✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

फार झोप येते राव.

व
वारा यांनी
Sat, 01/14/2012 - 15:15  ·  लेख
लेख
आजकाल फार झोप येते राव. ऑफीसात आल्यावरचे पहीले दोन अडीच तास कसे तरी जातात. मग लंच टाईमची वाट बघत बसाव लागत. ईतर लोक फोन वर बरच काहीतरी बोलत असतात. मार्केटींग वाले कस्ट्मर ना पिडुन पिडुन ऑर्डर ओढायचा प्रयत्न करतात. यांची पर्सेंटेजची गणित.......आग आई आई आई.......(जांभई)... रिकव्हरीवाले पेमेंट्साठी क्लायंटला पिडतात. सपोर्ट वाले सारखे साईट वर पळत असतात . साईट वर जाऊन काय करतात काय माहीत? .. बरच मटेरीयल पाठीवर असत त्यांच्या....अरे बापरे आज चहावाला जरा लेटच आलाय.... मॅनेजर ऑफीसात दोन तीन तासच येतो, चार पाच ईन्स्ट्रक्शन देतो , रिकव्हरी वाल्याला दोन चार शिव्या घालतो आणि गुजराती मधे काहीतरी बडबडत ब्लॅकबेरी कानाला लाउन गायब होतो. माझ्यासाठी आजही काहीच काम नाही, बर झाल एक दिवस अजुन पुढे. माझी सगळी काम करुन झालीत की माझ्या लायकीच काम कमी झालय, असो चला जेवायची वेळ झाली. काय काय दीलय आज बायकोनं? बटाट्यची भाजी, पोळी, लोणच, दही भात. वा वा वा... मस्त चाटुन पुसुन खाउ. आब्बब्ब वाईट. क्रमशः
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5276 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

धाग्यावरती लक्ष ठेवून आहे..

मोदक
Sat, 01/14/2012 - 15:28 नवीन
(सेहवाग जसा तंबूत परत जाण्याची घाई करतो तसे) लिखाण खूप लवकर आटोपते घेतले आहे..
  • Log in or register to post comments

झोप आली असेन हो,एकंदरीतच

पक पक पक
Sat, 01/14/2012 - 23:05 नवीन
झोप आली असेन हो,एकंदरीतच कामाचा कंटाळा दुसर काय..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

उत्सुकता

नरेश_
Sat, 01/14/2012 - 18:25 नवीन
ताss णss ली गेली आहे. लवकरात लवकर लिहा. पुभाप्र. तोपर्यंत एक निवांत डुलकी घ्यावी म्हणतो. :) (झोपाळू )- नरेश. हवांतर : तुमच्या ऑफिसमध्ये संगणक वापरण्यावर बंदी तर नाहीये ना? कारण लेखन फारच त्रोटक आणि घाईघाईने संपवल्यागत वाटतेय. :)
  • Log in or register to post comments

हायला!

sagarpdy
Sat, 01/14/2012 - 17:29 नवीन
हायला! आत्ताच झोपून उठलो होतो. परत जाऊन झोपतो :)
  • Log in or register to post comments

झोप येतेय?

प्रभाकर पेठकर
Sat, 01/14/2012 - 18:02 नवीन
मधुमेहाची चाचणी करून घ्या.
  • Log in or register to post comments

ZzzzzzZzzzzzZzzzzz

सानिकास्वप्निल
Sat, 01/14/2012 - 18:21 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

आरारारारा...

नरेश_
Sat, 01/14/2012 - 18:32 नवीन
सानिकातै डाराडूर ? तरी सांगत होतो, जास्त कॅलरीदार पदार्थ खात नको जाऊ म्हणून... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानिकास्वप्निल

ऑ....आय्य आइ आइ इ ग

पियुशा
Sun, 01/15/2012 - 11:34 नवीन
Image removed. ऑ....आय्य आइ आइ इ ग ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानिकास्वप्निल

खरंय... लई झोप येते राव....

सुहास झेले
Sat, 01/14/2012 - 18:36 नवीन
Image removed. म्यानेजरच्या तोंडावर ए४ मारावा म्हणतो..... लवकरचं अनुभव लिहितो मिपावर ;) :)
  • Log in or register to post comments

कोठेतरी वळचणीला जाउन पडाव

पक पक पक
Sat, 01/14/2012 - 19:57 नवीन
कोठेतरी वळचणीला जाउन पडाव निवांत, हाय काय अन नाय काय..?
  • Log in or register to post comments

किती झोप येते आहे ते असं मोजू शकाल...

