बर्याच दिवसांपासून हि गोष्ट खटकतच होती.. "माझा", "आयबीएन", "२४ तास" आदी मराठी वृत्तवाहिन्यांवर ज्या प्रकारे मराठीचे धिंडवडे काढले जात आहेत ते पाहून ऊबग आला आहे.. विशेषतः क्रिडाविषयक, त्यातही क्रिकेटविषयक बातम्या देताना या वाहिन्यांचे ईंग्रजीचे काय प्रेम ऊफाळून येते कुणास ठाऊक.. मराठीत अगदी छान प्रतिशब्द असताना यांना ईंग्रजाळलेले मराठी बोलण्यात फार मोठेपणा वाटत असावा.. पण स्वतःला 'ग्लोबल' दाखविण्याचा यांचा केविलवाणा प्रयत्न बघून हसावे कि रडावे हेही कळत नाही..
आता कालची एक बातमी पहा..वरील ऊल्लेखलेल्यापैकी एका वृत्तवाहीनीवरील ही बातमी :मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सेंच्युरीजची हाफ सेंच्युरी करण्याची संधी अश्या हेडलाईननंतर पुढे तर कहर होता.. सचिन तेंडुलकरच्या कारकीर्दीविषयी एका बाईच्या गोड आवाजात पुढीलप्रमाणे वर्णन होते - सचिनने आतापर्यंत १७१ टेस्ट्स खेळल्या असून त्याने १४ हजार २४० रन्स केल्या आहेत. त्यात त्याने ४९ सेंच्युरीज झळकावल्यात, ६ डबल सेंच्युरीज अन ** ईतक्या हाफ सेंच्युरीजही सचिनच्या नावावर आहेत. सध्या जगातील कुठलाही बॅट्समन सचिनच्या जवळपास नाहीये, जवळपास सर्वच बोलर्सच्या नाकीनऊ आणणार्या सचिनसाठी अहमदाबादचे हे स्टेडीयम जाम लकी ठरले आहे. २००५ साली याच मैदानावर न्युझीलंड विरुद्ध सचिनने डबल सेंच्युरी झळकविली होती. या मैदानावर २१७ हा सचिनचा हाईयेस्ट स्कोर आहे
अरे काय हे ? जेवताना सारखा सारखा खडा लागावा असे काहीसे वाटते. हे लोक त्रयस्थपणे आपल्या बातम्यांचे सादरीकरण कसे होतेय हे बघतच नाही का ? क्रिकेटविषयक बातम्या बघताना अक्षरशः वीट येतो.. 'कसोटी सामना' 'गोलंदाज' 'फलंदाज' 'धावा' 'शतके' 'द्विशतके' 'अर्धशतके' 'फलदायी' 'सर्वोत्तम' 'धावसंख्या' हे शब्द मराठी बातमी ऐकताना किंवा वाचताना चांगलेच वाटतात ना ? मग हे लोक ऊथळपणाचे ईतके प्रदर्शन का करतात ? 'मनसे'सारखा मराठीप्रेमी पक्षही ईथे का गप्प आहे तेही कळत नाही.. मी ह्या वृत्तवाहिन्यांच्या वेबसाईटवरही ह्या गोष्टीकडे लक्ष वेधले, पण माझ्या भावना त्यांच्यापर्यंत पोचल्याच नाहीत असे वाटते.. मिपाकरांना याविषयी काय वाटते हे जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न, न जाणो यातून काहीतरी मार्गही निघेल व ह्या वृत्तवाहिन्या स्वत:मध्ये बदल करुन घेतील ही एक वेडी आशा ठेवून हा लेखनप्रपंच..
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहाहा
अहो, नका बघत जाऊ इतक्या तपशिलात वाहिन्या. उगा का जिवाला त्रास करून घ्यायचा? हेडलाईन पहाव्यात, त्यातून जितकी बातमी कुणालाही कळते तेवढीच त्यांनाही कळलेली असते. बाकी सारे तपशील असतात.
सहमत
महत्त्वाचा प्रश्न आहे खरा.
कर्णा,
In reply to सहमत by आजानुकर्ण
तुला पहिल्याच वाक्यातली "बर्याच दिवसांपासून हि गोष्ट खटकली" नाही का?
बाकी हाफ सेंचुरी, रन्स, बॅट्समन, बॉलर्स, इ शब्द मला मराठीत नॉर्मल वाटतात. लकी हा शब्द मी मराठीत वापरत नाही. बाकीच्या इंग्लिश शब्दांची सामान्य रूपं करून मी त्यांना मराठी बनवून टाकते.
अरेऽऽ.....
