Skip to main content

भारतीय किती करंटे?

लेखक अभिज्ञ यांनी शनिवार, 04/08/2012 या दिवशी प्रकाशित केले.
पंधरा ऒगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला अन भारताच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. शेकडो राज्ये, संस्थाने, जमाती, भाषा, संस्कृती,जाती, धर्म.....वगैरे वगैरे ह्यांच्यात गुरुफ़टलेल्या भारताचे कळत नकळत का होईना ब्रिटिश काळात एकप्रकारचे CONGLOMERISATION झाले. अन १५ ऒगस्ट ला एक ब-यापैकी एकसंध भारत जन्माला आला. जस जसा काळ सरत गेला तस तशी भारतात एकसंधता येत गेली. भाषावार प्रांत रचना ,एकच चलन, काश्मीर काहि अंशी वगळता आंतर्देशीय स्थलांतर, व्यापार हा नवीन स्वरूपात विकसित होत गेला. भारतातल्या कुठल्याही भागात लोकांना स्थावर मालमत्ता खरेदी करता येउ लागली. उद्योगांची वाढ झाली. मिळालेल्या लोकशाहीत नवनवीन योजना राबवल्या गेल्या. त्याचा फ़ायदा /तोटा समाजातल्या सर्वच स्तरांना झाला. ब्रिटिशांनी उभारलेल्या रेल्वेच्या जाळ्यामुळे आपसुकच व्यापार उद्योगाला चालना मिळाली. दुर पल्ल्याची प्रवासी वाहतुक शक्य झाली. ब्रिटिशांनी बांधलेले रस्ते, पुल, बंदरे ह्यांचा वापर करता येऊन दळ्ण वळण, आंतर्राष्ट्रीय आयात निर्यात शक्य झाली. ह्या आधी नव्हती असे नाही परंतु काम करण्याची नवीन प्रणाली, वा एक पध्दत लागु झाली. उच्च समाजाला का असेना इंग्रजीची ओळख झाली. एक सामायिक शिक्षण पध्दती अस्तित्वात आली. सैन्य दले , वायुसेना व नेव्ही ह्या उपलब्ध झाल्य़ा. ब्रिटिश भारतात असण्याचा मुख्य फ़ायदा म्हणजे येथे लोकशाहीची मुहुर्त मेढ रचली गेली. ब्रिटिश राज्यवटी नंतर भारताला मिळालेल्या काहि आयत्या संधी १. लोकशाहीची मुहुर्तमेढ २. रस्ते, पुल, बंदरे, कारखाने , ३. इंग्रजी चा प्रसार ४. शिक्षण पध्दती ५. शासकीय कामकाज पध्दती ६. सैन्य दले- ७. रेल्वे अन सर्वात महत्वाचे म्हणजे एकसंध भारत येत्या पंधरा तारखेला ब्रिटिश भारतातून जाऊन ६५ वर्षे पुर्ण होतील तर प्रश्न असा आहे की गेल्या ६५ वर्षात भारताने किती प्रगती केली? त्यामध्ये किती भर घातली? तसेच ब्रिटिश जर भारतात आले नसते तर आज भारत कुठल्या परिस्थितीत असता? भारताने खरोखरच ह्या उपलब्ध संधीचा कितपत फ़ायदा करून घेतला? गेल्या ६५ वर्षात ह्या साधनांमध्ये किती वाढ केली? रस्ते, रेल्वे ह्यांची कितपत वाढ झाली? त्या ऐवजी ब्रिटिश अजुन ६५वर्षे भारतात राहीले असते तर बरे झाले असते का? भारतातला भ्रष्टाचार कमी झाला असता का ? एक प्रकारची शिस्त समाजाला लागली असती का? धर्म-जाती ह्याचे राजकारण संपुन एकसंध समाज अस्तित्वात आला असता का? अन मुख्य म्हणजे भारताची अजुन जास्त प्रगती झाली असती का? महत्वाचे : ह्या लेखात ब्रिटिश राजवटीचे कुठलेही समर्थन करण्याच प्रयत्न नसून मुख्य विचार हा ब्रिटिश राजवट सापेक्ष सध्याच्या भारताच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीचा आहे.

