Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चिप्लुन्कर on Wed, 09/28/2011 - 15:56
समस्त मिपाकर हो ... कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे कि काही दिवसा पूर्वी माझ्या गाडी कोणती घ्यावी या धाग्यातील प्रतिक्रियांवर विचार करून मी बजाज अवेंजर हि गाडी घेतली आहे. आज संध्याकाळी तिला घरी आणावयाचा मानस आहे... तरी आपल्या सर्वांच्या खास करून स्पा , शाहीर , ५० फक्त यांचा जास्त आभारी आहे (ज्यांनी अवेंजर बद्दल जास्त चांगले मत व्यक्त केले) . आपला चिपळूणकर
  • Log in or register to post comments
  • 7430 views

प्रतिक्रिया

Submitted by स्वैर परी on Wed, 09/28/2011 - 16:12

Permalink

वाह!

एकदम पर्फेक्ट चॉईस आहे! मागच्या आठवड्यात गोव्याला हिच घेतली होती आम्ही सगळ्यानी... रेन्ट वर... कसली भारी चालते.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Wed, 09/28/2011 - 16:12

Permalink

अभिनंदन. आता गाडी पहिल्यांदा

अभिनंदन. आता गाडी पहिल्यांदा चालवौन झाली की अजुन एक धागा ह्होउन जौद्यात,
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Wed, 09/28/2011 - 16:35

In reply to अभिनंदन. आता गाडी पहिल्यांदा by मृत्युन्जय

Permalink

हो

आणि मग १०० km रनींग झाल्यावर एक, १००० km, १०००० km, झाल्यावर एकेक असे धागे जरूर काढावेत अशी आमची सूचना आहे. च्यायला आपण दुचाकी घेतली हि केवढी आनंदाची गोष्ट, मग ती मिपावर नाही व्यक्त करायची तर कुठे? अवांतरः धाग्याचे शिर्षक तर भन्नाटच आहे. म्हणजे आपली क्रियेटीव्हीटी तुफानचं आहे. :D
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 09/28/2011 - 17:29

In reply to हो by मिसळलेला काव्यप्रेमी

Permalink

अगदी अगदी !!

>>धाग्याचे शिर्षक तर भन्नाटच आहे. अगदी अगदी !!
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Wed, 09/28/2011 - 16:19

Permalink

चिप्लुन्कर ..जरा दारुकाम व

चिप्लुन्कर ..जरा दारुकाम व गणपान केले तसल काहि तरी होवुन जावु द्या.. परा व चिंतामणीला आणायची जबाब्दारी आमची....
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 09/28/2011 - 16:54

Permalink

निषेध !

आधीच गाड्यांच्या प्रचंड संख्येने वाहतुकीचा बोजवारा उडालेला असताना, अजुन एका गाडीची रस्त्यावर भर घालून जनतेच्या हाल अपेष्टात वाढ केली आहेत आणि वर हा असला आनंद साजरा करत आहात ? स्वतःच्या सुखासाठी, मौजमजेसाठी घेतली ना गाडी ? मग एखाद्या आश्रमाला गाडी दान केल्यासारखे धागा काढून सांगण्यासारखे काय आहे ? उद्या लोक गंजीफ्रॉक घेतल्याचे धागे काढायला लागले नाही म्हणजे नशिब. असो... हे भारतीय लोक कधी सुधारायचे काय माहिती.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Wed, 09/28/2011 - 17:05

In reply to निषेध ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

त्रास

पराशी सहमत. अवेंजर बद्दल अभिनंदन. ह्या गाडीवर प्रवास करुन क्रियेटीवीटीला काही त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Wed, 09/28/2011 - 17:19

In reply to त्रास by विनायक प्रभू

Permalink

मेलो...

