Skip to main content

तुम्ही तुमच्या आयटमला काय म्हणता ?

लेखक शाहिर यांनी सोमवार, 19/09/2011 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
दर १२ मैला वर भाषा बदलते असा म्हणतात ..प्रत्येक कट्ट्याची स्वताची अशी स्वतंत्र भाषा असते ..काळा नुसार ती बदलत जाते .. गर्लफ्रेंड / बोय फ्रेंड या सर्व साधारण प्रचलित शब्दाला प्रत्येक गावात , कट्ट्या वर वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते .. उदा : पुण्यामध्ये आयटम , मुंबई मध्ये छावी ..सोलापूरकडे खडा , आणि हुच्चभ्रू मध्ये बेब या प्रमाणेच म्याटर, विषय , खटका , माणूस , झोंबड, चषक, हत्यार , कंडा, सिष्टीम, आंबा , लाईन...सामान , माल ..)बहुतेक शब्द कोल्हापूरहून ) मुली सुद्धा पंटर , छावा ..बैल ..मजनू असे शब्द वापरतात ..आपल्या कॉलेज मधले , कट्ट्यावरचे, मी. पा. कट्ट्यावर अजून काही शब्द माहित असेल तर सांगावे.. जेनेरल नॉलेज वाढवायचे आहे.. तर काय म्हणता तुम्ही ??

वाचने 53287
प्रतिक्रिया 127

प्रतिक्रिया

स्क्रीनशॉट काढुन योग्य व्य्क्ती कडे पाठवला आहे.

मि पा कट्याच्या--- वर --- मी काय बोलणार बापुडा?नवोदित अजाण ;-) तरी पण तुम्हाला जेनेरल नॉलेज वाढवायचे आहे.. असे म्हणता तर टाकतोच :tongue: स्वारी,टंकतोच काही अता--- (कातिल)--डाव ;-) ,फटाका,एटेम-बाँब,हापटबार :bigsmile: गोळी आयटम, खवा :-p , ब्रेडबटर ;-) , भरलं वांगं :-D, लॉलीपॉप ,कवळी-काकडी.....अशी काही (ऐकलेली)नावं पटा-पट अठवली... अजुन सुचली---तर टंकुच...सध्या पुरे नाही का? ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

लईच झाक्क बगा ... आब्यासु दिसत जनु.. हवा हवासा खवा ब्रेडबटर वाइच फारीन चा वाटला...

In reply to by शाहिर

आब्यासु दिसत जनु..
तुम्ही गुरुजींचे साहीत्य वाचले नाहीत का? बाकी धाग्याच्या विषयाला धरून "निसर्ग सौंदर्य" असा शब्द आम्ही वापरायचो ते आठवले.

फक्त तो उजव्या बाजूला असलेला ज्ञानोबा तुकोबांचा फोटो मात्र काढून टाकायला हवा.

In reply to by अनामिक

ते फोटोच तर मिपाच्या भरभराटीला कारणीभूत आहेत.
अहो भरभराट झाली आहे ते या धाग्यातून दिसतच आहे. त्यामुळे आता त्या फोटोची आवश्यकता नाही असे वाटते.

तार्किक आगाऊपणाचा दोष पत्करून सांगावासं वाटतं की हा धागा 'चीप' आहे. कृपया धागाकर्त्याने याची नोंद घ्यावी. इतर कोणी नोंद घेतील का नाही हे माहित नाही म्हणून धागाकर्त्यालाच हळी देत आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रत्येक सदस्याने आपली जबाबदारी पाळावी!

In reply to by अनामिक

धागा आणि त्यावरील प्रतिसाद वाचून एक मिपाकर असल्याची शरम वाटली. माझ्या सारख्या सुशील अन सुस्वभावी लोकांना असे धागे मिपावर यायला अगदी नकोसे करतात. हां, आता शिव्या देण्याविषयी धागा असता तर गोष्ट वेगळी होती किंवा परंपरेला अनुसरून फोटो तरी टाकायचेत!!

