Skip to main content

गोमातेला धुवावं की दोहावं?

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 16/04/2010 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
एक वेळ गोमातेला धुणं परवडलं पण दोहणं नको, असा सूर ग्रामीण भागात आढळतो.... परंतु आपण शहरी नेटकरी आहोत ना, तेव्हा गोमातेची शुचिता महत्त्वाचीच. आपली मराठी आपल्याला कामधेनू समान आहे.आजकाल जो तो येतो आणि नुसतं दोहत बसतो... मराठीची शुद्धता अजिबात पाळत नाही.नुसतं लिहीत जायचं.. खरडत रहायचं..उकार,वेलांटी, र्‍हस्व,दीर्घ म्हणून जे सोपे वाटेल ते ठोकून द्यायची सवय वाढलीय.यावर मिपाच्या सदस्यांनी नक्कीच मंथन करावं अशी अपेक्षा...

वाचने 5682
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

आयला सुदलेकन? चालुंद्या... पण आधी धुवुन मग दोहावं... नुसतंच शूत बसलं तर काय उपयोग? बिपिन कार्यकर्ते

दोहणेचा अर्थ काय? मला वाटले होते की 'धुवावे' आणि 'दोहावे' ही एकाच शब्दाची दोन रूपे आहेत. एक दुसर्‍याचे अज्ञानामुळे बनलेले अपभ्रष्ट रूप आहे. संदर्भः यासर अराफत = श्री हरिपाद. ;) नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

धुणे - तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ. दोहणे - धार काढणे. दूध काढणे.

In reply to by नितिन थत्ते

तेजोमहालय आठवला. ;) बिपिन कार्यकर्ते

मिपाची नीर्मिती याच मंथनातुन झाली आहे. एखादी साहित्य नीर्मिती होताना लेखक त्याचा इतिहास तपासतो मग लिहितो. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

निर्मितीचा "नि" ऱ्हस्व आहे. आपण दीर्घ लिहिला आहे. ;)

नाही तुमचा मुद्दा बरोबर आहे पण इथे अम्ही मिपा वर आलोय तेच मुळी मराठीशी परत नाळ जुळण्यासाठी. आमच्याकडे संदर्भाकरता मराठी पुस्त़कं पण नाहीत. १० वर्षं झाली मराठी पुस्तक वाचून. अशवेळी शुद्धलेखन कुठे तपासायचं? ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

In reply to by शुचि

>> अशावेळी शुद्धलेखन कुठे तपासायचं? उपक्रमचे / मनोगताचे सभासदत्व घ्या... :)

In reply to by शुचि

मराठीची कळकळ बाळगणारे अनेकजण येथेही असतील त्यांच्याकडून शुद्धलेखन तपासून घ्या. :)

In reply to by प्रियाली

किंवा विकीपिडीयावर बघा. बर्‍याच लेखनाचा कच्चा आणि पक्का माल तेथेच सापडतो म्हणे. सन्जोप राव इसे रोकिये महिंदरबाबू, क्या आप अपने तमाशे के लिये एक आदमी की जान ले लेंगे? शेरसिंग, राजू आदमी नही, जोकर है. ये जियेगा भी यही, मरेगा भी यही. मरेगा भी यही, जियेगा भी यही.

In reply to by प्रियाली

सहमत आहे. चुचु उर्फ पर्नल मराठे, माधुरी दिक्षित, सतिश असे अनेक मराठीचे गाढे व्यासंगी आपल्याला नक्की मदत करतील. बाहेरुन टंकुन आणुन इकडे युनिकोदात परावर्तीत करणे हा देखील एक उपाय आहे. ह्या विषयावर 'माननीय कोदा' हे आपल्याला मार्गदर्शन करु शकतील. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by नेत्रेश

......तसाही धुणे आणी दोहण्याचा संबंध काय?.... अवं, दासबोध वाचा, म्हंजी कळंल समदं नीट......... ...." कन्या जाली न्हातीधुती " .....वगैरे समर्थांनी समदं लई ब्येस सांगिटल्येलं हाय दासबोधामंदी......आमी लय वर्सं वाचला हाए...

