मिपावरील नुकत्याच उडालेल्या एका धाग्यावरिल एका प्रतिक्रीयेने एका झटक्यात मी १२-१५ वर्ष मागे गेलो, बुद्धीमत्ता वगैरे सोडा पण वेगवेगळ्या सामाजीक/भौगोलीक परिस्थीतील लोक किमान मागील पीढीपर्यंत तरी काही सवयी, गुण/अवगुन बाळगुन होते हे मान्य करायला हवे.
बी एस्सीला असताना, कोकणात शैक्षणीक सहलीनिमीत्त आमचा सगळा वर्ग गेला होता. दापोली कृषी विद्यापीठ बघुन झाल्यावर केशवराजला गेलो. परत येता येता सपाटुन भुक लागलेली. खाली वाडीत मस्त जेवण झाले आणी आमच्या एका मित्राने ताटातच हात धुतले. यजमानांच्या चेहर्यावरची नाराजी सहज वाचता येत होती. मला फारसे काही वाटले नाही कारण सिन्नर/ संगमनेर भागातले आमचे सारे नातेवाइक हेच करायचे. आज तो प्रसंग आठवला तसा मी त्याचा परत विचार करायला लागलो. नगर जिल्हातील अतिशय श्रीमंत व घरंदाज घरातील तो मुलगा अशी सवय का बाळगुन होता? तसा मला कमलेश आठवला, त्यापेक्षाही त्याची आजी... कमलेश शेखावतच्या घरी एकदा गेलो होतो, खानदानी राजपुत.. दणदणीत जेवण झाल्यावर त्याच्या आजीने सरळ ताटात हात धुतले, इतकेच नाही ते पाणी पीवुन टाकले. त्यावेळी मी त्यावर काही प्रतिक्रीया देण्याचा प्रश्नच नव्हता. परतही तो विषय कधी आला नाही.
आज विचार करता मी त्याचे मुळ शोधु लागलो. राजस्थानच्या रखरखीत अभाव्ग्रस्त वाळवंटातुन आलेल्या त्या आजी ताटात हात धुवुन ते पाणी पिवुन घेतात, यात अन्न वाया घालवु नये या विचाराइतकेच पाणी वाया जाउ न देणे हाही उद्देश आहे अस मला वाटल. नगरच्या एके काळच्या दुष्काळी प्रदेशात राहणारे माझे नातेवाईक आजही ताटात हात धुतात, व घरच महीला मंडळ त्याच पाण्याने लगेच ताट वाटी धुवुन टाकते. नळाखाली ताट धुण्याची चैन करणे तिथे आजही गरजेचे वाटत नाही. चार फुट खोद्ल की पाणी सापडणार्या कोकणात ही पध्दत चुकीची समजणे सहाजिकच आहे.
मागिल पीढीपर्यंत तरी असे प्रत्येक समाज/ भौगोलीक गट स्वताचे वैशीष्ट - गुण-अवगुण(?) बाळगुन होते. कोकणातील/मारवाडातील अभावग्रस्त परिस्थीतीत वाढलेले कोकणस्थ/मारवाडी इतरांकडुन कंजुसपणाबद्दल टोमणे खात (कुठलाही मारवाडी थोडी कुवत आली की आधी पाणपोयी बांधतो,) . अती सुजलाम व संपन्न धरतीतुन आलेले फाळणीग्रस्त पंजाबी/ सिंधी, त्या परीस्थीतीतही खाण्या पिण्यात कसर करत नाही. शेतकरी कुटुंबातुन आलेला सातारा/ कोल्हापुरचा किंवा उत्तर प्रदेशचा माणुस मुंबैत आला की आधी आपला गावचा कोण आहे ते शोधतो.
प्रत्येक पेशाला लागणारे विशीष्ट गुण तो व्यवसाय करणार्या ज्ञाती/ समाजांनी आपलेसे केले. जगातील सर्वोत्तम योध्दे समाज हे एकतर शेतकरी आहेत किंवा शिकारी. कारण या दोन्ही व्यवसायासाठी प्रचंड ताळमेळ व सामुहीक भान लागते, जे युध्दासाठीही लागते. जाट, मराठे, गुरखे, रामोशी ही काही उदाहरणे.
