✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पौराणिक विमाने

आ
आनन्दा यांनी
Sat, 04/14/2012 - 19:29  ·  लेख
लेख
सहज जालावर फिरता फिरता काही दुवे मिळाले, त्यावरुन अधिक खोलात जाता पुढील गोष्टी समजल्या. "पेरु" (खायचा नव्हे :) ) देशाच्या पश्चिम किनर्‍यावर म्हणे एक त्रिशूळ कोरलेला आहे, आणि त्या त्रिशूळबद्दल एक असा मतप्रवाह आहे कि तो त्रिशूळ हा विमानांसाठी दिशादर्शक होता त्या काळी... http://blog.travelpod.com/travel-photo/richardandsusie/2007_adventures/1176901560/paracas_trident.jpg/tpod.html अधिक संशोधन करता असे कळले कि त्याच प्रदेशात विमानांच्या काही प्रतिकृती सापडल्या आहेत म्हणे. प. वि. वर्तकानी या सर्वांचा परामर्ष "वास्तव रामयण" या पुस्तकात घेतला आहे... https://sites.google.com/site/vvmpune/other-works/about-trident-peru म्हणजे ख्रिस्तपूर्व काळात खरेच विमाने होती की काय? http://www.2atoms.com/weird/ancient/plane.htm ही म्हणे धावपट्टी असावी http://www.billandcori.com/peru/nazcalines.htm आश्चर्य म्हणजे मी गूगल नकाशात पाहिले असता खरेच काहीतरी अगम्य रेषा दिसतात की!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
78970 वाचन

💬 प्रतिसाद (216)

प्रतिक्रिया

>>बॅटमॅनचा वरचा आख्खाच

बॅटमॅन
Fri, 04/20/2012 - 14:31 नवीन
>>बॅटमॅनचा वरचा आख्खाच प्रतिसाद यूसलेस आहे, पण चुकारतट्टू हा शब्द अती-यूसलेस आहे. कसा काय ब्वॉ?? माझ्या प्रतिसादात चूक असेल तर दाखवा, बाकी मुद्द्यांवरती नंतर बोलू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

नासा

पुण्याचे वटवाघूळ
Fri, 04/20/2012 - 14:45 नवीन
अहो नासा भारतीय भाषांचा अभ्यास करते (त्यातूनच संगणकासाठी संस्कृत ही सगळ्यात योग्य भाषा आहे हे कळले ना?), पुण्यातील वर्तकांचे सूक्ष्मदेहाने मंगळ, शनी, गुरू आणि आणखी कुठे कुठे जाऊन आल्याचे दावे पडताळते इतकेच काय तर भारतातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेऊन कोण शास्त्रज्ञ बनण्यास योग्य आहे हे पण बघते (सौरभ सिंग नावाच्या उत्तर प्रदेशातील बलियाच्या मुलाने हा दावा काही वर्षांपूर्वी केला होता). नासाकडे इतकी महत्वाची कामे आहेत हे संस्कृतीद्वेष्ट्यांना समजत कसे नाही? उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. पुराणात लिहिलेल्या गोष्टींना आव्हान द्यायची हिंमतच कसी होते तुम्हा लोकांची? संस्कृतीद्वेष्टे कुठचे!!
  • Log in or register to post comments

दिल्ली मधला लोह स्तंभ

कपिलमुनी
Fri, 04/20/2012 - 15:19 नवीन
दिल्ली मधला लोह स्तंभ हा प्राचीन भारतीय धातुशास्त्राची साक्ष देत आजही उभा आहे ....
  • Log in or register to post comments

साक्ष वगरै ठिक आहे हो. पण

कवितानागेश
Fri, 04/20/2012 - 15:39 नवीन
साक्ष वगरै ठिक आहे हो. पण अभिमान बाळगलात तर याद राखा!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

शुद्ध भिकारचोटपण आहे

परिकथेतील राजकुमार
Fri, 04/20/2012 - 15:50 नवीन
स्वतःच्या संस्कृतीचा अभिमान नसलेल्या आणि आपल्या निष्ठा परदेशांच्या पायात वाहिलेल्या ह्या बेशरम लोकांना चाबकाने मारले पाहिजे. अहो पार्‍याचे इंधन काय घेऊन बसलात ? वनस्पतीच्या रसापासून आणि पाण्यापासून गाड्या पळवणारे शास्त्रज्ञ ह्याच मातीतले आहेत हे विसरु नका. काही परदेशी इंधन कंपन्यानी हा शोध दाबून टाकला आणि शोधकर्त्यांना धाक दाखवून गप्प केले. सुपरमॅन सुपरमॅन करत आनंदविभोर होऊन उड्या मारणारे आमच्या हनुमानाच्या पराक्रमांना मात्र नाके मुरडतात. बिचारा देशी पडला ना तो. त्याचे कौतुक काय करायचे ? आणि हो तो कोण तो तुमचा अती लोकप्रिय वैग्रे वैग्रे असलेला 'हॅरी पॉटर' आहे ना, ते पात्र तर सरळ सरळ आमच्या 'हरी प्रसाद' वरुन उचललेले आहे. खोटे वाटले तर आमच्या डाण्रावांना विचारा. पुराव्यानिशी साबीत करतील ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

द्विशतक झळकावा रे कोणीतरी

पुण्याचे वटवाघूळ
Sat, 04/21/2012 - 09:56 नवीन
हा १९८ वा प्रतिसाद. आणखी दोन प्रतिसाद देऊन द्विशतक झळकावा रे कोणीतरी.
  • Log in or register to post comments

चर्चेचा सारांश

पैसा
Sat, 04/21/2012 - 10:08 नवीन
चर्चेचा सारांश आणि त्याचा निष्कर्ष सांगा रे कोणीतरी!
  • Log in or register to post comments

कळविण्यास अत्यंत खेद :) वाटतो की,

कवितानागेश
Sat, 04/21/2012 - 11:21 नवीन
कळविण्यास अत्यंत खेद :) वाटतो की, काही अपरिहार्य ;) कारणांमुळे सारांश काढण्याइतकी महत्त्वाची चर्चा या ठिकाणी होउ शकलेली नाही! ( घरी जा रे पोरांनो. :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अरेरे!