मज्याशि मयत रि कर्न्र्र्र क? अदिती (मिपाच्या मुख्य पानावर बिन्डोक बिंबो न दिसल्यामुळे मिपाचे पहिले पान अधिक चांगले आणि सुखावह दिसत आहे.)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अच्रत! ;) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

धु धु धुवाह दो दो दोहावं धुहावं कि दोवाह हाव हाव..वाह वाह धु दो न्हातीधुती ????दुधो न्हाओ फलो फुलो

घ्या अजुन एक टि आर पी वाढवणारा धागा..

आता ही गोमाता जर भरल्या पिका अणीर्बंध घुसली तर शेतकरी दंडुका घेउन त्या गोमातेला फटका मारतो त्यावेळी त्या गोमातेच्या पोटात असलेल्या तेहतीसी कोटी देवांना लागत कस नाही? जि़ज्ञासुंणी सावरकरांचे विज्ञाणणीष्ठ निबंध वाचावे प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

सावरकरांचे विज्ञाणणीष्ठ निबंध.... जालावर आहेत का उपलब्ध? लायब्ररीत आहे समग्र सावरकर साहित्य, पण कोण दगदग करणार तीस किलोमीटर जाण्याची?

छान... आजच वाचू... ..."हायेत ना हित पघा"......मधील "हित" वर टिचकी मारली की जालपान उघडण्याची काय क्लुप्ती आहे बुवा? आंहाला हे जमले नाही अजून....

बहुतेकांनी उत्तम प्रतिसाद दिलाय. आभार!

आवो, भैये म्हशीलाही सोडत नाहीत ते गायीला काय सोडणार ? तुमी बसा धुवावं की दोहावं याचा काथ्याकूट करत!! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

शुद्धलेखन आणि संस्कृत हे संकेतस्थळावरील अमर विषय आहेत. :) 'शुद्धलेखनाचे नियम शून्य असावेत' हे शुभानन गांगल यांचे छोटेसे पुस्तक जरुर वाचा आणि वाचल्यानंतर आपले मत लिहा. मग मी नेहमीप्रमाणे शब्दांमधे शुद्ध आणि अशुद्ध काही नसते यावर पहिल्या चेंडुपासून खेळण्यास सुरुवात करीन. :) -दिलीप बिरुटे [शुद्ध शब्द,प्रमाणभाषा आणि संस्कृत यावर मारामार्‍या करुन थकलेला]

मराठीची शुद्धता अजिबात पाळत नाही.नुसतं लिहीत जायचं.. खरडत रहायचं..उकार,वेलांटी, र्‍हस्व,दीर्घ म्हणून जे सोपे वाटेल ते ठोकून द्यायची सवय वाढलीय. हम्म! असं म्हणता? अरे, यांची आणि चुचुची जरा भेट घडवून आणा रे कोणीतरी!!!! :) पिवळा डांबिस (शुद्धिचिकित्सक ऑलरेडी फोडून मोकळा झालेला!!)

In reply to by पिवळा डांबिस

ते समदं जाऊनद्या .. . दोन खरडी पडल्यात एकीचंबी उत्तर नाय ... काय चुकलं का काय मालक :) - हळवा डांबिस

डांबीसराव, ही चुचुची नावाची फटाकडी कोण म्हणायची??? कळू ध्या जरा...

In reply to by डॉ.श्रीराम दिवटे

अहो, अहो, असं लगेच फटाकडी वगैरे म्हणू नका हो! आम्हाला धाकट्या बहिणीसारखी आहे ती!!! पण भाषा मात्र जबरदस्त आहे... तुम्ही असं करा.... इथे मिपावरच सर्च करून बघा ना.... थोडं शोधल्याशिवाय काय मजा? :)

सावरकर म्हणतात गाय हा एक उपयूक्त पशू आहे