वाचने 7799
प्रतिक्रिया 34

प्रतिक्रिया

मी काय म्हणतो अभिज्ञा, आपल्या इथे मिपावर भारतात न राहणार्‍यांना भारताविषयी कळवळ्याने लिहायला बंदी आहे ना? बाकी आजची भारताची एकंदर परिस्थीती पहाता २०४७ पर्यन्त इंग्रज भारतात रहायला हवे होते असे वाटते.

भारत भारत राहिला नसता तर ब्रिटीश झाला असता. तरी सुद्धा आपण सगळे ब्रिटीश राणीचे दुय्यम नागरीकच राहिलो असतो. सगळे हळूहळू मॅडम व मिस्टर झाले असते. जहाजे भरभरुन सोन चांदी तशीच जात चालली असती. भारताचे अस्तित्व राहिले नसते आपण सगळे हळूहळू आपली हिंदू संस्कृती सोडून, त्यांच्या सारखे अजून अजून बनलो असतो. आपली आयडेंटीटी संपल्यावर मग एकसंध आहोत काय किंवा नाही ह्याला अर्थ राहिला नसता. एक प्रकारे आपण ब्रिटीशाचे दुय्यम नागरीक म्हणून खूप कामे मिळाली असती. फॉकलॅन्ड युद्धात ऑस्ट्रीयाशी ब्रिटीश सेना जरुर लढली असती पण खरे तर मेले असते आपलेच जवान तेथे जाऊन. इराण इराक वॉर मध्ये आपलेच मुसलमान तिथे जाऊन त्या मुसलमानांच्या हातून मेले असते आयर्न क्रॉस जरुर मिळाला असता. कोणाला हे आवडेल. आपली आयडेंटीटी संपवणे - मला व्यक्तीशः नाही आवडणार. ज्यांना सोडायची आहे त्यांनी जावे खुशाल. आज जे अमेरीकेत किंवा इंग्लंडात पोटा पाण्यासाठी कायमचे गेले आहेत त्यांनी आपली आयडेंटीटी सोडली आहे - ब-याच जणांना असे वाटत असेल की सोडली नाही पण तो त्यांचा भ्रम आहे. ह्या पिढीत नाही तर दुस-या किंवा त्याच्या पुढच्या पिढीत सगळे ब्रिटश किंवा अमेरीकन झालेले असणार. जसे काही पिढ्या आधी हिंदू बाटले गेले, बाटवले गेले मुसलमान धर्मात व आता त्यांचेच ३-या ४वथ्या पिढीतले लोक स्वतःला कट्टर मुसलमान म्हणवतात तसेच. सावरकरांची एक ओळ आहे सागरा प्राण तळमळला मध्ये प्रासाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी तिजवीण नको राज्य, मज प्रिया साचा वनवास तिच्या जरि वनिचा भुलविणे व्यर्थ हे आता, रे बहु जिवलग गमते चित्ता, रे तुज सरित्पते जी सरिता, रे त्वद्विरहाची शपथ घालितो तुजला सागरा, प्राण तळमळला ... मी ह्या पंथातला आहे :-) स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण इतके काही वाईट केलेले नाही. ब्रिटीशर्स च्या खाली अजून चांगले झाले असते असे म्हणणा-याला म्हणता येईल पण आपली आयडेंटीटीच राहिली नाही तर चांगले काय व वाईट काय. ,,..... वाचून वाईट वाटून पटकन टंकवले आहे. चू भू द्या घ्या

In reply to by रणजित चितळे

फॉकलॅन्ड युद्धात ऑस्ट्रीयाशी ब्रिटीश सेना जरुर लढली असती... फॉकलंड आयलंडस युद्धात ब्रिटिश सेना आर्जेंटिनाशी लढली..... नाय फक्त तपशील सांगितला, आणि त्या युद्धात आर्जेंटिनाची बाजू बरोबर होती असं आम्हाला वाटतं... बाकीच्या अभिप्रायाबद्दल तुमच्याशी सहमत...

In reply to by पिवळा डांबिस

चूकलो. बरोबर अर्जेटीना, काय कोण जाणे ऑस्ट्रीयाच तोंडात येत होते

ब्रिटिशांचे राज्य राहिले असते तर....... फार फार स्कोप आहे. काहीही लिहायला. ह्याऐवजी गांधीजी अजून जगले असते तर.... किंवा आधुनिक विचरांचे जिन्ना फाळनी झाल्याझाल्या १९४८ ला गेले त्याऐवजी अजून जगले असते तर? आधुनिक दिसणार्‍या तुर्कस्थानच्या वाटेवर त्यांनी पाकिस्तानला नेउन ठेवले असते तर? फार मोठा फरक पडला असता. अगदि त्याच धर्तीवर ब्रिटिश राहिले असते तर हा अगणित पाने चालू शकणारा विषय. मुळात हा प्रश्न टिळक- आगरकर वादाचेच एक रूप आहे. टिळक म्हणाले काहीही करुन स्वातंत्र्य हवे. आगरकर म्हणाले सामाजिक सुधारणांचा अग्रक्रम प्रथम. स्वातंत्र्य वापरायची अक्कलच नसेल तर स्वातंत्र्य मिळून उपयोग काय. ब्रिटिश करताहेत त्याहून वाईट हाल आपण स्वतःचे करुन घेउ. लहानपणापासून टिळकांचेच पटत आले होते; पण.... हल्ली हल्ली आगरकरांच्या म्हणण्याचे महत्व जाणवते. भारत ही एक "व्यवस्था" म्ह़णून काय हे हे जसे जसे जाणवू लागले तसे ह्या गणेशपुत्र गोपाळाच्या म्हणण्याची भूमिका थोडीफार तरी उअमजू लागली. शतकभरापूर्वी हा माणूस हे इतके कसे पाहू शकला ह्याचे आश्चर्य वाटले. एक उदाहरण म्हणून सांगतो, हाँगकाँगमध्ये ब्रिटिश सत्ता परवा परवा पर्यंत १९९७पर्यंत होती! त्यानंतर तिथे चीनी कम्युनिस्ट शासन सुरु झाले. १९९७ ला एक अत्यंत प्रगत, स्थिर, सुशासित अशी अर्थव्यवस्था चीनला आयतीच मिळाली. आज चीन भारताहून आर्थिकदृष्ट्या बराच बलिष्ठ भासतो. भारत अगदि किरकोळ वाटावा इतका त्यांचा व्यापार, निर्यात वगैरे आहे. जागतिक अस्तित्व आहे. हे पाहून "अरेच्चा हे किती तरी पुढं निघून गेले" असं मला सतत वाटायचं. पण भारत - चीन ह्यांच्यातला जो फरक अर्थव्यवस्थेत, आकारत दिसतो, तो प्रामुख्याने हाँगकाँगमुळे आहे. चीनमधून हाँगकाँग काढलं तर तो तितका भयावह (monstrous) आकाराचा वाटत नाही. म्हणजे तो जर भारताच्या चौपट दिसत असेल, तर त्यातून हाँगकाँग काढल्यावर दुप्पटच दिसेल. हाँगकाँग्...जिथे ब्रिटिशांनी १९९७ पर्यंत शासन केलं. बाकीचे फुरसतीत.

मनोबांच्या प्रतिसादाशी १००%सहमत,आगरकर,फुले, शाहु,आंबेडकर यांना अभिप्रेत असणार्‍या सामाजीक सुधारणा कदाचित आणखी मोठ्या प्रमाणात दिसल्या असत्या,या शिवाय ब्रिटीशांच्या येथील शासनाचा आणखी एक महत्वाचा परीनाम म्हणजे १९०९ चा कायदा ,१९१९ चा कायदा व १९३५ चा कायदा या सारख्या कायद्यांमुळे भारतीयांना प्रशासनाचे बहुमुल्य धडे मिळाले,त्याच प्रशासनाच्या अनुभवावर आपण ब्रिटिश येथुन गेल्यानंतरही स्वतंत्र भारताचे प्रशासन सुरळीत चालवु शकलो. अर्थात ब्रिटीशांच्या या सुधारणांच्या मोबदल्यात भारताची प्रंचंड लुट होत होती.याचेही भान ठेवणे महत्वाचे आहे.