In reply to by Nile

नोंद घेतली अहे

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सदस्य म्हणून मी नोंद घेतली आहे. धागाकर्ते आपली चूक उमजून स्वतःहून हा धागा अप्रकाशित करतील अशी आशा बाळगते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

खोट काय आहे ते सांगा ? आणि खोट वाटत असेल तर कोणत्याही कॉलेज मधल्या मुला ला विचरा.. गंमत म्हणुन धागा काढला आहे. .. जॉन आणि सलमान च्या शरिरावर्च्या कॉमेंटस हुच्च भ्रु ..आणि बाकी चीप ... हलके घ्या.

In reply to by शाहिर

कोणत्याही कॉलेज मधल्या मुला ला विचरा त्यात काय विचारायचय? आम्ही असे कोणत्याही कॉलेजच्या मुलांना विचारायला जाणार नाही. म्याटर, विषय , खटका , माणूस , झोंबड, चषक, हत्यार , कंडा, सिष्टीम, आंबा , लाईन...सामान , माल हे शब्द वेगवेगळ्या विषयातले असून त्यांचा एकमेकांशी संबंध असेल असे वाटत नाही. बघणार्‍याच्या नजरेचा, बुद्धीचा फरक काय तो असू शकतो. एखाद्याला आवडणारी मुलगी हत्यार वाटते म्हणजे तो नक्कीच अंडरवर्ल्डशी संबंधित असावा. कंडा हा शब्द काय आहे माहित नाही. कंड सुटणे म्हणजे खाज सुटणे एवढे माहीत आहे. असले शब्द आवडणार्‍या व्यक्तिविषयी वापरावेत हे पटत नाही. सबब धागा पटत नाही.

In reply to by रेवती

तुम्ही उल्लेखलेला शब्द मझ्य कदुन चुकिचा टाकल गेला आहे ..अर्थ माहित नव्ता ..बाकि गम्मत आणि क ट्ट्यावरची भा षा एवधेच स्वरूप होते ...धागा संपादि त कसा कराव अजुन शिकलो नहि ..नंतर )शिल्लक राहिल्यास ) संपादित करेन धन्यवाद

In reply to by शाहिर

शाहिर, गल्लत होते आहे तुमची. जॉन, समलान च्या शरिराबद्दल कोणाला काय वाटते हे विचारणारे धागे प्रकाशित झाले नाहित अजुन. प्रतिसादात आलेल्या कमेंट मधे उल्लेख आला असेल तर तो वैयक्तिक हिशेब चुकते करण्यासाठी येतो. इथे तुम्ही ज्या विषयावर धागा काढला आहे तो उथळ आहे असे माझे मत. (गुर्ज़ींच्या मताचा आदर राखुन ;)). आयटम हा शब्द खटकला. आम्ही 'आयटम' हा शब्द उथळ दिसणार्‍या/असणार्‍या मुलींबद्दल वापरायचो, त्यामुळे "तुमच्या आयटमला" हे आम्हाला लागु होत नाही सबब मुळ प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही. मिपावर अभिव्यक्त व्हायला प्रोत्साहन तर सर्वांनाच आहे. मोकळेपणा आणि परखड्पणा हा मिपाचा श्वास आहे असे मला वाटते म्हणुन मी मिपावर रमतो. तरीही काहीतरी भाषेचा आणि विषयाचा विधीनिषेध बाळगावा असे मला वाटते, बाकीच्यांबद्दल मला माहिती नाही. - (आयटम शब्द खटकलेला) सोकाजी स्वगत: सोक्या, नव-लेखकांच्या हिरमोड होइल असा प्रतिसाद आहे का हा की त्यांना अजुन भरीव लिहायला प्रोत्साहन मिळेल?

In reply to by सोत्रि

आम्ही 'आयटम' हा शब्द उथळ दिसणार्‍या/असणार्‍या मुलींबद्दल वापरायचा.. मान्य ... तुमच्या आयटम ला शब्द खटकला आहे बर्याच जणांना ... मि पा वर शब्द रचना बरेच काळजी पूर्वक करावी लागते ...नवीन आहे .. पुढच्या वेळेस काळजी घेइन .. अवांतर: ऐसा शबाब देख के साकिया को कौन सी शराब याद आती है ?

In reply to by शाहिर

अवांतर: ऐसा शबाब देख के साकिया को कौन सी शराब याद आती है ?
ऑफ कोर्स "अनारीटा" - (शराब आणी शबाब दोन्ही आवडणारा) सोकाजी

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तार्किक आगाऊपणाचा दोष पत्करून सांगावासं वाटतं की हा धागा 'चीप' आहे.
पाशवी शक्तींचा रोष ओढवण्याचा धोका पत्करून सांगावसं वाटतं की मला हा धागा चीप वाटला नाही. धागाप्रवर्तकाने स्त्री व पुरुष दोघांनाही सारखंच वस्तुकरण करण्याची किमान समानता पाळली आहे. पोरं देखण्या पोरींना काय म्हणतात किंवा पोरी देखण्या पोरांना काय म्हणतात हा अभ्यास करण्याजोगा विषय आहे. शिव्यांचा अभ्यास होऊ शकतो, तसंच काहीसं. मी म्हणेन की मिपावरील स्त्रीवर्गाने देखील सामील व्हावं. नाहीतर केवळ पुरुषप्रधान संस्कृतीचं प्रदर्शन होणं हे कारण पुढे करून बहिष्कार टाकला तर ती सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी होईल.

In reply to by राजेश घासकडवी

मला एक्झॅटली काय म्हणायचा होता ते तुम्ही समजुन घेतला

In reply to by राजेश घासकडवी

@--- धागाप्रवर्तकाने स्त्री व पुरुष दोघांनाही सारखंच वस्तुकरण करण्याची किमान समानता पाळली आहे. पोरं देखण्या पोरींना काय म्हणतात किंवा पोरी देखण्या पोरांना काय म्हणतात हा अभ्यास करण्याजोगा विषय आहे. शिव्यांचा अभ्यास होऊ शकतो, तसंच काहीसं.--- घासुगुर्जी धन्यवाद... आमले रातच्याला वाटलं हुतं की बाई/मानुस इषयक या नेचरल ब्युटीफुल धाग्याला तांबड फुटायच्या आत समादी मिळत्तीक काय की? :-) पन धाग्याला अजुन भहर फुट्ला ते बगुन वाईच थंड्गार वाटलं बगा :-)... हा आजचा दिस झ्याक जानार.. :cool: तुमाला बी हेप्पी मॉर्निंग :-) लव्हली लव्हली मॉर्निंग लव्हली केम अगेन........... :love: आता रोज सकाळी हा धागा उघडुन बघेन...