ह्या गाडीवर प्रवास करुन क्रियेटीवीटीला काही त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
च्यायला, कोलमडून पडलो मी... ;) मास्तर, दंडवत!!!
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 09/28/2011 - 17:27

In reply to मेलो... by श्रावण मोडक

Permalink

=)) =))

दंडवतच घालायला आला होतो. प्रभुदेवा... कहर कहर !!! Image removed. चित्र आंतरजालावरुन घेण्यात आल्या गेले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Wed, 09/28/2011 - 17:26

In reply to त्रास by विनायक प्रभू

Permalink

मुद्दा

नव्याच्या नवलाईत काही महत्वाचे मुद्दे दुर्लक्षित होतात हो श्रामो. म्हणुन आपला सल्ला दिला. बाकी कै नै.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Wed, 09/28/2011 - 18:02

In reply to मुद्दा by विनायक प्रभू

Permalink

हाहाहाहा

खरंय. :)
  • Log in or register to post comments

Submitted by संपत on Wed, 09/28/2011 - 22:20

In reply to त्रास by विनायक प्रभू

Permalink

क्रियेटीवीटीला त्रास ?

अवेंजरमुळे क्रियेटीवीटीला त्रास होतो? सायकलमुळे होतो हे ठाउक होते पण मोटार सायकलमुळे होतो? प्रश्न गम्भिर आहे, उगाच खिल्ल्ली उडवु नये. :)
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on Wed, 09/28/2011 - 22:38

In reply to क्रियेटीवीटीला त्रास ? by संपत

Permalink

होऊ शकतो...

माझ्या पाहण्यातील एक घटना:- एक जण अशाच एका जड मोटरसायकलवर बसून दोन्हीकडे दोन पाय टेकवून रस्त्यावर उभा होता. त्याच्या मागच्या आसनावर साडी परिधान केलेली एक महिला(दोन्ही पाय एकाच बाजुला टाकून) बसण्याचा प्रयत्न करीत होती. त्या महिलेची उंची कमी असल्याने तिला ते काहीसे अवघड होत होते. शेवटी ती एकदाची बॅक जंप मारून आसनावर बसली पण या उडीच्या झटक्याने मोटरसायकल एका बाजुला कलंडू लागली. अर्थात मोटरसायकलस्वाराने ती पडू दिली नाही परंतू त्यामुळे मोटरसायकलस्वाराला अवघड जागी इंधन टाकीचा जोराचा प्रहार बसला व तो असह्य वेदनेनी कळवळू लागला. शेवटी त्याला आजुबाजुच्या लोकांनी रिक्षात बसवून इस्पितळात नेले. पुढे काय झाले ते ठाऊक नाही, परंतू या घटनेवरून योग्य तो बोध घेऊन आधीच काळजी घेतलेली बरी.
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Sat, 10/01/2011 - 15:26

In reply to होऊ शकतो... by चेतन सुभाष गुगळे

Permalink

अग्गदी बरोबर.. छान निरीक्षन

अग्गदी बरोबर.. छान निरीक्षन आहे तुमचे.. खरंतर पुर्वी बुलेट व तत्सम गाड्यांबरोबर, एक स्टुल, किंवा जीन्स घालणारी बायको(वा गफ्रें) फ्री द्यावी असा प्रस्ताव आम्ही दीला होता.. पण कंपणीने साडीगार्डवर बोळवण केली. बाकी इंधन टाकीचा प्रहार बसु नये म्हणुन वेगळा गार्ड कंपणीकडे मागावा का? तुम्ही म्हणत असलेली काळाजी बहुदा हीच असावी. चिप्लुन्कर घेतीलच ती काळजी..
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Sat, 10/01/2011 - 15:31

In reply to त्रास by विनायक प्रभू

Permalink

"क्रियेटीवीटीला काही त्रास"

"क्रियेटीवीटीला काही त्रास" होवु नये म्हणुन योग्य ठीकाणी योग्य मुडप दुडप व खाचा असलेले सीट मिळते.. त्याचा वापर श्री चिप्ळुन्कर यांनी करावा.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Wed, 09/28/2011 - 23:46

In reply to निषेध ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

तुम्हाला दुसर्‍याचं बरं बघवतच

तुम्हाला दुसर्‍याचं बरं बघवतच नै!!! गाडी कोणती घेउ असं त्यांनी इथंच धागा काढुन विचारलं होतं. आता त्यांनी कोणती गाडी घेतली हे नसतं सांगितलं तर तुम्हीच परत " इतकं धागा काढुन काय घेउ हे विचारलं आणि कोणता खटारा घेतला हे सांगायला बँडविड्थ कमी पडली का?" म्हणुन निषेध कराल. माणसानं वागावं तरी कसं!!
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on गुरुवार, 09/29/2011 - 00:17

