http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=10…
लोकसत्तेतील ही बातमी वाचण्यात आली. हरबन्ससिंग नामक कुणी काँग्रेसी नेत्याने रेल्वे क्रॉसिंगपाशी धिंगाणा घातला. त्याला कुठेतरी जायचे होते. आणि रेल्वे फाटक बंद असल्यामुळे दोन तीन वाहने पुढे उभी होती. त्याने आपल्या सुरक्षारक्षकांच्या मदतीने त्या लोकांना वाहने हटवायला सांगितली. त्यांनी असमर्थता दाखवल्यामुळे धमक्या, शिवीगाळ वगैरे प्रकार केले.
मंत्री वगैरे हिंडतात तेव्हा सामान्यांचे हाल होतात हे आता नवीन नाही. पण असले धमकावणे वगैरे जरा जास्तच, युपी बिहार स्टाईलचे वाटते.
हा कोण असा नेता आहे जो मुंबईत असे वागू धजतो? ह्याची खूप वट वगैरे आहे का? कृपाशंकर सिंगाचा हा नातेवाईक आहे असे ऐकून आहे.
ह्याला ह्या प्रकरणी शिक्षा होईल का यथावकाश हेही प्रकरण "नियमित" करुन घेतले जाईल?
लोकशाही प्रकाराची थट्टाच चालली आहे. ह्यांच्यात आणि पूर्वीचे राजे, नबाब, सुलतान, जहागिरदार यांत काय फरक आहे? निवडणुका आल्या की ढोंगी भाषणे देणे एवढाच बह्धा.
वाचने
2309
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
अटक झाली की ह्या माणसाला.
जामिनावर सुटलाही तो....... -
तपशील
क्षमस्व
In reply to तपशील by तिमा
नाघडा करून मारा त्या महाप्रतापीला
महाराष्ट्राला यु पी , बिहार
परिचय.....
बातमी