पैसा
Sat, 04/21/2012 - 11:45 नवीन
म्हणजे आता मला एक तर सगळ्या प्रतिक्रिया वाचाव्या लागणार आणि तुमच्या "नाजुका लाईन्सचं काय झालं" हेही गुलदस्त्यातच राहिलं तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

?

विकास
Sat, 04/21/2012 - 17:34 नवीन
चर्चेचा सारांश आणि त्याचा निष्कर्ष सांगा रे कोणीतरी! ही तर केवळ चित्रपटांची नावे आहेत... सारांश ह्या हिंदी आणि निष्कर्ष या क्न्नड चित्रपटांचा पौराणिक विमानांशी काय संबंध?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अगंबै!! हा घ्या २००वा.

शिल्पा ब
Sat, 04/21/2012 - 11:05 नवीन
अगंबै!! हा घ्या २००वा.
  • Log in or register to post comments

आनन्दा कुठे आहेत?

पुण्याचे वटवाघूळ
Sat, 04/21/2012 - 15:15 नवीन
द्विशतकाबद्दल सर्वांचे अभिनंदन. पण एक प्रश्नः या उत्कंठावर्धक चर्चेची सुरवात करणारे "आनन्दा" कुठे गायब झाले? की ते पुराणकालीन विमानात बसून पसार झाले?
  • Log in or register to post comments

टींगल करणार्याकडे

शाहिर
Wed, 04/25/2012 - 15:03 नवीन
http://www.world-mysteries.com/sar_11.htm व अशा अनेक उदाहरणांची ( http://www.world-mysteries.com/ ) उत्तरे नसतात ... कदाचित ९० % उदाहरणे ताणलेली असतील..पण जी १०% उदाहरणे असतात ती नीट तपासली तर बरेच काही गवसते ... पण जसे सनातनी डोल्यावर पुराणांचा पडदा टाकतात आणि सर्व होते म्हणतात तसेच विज्ञान वादी सुद्धा त्यांच्या उदाहरणांची टींगल करतात ..पण पुराव्यानिशी खोडत नाही... उदा :http://www.world-mysteries.com/sar_1.htm हा नकाशा आणि विमाने http://www.world-mysteries.com/sar_7.htm फक्त भारत च नाही तर इतर देशामध्ये सुद्धा
  • Log in or register to post comments

लैच ऊंच उडालं की या धाग्याचं

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/25/2012 - 14:59 नवीन
लैच ऊंच उडालं की या धाग्याचं इमान ;-) Image removed.
  • Log in or register to post comments

या धाग्यावरील चर्चा

सर टोबी
Wed, 07/27/2022 - 15:28 नवीन
या धाग्यावरील चर्चा आज वाचली आणि केवळ आश्चर्य वाटले. एखाद्या सामाजिक स्थित्यंतरासाठी दहा वर्षाचा काळ हा प्रगती अथवा अधोगती मोजण्यासाठी फार कमी आहे. म्हणजे या काळात आपण अधोगतीने जात असल्यास हि अधोगती समाजाला पेलवणार नाही इतक्या वेगाने होत आहे असे खेदाने म्हणावे लागेल. या धाग्यात प्रगतिशील, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणाऱ्यांची फुरोगामी, लिब्रान्डु अशी संभावना झाली नाही किंवा हिंदू असण्याची लाज वाटते का असा मुजोरपणाचा प्रश्न विचारला गेला नाही. सद्य काळात येता जाता द्वेषाच्या पिंक टाकणारे अथवा गरळ ओकणारे प्रसिध्ध आइडी देखील त्या दिवसांमध्ये बरेच सभ्य प्रतिसाद देत होते असे दिसते. जाता जाता: माशेलकरांच्या हळद विषयक बौद्धिक स्वामित्वाविषयी देवदत्त दाभोलकर, जे स्वतः एक संशोधक आहेत, खिल्ली उडवित असत. अंटार्क्टिकावर संशोधन करण्यासाठी उभारलेल्या लाकडी इमारतींना तेथील तीव्र सूर्यप्रकाशामुळे आग लागू नये असे वार्निश तयार करण्याची जबाबदारी सोडून तुलनेने निरुपयोगी (हळदीचा त्वचेवरील उपचारात जंतुनाशक म्हणून उपयोग सिध्ध्द करणे, ज्या साठी पर्यायी उपचार अगोदरच ज्ञात आहेत) संशोधन करण्याचं काम माशेलकरांनी केले असा गंभीर आक्षेप त्यांनी घेतला होता.
  • Log in or register to post comments

जबरदस्त चर्चा आहे.

Trump
Wed, 07/27/2022 - 16:17 नवीन
जबरदस्त चर्चा आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा