आईचे, बापाचे, मित्रांचे, बायकांचे त्यांच्या जिवंतपणी आम्ही दिवस घालत नाही.
कोणाचे प्रेम दाखवून द्यायचे असेल तर, मी ते 'वेळोवेळी', गरज असेल तेव्हा, तिथल्यातिथेच दाखवून देतो. एखाद्या विशिष्ट दिवसाची गरज वाटत नाही. मला कोणताही दिवस चालतो.
हलके घ्यालच :
आई वडिलांना पायातील वाहन बनविण्यासाठी अंगावरचे कातडे देखील काढून देईन, पण सध्या माझे आई-वडील एका नामांकित कंपनीचे जोडे वापरतात. त्यामुळे तूर्तास अंगावरची कातडी बचावून आहे. बरं मी जर का आज आईला, मला जन्म दिला म्हणून शुभेच्छा वगेरे द्यायला गेलो तर आईकडूनच एक सणसणीत कानाखाली बसेल.
प्रतिक्रिया
अनुमोदन!
कैच्या कैच!
योग्य आहे
हम्म
होय होय कालच मी वाचत होते .
त्यांच्या जिवंतपणी आम्ही दिवस घालत नाही.
वाहन की वहाण?
+१