही नोंद या फलकावर असावी. ती तारीख ओलांडल्यावर पुरस्कर्त्याने आपला संपर्काचा पत्ता/दूरध्वनी क्र. त्या त्या देणगी प्रतिज्ञकांना व्य. नि. द्वारे कळवावा. आणि अखेर विवक्षित मुदतीनंतर (follow up date, प्रकल्प प्रगती दिनांक, ही देखील फलकावर अंतर्भूत असावी) या देणग्यांमुळे झालेली प्रकल्प प्रगती जाहीरपणे 'लिंक' च्या द्वारे व्यक्त करावी. उदाहरणार्थः प्रकल्प देणगी अन्तिम दिन देणगी देऊ इच्छिणारे 'मिपा'कार प्रकल्प प्रगती दिनांक देणग्यांमुळे झालेली प्रकल्प प्रगती मला स्वत:ला, हिंगण्याकरता मदत करण्याशिवाय, डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी आमटे यांच्या कार्यातही हातभार लावावासा वाटतो, इतरांनीही यात मदत करावी अशी विनंति. या दोन्ही प्रकल्पांसाठी प्रत्येकी ५००० रु. देणगी मी देउ करतो. आमटे यांच्या कार्यात मदत कशी पोहोचवायची ह्याची माहिती जाणकारांनी कळवावी. (आमटे यांचे कार्य)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
व
विकास Fri, 06/27/2008 - 07:19 नवीन

अगदी मान्य!

तरी प्रत्येकाने केलेली मदत ही त्याची/तिची वैयक्तिक मदत असावी/असेल व त्याचे संपूर्ण श्रेय त्या व्यक्तिचेच असेल. त्याचे श्रेय मिपाला न मिळता मिपा फक्त निमित्तमात्र ठरले तरी उत्तम! परंतु 'मिपाच्या नावाखाली अमूक अमूक रक्कम गोळा केली गेली अन् ती संबंधित संस्थेला पोहोचलीच नाही!' असं कधीही, केव्हाही होता कामा नये!!! अगदी मान्य. मला यापेक्षा वेगळे अपेक्षित नव्हते, पण नीट लिहीले गेले नाही. मिपा निमित्तमात्रच असेल फक्त उल्लेख करण्याचा हेतू इतकाच की त्यातून इतरांना संकेतस्थळाचा असाही उपयोग होऊ शकतो याची जाणीव करून देणे. म्हणूनच म्हणले की ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या (आणि अजून म्हणायचे राहीलेले पण रजिस्टर्ड) सेवाभावी संस्थेला असली देणगी सरळ जाउदेत. यात कुणावर अविश्वास आहे असं नाही, परंतु दुनिया पाहिल्यामुळे काही पाऊलं सुरवातीपासूनच फार सावधपणे टाकावी लागतात! हे असेच स्पष्ट असूदेत. त्यात काही गैर नाही तर त्याची गरज आहे. इतरांना पण विनंती काही यात काही तॄटी होऊ शकत असल्यास/वाटत असल्यास त्या अवश्य सांगा. यात व्यक्तिगत काहीच नाही आणि घेणारपण नाही. या संदर्भात मी आज पर्यंत सावधपणे वागत आलो आहे - संस्थेसाठी काम करताना अथवा चालवताना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सहज Fri, 06/27/2008 - 06:53 नवीन

संपुर्ण अनुमोदन

संपुर्ण अनुमोदन. विचारमंथन सुरु झाले आहेच. लवकरच मुर्त स्वरुप यावे.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 06/27/2008 - 10:00 नवीन

संपुर्ण अनुमोदन

योग्य आहे... हेच म्हणतो... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/27/2008 - 09:29 नवीन

हम्म

प्रस्ताव चांगला आहे, काय करता येऊ शकते त्याची एकदा मनात बांधणी करतो आणि मग योगदान आणि सहभागाबद्दल ठरवतो. मिसळपाव सदस्य सामाजिक जवाबदारीचे भान ठेवतात, किती आनंदाची गोष्ट !!!
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 06/27/2008 - 09:51 नवीन

शुभस्य शिघ्रम् !!!

