शब्दांचा अर्थ हवा आहे..

विसोबा खेचर काथ्याकूट
राम राम, बर्‍याच दिसापासून या एका अप्रतिम गाण्यावर काही रसग्रहणात्मक लिहायचा विचार आहे.. गेले अनेक दिस हे गाणं मनी घर करून राहिलं आहे.. परंतु तत्पूर्वी, 'मेरे मौला करम हो करम...' या त्या गाण्यातील पहिल्याच ओळीचा नक्की अर्थ कुणी सांगितल्यास बरं होईल..'करम हो करम' म्हणजे काय? त्याचप्रमाणे या गाण्यातील 'बेकसो को सहारा मिले..' या ओळीतल्या 'बेकसो को..' या शब्दाचा नक्की अर्थ कुणी सांगितल्यास बर होईल.. उत्तराच्या प्रतिक्षेत.. (चांगल्या चांगल्या गाण्यांवर जीव ओवाळून टाकणारा) तात्या.

15 टिप्पण्या 6,299 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

टग्या टवाळ नवीन

छान आहे गाण मला तर आज ईद असल्या सारख वाट्ल आणि अर्थाच म्हणाल तर सुगावा लागताच आपणास सांगु.

विसोबा खेचर नवीन

खाकी नावाच्या चित्रपटात या गाण्याचा फार सुंदर उपयोग केला आहे. येथे पाहाता येईल.. परंतु हे गाणं ज्या मूळ उर्दू गाण्यावरून घेतलं आहे ते गाणं इथं ऐकता येईल.. त्यातला तर एकही शब्द समजत नाही.. परंतु सूर मात्र अस्वस्थ करतात.. धनंजयासारख्या भाषापंडिताने वा अन्य कुणी जाणकाराने मूळ उर्दू गाण्याचा अर्थ जरी संपूर्ण उलगडून सांगितला तरीदेखील मी आभारी राहीन.. (सुफी प्रेमी) तात्या.

धनंजय नवीन

In reply to by विसोबा खेचर

उर्दूचा फारसा अभ्यास नाही :-( पण घरी उर्दू-मराठी शब्दकोश आहे :-) गाण्याचे सुर छानच आहेत. मिश्र रागांबद्दल सांगितल्याबद्दल धन्यवाद.

विसोबा खेचर नवीन

In reply to by धनंजय

पण घरी उर्दू-मराठी शब्दकोश आहे
हरकत नाही.. शब्दकोशात पाहून कधी सवडीने अवश्य लिहा या गाण्याच्या अर्थाबद्दल.. उत्सुकता आहे.. तात्या.

विसोबा खेचर नवीन

In reply to by JAGOMOHANPYARE

मिश्र स्वर आहेत.. कोमल गंधार खास 'पिलू'तला आहे.. परंतु किरवाणी, पटदीपचेही काही रंग आहेत.. कॉम्पोझिशन जबराच आहे! (गाण्यातला) तात्या.

अवलिया नवीन

गल्ली चुकली का विसोबा ? अक्षरं, त्यांचे बनणारे शब्द, त्यांचे अर्थ, अर्थाचा अनर्थ असल्या चर्चा मिपावर कधीपासुन तुम्ही टाकायला लागलात? मनात येईल ते लिहुन टाकायचे, शब्द केवळ भारवाहक, मनातले विचार ते खरे असा तुमचा खाक्या ना? मग हे भलते डोहाळे कसे लागले? अजुनही वेळ गेलेली नाही ! सुधरा !! :) बाकी अर्थाबद्दल तज्ज्ञ लोक सांगतीलच काय ते ! आपली तेवढी कुवत नव्हती, नाही, नसेल.

अवलिया नवीन

In reply to by llपुण्याचे पेशवेll

काय सांगतोस ? मला वाटले गणेशोत्सवाच्या उन्मादात तात्या निधर्मी झाल्यामुळे नेटके लिहिण्याचा सराव करत असेल

प्रदीप नवीन

सरकारे मदिना, गर्दीश मे है तक़दीर, भंवर मे है सकिना' नौशाद व लता ह्यांनी दिलेले हे अप्रतिम गाणे इथे ऐका व पहा बेक़स : असहाय्य करम : दया