अर्थात ब्रिटीशांच्या या सुधारणांच्या मोबदल्यात भारताची प्रंचंड लुट होत होती.याचेही भान ठेवणे महत्वाचे आहे. अत्ता वेगळे काय होतय? निदान लूटीच्या बदल्यात मिळणार्‍या पायाभूत सोयी तरी दर्जेदार मिळाल्या असत्या.... आज रस्ता केला की उद्या गेला वाहून...

जंगलाचे म्हणुन काहि नियम असतात. इथे प्रत्येक प्राण्याला आपल्या शक्ती-स्वभावानुसार एक भुमीका अदा करावी लागते. ब्रिटीशांकीत भारत म्हणजे कोल्ह्याने पाळलेला सिंह. जंगलाचा बाज बिघडतो अशा असमतोलाने. ब्रिटीश राज्य भारतात आणखी काहि काळ टिकणे हे केवळ भारत-ब्रिटन संबंधाने बघता येते नाहि. ब्रिटीशांमध्ये जर त्यांची वसाहत शाबुत ठेवायची शक्ती असती तर ते अमेरीका / रशीया वगैरे देशांच्या तोलामोलाचे राष्ट्र असते.. किंबहुना सुपरपॉवर. या वसाहतींवरील वर्चस्वासाठी त्यांना इतर स्पर्धक राष्ट्रांशी टक्कर द्यावी लागली असती. म्हणजे भारत हा अमेरीका, रशीया, ब्रिटन इ. बैलांच्या झुंडींचे मैदान झाला असता. त्या त्या देशाने आपले हितसंबंधी भारतात तयार केले असते. भारत एक कायम युद्धखोर प्रदेश म्हणुन उदयास आले असते... कदाचीत भारतातल्या प्रादेशीक/भाषीक/जातीय/धार्मीक अस्मीता वेगवेगळ्या राष्ट्रांत विभागल्या गेल्या असत्या. त्याचाच परिणाम म्हणुन लवकरच भारत एक स्वतंत्र देश म्हणुन उदयाला आला असता... पण त्याचा भुगोल वेगळा असता. असा रितीने ढोबळ मानाने भारताचे चार तुकडे पडले असते. दक्षीण तुकडा कदाचीत बर्‍या परिस्थीतीत असता. अती पुर्वेकडील प्रदेश मागास असते. युपी, बिहार वगैरे सर्वात बलवान पण अडाणी प्रदेश असता. पश्चीम भारताने बरी प्रगती केली असती ( गुजरात, महाराष्ट्राचा काहि भाग). दिल्ली, प़जाब, राजस्थान वगैरे राजकारणाचे केंद्रबिंदु असते आणि त्यांनीही प्रगती केली असती. या सर्व गदारोळात शांती-सद्भावाचे पार वाटोळे झाले असते व प्रगत विचारांच्या हिंदु धार्मीय संतांकडुन थोडेफार शांतीचे प्रयोग झाले असते. अर्धवटराव

या सर्व गदारोळात शांती-सद्भावाचे पार वाटोळे झाले असते व प्रगत विचारांच्या हिंदु धार्मीय संतांकडुन थोडेफार शांतीचे प्रयोग झाले असते. हो आणि काही इतर धर्मीयांकडूनही झाले असते.

In reply to by मन१

>>या सर्व गदारोळात शांती-सद्भावाचे पार वाटोळे झाले असते व प्रगत विचारांच्या हिंदु धार्मीय संतांकडुन थोडेफार शांतीचे प्रयोग झाले असते -- या वाक्यातही "काही प्रगत विचारांच्या" असा अर्थ अभिप्रेत आहे... ( प्रगत विचारांचे संत संख्येने "काहिच" असतील) अर्धवटराव

आम्हाला तर अशावेळी फक्त मुसुशेठची सही आठवते. "हिंदुस्थान जर इंग्रजांनी घेतले नसते तर ते फ्रेंचांनी घेतलेच असते. प्रवाहात पडलेली भांडी एकमेकांवर आदळली असता कोणते फुटावयाचे - मातीचे की लोखंडाचे - हे ठरलेले आहे" - वासुदेवशास्त्री खरे

In reply to by परिकथेतील राजकुमार

म्हणजेच भारताचे भले जसे ब्रिटिशांनी केले त्याच धर्तीवर फ्रेंचांनी केले असते का? स्पॅनिश, पोर्चुगिज ह्यापेक्षा फ्रेंच्-ब्रिटिश - अमेरिकन परवडले.