In reply to by राजेश घासकडवी

सहमत... ( घासुगुर्जीशीं सहमत असण्याचा माझा हा पहिलाच योग असावा... ;) ) तशी पाखरांची बरेच नावे असतात आणि पाखरांना पेट नेम ने हाक मारलेले आवडते देखील... ;) पण मी काही पाखरांचे प्रकार द्यावे म्हणतो ! ;) सोज्वळ पाखरु :--- हे पाखरु फार नशिबवान पारद्याच्या नशिबातच असते ! सात्विक स्वभाव आणि सुगरणपणा हा अश्या पाखरांचा अंगीभूत गुणधर्म असतो ! ;) सध्याच्या काळात या पाखरांची अत्यंत दुर्लभ प्राजाती म्हणुन नोंद केलेली आढळते. ! ;) लबाड पाखरु / वस्ताद पाखरु :--- अशी पाखरं १ नंबरची चंट असतात, आपल्याला भाव मिळतो हे या पाखरांना व्यवस्थीत ठावुक असते, बरेच पारधी अश्या पाखरांनी आपल्या जाळ्यात अडकावे या प्रतिक्षेत असतात... पण ही पाखरं जाळ्यात न-अडकता दाणा-पाणी टिपुन उडुन जातात व पारध्यांना वाकुल्या दाखवण्यात पटाईत असतात. एखाद दुसर्‍या पारद्यालाच असे पाखरु गावते. ;) मालदार पाखरु :--- सौंदर्याने टच्च भरलेले हे पाखरु फार फार प्रयत्नांनी दिसते किंवा गवसते,समस्त पारधी मंडळी अश्या पाखरांनी आपल्या जाळ्यात अडकावे म्हणुन प्रयत्नशील असतात आणि त्याच्या अडकण्याचे स्वप्न पहातात. ! ;) बर्‍याच वेळा असे पाखरु आर्थीक बाबतीत हुशार असल्याने एखाद्या काळ्या कोळश्याच्या घरात बागडताना दिसते, कारण काळ्या कोळश्याच्या गळ्यात पचास तोला लटकत असते ना ! ;) लंगुर के मुंह में अंगुर ही म्हण बहुधा अश्या उदा. मुळेच उदयास आली असावी असा मला दाट संशय आहे. ! ;) विक्षिप्त किंवा वाय झेड पाखरु :--- खरे तर या प्रकाराला पाखरु म्हणणे म्हणजे इतर समस्त पाखरांचा घोर अपमान आहे,इतर पाखरे या नमून्याला "बया" किंवा "वैताग" अश्या नावाने हाक मारतात आणि त्यांच्या पासुन ४ हात लांब राहतात... हुशार पारधी अश्या नमून्याला पाहताच आपली लावलेली जाळी काढुन घेतात ! सुंभ जळला तरी पिळ जात नाही ही म्हण अश्या नमून्यांना तंतोतंत लागू पडते.शक्योतो अश्या नमून्यांना कोणी सुजाण पारधी काडीचाही भाव देत नाही,तरी सुद्धा ज्या प्रमाणे युवराजांचे जोडे उचलणारे असतातच त्याच प्रमाणे काही पारधी अश्या नमून्यांचे पदर धरुन असतात ! ;) बाकी पाखरांना बरीच नावे आहेत... ती नंतर कधी तरी सांगीन... सुहासराव... बझ वरील हा प्रतिसाद तुम्हाला आठवलाच असेल नव्हे ! ;) ( गाजरेश पुंगीवाजवी) ;) घासु गुर्जी हलकेच घेतील ही अपेक्षा करुन त्त्यांच्या नावाचे इडंबन केरण्याचे चेष्टा केली आहे. ;)

In reply to by मदनबाण

खरच ''मदनबाण'' आहात... नाव अगदी सार्थ केलत हो... :-) आपल्या निरिक्षणास आमची शंभर टक्के दाद... @सोज्वळ पाखरु :-....या पाखरांची अत्यंत दुर्लभ प्राजाती म्हणुन नोंद केलेली आढळते!---काय मनातलं बोल्लात राव ;-) @लबाड पाखरु / वस्ताद पाखरु:-ही पाखरं जाळ्यात न-अडकता दाणा-पाणी टिपुन उडुन जातात व पारध्यांना वाकुल्या दाखवण्यात पटाईत असतात... :-D @मालदार पाखरु:-बर्‍याच वेळा असे पाखरु आर्थीक बाबतीत हुशार असल्याने एखाद्या काळ्या कोळश्याच्या घरात बागडताना :-D दिसते,कारण काळ्या कोळश्याच्या गळ्यात पचास तोला लटकत असते ना!... जेब्बात..अतीशय परफेक्ट निरिक्षण..लंगुर के मु मे..सारखी सत्याच्या अधिक जवळ ;-) जाणारी १ म्हण मला माहितीये...पण ती इथे देत नाही,तुंम्हास व्यनीत कळवतो ;-) @विक्षिप्त किंवा वाय झेड पाखरु:-खरे तर या प्रकाराला पाखरु म्हणणे म्हणजे इतर समस्त पाखरांचा घोर अपमान आहे,इतर पाखरे या नमून्याला "बया" किंवा "वैताग" अश्या नावाने हाक मारतात आणि त्यांच्या पासुन ४ हात लांब राहतात...अगदी बरोब्बर..योग्य मुल्यमापन..इतर स-मस्त पाखरांचा अपमान होऊ नये,म्हनुनशान आपुन ह्यास्नी यकच नाव द्येउ शकतो-उलटया पिसाची कोंबडी :विकट हास्याची स्माइली :

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धागा चीप आहे हे मान्य पण आता कोणी चीप पणा बघणार्‍याच्या नजरेत (पक्षी: वाचणार्‍याच्या मनात) असतो असा युक्तिवाद कोणी केला तर काय करणार? असेही मिपावरच्या कित्येक धाग्यांवरचा चावटपणा आणि शिवराळ लडींचा नजरांणा बघता केवळ भाषेवरौन कुठल्याही धाग्यावर आक्षेप घेता येइल असे वाटत नाही. असो. धागा चीप असुनही त्याबद्दल काय अ‍ॅक्शन घ्यावी हे सांगता येणार नाही.

In reply to by शुचि

नुसतं खरय असं नाही म्हणायचं शुचितै! "खरय गं बाई!" म्हणण्याने तुम्ही खर्‍याखुर्‍या वय वाढलेल्या वाटू शकता (म्हातार्‍या म्हटलेले नाही याची नोंद घ्यावी.)

In reply to by रेवती

अगं इथे टेक्सास मध्ये पाऊस पडतो आहे इतक्या दुष्काळात खरं तर मी आनंदी असायला हवं पण का कोण जाणे मनावर मळभ दाटलं आहे. देवळात जाऊन यायचं आहे (पितृपक्षाचं करायला) पण कोणी मैत्रिण घेऊन जायला तयारच होत नाहीये : ( .... टॅक्सी चा खर्च नकोय कारण लांब आहे $८० होतील. त्यामुळे एकंदर वैताग आला आहे.

In reply to by धन्या

"आपण परदेशात रहातो" हे दाखवण्याचा एक प्रयत्न................................................. . . . . अशी कोणाची प्रतिक्रिया कशी नाही आली अजून.....

आम्ही आमच्या आयटमला 'अगं ए...' किंवा 'अजी सुनती हो मुन्ने की मम्मी' म्हणतो.

बिर्‍हाड , सामान, छावी, हत्यार, त्रास, झेंगाट आणी समोरच असेल तर स्वीटी-पाय्, पॉपकीन, हनी अथवा बेब असे संबोधतो.... इतरही काही नावे आहेत पण सदरील धागा अजून चीप होण्याच्या भीतीने टंकत नाही. ;)

In reply to by शाहिर

परीस्थीती व लोक बघून योग्य शब्दाचा वापर करावा लागतो.. १) जस की मीत्रा समोर त्याला टाळयचं असेल तर, घे हा लागलाय "त्रास" बघ मागे निघतो मी... २) जराशा वयस्कर पण "मीत्र" गणता येइल अशा व्यक्ती समोर "झेंगाट" म्हणायचं., ३) हत्यार व सामान हे शब्द चावट भासत असल्याने शक्यतो ओपन माइंडेड व समवयस्कांसमोरच हे बोलायचं (इथं इन्क्लूड पहील्या कारणासाठी केल्या आहे) आणी उरलेल इंग्रजी ज्ञान फोनवर रात्री गप्पा मारताना पाजळायचं.... वेळेच्या मर्यादेमूळे प्रत्यक्ष भेटीमधे काहीच बोलायला फारसा वाव नसतो ;) म्हणून त्यावेळी केवळ मूक संभाषणावरच तहान भागवावी ;) अवांतर : - बाकी हे शब्द चर्चेसाठी उघड केले, प्रत्यक्ष परीस्थीतीमधे एक गोश्ट कटाक्षाने पाळायची आणी ते म्हणजे एका स्त्रि समोर दूसर्‍या स्त्रिला कधीही सभ्यतेची पातळी ओलांडली जाअल अशा शब्दाने हाक मारायची नाही, होय स्त्रियांचा अहंकार फार मोठा असतो.. जन्माच्या वैरी जरी असल्या तरी एक स्त्रि दूसर्‍या स्त्रिवीषयी कधीही अवमान कारक बोलणं खपवून घेत नाही. तेव्हां प्रेमात सारं क्षम्य असतं हे काही काळापूरतं विसरायचं.

In reply to by आत्मशून्य

एका स्त्रीसमोर दुसर्‍या स्त्रीचा अपमान करू नयेच पण फार कौतुकही करू नये.;) ब्रेक दाबल्यामुळे बसमध्ये मागे उभी असलेली एक वर्गभगिनी चुकून माझ्या नवर्‍याच्या पाठीवर आदळता आदळता वाचली तरी तिचा हात माझ्या नवर्‍याच्या हाताला लागल्याचे पुसटसे ऐकले होते. ते मी अज्जून विसरले नाहिये. असे चुकून घडलेले प्रसंगही चालत नाहीत. आता ते झेंगाट आणि मित्र वैग्रे विसरा आणि जगदंबा, महामाया असे शब्द लवकरच येऊ घातलेत.;)

In reply to by आत्मशून्य

वेळेच्या मर्यादेमूळे प्रत्यक्ष भेटीमधे काहीच बोलायला फारसा वाव नसतो. म्हणून त्यावेळी केवळ मूक संभाषणावरच तहान भागवावी
आपल्याला मुक म्हणायचंय की मुका?

आम्हाला आमच्या आयटम बरोबर लग्न करुन आता ४ वर्षे झाली पण यातले २ सुद्धा शब्द माहित नव्हते, राव! पुण्यात राहून एवढे अज्ञान! कुठे फेडू मी ही पापं?! ;)

In reply to by बाळकराम

अच्छा! आयटम हा शब्द लग्न झालेल्या नवरा/बायको संदर्भात आहे होय? मला वाटलं की कॉलेजच्या कट्ट्यावर बसून जेवढं पक्षी/पक्षीण निरिक्षण होतं त्यासाठी आहे. असे असल्यास मी सांगते. माझा नवरा मला "अगं एऽऽऽ ऐकलस का?" यावर मी "बोला गडे!" असे म्हणते. किंवा मी नवर्‍याला "अवं धनीऽऽ" अशी हाक मारते त्यावर नवरा "गंऽऽऽ साजणी" असा प्रतिसाद देतो. उगीच एकमेकांना हत्यार वैग्रे म्हणत नाही.;)

In reply to by रेवती

आमच्या आयटमला लग्नाआधी आयटम म्हणायचो, नंतर ती आपली साधी-सुधी, वरण-भात स्टाईल "बायको" झाली!

In reply to by रेवती

आमच्या आयटमला लग्नाआधी आयटम म्हणायचो, नंतर ती आपली साधी-सुधी, वरण-भात स्टाईल "बायको" झाली!

In reply to by रेवती

काय हे रेवतीकाकू, इतक्या लोकांनी इतके छान छान प्रतिशब्द सुचवले असताना नुसती साधी 'शोभेशी मुलगी'?

In reply to by राजेश घासकडवी

कारण तो बायको शोधतो आहे, आयटेम नाही. दोन्हीतला फरक तुम्हाला आम्ही का समजावून द्यायचा गुर्जी ? ;-)

In reply to by बाळकराम

गर्लफ्रेंड / बोय फ्रेंड या सर्व साधारण प्रचलित शब्दाला प्रतिशब्द सांगा असे म्हणाले आहे .. त्या मु ळे लग्न नंतर कोन काय म्हनतो याचा भोचक पणा आम्ही करणार नाही ...

In reply to by बाळकराम

गर्लफ्रेंड / बोय फ्रेंड या सर्व साधारण प्रचलित शब्दाला प्रतिशब्द सांगा असे म्हणाले आहे .. त्या मु ळे लग्न नंतर कोन काय म्हनतो याचा भोचक पणा आम्ही करणार नाही ...

धाग्याचा उद्देश कॉलेज कट्ट्यावर बसुन पक्षी/पक्षीण निरिक्षण होतं त्यासाठी आहे ..नवरा बाय्को चा विचार केला नाहिय .. हलका धागा आहे ..हलकाच घ्यावा

धाग्याला मो...ठ्ठ्या मो...ठ्ठ्या लोकांचे पाय लागलेले असल्याने तुम्ही धागाग्रस्त होणार नाही ही ग्वाही. बिल्डींग, मैना, पाडाची कैरी, पाखरू, कबूतर, ढिंगच्याक, वेबपेज, साईट, वेबसाईट (स्टॅटीक साईट, डायनॅमीक साईट हे उपप्रकार) हिरोईन आदी काही शब्द आहेत. (साईड हिरोईन हा प्रकार जास्त लवकर प्रसन्न होतो.)

In reply to by पाषाणभेद

कवी प्रेयसी ला विविध नावांनी हाक मारतो.. विशेषण देतो ... तिच्या सौंदर्याला वेग वेगळ्या उपमा देतो ... तसेच कॉलेजची पोरे करतात .. त्या वरुन तथाकथित सं स्कृती र क्षकांनी केवढा गोंधळ घातलेला आहे .. पिंजरा चित्रपटा मधे सांगिअतल आहे .. कृष्ण गोपि चि लीला संस्क्रुत मधे लिहिला कि काव्य आणि ग्रमीण मध्ये लिहिला कि अश्लिल , द्यार्थी लावनी..

In reply to by पाषाणभेद

वेबपेज, साईट, वेबसाईट,स्टॅटीक साईट, डायनॅमीक साईट---तव दिव्य प्रतिभेने ;-) आंम्ही अडवे जाहलो... इत्यर्थे = खपलो

हिन्दी चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून 'आयटम साँग' 'आयटम गर्ल' वगैरे शब्दांनी ज्ञानात भर घातली आहे. त्या ज्ञानाच्या आधारे, स्वतःच्या प्रेयसीला अथवा कुणाही सभ्य घरातील मुलीला अशी संबोधने वापरणे असभ्यपणाचे लक्षण आहे असे वाटते. पुढील यादी तर विचारातही घेतलेली नाही. मागासलेले म्हणा, बुरसटलेले म्ह्णा, वय झाले म्हणा, काहीही म्हणा. संस्कारच असे झाले आहेत की शाब्दीक स्वैराचारसुद्धा मनाला पटत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

कधी नव्हे तेवढं निसरडं वाटताय आज मिपावर! कुठेही पाय ठेवला तरी घाण लागेल असं वाटताय. मुलींना असली नावं ठेवणार्‍या महाभागांच्या बहिणींना असं कोणी म्हटलेलं चालेल का, हे आधी त्यांना विचारायला पाहिजे.

माझा नवरा मला "अगं एऽऽऽ ऐकलस का?" यावर मी "बोला गडे!" असे म्हणते. किंवा मी नवर्‍याला "अवं धनीऽऽ" अशी हाक मारते त्यावर नवरा "गंऽऽऽ साजणी" असा प्रतिसाद देतो.
हांग्ग आस्सं!!! रेवती आज्जीचं भारी कामय बुवा! कट्ट्यावर बसण्याचे दिवस केव्हाच संपले. त्यामुळं नो कॉमेंट! पण कधीही फारशा भेटीगाठी न होताही निरागस प्रेम दाखवणार्‍या चार-दोन मैत्रिणी आहेत त्यांना "अगं राणू.. " किंवा "डिअर.." फार्फार तर "ए भवाने" किंवा "अंबाबाई" म्हटलेलं पुरतं.. त्या पण आम्हाला लाडात असतील तर " हे बघ सोन्या..." आणि ताप / (व) लेल्या असतील तर "ए डुकरा" वगैरे बोल्तात ब्वा कधी कधी.. आमच्या गावात दोस्तमंडळीत "इंजन" आणि "मशीन" तसेच "टिकूर" हे शब्द नेहमी ऐकण्यात येतात. बाकी असले शब्द दर कोसावर नाही, तर कॉलनीगणिक बदलत असतील ... मुसुंनी जे "लॉकर रूम टॉक" सांगितलेलं आहे त्याच्या अस्सल मराठी आवृत्तीतले शब्द या धाग्यावर टाकण्यासारखे नाहीत.

काही दिवसांपूर्वी अशा स्वरूपाच्या संबोधनांना काय म्हणतात याबद्दल थोडे विवेचन केले होते http://www.misalpav.com/node/18851#comment-331719. प्रस्तुत धाग्यावर याचा अर्थ असा की , एखाद्या व्यक्तीला "वस्तुरूप" म्हणून निर्देश करणे अयोग्य आहे. "लॉकर रूम परिभाषेत" हे होते का ? होय. मिसळपाव लॉकररूम आहे का ? नाही. असो.

पंजाबकडे "गंडासी" म्हणतात, असं ऐकून आहे. ....उदा: पॅण्दी साड्डी गंडासी किथ्थे गई.... सड्डे नाल आण्वाली थी....इ.इ.

.

वर एका प्रतीसादात धाग्याला "चीप" म्हटले आहे त्या प्रतीसादाशी सहमत.