In reply to तुम्हाला दुसर्‍याचं बरं बघवतच by शिल्पा ब

Permalink

हो ना. आता गाडी अ‍ॅव्हरेज काय

हो ना. आता गाडी अ‍ॅव्हरेज काय देते हे सांगितले नाही तरी हा परा शिव्या घालेल बिचार्‍यांना. तुम्ही त्याचाही एक धागा काढाच हो.
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on गुरुवार, 09/29/2011 - 19:26

In reply to निषेध ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

घेऊ द्या हो

अहो, लोकसंख्या वाढली म्हणून कोणी लग्न करायचं बंद करतं का ?
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Wed, 09/28/2011 - 16:58

Permalink

धन्यवादासाठी धन्यवाद, आणि

धन्यवादासाठी धन्यवाद, आणि धाग्याचं शिर्षक ' आज काही तरी आणणार आणणार गं' असं हवं होतं' असो, मी तर चेपुला असाच टाकलं होतं ' न्यु मेंबर कमिंग टु होम वेट @ १५० केजि' रंग कोणता ते सांगा, चेपुला एक ग्रुप आहे तो जॉईन करा तिथं मोलाची माहिती मिळते अजुन एक्सबिचपी पण आहे, ब्रेकं जपुन वापरा महत्वाचे बॅटरीवर मार्करने खुण करुन ठेवा, सर्विसिंगला दिल्यावर बॅट-या बदलणे हा मेकॅनिक लोकांचा आवडता छंद आहे जो आपल्या जीवाला पिसे लावतो, गाडीला किक नाही हे लक्षात ठेवणे. बॅटरी सगळ्यात महत्वाची. फोटो टाका इथं, माझ्या गाडीचे फोटो चेपुला आहेत. चला कोणीतरी समसुखी / दुखी मिळाला.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on Wed, 09/28/2011 - 17:03

Permalink

अभिंनदन !!

धाग्याचे शीर्षक वाचून पार गोंधळलो.... असो बाईकसाठी पेढे-बर्फी वाटल्यास हरकत नाही.... ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by निवेदिता-ताई on Wed, 09/28/2011 - 17:12

In reply to अभिंनदन !! by सुहास झेले

Permalink

असेच म्हणते.....

असेच म्हणते.....
  • Log in or register to post comments

Submitted by शाहिर on Wed, 09/28/2011 - 17:17

Permalink

अभिनंदन !!

फोटु टाका !
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Wed, 09/28/2011 - 17:22

Permalink

प्यार्टी है का नै ?

.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 09/28/2011 - 18:17

Permalink

अ‍ॅव्हेंजरबद्दल ज्यांचे मत

अ‍ॅव्हेंजरबद्दल ज्यांचे मत चांगले त्यांचेच खास आभार का बुवा? शिर्षक पाहून वेगळे अभिनंदन करायला आले होते. बाकी विप्रंबद्दल काही बोलायलाच नको. फिस्स््कन हसू आले. गाडी घेतल्याबद्दल अभिनंदन!
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Wed, 09/28/2011 - 18:29

Permalink

साखर

आरे कुणितरी अवेंजर वरुन साखर वाटा रे. रेवती तै ना प्रतिसाद कळ्ला आणि वर हसु पण आले. असो. चिप्लुन्कर तुमचे प्रविणभप्कर कुणी नातेवाईक आहेत का?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Wed, 09/28/2011 - 18:35

In reply to साखर by विनायक प्रभू

Permalink

मास्तर

आरे कुणितरी अवेंजर वरुन साखर वाटा रे. रेवती तै ना प्रतिसाद कळ्ला आणि वर हसु पण आले.
मास्तर, किती ते... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 09/28/2011 - 18:38

In reply to मास्तर by श्रावण मोडक

Permalink

ऑ ?

