मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

च्यायला ह्यांच्या..

यकु · · काथ्याकूट
सचिन तेंडुलकर मानसिकदृष्ट्या कमकुवतः ग्रेग चॅपल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा अनेक प्रसंगी मानसिक दृष्ट्या कमकुवत दिसून आल्याचे मत नोंदवले आहे टींम इंडियाचे माजी प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार ग्रेग चॅपल याने. चॅपल यांनी त्यांच्या ‘ फियर्स फोकस ’ या आगामी आत्मचरित्रात सचिनबाबते हे निरिक्षण नोंदविले आहे. ‘ हेरॉल्ड सन ’ ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने या आशयाचे वृत्त प्रकाशित केले आहे. इति ग्रेग चॅपेल व्हाया हेरॉल्ड सन व्हाया म.टा. आता असेलही येत सचिनला ताण सगळ्या गोष्टींचा.. मोठा माणूस तो... तसा कुणाला येत नसतो.. पण चॅपेल बडबडला.. त्यातुन तो पडला आमचा सचिन... झालीन् एक सनसनाटी बातमी तयार.. अर्थात ती कोण करणार तर म.टा..! बाकी सचिनला वेठीस धरुन सनसनाटी बातम्या करणारा कोण म.टा.ला गावलाय कुणास ठावे.. शोएब झाला, चॅपल झाला आणखी कुणी लुंगासुंगा गावतोय का सचिनला चिमटे घेणारा बघा..

वाचने 5317 वाचनखूण प्रतिक्रिया 24

पैसा 24/10/2011 - 22:46
कितपत लक्ष द्यावं प्रश्नच आहे!! हाथी चाले अपनी चाल....

चिरोटा 25/10/2011 - 01:13
चॅपल ह्यांनी तसे आत्मचरित्रात मत नोंदवले आहे. त्यात गैर काय आहे? चॅपेल म्हणजे कोणी गल्लीबोळातले क्रिकेटपटू नाहीत. म.टा.वाल्यांचा हळूच काडी लावण्याचा उद्दोग जुना आहे.त्याकडे दुर्लक्ष केलेले बरें.

In reply to by चिरोटा

यकु 25/10/2011 - 02:23
म.टा. हळूच काड्या लावतो.. त्याकडे दुर्लक्ष करायला हवं हे ठीक.
चॅपल ह्यांनी तसे आत्मचरित्रात मत नोंदवले आहे. त्यात गैर काय आहे? चॅपेल म्हणजे कोणी गल्लीबोळातले क्रिकेटपटू नाहीत.
टेन्शन आल्याने (पक्षी मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याने) दारू पिऊन सचिनने धिंगाणा घातलाय.... हे मी तरी कुठे वाचलेलं नाही.. मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे म्हणून सचिन मैदानावर कुणावर ओरड्लाय.. हे पण कधी ऐकले नाही.. त्यानं मानसिकदृष्ट्या कमकुवतीतून आजी-माजी सहकाऱ्यांवर आरोप केलेत.. हे पण कधी ऐकण्यात नाही.. मानसिकदृष्ट्या कमकुवतपणा आला म्हणून त्यानं खेळ करायला नकार दिलाय.. हे पण कधी ऐकलं नाही.. बाकी सचिनची सकारात्मक बाजू मज पामराने काय मांडावी ? इकडे तिकडे न पाहता तो हेडफोन लाऊन बसला आणि डॉन ब्रॅडमनकडून नसतील एवढ्या अपेक्षांचे ओझे सचिन वागवतो.. हरवलेल्या फॉर्मबद्दल चिंतीत होऊन २ तास बोलत बसला..म्हणून तो मानसिकदृष्ट्या कमकुवत? हे पटतंय? फर्स्ट्पोस्ट.कॉमवरुन “When the team travelled, he would snap on his headphones, not look sideways, and shut it all out. Not even Don Bradman carried expectations like this, and Sachin had been bearing it since 1989,” Chappell said in the book. “He just couldn’t get any rest. Once we were talking… and I said, ‘You must have so many friends, it must be hard finding time to keep in touch with all of them’. He looked me in the eye and said, ‘Greg, you would have more friends in India than I’ve got’,” Chappell said.

