नमस्कार,
मिपाच्या धोरणाचा थोडासा आधार घेत आम्ही खालील शंकानिरसन करून घेऊ इच्छितो आणि त्याबाबत थोडेफार साक्षर व माहीतगार होऊ इच्छितो. जाणकारांनी कृपया प्रतिसाद देत सदर चर्चेत अवश्य भाग घ्यावा व माहिती पुरवावी ही विनंती -
आजच्या घडीला सामान्य माणुस आणि अन्य सदस्य मिपावर कार्यरत आहेत. त्यामुळे टाईम पास करण्याचे आपले बरेचसे काम सुकर झाले आहे हे नाकारता येणार नाही.
समजा आपल्याला डोक्याला वैताग आलेला आहे काय करावे हे माहिती नाही; आणि म्हणून आपण मिपाच्या शोधयंत्रात वल्ली हा शब्द टंकीत केला तर क्षणार्धात काही धागे, छायाचित्रांची माहिती आपल्या पुढ्यात येते. यात जगभराच्या लेण्या, किल्ले, विडंबने इत्यादी नानाविध माहितीचा खजिना आपल्यापुढे उघडला जातो. परंतु हे झाले दिलेल्या वल्ली ह्या शब्दावरून माहिती पुरवण्याचे गुगलचे / मिपाचे कसब. परंतु आमचा प्रश्न निराळाच आहे. तो असा -
मिपात असे चांगले लेखन शोधता येते त्याप्रमाणे टुकार धागे टाळण्याची सोय का नाही???
आम्ही आमचा मुद्दा वरीलप्रमाणे उदाहरणाद्वारे अजून थोडा स्पष्ट करू इच्छितो. समजा आमच्या नवे लेखन पेज वर सर्व लेख उपलब्ध आहेत. परंतु कोणता चांगला कोणता टुकार हे जर आम्हाला माहीत नसेल तर मग मिपाच्या शोधयंत्रात सदर (टुकार धागे काढणार्या) आयडीची माहिती चढवून 'वाजवा' या पर्यायावर कळ दाबता का येऊ नये? मिपा संमं नवे लेखन त्यानुसार त्या शब्दासंबंधी जमेल तितकी माहिती पुरवण्याचा प्रयत्न करते त्याप्रमाणे ते असे टुकार आय डी ओळखून त्यानुसार माहिती पुरवण्यास आजच्या घडीला असमर्थ का?, हा आमचा सवाल आहे.
या अनुषंगाने काही स्वाभाविक प्रश्न -
१) अशा टुकार सदस्यांचा शोध घेण्याचे तंत्र अद्याप विकसितच झालेले नाही? किंबहुना तसा अद्याप विचारच झालेला नाही?
२) किंवा तसे प्रयत्न सुरू आहेत?
३) किंवा या संदर्भातील तांत्रिक आव्हानांना अद्याप सारे प्रयत्नशील तंत्रज्ञ अपुरे पडत आहेत/पडले आहेत..?
कृपया या विषयाबाबत येथे विषयाला अनुसरूनच विस्तृत बाजार उठावा. सुसंबद्ध प्रतिसाद देणार्यांना आकाशातल्या ईश्वराने तूर्तास क्षमा करावी .
ता. क. - सामान्य माणूस यांसारख्या सन्माननीय मिपा सभासदांनी स्वतंत्र लेखन केल्यास तो निश्चितच एक निखळ विरंगुळ्याचा धागा ठरावा, अशी आम्हाला आशा आहे.
वाचने
2277
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
विडंबन ही एक कला आहे ..
In reply to :) by प्रचेतस
@(गहने का विचार करणारी
In reply to विडंबन ही एक कला आहे .. by गणेशा
(गहन विचार करणार्या
In reply to :) by प्रचेतस
=))
बोंबला!!
In reply to =)) by पैसा
मिपा - शोध
आनंद आहे,
फुटलो
मस्त..
चान चान...
आवडले