मी विकासरावांनी मांडलेला प्रस्ताव व त्यामागची त्यांची भुमीका यांच्याशी संपुर्णपणे सहमत आहे. बर्‍याच दिवस मी सुद्धा असाच विचार करत होतो की "ह्या व्यासपीठावरुन समाजासाठी" काही करता येईल का ? च्यायला ह्या नोकरीमुळे इतर कामासाठी अजिबात वेळ भेटत नाही. पण सामाजीक अस्वस्थता स्वस्थही बसु देत नाही. मग त्याला नुसतेच "लेख" म्हणून काही खरडणे पुरेसे नाही ह्याची जाणीव होतीच. काहीतरी करणे जरुरीचे आहे. "क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे" हे म्हणतात तेच खरे. असो, विकासरावांनी सुरवात केली आहे त्याला माझा पाठिंबा !!! तात्यांची "सावधपणाची" सुचना पटण्यासारखी आहे. बाकी सर म्हटल्याप्रमाणे "मिसळपाव सदस्य सामाजिक जवाबदारीचे भान ठेवतात, किती आनंदाची गोष्ट !!! " असेच म्हणतो. याबरोबरच अजुन एक गोष्ट मनात आहे ती म्हणजे "मिपाकरांचा एक मास्टर डेटाबेस" बनवणे. त्यात इच्छुकांचे "संपर्क, व्यवसाय, आवडी, समाजकार्य करण्याची इच्छा" याचा समावेश करणे शक्य आहे. त्याचा उपयोग खुप ठिकाणी होऊ शकतो. सध्या आपले "मिपाकर" जगभर अनेक भागात पसरले आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात, अनेक कौशल्य बाळगुन आहेत व अनेक ठिकाणी याची एकमेकांना मदत होऊ शकते. कुणाला परदेशवारीच्या वेळी, देशांतर्गत प्रवास व तेथील हवी असल्यास व्यवस्था, शिक्षण, कला, संगीत, पाककला .... इ.इ. असा अनेक गोष्टीत आपण एकमेकांना मदत करु शकतो. असे म्हणतात की "एक मराठी माणुस दुसर्‍या मराठी माणसाला मदत करत नाही" हे कुठेतरी मनाला बोचते. पाहु, आपण त्यासाठी काही करु शकतो का ? आमच्या "बेंगलोर कट्ट्यावर" ह्या गोष्तीबद्दल सांगोपांग चर्चा झाली व त्यावेळीच मी हा धागा टाकणार होत पण तो कट्टा वेगळ्याच कारणाने गाजल्याने हा विषय विस्मॄतीत गेला. याबद्दल आपली मते कळल्यास मला "थोडा अभ्यास" करुन "प्रपोजल " तयार करता येईल ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 06/27/2008 - 12:10 नवीन

+++१

वा! तिकडे संपादकीय आणि इथे विधायक कार्यांसाठी पावले उचलण्याची चर्चा! दोन छान गोष्टी एकाच दिवशी. सुंदर. विकासराव, अतिशय उत्तम विचार. इथे आपण केवळ मराठी साहित्य, चर्चा (आणि आमच्यासारख्यांच्या बाबतीत टवाळक्याही ;) ) साठीच जमतो असे नव्हे तर आपल्यामध्ये तयार झालेली ही एकी अशा विधायक कामांसाठी वापरली जावी हा विचार अतिशय स्तुत्यच. अभय बंग व राणी बंग ह्यांच्याही कार्याला हातभार लावण्याची संधी आपल्याला ह्या निमित्ताने मिळू शकते. लवकरच त्याबद्दल मी इथे माहिती प्रकाशीत करेन. छोटा डॉन ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे, आपले मिपाकर एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी गेले असता, जर तेथील आपल्या ओळखीच्या (आंतरजालीय ओळख का होईना), व्यक्तिंशी संपर्क साधू शकल्यास काही मदत मिळू शकल्यास (घाबरु नका, आर्थिक नव्हे.) ते सोयीचे पडेल. उदा. मी जर इंग्लंडला गेलो तर छोटी टिंगीशी संपर्क साधून कुठे स्वस्तात घर मिळू शकेल इ.इ. गोष्टी विचारुन घेऊ शकेन. ह्यातुन नक्कीच असलेले ॠणानुबंध वृध्दींगत होतील असे मला वाटते. तात्या,नीलकांत ह्यांनी ह्या मास्टर डेटाबेसबद्द्ल जरुर विचार करावा अशी माझी त्यांना विनंती आहे. अर्थात आपली माहिती पुरवायची की नाही, हा प्रश्न वैयक्तिक असेलच. असो, विकासरावांचे अभिनंदन, त्यांनी अशा विषयावर चर्चाप्रस्ताव मांडल्याबद्दल. मी ह्यात मनापासुन सहभागी होण्यास इच्छुक आहे. आपला, ध मा ल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
आ
आनंदयात्री Sat, 06/28/2008 - 00:27 नवीन

