लाजरे राहूलजी!
चला! जे कदाचीत गांधी घराण्यात जन्मून, सत्ताधारी गांधी घराण्याची कॉंग्रेस पायाशी असून देखील जे शक्य झाले नाही, ते आज मायावतीने केले.... राहूलजींना अटक करून एका क्षणात हिरो केले! किमान प्रयत्न तरी केला आहे.
कारण आपण सर्वांनी वाचले असेलच. तरी देखील थोडक्यात सांगायचे झाले तर, बट्टा पसरल या उत्तर प्रदेशातील गावात शेतकर्यांच्या काळजीने राहूलजी धडकले. सध्याच्या राजकारण्यांच्या ("माझ्या मधे तू येयचे नाही,तुझ्यामध्ये मी येणार नाही" या) अलिखित कराराप्रमाणे त्यांच्या येण्यावर मुख्यमंत्री मायावतींनी बंदी घातली होती. तरी देखील हूल देत राहूल गेलेच! वास्तवीक तिथेच ते हिरो झाले असते. पण मायावतींनी त्यांना अटक करून खातरजमा केली.
खरं म्हणजे राहूलजींचे हे खेळण्याबागडण्याचे दिवस आहेत. म्हणजे कसं, की मुंबई हल्ल्याच्यावेळेस ते अजिबात न डगमगता नाचात मग्न होते. तसेच त्यांनी शेतकर्यांच्या बाबतीत करायला हवे होते. पण तसे होणे नव्हते. आणि मग उत्तरप्रदेशातील विरोधी पक्षाच्या राज्यातील शेतकर्यांचे हाल पाहून त्यांना एकदम भारतीय असल्याची लाज वाटली... म्हणजे आजपर्यंत त्यांना महाराष्ट्र, आंध्र वगैरेत शेतकर्यांचे काय हाल झालेत/होत आहेत याची कल्पनाच नव्हती का? आणि हो एकामागोमाग एक भ्रष्टाचाराची लफडी, कलमाडी सारखे नग दिवे लावत असताना, त्यात भारतीय असण्याची लाज वाटण्यासारखे काही नव्हते? (याच राहूलजींना,२६/११ नंतर केवळ उत्तर भारतीयांनी मदत केल्याचे आठवल्याचे या संदर्भात आठवले...).
अगदी आणिबाणीच्या काळातही तमाम विरोधी नेत्यांनी स्वतःचे आणि जनतेचे हालहाल होत असताना देखील कधी भारतीय असण्याची लाज वाटली, असे म्हणल्याचे आठवत नाही. ज्या व्यक्तीकडे त्याच्या पक्षातले आणि त्याच्या पक्षाचे समर्थक "भावी पंतप्रधान" म्हणून बघतात त्याच्यातले "अभावी भारतीयत्व" बघताना आपण भारतीय म्हणून लाजावे का अशा नेत्यांची लाज बाळगावी का "माझ्या मना बन दगड" म्हणत गुमान बसावे?
वाचने
2980
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
राजपुत्र आहेत ते. त्यांना असे
शेतकऱ्यांचा प्रश्न काय आहे?
कुछ नही हो सकता इस देश
अहो ! त्याच्या कडे भारतियत्व
गप्प राहायचे ठरवले आहे ...
बाळलीला
हॅ हॅ हॅ