Skip to main content

वाजवा रे वाजवा, कलमाडी पुण्यात आला!

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 05/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.esakal.com/eSakal/20120204/5163698292591074375.htm वाजवा रे वाजवा, आपला कलमाडी सुटला आणि पुण्यात पोचला. पुणेकरांच्या अकलेचे दिवाळे आणि अब्रूचे खोबरे करुन झाले. आता मनपाच्या विलेक्शनमधे पैसे खायाला आला रे आला. चला चला चला सुरेशभाईंच्या पाया पडू आणि तिकिटाची भीक मागू ! चला चला बिगी बिगी. लाजू नगा. मागं र्हावू नगा. जेलमदून भाईर आल्यावर समदे साफच असत्यात.

वाचने 3474
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

हेss...ढिंक चिका...ढिंक चिका...ढिंक चिका...ढिंक चिका...हैss हैss हैss...एss एss एss ज्या माणसाचा कल-माडी बांधण्याकडेच आहे...(हो त्यात तो एक नंबर आहे..) त्याला अनुकुल शासनव्यवस्थेत या पेक्षा दुसरे काय होणार..?

In reply to by पक पक पक

पण मतदारांचा कल 'माडी ' पिउन मतदान करण्याकडे असेल तर......? Wink हाहाहा हाहाहा पक पक पक'जी... हा शब्दच्छल आवडला!!!!!! :) _____________

"हे सरकार भ्रष्ट सरकार आहे. जनता यांना धडा शिकवल्या खेरीज राहणार नाही.(हे,करारा जवाब मिलेगा ...मनोज वाजपेई च्या इष्टाइलमध्ये)" अस कायसं समजून चला म्हणजे सुज्ञ पुणेकर हेच करतील हि अपेक्षा. म्हणजे त्यांनी उद्या-माडी (कलमाडी) बांधली काय किंवा झुकतं माप-माडीकडे (पुन्हा कलमाडी, पण हा झुकाव माडी के ओर.. प्यायची बरं का !) दिल तरी काय उखडून घेणार ?

जाउ द्या हो हुप्प्याजी! जसे लोक तसे त्यांचे प्रतिनिधी. कसं?

मागे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एका मित्राने डेक्कन हेराल्डमध्ये प्रसिद्ध झालेला एक लेख पाठवला होता. त्याचीच पुन्हा आठवण झाली. "लायकीप्रमाणेच सरकार मिळतं असा गोषवारा त्यात आहे. तो इथे द्यावासा वाटला." संपूर्ण लेख इथे वाचता येईल.. !!

अजून हा प्राणी कॉन्ग्रेसमधे आहे की 'पक्षशिस्ती'खाली काढला? आता त्यांचे सिद्धिविनायक्,शिरडीला जावून तेथे पूजा करतानाचे फोटू येत्या आठवड्यात बघुया.

माननीय खा. श्री. सुरेश कलमाडी हे जरी काही भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अल्प काळ तुरुंगवासात असले तरी तो तुरुंगवास त्यांना शिक्षा म्हणून झालेला नाही. ते प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे. भारताचे माजी अर्थमंत्री अणि विद्यमान गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या उदाहरणावरून असे दिसते की भारतातील न्यायालये योग्य तो निर्णय घेतातच! शेवटी नैतिक जबाबदारी म्हणजे आर्थिक आणि कायदेशीर जबाबदारी नव्हे. काही महत्त्वाचे निर्णय घेताना झालेली हलगर्जी अथवा दुर्लक्ष म्हणजे प्रत्यक्ष भ्रष्टाचार किंवा आर्थिक गुन्हा नव्हे हे सर्वांनी स्पष्टपणे लक्षात घेतले पाहिजे. तेव्हा अजूनतरी श्री. सुरेश कलमाडी यांच्यावरचा कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. दुसरे असे की काही झाले तरी ते अजूनही खासदार आहेत. काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदावरून त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांची काँग्रेस पक्षातून हाकालपट्टी झालेली नाही. एका जबाबदार राष्ट्रीय पक्षाचा खासदार म्हणजे काही रस्त्याकडेला बेशुद्ध पडलेला बेवडा नव्हे. अशा व्यक्तीसाठी एकेरी संबोधन योग्य नव्हे. त्यांचे दिवस काही काळापुरते फिरलेले आहेत. भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे उदाहरण काही लोक इतक्या लवकर विसरतात हे पाहून आश्चर्य वाटले.