In reply to by मन१

खर्‍यांना माहिती किंवा मुस्सुशेठला. रच्याकने, मिपावरील अमोल खरे हे वासुदेवशास्त्र्यांचे खापर पणतु आहेत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मिपावरील अमोल खरे हे वासुदेवशास्त्र्यांचे खापर पणतु आहेत. हो हे मात्र खरे खरे बरे.

एकंदर ब्रिटीश चांगले होते तर... बर बर असेल आम्हाला काय कळतं त्यात. चार लोक म्हणतात त्याला मान डोलवावी. ते जाऊ द्या नरहर कुरुंदकर काय लिहून गेले हो ब्रिटिशांबद्दल आणि त्यांच्या या सुरेख राजवटीबद्दल ? ;)

आणखी काही विषय.. 1. भारतावर परकीय आक्रमणे झाली नसती तर.. 2. 1857 चा उठाव यशस्वी झाला असता तर.. 3. नेहरुंऎवजी सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर.. 4. संस्थानांचे विलीनीकरण झाले नसते तर..

In reply to by चिगो

१. राजीव ऎवजी सन्जय गान्धि पुढे आले असते तर? २. भुजबळ, राणे, नाइक, राज आज शिवसेनेतच असते तर? बाकी चालुदे...... किणकिनाट प्रस॑ग आणि सोबत पाहुन मी घ॑टा वा ग्लास बनतो पण प्रसन्न आणि मन्जुळ किणकिनाट हवाच..........

In reply to by किणकिनाट

राजीव ऎवजी सन्जय गान्धि पुढे आले असते तर? १)मनेका गांधी रस्त्यावरच्या ऐवजी काँग्रेसच्या कुत्र्यांसाठी कळवळली असती. २) वरूण युवराजांच्या अधिपत्याखाली काँग्रेस विविध राज्यात सपाटून मार खात राहिली असती.

In reply to by कवटी

कुणितरी माझ्या दुसर्या प्रश्नाचे उत्तर द्या. धागा शम्भरी गाठतो का नाही ते पहा...... किणकिनाट प्रस॑ग आणि सोबत पाहुन मी घ॑टा वा ग्लास बनतो पण प्रसन्न आणि मन्जुळ किणकिनाट हवाच..........

जयंत नारळीकरानी " गंगाधरपंतांचे पानीपत" का कथेत अशाच एका गृहितकावर आधारीत लिखणात " पनिपत युद्धात विश्वासराव भाऊ वाचला असता तर अशी कल्पना करून आजचा भारत कसा असता याबद्दल लिहिले आहे. त्यात ते म्हणतात तंत्रज्ञानाच्या रेट्यात भारतातही औद्योगीक क्रान्ती झाली असती.

इथे ब्रिटिश राजवट आली नसती तर वा वर कोणीतरी म्हंटल्याप्रमाणे 1. भारतावर परकीय आक्रमणे झाली नसती तर.. 2. 1857 चा उठाव यशस्वी झाला असता तर.. 3. नेहरुंऎवजी सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर.. 4. संस्थानांचे विलीनीकरण झाले नसते तर.. वगैरे वगैरे.. असा प्रश्न नाही.वा चर्चेचा रोख तो नाही. अशा जर-तर च्या प्रश्नांना काही मरण नाही वा प्रत्येकाचे परिणाम वेगळेच असते. भारतात ब्रिटिश राजवट होती व तिला जाऊन आता ६५ वर्षे पुरी होत आहेत. ही फॅक्ट आहे. गेल्या ६५ वर्षात आपण मिळालेल्या संधीचा किती उपयोग करून घेतला? कितपत प्रगती केली? दुस-या महायुध्दात बेचिराख व नेस्तनाबुत होउन देखील जर्मनी वा जपान ह्यांनी किती मोठी मजल मारली? बाकी प्रतिसाद सवडीने. अभिज्ञ