++११

असेच म्हणतो. (सहमत) आनंदयात्री
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
म
मयुरयेलपले Fri, 06/27/2008 - 10:47 नवीन

आम्हिहि सहभागि होणार...

नमस्कार मिपाकरहो... आपला उपक्रम नक्किच स्तुत्य आहे .. पण आमचि जात विद्यार्थाचि त्यामुळे आर्थिक मदत आजुन दोन वर्ष तरि शक्य नाहि पण स्वयंसेवक म्हनुन महाराष्ट्रात कुठेहि उपस्थित राह्यला अम्हि तयार आहोत..(सुट्टित) आपला मयुर
  • Log in or register to post comments
अ
अन्जलि Fri, 06/27/2008 - 12:37 नवीन

मदत

उपक्रम अगदि स्तुत्य आहे. यथाशक्ति मदत करायला नक्किच आवडेल. एक विचार मनात आला म्हनुन लिहिते आज काल आपण श्राध वगेरे करत नाहि म्हन्जे दर् वेळी रजा घेण शक्य नस्ते म्हनुन मनात असुन सुध्हआ आपण करु शकत नाहि तर त्या त्य्या दिवशि आपण पूर्वज्याच्या नावाने देणगि दिल्यास ति गरजु लोकनपर्यन्त पोचवु शकु. जसे वास्त्ल्य साथि कोनाला मदत कराय चि असेल तर मि ति मदत पोच्वु शकेन कारन ति सन्स्था मझ्या घरापासुन जवल आहे. क्रुपया माझा मुद्दा लक्शात घ्या लिहिताना चुका होत अस्ल्यामुले खुप स्पस्ट करता येत नाहिय. तुम्चे विचार ऐकाय्ला आवडतिल.
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 06/27/2008 - 15:05 नवीन

स्तुत्य

हे फार स्तुत्य सामाजिक कार्य हातात घेत आहोत. परदेशातून जर काही सहकार्य लागले तर सांगा. मदत करायला आवडेल.
  • Log in or register to post comments
प
प्रगती Fri, 06/27/2008 - 19:33 नवीन

स्तुत्य उपक्रम....

आम्हाला पण "सलोनी लायब्ररी" तर्फे सामाजिक कार्यामध्ये खारीचा वाटा उचलण्याची इच्छा आहे. "मिपाकरांचा एक मास्टर डेटाबेस" बनवणे. त्यात इच्छुकांचे "संपर्क, व्यवसाय, आवडी, समाजकार्य करण्याची इच्छा" याचा समावेश करणे शक्य आहे" छोटा डॉन यांच्याशी सहमत. ज्याप्रमाणे श्रीयुत संदिप चित्रे हे जसे सामाजिक कार्यासाठी काही कार्यक्रम सादर करतात त्याचप्रमाणे आपणही काही कार्यक्रम करु शकतो का? मला माहीत आहे की या गोष्टी थोडया अवघड आहेत पण आपण यावर काही विचार करु शकतो का?
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Fri, 06/27/2008 - 23:40 नवीन

