Skip to main content

"साहेब" आता निवृत्त होणार काय???

लेखक चेतनकुलकर्णी_85 यांनी रविवार, 29/01/2012 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच सकाळी सकळी चहा पिताना हि बातमी वाचली .... http://esakal.com/eSakal/20120129/5355751858605295094.htm पवार साहेब म्हणे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत म्हणे.. तसेच राज्यसभेवर जाऊन जनतेचे पैसे पण वाया घालवणार नाहीयेत... आपल्याला काय वाटते? बोलल्या शब्दाला जागतील कि जसे वेगळ पक्ष काढून पण सोनिया चे पाय धरले तसे करतील?? अवांतर : मला तर असे वाटते कि स्विस बँकेने आता जास्त काळा पैसा जमा करण्यावर असमर्थता व्यक्त केली असेल......

वाचने 5897
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

In reply to by आशु जोग

अश्या लोकांनी व त्यांच्या पिलावळीने राजकारणच काय लवकरात लवकर हे जग हि सोडून जायला हवे ... टपाल तिकीट ते क्रिकेट हा त्यांचा प्रवास सर्वांनाच माहित आहे.....

काय राव.... नुसती बातमी लिंकवून धागा काढायचा? काय बोलणार.....चालू द्या !! अवांतर - मिपाच्या २०१२ च्या डायऱ्या आल्या काय? खूप जणांना भेट देता येतील.

In reply to by सुहास झेले

काय राव.... नुसती बातमी लिंकवून धागा काढायचा? काय बोलणार.....चालू द्या !! गप्पं बसायचं ठरवलं आहे. -दिलीप बिरुटे

मिपाचे साहेब मिपा सोडणार, मिपावरून निवृत्त होणार असाही धागा लवकरच येवू पाहत आहे -- काय करणार तुका म्हणे उगी रहावे| जे जे होइल ते ते पहावे ||

अश्या लोकांनी व त्यांच्या पिलावळीने राजकारणच काय लवकरात लवकर हे जग हि सोडून जायला हवे ... भ्रष्टाचाराच्या बोळातील त्यांचा प्रदीर्घ प्रवास हा सर्वश्रुतच आहे....

चेतनजी एकच सांगतो. एक चांगला पर्याय महाराष्ट्रात आणि देशात उभा करा या लोकांचे महत्व आपोआप कमी होत जाइल

In reply to by आशु जोग

साहेब एवढे हुशार आहेत ती त्यांनी आधीच राज्यात व दिल्लीत त्यांचे वारसदार तयार करून ठेवलेत....

In reply to by चेतनकुलकर्णी_85

अनेकांच्यामते त्यांना अनेक पुढे होणा-या गोष्टी आधीच समजतात. त्यामुळे असा निर्णय घेतला असावा. देव करो आणि साहेब "लोकाग्रहा"पुढे न झुकता निर्णयावर ठाम राहोत.

In reply to by चिंतामणी

साहेब जेव्हा "नाही नाही " म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ "हो" असा असतो. तेव्हा समजदार लोकानी समजुन घ्यावे कय ते.

@पवार साहेब म्हणे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत म्हणे..>>> पाठ-बळ नसल्यामुळे त्रास होत असेल अता उभं र्‍हायला... ;-) होतं असं..वयाचा परिणाम,,,दुसरं काय..? ;-)

साहेब जग सोडुन गेले तरी काही हरकत नाही माझी..!!

स्टार माझा वर साहेबांची मुलाखात बघा , फार च प्रेरणादायक आहे. http://www.youtube.com/watch?v=6abGGd-Z8p8&feature=share वयाच्या २२ व्या वर्षापासुन ( च्यायला कोण रे तो २ + २ म्हणतोय ) साहेब राजकारणात आहे म्हटलं.

काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही . दुर्लक्ष करायचे , गप्प रहायचे हा त्यांचा स़ंदेश विसरणार नाही.

मग आता पुढचा 'मराठा स्ट्रॉन्गमॅन ' कोण? आदरणीय अजित पवार की सुकन्या सुप्रिया सुळे? बहुदा गादी सु.सु.सु. कडे जाईल. पुतणे कंपनी राजकारणात काकांचा घात करते असा अनुभव आहे.

चिरोटा बाबू , पुतण्याचा घात करणारे काका इतिहासापासून आहेत. वडीलांचा घात करणारे ही इतिहासात आहेत. भावाला कैदेत ठेवणारेही आहेत.

ते आता 'वर' जाणार आहेत.... म्हणजे वरच्या वर्गात जाणार आहेत. मागल्या दाराने राज्यसभेत जातील नायतर फुडल्या येळंला 'उप्राष्ट्रपती'पदाचा चा चानस घेतील (पंतप्रधान व्हायचं तर र्‍हायलंच आता, निदान त्ये तरी का सोडाव?)

फारच छान प्रतिक्रीया वाचायला मिळाल्यात . काय करणार जो तो आपापल्या कोषात , स्वप्नरजन करतोय,दुसरे काय .पवार साहेबाचे ही काही स्वप्नरजन करत असतील .ज्याचे त्याचे जग निरनिराळे ...

In reply to by अशोक पतिल

.पवार साहेबाचे ही काही स्वप्नरजन करत असतील . हल्ली हरविंदर सिन्ग येतो म्हणे त्यांच्या स्वप्नात.. ;)

In reply to by पक पक पक

काय सांगता..?? साहेबांच्या "तसल्या" आवडी निवडी पण इतक्या बदलल्या काय?? :O

देव, गॉड इ. इ सचिन तेंडुलकर वर पण काढा. फक्त लिंक बदलावी लागेल. (अवांतरः ह्या साहेब लोकांपेक्षा त्यांना डोक्यावर घेऊन नाचणार्‍यांचा जास्त वीट आला आहे. ह्यांना स्वःताची आयुष्य नाहीच का? का हमाला सारखं डोक्यावर काही घेतल्या शिवाय चैन पडत नाही? )