दुस-या महायुध्दात बेचिराख व नेस्तनाबुत होउन देखील जर्मनी वा जपान ह्यांनी किती मोठी मजल मारली? हा तुलनेचा विषय होउ शकत नाही. जपान वा जर्मनी हे स्वतन्त्र देश होते. हे दोन्ही देश पारतंत्र्यात नव्हते. त्या शिवाय बेचिराख होण्यापूर्वी या दोन्ही देशातील नागरीकांत औद्योगीक मानसिकता भिनली होती. त्यांच्याकडे तंत्रज्ञा उपलब्ध ओते. शिक्षणची योग्य ती व्यवस्था ( आरेखन) होते. भारत त्या मानाने अजून रांगतही नव्हता. कदाचित इंग्रज राहिल्याने सुयोग्य नियोजन आणि अम्मलबजावणीसाठी भारताचे छोट्या छोट्या भागात त्यानी विभाजन केले असते. व त्या त्या भूभागातील लोकानी वेगवेगळ्या विभागात स्वतन्त्रपणे प्रगती केली असती.

In reply to by विजुभाऊ

शिवाय भारतासारख्या diverse culture असलेल्या खंडप्राय देशाची एक धर्म्,एक भाषा असलेल्या जपान्,जर्मनी सोबत तुलना होऊच शकत नाही.

स्वातंत्र्य मिळालं त्या क्षणी अस्तित्वात असलेलं नेतृत्व देशाला भरपूर पुढे घेऊन जाईल अशा पोटेन्शिअलचं होतं पण एका विशिष्ट राजकारणी कारकीर्दीत आपल्या बगलबच्च्यांचा समावेश महत्वाच्या ठिकाणी करणार्‍या व्यक्ती आल्या आणि तिथून एकदम दिशा बिघडली असं वाटतं. मुख्य म्हणजे शैक्षणिक क्षेत्र हा कोणत्याही देशात उत्तम लीडरशिप तयार करणारा कारखाना असतो. तिथल्या क्वालिटी कंट्रोलमुळे देश उभा राहू किंवा कोलॅप्स होऊ शकतो. अन्य क्षेत्रांतला भ्रष्टाचार या शैक्षणिक क्षेत्रात आला की एकूण भवितव्याला गलिच्छ वळण मिळतं. कदाचित आपल्या देशात यथावकाश तसं झालं असावं. एरवी ब्रिटिश असते तर सर्व चांगलं झालं असतं असं नव्हे. तरीही जगातल्या इतर अनेक देशांकडे बघितलं की आपण भारतात आहोत याबद्दल आपल्या नशिबाचे आभार मानावे तेवढे थोडे असं वाटतं. ज्या गुणावगुणांमुळे (सहिष्णुतासदृश) आपण परकीयांकडून सहज जिंकले गेलो आणि प्रगतीच्या दिशेने सर्वांनी एकत्र येऊन तीव्र बदल घडवता आले नाहीत त्याच गुणावगुणांमुळे आपली दशा मध्यपूर्वेतल्या किंवा आफ्रिकेतल्या अनेक राष्ट्रांसारखी झाली नाही हेही खरंच. भारतासारखी नसलेली , कडव्या टोकदार स्वभावाची अनेक राष्ट्रं सतत अस्थिर अशांत धुमसणारी असू शकतात. घडलेल्या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर भारतात जे आहे जसं आहे ते फार उत्तम आहे असं माझं मत आहे.. उद्याच्या जगात टिकलो तर आपणच टिकू असं वाटतं..