मी ऐका NGO

मी ऐका NGO (maimarathi.org) साठी काम करतो. आपण ते ऐक माध्यम म्हणुण वापरु शकतो. कारण त्याच्यांकडे सगळे पायाभुत सुविधा तयार आहेत. सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 06/28/2008 - 00:18 नवीन

धन्यवाद

सर्व वाचकांना आणि प्रतिसादांबद्दल धन्यवाद! आपल्याला आलेले प्रतिसाद वाचताना लक्षात आले असेल की अगदी सहजपणे काही चांगली कामे होऊ शकतात. दत्तक योजना कचरा व्यवस्थापन हिंगण्याचा भाऊबीज फंड मराठी माणसाची मराठी माणसाला मदत डेटाबेस आणि नेटवर्कींग मायमराठी.ऑर्ग अशा अनेक कल्पना तात्काळ पुढे आल्या. यात काही स्वतःच पाळायचे नियम लक्षात असुद्यात ही विनंती:
  1. मिसळपावचा उल्लेख करून पैसे मागायचे नाहीत
  2. अनेकदा इमेल वर पैशाची मागणी करणार्‍या येतात - (अमुक आजारी आहे, तमुकचा पाय मोडला वगैरे) अशा विनंत्या कोणी कुणाला फॉरवर्ड करू नये आणि येथे पण पोस्ट करू नयेत
  3. स्वतःचे अनुभव अवश्य सांगा - चांगले आणि वाईटही पण वाईट सांगायचाच असला तर स्वतःचाच सांगा आणि तसे स्प्ष्ट आणि सभ्य शब्दात सांगा. अमुक म्हणाला वगैरे नाही. कारण कितीही झाले तरी नकळत एखाद्या संस्थेला यातून उगाच बदनामी मिळू शकेल. ह्या गोष्टी नाजूक असतात आणि त्या तशाच हाताळल्या तर इप्सित साध्य होऊ शकेल.
  4. राजकारण आणायचे नाही. भारतीय पद्धतीत अनेक विचारांच्या सेवाभावी संस्था कार्यरत आहेत - समाजवादी, साम्यवादी आणि हिंदूत्ववादी. पण आपण मदत करतोय ते केवळ एखादा प्रकल्प चांगला वाटला म्हणून इतकेच डोक्यात ठेवावे आणि त्यावरून वाद निर्माण करू नयेत. (मिशनरी संस्थापण आहेत ज्या धर्मांतराला प्रोत्साहन देत नसतील त्यांच्यापुरते मर्यादीत ठेवले तर बरे होईल पण तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे.)
  5. संस्थेची व्यवस्थित माहीती, त्यांचे काम वगैरे पाहून मदत करा. मदत नुसती पैशानेच होऊ शकते असे समजू नका!
पुढचे दिड-दोन दिवस मला मिपा अथवा संगणकाला "ऍक्सेस" नसेल. तेंव्हा एखाद्या प्रतिसादास उत्तर दिले नाही तरी गैरसमज करून घेउ नका! परत एकदा धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 06/28/2008 - 00:24 नवीन

सर्वात महत्वाचा मुद्दा...!

मिसळपावचा उल्लेख करून पैसे मागायचे नाहीत हा सर्वात महत्वाचा मुद्दा...! धन्यवाद विकासराव.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
स
संजीव नाईक Sat, 06/28/2008 - 08:14 नवीन

मान गये उस्ताद! अनेकोत्तम शुभेच्छा!