माझा गॅरेजवाला जातीने सोनार आहे, लोखंडाचे काम करत असला तरी तो सोनाराच्याच काटेकोरपणे करतो. संपुर्णपणे शहरात वाढलेल्या त्याच्या मुलांमधे मात्र हा गुण नाही. शिंपी/ सोनार हे समाज त्यांच्या काटेकोरपणाबद्दल ज्ञात होते. हे गुण बहुदा व्यवसायातुनच आले असावे. जेंव्हा समाज जातींच्या, व अनुषांगीक व्यवसायांच्या कप्प्यात बंदीस्त होता तेंव्हा हे गुण जोपासले जायचे, एका पिढीतुन दुसर्या पिढीत पाझरत जायचे. या प्रकारे हजारो वर्ष न बदललेल्या ग्रामीण भारतीय समाजाने एक साचेबध्द रुप घेतले.
याला पहीला धक्का बसला तो यांत्रीकीकरणाने व शहरीकरणाने..
जेंव्हा आपण एखादा गुणविषेश एखाद्या समजाला/जातीला चिकटवतो तेंव्हा तो वांशिक नसुन परिस्थीतीजण्य आहे हे आपण ध्यानात घ्यायला हवे. हल्लि शहरातील बर्याचशा एकजीनशी वातावरणात वाढताना, आपले हे गुण विरघळत चाललेत, आणि आपल्या पुढील आयुष्यासाठी व्यवसायसाठी योग्य गुण आपण आत्मसात करतोय. त्यामुळे हळुहळु पण निच्छितपणे ज्या गुणांचा आपल्याला अभिमान आहे वा इतरांच्या ज्या सवयींबद्दल आपण नाके मुरडतो, त्या नाहीशा होवुन एक नवा काहीसा एकजीनसी समाज उदयास येणार आहे हे नक्कि.
वाचने
15317
प्रतिक्रिया
95
मिसळपाव
प्रतिक्रिया
आप्ल्याला ईन्ग्लिश येते हे
In reply to ओके. by अवलिया
क्षीण प्रयत्न कशाला म्हणताय
In reply to आपली मुख्यमंत्र्यापर्यंत वट by अवलिया
हांग आशी ! आजकाल चुचु आज्जी
In reply to क्षीण प्रयत्न कशाला म्हणताय by पर्नल नेने मराठे
हांग अश्शी!!! =))
In reply to क्षीण प्रयत्न कशाला म्हणताय by पर्नल नेने मराठे
वा वा..
In reply to क्षीण प्रयत्न कशाला म्हणताय by पर्नल नेने मराठे
आपण ग्रॅज्युएट झालोय, हे
In reply to त्या काळात ग्रॅ़ज्युएट झाल्या by पर्नल नेने मराठे
भायेर हाटेलात जाउन खाउ शकतो
In reply to त्या काळात ग्रॅ़ज्युएट झाल्या by पर्नल नेने मराठे
फिंगर बाउल
मग ही प्रथा कुठल्ली? कारण
In reply to फिंगर बाउल by लतिका धुमाळे
जेवल्यावर बोट थंड पडतात,
In reply to मग ही प्रथा कुठल्ली? कारण by शिल्पा ब
हॅ हॅ हॅ ...किंवा हातात एवढे
In reply to जेवल्यावर बोट थंड पडतात, by शैलेन्द्र
बाकी काही असो, थंडीत, त्या
In reply to हॅ हॅ हॅ ...किंवा हातात एवढे by शिल्पा ब
बाउलमधे बुचकळायला बोट वळवळ
In reply to बाकी काही असो, थंडीत, त्या by शैलेन्द्र
एकदा का झा लं प्रत्येक बोट
In reply to जेवल्यावर बोट थंड पडतात, by शैलेन्द्र
ही सवय नक्की कशामधून आली असावी?
हातावर चांदीच्या झारीतून उन
In reply to ही सवय नक्की कशामधून आली असावी? by योगप्रभू
फिंगरबोल..
विधी
वाचुन मळमळतेय
In reply to विधी by प्रकाश घाटपांडे
वाचुन मळमळतेय .
In reply to वाचुन मळमळतेय by पर्नल नेने मराठे
छान! छान!
In reply to विधी by प्रकाश घाटपांडे
सॉरी.. पण नाही आवडली
In reply to छान! छान! by योगप्रभू
व्वा!!
In reply to विधी by प्रकाश घाटपांडे
अवांतर- विधीमहाविद्यालय म्हन्ल्याव नेमक ...
भन्नाट... ठाण्यात एक
In reply to अवांतर- विधीमहाविद्यालय म्हन्ल्याव नेमक ... by sagarparadkar