चिप्लुन्कर तुमचे प्रविणभप्कर कुणी नातेवाईक आहेत का?
चिप्लुन्करांचा पण 'मारुती कांबळे' होणार असे गुर्जींना म्हणायचे आहे काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 09/28/2011 - 19:40

In reply to मास्तर by श्रावण मोडक

Permalink

नाहीतरी तुम्हाला माझी चेष्टा

नाहीतरी तुम्हाला माझी चेष्टा करायला कारणच हवं असतं. बाकीचेही विनोद किंवा असली बोलणी कळत नाहीत असे नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Wed, 09/28/2011 - 21:16

In reply to नाहीतरी तुम्हाला माझी चेष्टा by रेवती

Permalink

चेष्टा नाही

चेष्टा नाही. उगाच चिडवाचिडवी. पण आता काही दिवस बंद. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 09/28/2011 - 23:15

Permalink

अभिनंदन.

>>>> मी बजाज अवेंजर हि गाडी घेतली आहे. अभिनंदन.....! च्यायला, हल्ली माझे अशा धांग्यांकडे दुर्लक्षच होत आहे. -डिलीट बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on गुरुवार, 09/29/2011 - 14:29

In reply to अभिनंदन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

डॉ. सा. तुमचे दुर्लक्ष म्हणजे

डॉ. सा. तुमचे दुर्लक्ष म्हणजे पामरांकडून काही प्रमाद कि आगळीक घडली काय ? क्षमा क्षमा भन्ते.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 09/29/2011 - 20:36

In reply to डॉ. सा. तुमचे दुर्लक्ष म्हणजे by इरसाल

Permalink

हेच म्हणतो चायला फुकट २ २ ओळी

हेच म्हणतो चायला फुकट २ २ ओळी खरडल्या
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 09/30/2011 - 10:48

In reply to डॉ. सा. तुमचे दुर्लक्ष म्हणजे by इरसाल

Permalink

मौन साधावे लागेल असे दिसते.

>>>>>तुमचे दुर्लक्ष म्हणजे पामरांकडून काही प्रमाद कि आगळीक घडली काय ? अहो, आता याच्यात तुमच्या काय प्रमादाची गोष्ट आली ? च्यायला, हल्ली माझे साधे बोलणेही मला बंद करावे लागेल असे दिसते. कालच माझ्या एका मित्राने माझ्या साध्या बोलण्याचे मनावर घेऊन आपली खरडवहीची सुविधा बंद केली. :( बाईक कोणती घेऊ म्हणू चिप्लूणकरांनी धागा काढला होता. आता बाईक घेतल्यावर त्याच धाग्यावर बाईक घेतल्यामुळे पेडे वाटायला पाहिजे होते असे मला वाट्ले. आता कोणी आपल्या लेकराने शाळेत डबा खावा म्हणून कोणत्या प्रकाराचा डबा घेतला पाहिजे असा धागा काढला आणि पुन्हा डबा घेतला म्हणून सांगण्यासाठी दुसरा दोन ओळीचा धागा काढला तर ते बरे दिसणार नाही असे मला वाटले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Sat, 10/01/2011 - 20:13

In reply to मौन साधावे लागेल असे दिसते. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

अगदी अगदी. तुमच्याशी आम्ही

अगदी अगदी. तुमच्याशी आम्ही वर्ल्ड कप पासूनच सहमत आहोत. सध्या आमच्या कडेही हेच चाललेय. पोरीला शाळेत मिड-डे मिल मिळते पण ती खात नाही म्हणून घरून पण डबा द्यावा लागतो. दुहेरी खर्च. काढू काय धागा ?
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on Wed, 09/28/2011 - 23:24

Permalink

अभिनंदन!

नव्या गाडीबद्दल हार्दिक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sat, 10/01/2011 - 17:51

Permalink

मंग पुढं काय झालं!

हनिमून वगैरे बद्दलपण लिहा राव! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Sat, 10/01/2011 - 18:05

Permalink

इयत्ता ३री

हा इयत्ता ३ री त नको ती पुस्तके वाचल्याचा परिणाम किंवा प्रगल्भ मास्तर न मिळाल्याचा परिणाम. इथे हनीमुन ची वर्णने? काय झाले आहे काय तुला निळ्या? तुला हवी ती माहीती गुगळल्याने मिळलेच की.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com