In reply to by यकु

श्रीरंग 26/10/2011 - 23:50
>>त्यानं मानसिकदृष्ट्या कमकुवतीतून आजी-माजी सहकाऱ्यांवर आरोप केलेत.. हे पण कधी ऐकण्यात नाही. एका खूप चांगल्या यष्टीरक्षकाची कारकिर्द सचिनच्या मर्जीत नसल्यामुळे खूप बहरात असताना देखील अचानक "संपली" असे खूप वेळा ऐकले आहे. बाकी सचिनच्या संघाच्या प्रक्षिकांनी देखील त्याच्याबद्दल निरिक्षणे नोंदवू नयेत (किंवा फक्त गोग्गोड, छान छान लिहावे, बडजात्यांच्या चित्रपटात शोभेल असे), त्यांच्यापेक्षा निव्वळ टीव्ही वर सचिनला पाहणारे त्याला जास्त ओळखतात असा आक्रस्ताळा आग्रह बर्याच सचिनप्रेमींचा असतो. मग वाचायला जावेच कशाला अशा लोकांची पुस्तके? फक्त द्वारकानाथ संझगिरी, हर्ष भोगले, इत्यादी लोकांचे प्रचंड एकांगी, अतिशयोक्तीपूर्ण लिखाण वाचावे.

In reply to by श्रीरंग

यकु 27/10/2011 - 01:00
एका खूप चांगल्या यष्टीरक्षकाची कारकिर्द सचिनच्या मर्जीत नसल्यामुळे खूप बहरात असताना देखील अचानक "संपली" असे खूप वेळा ऐकले आहे.
माहितीबद्दल मंडळ आभारी आहे. :) सचिन जाणूनबुजून आकसाने असे काही करणार नाही हा विश्वास असल्याने तपशीलात जाण्याची गरज वाटत नाही. :)

आमचे थोर संत सांगूनशान ग्येले हायेत, "पायीची वहाण पायी बरी | " उगा कशाला त्या वहाणेला(चप्पलला) डॉक्यावर घ्याचे? ती काय रामाची पादूका हाय?

रघुत्तम 25/10/2011 - 12:24
सचिन वर टीका करुन चॅपल सारखा माणुस चार पैसे मिळ्वत असेल तर गैर काय आहे? म्हातारपण सुखात काढेल बिचरा ......

फारएन्ड 25/10/2011 - 14:30
चॅपेल (त्याची बॅटिंग सोडली तर) काही फेवरिट वगैरे नाही, पण हे उद्गार केवळ एका फेज बद्दलचे निरीक्षण वाटतात, आणि त्यात काही गैर नाही. २००४ चा मध्य ते २००७ चा पूर्वार्ध सचिन गडबडलाच होता. त्याला खेळताना पाहायला अजिबात मजा येत नसे. दीवार मधला अमिताभ बघायला जावे आणि मोहब्बते मधला समोर यावा तसे काहीतरी व्हायचे :) मग २००७ च्या इंग्लंड दौर्‍यापासून पुन्हा ती बघण्यातली मजा परत आली.

In reply to by फारएन्ड

रेवती 25/10/2011 - 21:50
दीवार मधला अमिताभ बघायला जावे आणि मोहब्बते मधला समोर यावा तसे काहीतरी हा हा हा. मस्त विनोद! (कांबळी नव्हे.)

जाई. 25/10/2011 - 22:42
त्या चँपेलकडे दुर्लक्ष करण हा उत्तम उपाय पुस्तक खपवायचे असेल म्हणून हे चाळे मटावाल्याबद्दल तर बोलायलाच नको आधी तो आफ्रिदी नंतर हा मागे झहीर खानने चँपेलच्या काळ हा अधोगतीचा होता अस व्यक्तव्य केल होत त्याची आठवण झाली वरती म्हटल्याप्रमाणे सचिन आमच्यासाठी सच्चू होता आहे राहील