In reply to कर्णा, by ३_१४ विक्षिप्त अदिती
अरे शुध्दीचिकित्सक मॉड्युलांनो :D
शांत व्हा..शांत व्हा . श्री./सौ./कु. (जे काय असेल ते राव...) पंख ह्यांनी मराठीत विंग्रजी शब्दांच्या खिचडीविषयी हा लेख लिहिलाय असं नाय काय वाटत? :)
(आता, जर का माझ्या वाचण्यातून त्यांच्या लेखातलं सुद्दलेकनावरचं भाष्य सुटलं असेल तर आपलं काऽऽय बा,.....सुमडीत माघार :) )
तुम्ही
तुम्ही उल्लेख केलेला परिच्छेद वाचला तर असं वाट्लं की हि माझ्या आसपास बोलली जाणारी मराठी आहे. हिच गोष्ट मला सांगाय्ची असती तर मी सुद्धा अशीच सांगितली असती. त्यांचं मराठी हे बोली - बोलल्या जाणा-या मराठीच्या जवळ्पासचं असतं असं मला वाटतं.
तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण मनसे किंवा इतर पक्ष या गोष्टित लक्ष घालायची शक्यता फार कमी, त्यांच्याकडे सध्या भाषाविषया पेक्षा गणितीय आकडेमोड (पक्षी- घोडेबाजार) विषय जास्त महत्वाचा आहे.
आणि नंतर सुद्धा जर त्यांनी ह्या गोष्टित लक्ष घालायचं ठरवलं तर त्यांना ' षुध मराटी क्से बोलवावे याचे कलास काढवावे लागतील''
म्हणुन श्री. श्रा.मो. म्हणतात तसं - ह्या गोष्टी फार गांभिर्यानं घेउ नका, आपली मराठी एवढी नाजुक नाही की अशा फुटकळ घट्नांमुळे गडबडुन जाईल.
तपशिलात पाहायचंच असेल तर - बदनाम मुन्नी किंवा वाजलेल्ले बारा किंवा आलेली अप्सरा आणि उभ्या रेल्वे वरुन आडवे जाणारे रा.रा. मा. श्री. रजनीकांत असे पुष्कळ पर्याय उपलब्ध आहेत, ते पहा.
आणि सचिन पहायचा असेल तर प्रत्यक्ष मॅच पाहा, त्याचा खेळ कोणत्याही भाषा, वाहिन्या या सर्वांच्या पलिकडचा आहे. त्याच्या खेळाचं मिपा वरच्या जेपींनी केलेलं वर्णन या निवेदकांना वाचायला दिलं ना तर फेफरं येउन बोबडी वळेल त्यांची.
हर्षद
इंग्रजी नव्हे, हिंदी
प्रसार माध्यमांनी मराठी बिघडवली हे खरे, पण त्याचे कारण इंग्रजी हे नसून हिंदी हे आहे.
मी सहमत आहे
मी पंख ह्यांच्याशी सहमत आहे. कोणच्याही कामात कस जोपासला पाहीजे असे वाटते. शुद्ध मराठी बोलणारी लोकं आहेत. जरा शोधले तर सापडतील. सचिन ची फलंदाजी आवडते कारण त्यात क्वालीटी ;) आहे. मराठीत छान सोपे शब्द आहेत, उगाचच भेसळ काय़
मी ह्या वृत्तवाहिन्यांच्या
मी ह्या वृत्तवाहिन्यांच्या वेबसाईटवरही ह्या गोष्टीकडे लक्ष वेधले
रादर संकेतस्थळावर लक्ष वेधले असते तर फरक पडला असता, नाही का?
पंखजी, इतरही भाषांचे प्रवाह
पंखजी,
इतरही भाषांचे प्रवाह सामावून घेउन मराठी वाहती ठेवतायत ते!;)
काहीही म्हणा पण अहमदाबादचे हे स्टेडीयम जाम लकी ठरले आहे हे वाचून जाम हसू आले.
वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रं
ह्यांची भाषा, सामान्य ज्ञान याबद्दल एकंदरीत आनंदच आहे. गूगलच्या जमान्यात 'स्टार माझा'चे बातमीदार दोह्याला दुबईत नेऊन वसवतात आणि लोकसत्ता अमेरिकेतील निकालांवर भाष्य करताना उमेदवार स्त्री आहे की पुरुष, हे पाहण्याचेही कष्ट घेत नाही.
उदा. -
भळभळता पराभव..
ख्रिस्तिन ओडोनिल : कट्टरपंथी टी पार्टीचे लोकप्रिय उमेदवार. डेलवेअर सिनेटच्या जागेवर त्यांना जोरदार मार खावा लागला.
कार्ली फिओरिना : ह्यूलेट-पॅकार्ड अर्थात ‘एचपी’ या जगद्विख्यात कंपनीचे हे माजी कार्यकारी अधिकारी कॅलिफोर्नियातून पराभूत झाले.
एवढे प्रामाणिक प्रयत्न ह्या
एवढे प्रामाणिक प्रयत्न ह्या मराठी मीडीयाकडुन होत आहेत्,त्यांना असे भाषेच्या चुकीमुळे कमी लेखु नये.
काही वृत देणा-या पत्रकार कौतुक करावे ईतके छान आहेत.