In reply to by गवि

परकीयांकडून सहज जिंकले गेलो आणि प्रगतीच्या दिशेने सर्वांनी एकत्र येऊन तीव्र बदल घडवता आले नाहीत त्याच गुणावगुणांमुळे आपली दशा मध्यपूर्वेतल्या किंवा आफ्रिकेतल्या अनेक राष्ट्रांसारखी झाली नाही हेही खरंच. ह्याबद्दल थोडसं. हे गुणावगुण कुठले? रॉबर्ट क्लाइव्हने १७५७ ला प्लासीची लढाई जिंकली आणि इंग्रजांचं राज्य आपल्या देशावर आलं. पण या क्लाइव्हनेच लिहून ठेवलंय की तो विजयी सैन्य घेऊन जेव्हा किल्ल्यात शिरत होता, तेव्हा तिथे जी बघ्यांची गर्दी होती, त्या गर्दीतल्या प्रत्येकाने उचलून एक दगड जरी मारला असता तरी आम्ही सर्व मेलो असतो. ती अक्कल आपल्याला नव्हती म्हणून त्यांनी आपल्यावर राज्य केले. . बॉलीवूडवाले उचक्या दिल्यासारखे जे अचानक भंपक देशभक्ती वगैरे दाखवतात(आता पंधरा ऑगस्टला तर देशभक्ती उतू जाणार आहे, ती उतू इतकी जाइल की लगेच १६ ऑगस्टला संपलेली असेल. सगळे निर्ढावलेले निगरगट्त नि बरेचसे असहाय , अगतिक पुन्हा आपले रहाटागाडगे सुरु करणार. हे करताना आपण थकत नाही; दंगे करत नाही; शस्त्रे हाती घेत नाही ; तोंड दाबून बुक्क्यांचा मार बर्‍या बोलाने खातो ही ती क्वालिटी. एका बाजूने सपशेल लोटांगण वर्ष्ठांपुढे घालायचं आणि कनिष्ठांना पिळून काधायचं म्हटलं की संघर्षाचा असा प्रश्नच नाही; सगळच कसं स्मूथ, शांत, सुबक. अगदि नाकातोंडात पाणी जाउन मेलेल्या प्रेताच्या तरंगणार्‍या शवासारखं गुळगुळीत, लिबलिबीत. ); भारत हा कसा सर्व शूरांचा देश वगैरे आहे असं सांगतात त्यात हे कुणीच सांगत नाही जगातील सर्वाधिक भेकड ही आणि फितूरही इथेच मिळतील. ही ती क्वालिटी.

In reply to by मन१

भारत हा कसा सर्व शूरांचा देश वगैरे आहे असं सांगतात त्यात हे कुणीच सांगत नाही जगातील सर्वाधिक भेकड ही आणि फितूरही इथेच मिळतील. ही ती क्वालिटी.
१००% सहमत. अगदी देशाच्या, राज्याच्या वगैरे सामाजिक पातळीवरून बघायचं झाल्यास, लोकांचं कोणत्याही क्षेत्रातलं मोठेपण हे त्याच मातीत तयार झालेल्या पुढच्या पिढ्यांची अवस्था काय आहे त्यावर ठरतं. भ्रष्टाचारा पासून ते अस्वच्छतेपर्यंत, जातियवादापासून ते अंधश्रद्धेपर्यंत असलेली घाण ही भारतात दोन-चार वर्षात तयार झाली नाहिये. त्यासाठी आधिच्या पिढ्याही जबाबदार आहेत असं माझं परखड मत आहे. अतिअवांतरः पिढ्या वरून आठवलं. परवाच भारतातल्या पुढच्या पिढ्यांविषयी बोलताना शाळेतल्या मुलांच्या निरागसते बद्दल सानेगुरुजी कल्पना असलेल्या शिक्षक मित्रानी सांगितलेला अनुभव. शनिवारी पिटी झाल्यावर राष्ट्रगीत वाजल्यानंतर त्या शाळेत एक साथ "भारत माता की जय!" अशी आरोळी मारण्याची पद्धत. हे म्हणताना प्रत्येकवेळी मैदानात मागं काहितरी थोडा गोंधळ होइ म्हणून एका शनिवारीया हा हळूच मागं जाउन उभा राहिला. त्यावेळी आठवीच्या रांगेतली शेवटची पोरं त्यावेळी "भारत माता की" च्या ऐवजी भारत की X X! असं ओरडत आणि ज्या मागच्या ४०-५० मुला-मुलींना हे ऐकू जात असे ते सगळे फिदीफिदी असत. :( हे ऐकून-बघून मला नैराष्य येतं.