In reply to by विसुनाना

सन्धीसाधूपणे कलमाडीन्वर जोरदार शेरेबाजी चालू आहे. ती करणार्यापैकी बरेच राजकारणी 'कलमाडी परवडले' या कॅटेगरीतलेच आहेत असाही एक मतप्रवाह आहे. असो.

In reply to by मूकवाचक

कॉन्ग्रेस --> समाजवादी कॉन्ग्रेस ---> पुणे विकास आघाडी--> कॉन्ग्रेस असा प्रवास करणारे आदरणीय कलमाडी संधीसाधू नाहीत असे म्हणायचे आहे का? जनतेची (साई) सर्विस कशी करायची हे कलमाडी उत्तम जाणतात. (एके काळी पूना कॉफी हाउसमधे कॉफी पिणारा) चिरोटा

In reply to by विसुनाना

मराठी भाषेत एकवचनापेक्षाही खालच्या दर्जाचे काही वापरता येत नाही म्हणून ह्या भ्रष्टाचाराचे शेण खाल्लेल्या किड्याला अरे तुरे करावे लागले ह्याबद्दल क्षमस्व. कसाब आणि गुरुच्या शिक्षेची अंमलबजावणी करताना जी तत्परता दिसते आहे त्यावरून आपली न्यायालये किती चपळ आहेत ते कळतेच आहे. पण न्यायालय जेव्हा केव्हा निर्णय घेतील तो घेतील. पुणेकरांनी ह्या हलकटाला राजीनामा द्यायला भाग पाडावे अशी इच्छा आहे.

हिंदुस्थानात भ्रष्टाचार हा शिष्ठाचार झाला आहे असं आता माझे ठाम मत झाले आहे. :( कलमाडींची निवडणुकींच्या काळातच सुटका कशी झाली ? याचे मला नवल वाटत आहे ! असो... न्याय व्यवस्थेवरचा माझ्या विश्वास अजुन उठलेला नाही. बाकी कलमाडींचे जंगी स्वागत झाले त्यावरुन स्वागत करणारी मंडळी काय विचारांची असतील याचा बोध झाला ! जगात आपल्या देशाचे नाव ज्यामुळे काळवंडले गेले त्याच व्यक्तीचे जंगी स्वागत ? तसेही कॉग्रेसला नितीमत्तेची काही चाड राहिलेली दिसत नाही...कारण ठाण्यात चक्क गुंडांना उमेदवारी देण्याचा पराक्रम केला आहे ! कुख्यात गुंड राजा गवारी याच्यापाठोपाठ काँग्रेसमध्ये अनू आंग्रे या गुंडाने अल्वा यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. संदर्भ :--- http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=1584… देशातल्या अराजकतेचे चित्र आता सुस्पस्ट झाले आहे ! :( जाता-जाता :- इतके वर्ष झाली तरी सर्व पक्ष विकास करत आहेत ! कोणाचा ? इथे महाराष्ट्रात भुकंपात जितके लोक मेले नसतील तितके रस्त्यांच्या अपघातात ठार झाले आहेत ! जगातील सर्वाधिक रस्ते अपघात हिंदुस्थानात होतात्,त्यातही आपला महाराष्ट्र आघाडीवर आहे ! :( रस्ते नाही,पाणी नाही,लोड शेडिंग शिवाय दिवस जात नाही, तरी विकास होतोय ! कोणाचा ? :( संदर्भ :--- http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=20…