गैरसमज.. प्रेषक विसोबा खेचर ( शुक्र, 03/21/2008 - 13:58) . जगामध्ये मराठी माणसाला काहितरी करताना (एखादी सणसणीत शिवी द्याविशी वाटते! ) खवी लागते. गैरसमज होतो आहे. मी मराठी माणसाला काहीतरी करताना पाहून शिवी द्याविशी वाटते असे कुठेही लिहिलेले नाही. कृपया इकडचे अर्थ तिकडे चिकटवू नका! आपण जर का मुबंई जवळचे असाला तर आपण माझ्या लेखातील खेरेपाना पाहान्यास आवश्क्य आमच्या संस्थेस भेट्द्या.... नक्की देईन! व मराठी तून लेखलिहुन अनुदान मिळवून दाखवा हे आपणास विनम्र अह्वावन करीत आहे. ते जमेलसं वाटत नाही कारण माझ्या सर्व श्रद्धा पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेस वाहिलेल्या आहेत त्यामुळे इतर अनेक सामाजिक संस्थांच्या कार्यात इच्छा असूनही भाग घेणे मला शक्य होत नाही. तरीही कधी सवड मिळाल्यास मी आपल्या संस्थेला अवश्य भेट देईन व माझ्या कुवतीप्रमाणे यथाशक्ति मदतही करीन. याहून अधिक, म्हणजे लेख लिहून अनुदान वगैरे मिळवणे मला शक्य होईलसे वाटत नाही. असो, आपल्या कार्याला अनेक शुभेच्छा! जाता जाता - मराठी संस्थळांवर मराठीतच लिहिण्याचा आग्रह असणे आणि लोकांना तसा आग्रह करणे फारसे गैर नाही एवढा मुद्दा मात्र अवश्य लक्षात घ्या, ही विनंती! आपल्या संस्थेस माझ्या अनेकोत्तम शुभेच्छा! आपला नम्र, तात्या अभ्यंकर, स्वयंसेवक, भाऊबीज निधी, महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था, पुणे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 06/28/2008 - 09:10 नवीन

काय कारण?

नाईक साहेब, माझे पूर्वीचे लेखन इथे प्रसिद्ध करण्याचे प्रयोजन समजले नाही! प्रतिसादाच्या सुरवातीला आपण 'गैरसमज' असे लिहिले आहे. कुठला गैरसमज? विकासरावांनी जो चर्चाप्रस्ताव मांडला आहे त्यावर तुमचं वैयक्तिक अन् स्वतंत्र मत काय ते लिहा की! माझाच पूर्वीचा प्रतिसाद इथे उद्घृत करण्याचा हा काय प्रकार आहे?? तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजीव नाईक
ब
बेसनलाडू Wed, 07/09/2008 - 02:06 नवीन

टीच इन्डिया उपक्रम

टाईम्स ऑफ इन्डियाने टीच इन्डिया उपक्रम चालू केला आहे. संबंधित बातमी येथे वाचा. हा प्रत्यक्ष सहभागातून आणि आयुष्यातल्या थोड्या वेळाच्या समर्पणातून साकार होणारा उपक्रम आहे. उपक्रमाबाबत अधिक माहिती येथे मिळेल. या उपक्रमाशी संबंधित,उपक्रमाच्या सुरुवातीची प्रेरणा ठरलेली शिक्षणहक्क विधेयकाबाबतची बातमी येथे वाचा. शिक्षणहक्क विधेयक येथे वाचता येईल. ज्यांना या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होऊन स्वेच्छासेवा (वॉलन्टिअरिंग) स्वरूपाचे काम करणे शक्य असेल,त्या मिपाकरांनी या स्तुत्य उपक्रमात निश्चित सहभागी व्हावे आणि मिसळपाव या संकेतस्थळाचा या उपक्रमासाठी पूरक म्हणून कसा फायदा होईल,याचा विचार करावा,ही नम्र विनंती. (उपक्रमी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
श
शिप्रा Wed, 07/09/2008 - 16:34 नवीन

मि नविन

मि नविन सभासद आहे. रोज येथिल लेखन वाचते. आधि वाटल होते कि फक्त चहाट्ळ्पणा चालतो. :) :) पण वरिल विचार वाचुन मिपा चि फॅन झाले. खुप खुप शुभेच्छा
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 07/09/2008 - 23:44 नवीन

चहाटळपणा ?

आधि वाटल होते कि फक्त चहाट्ळ्पणा चालतो. चहाटळपणा ? छे ! आम्हाला कुठे दिसला नाही तो ? - (मि पण मिपाचा फ्यान) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिप्रा
श
शिप्रा गुरुवार, 07/10/2008 - 11:23 नवीन

मि चहाटळ

मि चहाटळ लोकांबद्ल नव्हते बोलत. त्यामुळे तो तुम्हाला दिसायचा प्रशनच नाहि...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा