Skip to main content

सामाजीक सवयी

लेखक शैलेन्द्र यांनी शनिवार, 11/12/2010 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील नुकत्याच उडालेल्या एका धाग्यावरिल एका प्रतिक्रीयेने एका झटक्यात मी १२-१५ वर्ष मागे गेलो, बुद्धीमत्ता वगैरे सोडा पण वेगवेगळ्या सामाजीक/भौगोलीक परिस्थीतील लोक किमान मागील पीढीपर्यंत तरी काही सवयी, गुण/अवगुन बाळगुन होते हे मान्य करायला हवे. बी एस्सीला असताना, कोकणात शैक्षणीक सहलीनिमीत्त आमचा सगळा वर्ग गेला होता. दापोली कृषी विद्यापीठ बघुन झाल्यावर केशवराजला गेलो. परत येता येता सपाटुन भुक लागलेली. खाली वाडीत मस्त जेवण झाले आणी आमच्या एका मित्राने ताटातच हात धुतले. यजमानांच्या चेहर्‍यावरची नाराजी सहज वाचता येत होती. मला फारसे काही वाटले नाही कारण सिन्नर/ संगमनेर भागातले आमचे सारे नातेवाइक हेच करायचे. आज तो प्रसंग आठवला तसा मी त्याचा परत विचार करायला लागलो. नगर जिल्हातील अतिशय श्रीमंत व घरंदाज घरातील तो मुलगा अशी सवय का बाळगुन होता? तसा मला कमलेश आठवला, त्यापेक्षाही त्याची आजी... कमलेश शेखावतच्या घरी एकदा गेलो होतो, खानदानी राजपुत.. दणदणीत जेवण झाल्यावर त्याच्या आजीने सरळ ताटात हात धुतले, इतकेच नाही ते पाणी पीवुन टाकले. त्यावेळी मी त्यावर काही प्रतिक्रीया देण्याचा प्रश्नच नव्हता. परतही तो विषय कधी आला नाही. आज विचार करता मी त्याचे मुळ शोधु लागलो. राजस्थानच्या रखरखीत अभाव्ग्रस्त वाळवंटातुन आलेल्या त्या आजी ताटात हात धुवुन ते पाणी पिवुन घेतात, यात अन्न वाया घालवु नये या विचाराइतकेच पाणी वाया जाउ न देणे हाही उद्देश आहे अस मला वाटल. नगरच्या एके काळच्या दुष्काळी प्रदेशात राहणारे माझे नातेवाईक आजही ताटात हात धुतात, व घरच महीला मंडळ त्याच पाण्याने लगेच ताट वाटी धुवुन टाकते. नळाखाली ताट धुण्याची चैन करणे तिथे आजही गरजेचे वाटत नाही. चार फुट खोद्ल की पाणी सापडणार्‍या कोकणात ही पध्दत चुकीची समजणे सहाजिकच आहे. मागिल पीढीपर्यंत तरी असे प्रत्येक समाज/ भौगोलीक गट स्वताचे वैशीष्ट - गुण-अवगुण(?) बाळगुन होते. कोकणातील/मारवाडातील अभावग्रस्त परिस्थीतीत वाढलेले कोकणस्थ/मारवाडी इतरांकडुन कंजुसपणाबद्दल टोमणे खात (कुठलाही मारवाडी थोडी कुवत आली की आधी पाणपोयी बांधतो,) . अती सुजलाम व संपन्न धरतीतुन आलेले फाळणीग्रस्त पंजाबी/ सिंधी, त्या परीस्थीतीतही खाण्या पिण्यात कसर करत नाही. शेतकरी कुटुंबातुन आलेला सातारा/ कोल्हापुरचा किंवा उत्तर प्रदेशचा माणुस मुंबैत आला की आधी आपला गावचा कोण आहे ते शोधतो. प्रत्येक पेशाला लागणारे विशीष्ट गुण तो व्यवसाय करणार्‍या ज्ञाती/ समाजांनी आपलेसे केले. जगातील सर्वोत्तम योध्दे समाज हे एकतर शेतकरी आहेत किंवा शिकारी. कारण या दोन्ही व्यवसायासाठी प्रचंड ताळमेळ व सामुहीक भान लागते, जे युध्दासाठीही लागते. जाट, मराठे, गुरखे, रामोशी ही काही उदाहरणे. माझा गॅरेजवाला जातीने सोनार आहे, लोखंडाचे काम करत असला तरी तो सोनाराच्याच काटेकोरपणे करतो. संपुर्णपणे शहरात वाढलेल्या त्याच्या मुलांमधे मात्र हा गुण नाही. शिंपी/ सोनार हे समाज त्यांच्या काटेकोरपणाबद्दल ज्ञात होते. हे गुण बहुदा व्यवसायातुनच आले असावे. जेंव्हा समाज जातींच्या, व अनुषांगीक व्यवसायांच्या कप्प्यात बंदीस्त होता तेंव्हा हे गुण जोपासले जायचे, एका पिढीतुन दुसर्‍या पिढीत पाझरत जायचे. या प्रकारे हजारो वर्ष न बदललेल्या ग्रामीण भारतीय समाजाने एक साचेबध्द रुप घेतले. याला पहीला धक्का बसला तो यांत्रीकीकरणाने व शहरीकरणाने.. जेंव्हा आपण एखादा गुणविषेश एखाद्या समजाला/जातीला चिकटवतो तेंव्हा तो वांशिक नसुन परिस्थीतीजण्य आहे हे आपण ध्यानात घ्यायला हवे. हल्लि शहरातील बर्‍याचशा एकजीनशी वातावरणात वाढताना, आपले हे गुण विरघळत चाललेत, आणि आपल्या पुढील आयुष्यासाठी व्यवसायसाठी योग्य गुण आपण आत्मसात करतोय. त्यामुळे हळुहळु पण निच्छितपणे ज्या गुणांचा आपल्याला अभिमान आहे वा इतरांच्या ज्या सवयींबद्दल आपण नाके मुरडतो, त्या नाहीशा होवुन एक नवा काहीसा एकजीनसी समाज उदयास येणार आहे हे नक्कि.

वाचने 15317
प्रतिक्रिया 95

प्रतिक्रिया

In reply to by अवलिया

क्षीण प्रयत्न कशाला म्हणताय .... ठ्सठशीत देखावा म्हणालात तरी हम डरता नाय किस्को ;) अपुनकी हैइच वट =))

In reply to by पर्नल नेने मराठे

हांग आशी ! आजकाल चुचु आज्जी लैच फार्मात आहे. पौष्टिक लाडूंचे सेवन केल्याचा परिणाम म्हणावा काय?

In reply to by पर्नल नेने मराठे

आपण ग्रॅज्युएट झालोय, हे दाखवायचा यशस्वी प्रयत्न. तसेच आपण ज्याला शिकवलं ते कुठल्या कुठ्ठ पोचले हे दाखवणारी यशस्वी जाहीरात.

आपण हाताने जेवतो म्हणून देतात फिंगर बाउल. पण जे सुरी, काटे , चमच्याने जेवतात त्यांना हात धुतले काय आणि नाही काय सारखेच.

In reply to by लतिका धुमाळे

मग ही प्रथा कुठल्ली? कारण गोरे लोक हातात चमच्या, काटे अन सुऱ्या घेऊन जेवतात...मग त्या लिंबाच्या पाण्याचं काय?

In reply to by शैलेन्द्र

हॅ हॅ हॅ ...किंवा हातात एवढे शस्त्र धरू धरू बोटं दुखून येत असतील म्हणून जरा जीवाला बरं वाटावं म्हणून गरम लिंबाच्या पाण्यात बोटं बुचकळून काढायची...

ताटात किंवा बाऊलमध्ये हात धुणे ही सवय नक्की कशी (गरजेतून की विलासातून) आली असावी, हा गोंधळाचाच मुद्दा आहे. वाळवंटी किंवा दुष्काळी प्रदेशातील पाण्याच्या दुर्भीक्ष्यामुळे लोकांनी हा पर्याय निवडला असावा, असे मानल्यास राजे-रजवाडे आणि श्रीमंतांकडच्या मेजवान्यांतही ही पद्धत दिसून येते. राजस्थानी जेवणात आजही शेवटी असे गरम पाण्याचे बाऊल येतात तर हैदराबादकडे शाही मेजवान्यांत किंवा बड्या हॉटेलांत हेच पाणी गुलाबाचा अगर वाळ्याचा सुगंध असलेले असते. महाराष्ट्रात मात्र फार पूर्वी सर्वसामान्य घरांत वेगळी पद्धत असे. लोकांची जेवणे झाल्यावर मोरीवर हात धुऊन आंचवल्यावर यजमान स्वतः ते हात पुसून कोरडे करत असत आणि पाहुण्यांच्या हातात तांबूल देत असत. पेशव्यांच्या आणि सरदारांच्या जेवणावळीत बड्या असामींच्या हातावर चांदीच्या झारीतून उन उन सुगंधी पाणी घातले जाई. ते गोळा करण्यासाठीही चांदीचे घंगाळे असे. यानिमित्त मला माझ्या घरातील शिस्त आठवली. आजारी व्यक्ती व बाळंतीण यांनाच केवळ ताटात हात धुण्याची परवानगी होती. लहान मुलांनी तसे केल्यास 'ताटात हात धुवायला काय बाळंत झालायस का?' असे वडीलधारे फटकारत असत. कोकणात, तसेच घाटावरील खेड्यांत अजुनही एक चांगली प्रथा आहे. घरात येण्यापूर्वी हातापायावर घेतलेले पाणी किंवा जेवणानंतर हात धुतलेले पाणी फुलझाडांत किंवा आळू-कर्दळीच्या वाफ्यांत सोडलेले असते. त्यामुळे छोटेखानी बाग कायम फुललेली राहते.

