Skip to main content

अणु युध्द आणि भारत : कधी आणि का ?

लेखक वडिल यांनी गुरुवार, 23/12/2010 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
अणुयुध्दा बद्दल चर्चा जरी भयावह वाटली तरी ते एक सत्य आहे आणि नाकारता येणार नाहि. अणुयुध्द होणार आणि भारतीय भुखंडात ते भोगावे लागणार हे जवळ जवळ सत्य आहे. प्रश्व येवढाच आहे कि ते कधी आणि कसे ? भारताने किती हि शांती चा पुरस्कार करत अणुकार्यक्रम कार्यरत ठेवला तरी एके दिवशी सत्या ला समोरे जात...जे गरजेचे आहे ते करावे लागेल. अणुशस्त्रां मधे जेवढी गुंतवणुक होते आहे कि एके दिवशी ह्या गुंतवणुकीच्या रीटर्नस साठी तरी अणुयुध्द्द गरजेचे होइल. अणुभट्ट्या जरी उर्जे साठि वापरल्या तरी त्या अत्यंत धोकादायक असतात. फ्रांस आणि उत्तर अमेरीकेत अणुउर्जे च्या प्रकल्पां च्या सुरक्षे चा खर्च लक्षणिय आहे. हा खर्च गरीब देशांना झेपणारा नाहि.. त्यांना अजुन गरीब करण्याचे हे एक साधन आहे ( कारस्थान !!!) असा अनुमान आहे कि अणुयुध्द्दा ची सुरवात हि महासत्तां कडुन न होता.. एखाद्या गरीब राष्ट्रा कडुन होइल.. उदा..( उ कोरीया, पाकिस्तान, भारत, अफ्रिकेतील एखादा देश, इस्लामिक मिडल इस्ट ) प्रगत राष्ट्रे ह्या सर्व हालचालीं वर बारीक लक्ष ठेवुन आहेत. जर युध्द झाले तर त्याची झळ आपल्या प्रदेशा पर्यंत पोचु नये म्हणुन अमेरीका भरपुर गुंतवणुक करत आहे. शिवाय स्वत:च्या बाजार पेठा सुरक्षित ठेवण्या चा आटोकाट प्रयत्न करत आहे. इस्लामी आतंकवादाचा विमोड करणे व भारत आणि चीन ची प्रगती खुंटवत ठेवण्या साठि अशा युध्दाचा वापर होण्याची शक्यता आहे. जर असे युध्द भारतीय भुखंडात झाले तर ते महाशक्तिंच्या फायद्याचे ठरु शकते.. २०१२ च्या आसपास असे झाले तर जागतिक अर्थव्यवस्थे ची सुंठी वाचुन सर्दि जाइल !!

वाचने 13688
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

तुम्ही त्याना का छळताय. किती सुंदर माहिती ते देता आहेत अन काही अल्पसंतृष्ट लोक त्याना खिंडीत पकडत आहेत. ओ कुणाचे का असेनात वडील , तुम्ही लिहा हो.......

In reply to by वेताळ

वडिल वडिलकीच्या नात्याने माहिती देत असताना याचि शक्यता आहे. किती सुंदर माहिती ते देता आहेत अन काही अल्पसंतृष्ट लोक त्याना खिंडीत पकडत आहेत. शक्यता नाकारता येत नाही ओ कुणाचे का असेनात वडील याचि शक्यता मी व्यक्तीगत नाकारत नाही,

In reply to by वेताळ

तुम्ही डेंकालीच्या जंगलात पाऊल टाकल्यापासून हे बांदर दंगा करत होते. पण आता खुद्द वेताळाने तुम्हाला कवटीगुहेत येण्याचे आमंत्रण दिले आहे. तेंव्हा निश्चिंत होऊन तुमचे सर्वस्पर्शी लेखन चालू ठेवा.

माह्या राखीव कुरणात अनिर्बंध प्रवेश करून माझ्या हून जास्त प्रतिक्रिया जमविणाऱ्या वडीलधार्या मंडळीचा त्रिवार निषेध

काय गडबड चाललीय रे? झोपू द्या की जरा. हां !!! ते अणुयुद्ध सुरू झालं की मला उठवा बरं का? (कानात बोळे घालायला हवेत ना!!!)

हां !!! ते अणुयुद्ध सुरू झालं की मला उठवा बरं का? (कानात बोळे घालायला हवेत ना!!!) झोपायच्या अगोदर कानात बोळे घालून झोपु नका बर का. हाका ऐकु यायच्या नाहीत