मी तर अनुक्रमणिकेत हे असं वाचलं. तुम्ही तुमच्या आयटमला काय म्हणता ? शाहिर प्रश्नातच उत्तर दिलं गेलंय की काय? असो. गंमतीचा भाग सोडून देऊ. मुद्दा असा की, माझं मिसळपाव वर तीन वर्षे जुनं खातं असलं तरी गेल्या तीन एक महिन्यातच मी पुन्हा खर्‍या अर्थाने सक्रिय झालो. माझे खर्‍या नावाने वावरणे, गंभीर लेखन करणे, प्रतिसाद आणि प्रतिसादांना प्रत्युत्तर यांची एक प्रमाण पद्धती, सदस्यांच्या टोपणनावाऐवजी खर्‍या नावाचा उल्लेख यामुळे मी अनेकांना कंटाळवाणा वाटु लागलो होतो. "तुम्ही मिपावरची मौजमजा घालविता आहात. इथल्या पिकनिक टाईप कल्चर ला ऑफिस टाईप कल्चर बनविण्याचा तुमचा बेत सोडून द्या" अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया मला मिळाल्या. आता "पिकनिक टाईप" कल्चर चा अतिरेक झाला की अशा कल्चरचे समर्थक देखील वैतागतात हे या धाग्यावरच्या बहुतांश प्रतिक्रियांवरून दिसून येईल. सबब हा धागा उडविण्याची कुणीही मागणी करू नये. उलट हा धागा आता या संकेतस्थळावर थिल्लरपणाचा अतिरेक झाला आहे आणि ते थांबविण्याची गरज असल्याची आठवण करून देत राहील.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

>>मुद्दा असा की, माझं मिसळपाव वर तीन वर्षे जुनं खातं असलं तरी गेल्या तीन एक महिन्यातच मी पुन्हा खर्‍या अर्थाने सक्रिय झालो. माझे खर्‍या नावाने वावरणे, गंभीर लेखन करणे, प्रतिसाद आणि प्रतिसादांना प्रत्युत्तर यांची एक प्रमाण पद्धती, सदस्यांच्या टोपणनावाऐवजी खर्‍या नावाचा उल्लेख यामुळे मी अनेकांना कंटाळवाणा वाटु लागलो होतो. "तुम्ही मिपावरची मौजमजा घालविता आहात. इथल्या पिकनिक टाईप कल्चर ला ऑफिस टाईप कल्चर बनविण्याचा तुमचा बेत सोडून द्या" अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया मला मिळाल्या. आता "पिकनिक टाईप" कल्चर चा अतिरेक झाला की अशा कल्चरचे समर्थक देखील वैतागतात हे या धाग्यावरच्या बहुतांश प्रतिक्रियांवरून दिसून येईल. सबब हा धागा उडविण्याची कुणीही मागणी करू नये. उलट हा धागा आता या संकेतस्थळावर थिल्लरपणाचा अतिरेक झाला आहे आणि ते थांबविण्याची गरज असल्याची आठवण करून देत राहील. :) आपल्या तेजस्वी लेखणी/टंकणीने मिसळपावचे स्वरूप आमुलाग्र बदलणार्‍या प्रेषीतासमान भासणार्‍या चेसुगु यांची प्रचंड कोंडी होत आहे असे निरिक्षण नोंदवतो.. शुभेच्छा. अवांतर - या मतप्रदर्शनात वैयक्तीक टीका नाही... कारण तुम्हाला मी तुमच्या लेखन/प्रतिक्रीयांमधूनच ओळखतो वैयक्तीक ओळख नाही तुम्हाला याआधी कुणी सांगीतले आहे की नाही माहित नाही, पण मी सांगतो.. राग नसावा... यू आर सो फुल्ल ऑफ युरसेल्फ.. अ‍ॅन्ड व्हॉट अ वेस्ट ऑफ स्पेस...

In reply to by अर्धवट

यू आर सो फुल्ल ऑफ युरसेल्फ.. अ‍ॅन्ड व्हॉट अ वेस्ट ऑफ स्पेस... =)) =)) =)) या प्रतिक्रियेला pratisad of the year देण्याची विनंती समस्त पिडीत मिपाकारांकडून करण्यात येत आहे