मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझा वाढदिवस (शीघ्र मदत हवी आहे).

इंटरनेटस्नेही · · काथ्याकूट
दिनांक २६ ऑक्टोबर २०१० रोजी माझा बावीसावा वाढदिवस आहे. मात्र त्या दिवशी अंगारकी असल्याने बहुतेक मित्र मैत्रीणींचा उपवास असण्याची शक्यता विचारात घेऊन तो मी २४ ऑक्टोबर २०१० रोजी साजरा करण्याचे ठरविले आहे. आम्ही एकुण ६ मुले/मुली सर्वचजण सुमारे १८ ते २४ वयोगटातील आहोत. [एक लहान मुलगा आहे, पण त्याला पिटाळता येईल लवकर ;)] केक आणि बिर्याणी असा बेत केला आहे. या दिवशी खेळण्यासाठी काही धम्माल पार्टी गेम्स (आमच्या वयाला अनुसरुन) ची माहिती देण्याची नम्र विनंती मी याद्वारे मिपाकरांना करतो. तसेच पार्टी मुड तयार करण्यासाठी काही लेटेस्ट गाण्यांची देखील नावे सुचवावीत ही नम्र विनंती, (आम्ही जनरली जुनी गाणे ऐकत असल्याने आमचे या बाबतीतील नॉलेज हे फारच तोकडे आहे.) आपल्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत, इंट्या.

वाचन 12674 प्रतिक्रिया 0