बहुगुणी
Sun, 01/15/2012 - 08:14 नवीन
किती जागे आहात किंवा किती दमला आहात ते PVT (psychomotor vigilance test) या परीक्षेने कळू शकेल.
  • Log in or register to post comments

मला वाटलं एखादी लावणी वगैरे

५० फक्त
Sun, 01/15/2012 - 12:24 नवीन
मला वाटलं एखादी लावणी वगैरे आहे की काय, फार झोप येते राव मला मिठिमंदं घ्यावं घोड्यावर बसवावं मग समदे म्हणतील वाव जाउदे, वर सुहास म्हणतोय तसं करा, एखादा ए४ टाका म्यानेजरच्या तोंडावर मग बघा, ऑफिसातच काय घरी पण झोप येणार नाही .
  • Log in or register to post comments

फार झोप येते राव मला मिठिमंदं

पक पक पक
Sun, 01/15/2012 - 15:43 नवीन
फार झोप येते राव मला मिठिमंदं घ्यावं घोड्यावर बसवावं मग समदे म्हणतील वाव ५० राव, यमक जुळले आहे पण अगदीच आव जाव घर तुम्हारा सारख वाट्ल.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

बटाट्यची भाजी, पोळी, लोणच,

सूड
Sun, 01/15/2012 - 17:56 नवीन
बटाट्यची भाजी, पोळी, लोणच, दही भात. वा वा वा... मस्त चाटुन पुसुन खाउ. सपे का ?
  • Log in or register to post comments

काय रे सूड, नीट वाच की !!

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 01/16/2012 - 05:58 नवीन
काय रे सूड, नीट वाच की !! बटाट्यची भाजी + पोळी किंवा लोणच + दही भात असे नाही आहे ते. डब्ब्यात चक्क चार चार पदार्थ..... सपे कसे शक्य आहे ? ज्या शहरात राहता त्याबद्दलचा अभ्यास वाढवा ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हापिसात झोप येणे हा बर्‍याच

मराठमोळा
Mon, 01/16/2012 - 06:11 नवीन
हापिसात झोप येणे हा बर्‍याच पुरुष मंडळींचा कॉमन प्रॉब्लेम असावा. ;) रात्री "जागरण- गोंधळ" करणे, दुपारी चमचमीत खाणे, कामाचा कंटाळा अशा बर्‍याच गोष्टी यामागे असू शकतात.. हापिसात नुसते झोपणारे नव्हे तर घोरणारे महाभाग पाहिले आहेत. बर्‍याचशा हापिसात स्त्रियांसाठी सुविधा उपलब्ध असते पण पुरुषांना बसल्या बसल्या खुर्चीतच/रिकाम्या मीटींग रुममधे किंवा टॉयलेट मधे बसून झोपता काढावी लगते असे निरिक्षण नोंदवतो आणि पुरुषांनादेखील (बहुतांश चायनीज कंपन्यांप्रमाणे) झोपण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी असे मत नोंदवतो ;)
  • Log in or register to post comments

सॅलड

चिरोटा
Mon, 01/16/2012 - 11:16 नवीन
आजकाल फार झोप येते राव
धै भात्,बटाटाची तळसावलेली भाजी खावून आणखी झोप येईल. त्यात बायका भाजी चवदार बनवण्यासाठी जास्त तेल ओततात.बायकोला सॅलड द्यायला सांगा. चिरलेला कोबी+शिजवलेली कडधान्ये,संत्रे/मोसंबे,टोमॅटो..... मग बघा कसे तर्तरीत व्हाल.
  • Log in or register to post comments

वारा यांना धन्यवाद!!

स्वातीविशु
Mon, 01/16/2012 - 13:03 नवीन
सर्वांची नस बरोबर पकड्ल्याबद्द्ल.........आमच्या हापिसात कामाचा दिवस भरणे म्ह्न्जे दोन पंच......एक लंच असे म्हनन्याची परंपरा निर्माण होत आहे. ए४ मारायचा होता..........पण खुद्द मॅनेजरच ए४ मारुन गेला......(अर्थात वेगळे कारण देउन......) हाय रे नसिबा........... पेपर टाकण्याच्या प्रतिक्षेत..........आ........आइ$$$$ग$$$$$....आ.......
  • Log in or register to post comments

पूर्ण झोपाळलेल्या धाग्यावर

अत्रुप्त आत्मा
Mon, 01/16/2012 - 16:05 नवीन
पूर्ण झोपाळलेल्या धाग्यावर आंम्हीही आलो.... Image removed.
  • Log in or register to post comments

भावना.....

वारा
Mon, 01/16/2012 - 17:42 नवीन
वा वा वा..... आपल्या भावना बर्याच लोकांपर्यंत पोहोचलेल्या बघुन भडभडुन आलं.. समस्त प्रतिसाद कर्त्यांना धन्यवाद व पुढील लेखनाचा उत्साह वाढ्वुन झोपेतुन जाग केल्याबद्द्ल अनेक आभार. लवकरच लिहु..
  • Log in or register to post comments

एक बरे आहे ..

सुधीर मुतालीक
Mon, 01/16/2012 - 18:50 नवीन
हे एक बरे आहे की माझ्या हापिसात तुमच्या पैकी कुणी झोपाळू नाही ! लेखन छान.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा