पाकिस्तानातून शांतिसंदेश घेऊन आलेले लोकोत्तर पुरुष जनाब अजमल कसाब ह्यांची बिर्याणी नुकतीच बंद झाल्याचे दु:खद वृत्त कळले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13343396.cms
आपल्या जनजागृतीच्या प्रयत्नाला अनवधानाने किंचित हिंसक स्वरुप लाभून त्यात किरकोळ लोकांची हानी झाली त्याबद्दल ह्या महात्म्याला मृत्युदंड झाला म्हणून ह्या देशाचे शांतिप्रिय पिते स्वर्गात तळमळले असतील ह्यात शंका नाही.
पण सरकारने आपल्या परीने ह्या क्रूर शिक्षेला पुढे ढकलून आपले शांतिपूर्ण हेतू सिद्ध केले आहेतच.
आजपर्यंत ह्या शंतिदूताला त्याच्या आवडीचा मांसाहार पेश केला जात होता. एखाद्या व्ह्यायपीला लाजवेल अशा पद्धतीने ह्या थोर मनुष्याला खाना खिलवायला सहा पोलिसी खानसामे राबत होते. आता त्यांना अन्यत्र हलवले आहे. अर्थात त्यांनी आजपर्यंत दिलेल्या सेवेचा यथोचित सन्मान होईल अशी खात्री बाळगू. काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना ह्या विभूतीच्या मांसाहारामुळे बदहजमी झाली असावी.
निदान मांसाहार बंद करायच्या ह्या क्रूर शिक्षेमुळे ह्या वीराला फाशीसारखी अनावश्यक शिक्षा देण्याचा अनाठायी दुराग्रह नष्ट होईल ही आशा.
इस बहादूर शेर को घासफूस का खाना खिलाना तो मौत से भी बदतर है.
वाचने
1884
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
...
परत तेच
वीट आला की...
In reply to परत तेच by अमृत
आता दिग्गीबाबू उपवास करुन
त्याला सुकर मासाची बिर्याणी