In reply to by योगप्रभू

हातावर चांदीच्या झारीतून उन उन सुगंधी पाणी घातले जाई. ते गोळा करण्यासाठीही चांदीचे घंगाळे असे. आम्च्या गावात "राजधानी" नावाच्या रेस्तरामध्येही अशीच पध्दत आहे. जेवण झाले कि त्यांचा माणुस येउन हातावर वॉर्म पाणी घलतो.

मला हा प्रश्न पडतो की फिंगरबोल मधल्या कोमट पाण्यात बोटे धुता येतील पण जेवण झाल्यावर खळखळून चूळ भरण्याची सवय जी लहानपणापासून लावलेय ती योग्य नव्हे काय.. त्या काड्या घेउन दात कोरत कॅव्हीटी वाढवणे कधीही अयोग्यच.. तुम्ही रोमात असा नाहीतर कुठे, तुमच्या आरोग्याला जे योग्य वाटतं ते तुम्ही करायलाच हव, कुठलाही न्यूनगंड न ठेवता.. मी तर समोरच्यालाच शिकवतो अशावेळी चूळ भरणं कसं योग्य ते, तो अमेरिकन असू दे वा जर्मन वा भारतीय.. ;)

आमच्याकडे प्रातर्विधी साठी वढ्याव गेल्याव बोचा साफ करायाला दगड ( नर्मदेतल्या गोटा असतो तसा त्यातल्या त्यात गुळगुळीत) व झाडीत गेल्याव झुडपाचे पान वापरीत. किंबहुना प्रातर्विधी करणे याला 'झाड्याला' जाणे असच म्हंत्यात. त्याची थोडी संस्कारित आवृत्ती म्हणजे 'परसाकडे' जाणे असेच म्हटले जाते. पण त्यासाठी टमरेल वापरले जाते. बर्‍याचदा ते गळके असते. म्हणजे शेवटी त्यातले पाणी फक्त शास्त्रापुरतेच रहाते. पाटी पुसायला त्याच्यावर थुकुन हातानी मंग सारवायचे; नंतर त्या हाताचा सोताबी वास घ्यायचा व दुसर्‍याला बी द्यायचा. कधी पाटी गांधीटोपीनी बी पुसायची. तीच डोक्याव परत घालायची. हे सर्रास असे त्यात कुणालाच वावगे वाटत नसे. आमचे देव गुरुजी या सवयींवर बोलत असत पण ते स्वतः तंबाखु खाउन वर्गात कोपर्‍यातच थुंकत. वर्ग शेणाने सारवलेले असायचे. त्यात थुंकी मिसळून जात असे. सर्व॑ पोर मिळुन नंत॑र वर्ग सारवत असत. पोर जमीनीवरच बसत व गुरुजी खुर्चीत. जेवणात कशावर काय ही भानगड नसे बाजरीची भाकरी व कांदा चटणी लसुण वा कोड्यास फडक्यात गुंडाळलेले असे. शिष्टाचारा बाबत आमच्या गुरुजींचे ठरलेले उदाहरण म्हणजे धनगर बसले जेवाया आन ताका संग शेवया || वर्गातल्या धनगर मुलांनाही त्याचे काही वाटत नसे. खंडीच्या वरनात मुतायची सवंच आस्ती काही लोकान्ला तव्हा मंग गुरुजी बोलनारचा ना? असो गेले ते दिन गेले पण प्रवासात वा संकट प्रसंगी पुर्वाश्रमीचे अनुभव उपयोगाला येतात. अवांतर- विधीमहाविद्यालय म्हन्ल्याव नेमक कंचा विधी करत्यात हा प्रश्न आमाला पडत असे

In reply to by प्रकाश घाटपांडे

वेडात मराठे वीर दौडले सात या गाण्यातली एक ओळ सहज आठवली दगडांवर इथल्या अजुन रंग रक्ताचा... :)

In reply to by प्रकाश घाटपांडे

वेलकम ब्यॅक, प्रकाश!

एका छोट्या शहरात सकाळी भरणारे / चालणारे 'लॉ कॉलेज' सुरू होणार होते. पण त्याची बातमी वर्तमानपत्रांत आली ती अशी: प्रातर्विधी महाविद्यालय उद्यापासून सुरू .... :)

In reply to by sagarparadkar

भन्नाट... ठाण्यात एक प्रसिध्द "आय व्ही एफ" (कृत्रीम गर्भ्धारणा) तज्ञ आहेत. खुप वर्ष मुलं न झालेल्या एका स्त्रीला त्यांच्या प्रदीर्घ उपचारांनंतर जुळे झाले, त्याची पेपरात आलेली बातमी... "डॉ. ****** यांच्या अथक प्रयत्नाने महीलेस जुळे"